एका वीस वर्षांच्या वाघाच्या बच्च्यानं नुकतीच आपली नखं दाखवून आपल्या उज्ज्वल कारकीर्दीची सुरुवात केली आहे. उध्दवजी ठाकरे यांचे सुपुत्र आणि सन्माननीय श्री. बाळासाहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून एका यःकश्चित कादंबरीची जी रातोरात हकालपट्टी केली आहे ते पाहून मराठी माणसाची मान अभिमानानं पुन्हा एकदा उंचावली गेली आहे.
रोहिंटन मिस्त्री नावाच्या एका पारशाच्या 'सच अ लाँग जर्नी' या कादंबरीला २००७ मध्ये जेव्हा मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. (इंग्रजी) अभ्यासक्रमाचा एक वैकल्पिक भाग म्हणून निवडण्यात आलं तेव्हा आमचा वाघाचा बच्चा जरा वयानं लहान होता. यथावकाश मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये बी.ए. (इतिहास) करण्यासाठी त्यानं प्रवेश घेतला त्यानंतर कधीतरी बहुधा या कादंबरीत केल्या गेलेल्या ऐतिहासिक अपराधांची त्याला जाणीव झाली असावी. अगदी अशोकरावजी चव्हाणांनीही त्याची री ओढली आहे. आहात कुठे? कुणीतरी म्हटलंच आहे ना की
आणि त्या मिस्त्रीनं म्हणे असं म्हटलं आहे की या वीस वर्षांच्या मुलाबद्दल कीव, किळस की करुणा बाळगावी ते कळत नाही! त्याला म्हणावं तिथे कॅनडात बसून अशा गमजा करण्याऐवजी आमच्या गल्लीत ये, मग दाखवतो तुला आमचा बडगा! काय म्हणालात, आमचा बडगा फक्त आमच्याच गल्लीत दिसतो? थांबाच जरा, आमचा बछडा अजून थोडा मोठा होऊ दे, मग लावू पुन्हा अटकेपार झेंडा. आहात कुठे?
आमच्या आदित्यजींच्या कॉलेजातल्या मुख्याध्यापकांनी पण त्या शिंच्या मिस्त्रीचीच बाजू घेतली म्हणे. 'एकविसाव्या शतकात एका राजकीय पक्षानं आपल्यावरची टीका सहन करण्याची आणि आपल्या वागणुकीतून टीकाकारांना चोख उत्तर देण्याची प्रगल्भता दाखवायला पाहिजे. निव्वळ आपल्यावरच्या टीकेपोटी पुस्तकावर बंदी घालणं हे अयोग्य आहे', असं त्यांनी म्हटलं आहे म्हणे. आता तो मिस्त्री पण त्यांच्याच कॉलेजातला आणि त्यात पुन्हा जागतिक किर्तीचा वगैरे. मग त्यांना ही दादरची मुर्गी दाल बराबर वाटणार नाही तर काय? पण आमची मुर्गी नाही बरं, वाघ आहे वाघ!
वाचने
27614
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त बोचरे चिमटे!
कादंबरी वाचली आहे
In reply to मस्त बोचरे चिमटे! by यशोधरा
धन्यवाद
In reply to कादंबरी वाचली आहे by चिंतातुर जंतू
वा वा वा मज्जाच मज्जा चालु
हेच बोल्तो. चिंजं : उत्तम
In reply to वा वा वा मज्जाच मज्जा चालु by गणपा
या छोट्या ठाकर्यांना
युवराजांचे युवराज
In reply to या छोट्या ठाकर्यांना by Dhananjay Borgaonkar
आरे हो की. हे लक्षातच आले
In reply to युवराजांचे युवराज by विकास
युवयुवराज की युयुवराज असे
In reply to आरे हो की. हे लक्षातच आले by Dhananjay Borgaonkar
एक कौलच टाका ना मालक त्यासाठी
In reply to युवयुवराज की युयुवराज असे by अवलिया
आपल्याला
अगदी अगदी
In reply to आपल्याला by गुंडोपंत
तर काय?
In reply to अगदी अगदी by प्रियाली
त्यांचा आजा मोठा ठाकरे असता
In reply to तर काय? by गुंडोपंत
आजा मोठा ठाकरे?
In reply to त्यांचा आजा मोठा ठाकरे असता by Dhananjay Borgaonkar
गुंडोआजोबा बोलले म्हणजे हे
In reply to आपल्याला by गुंडोपंत
सहमत आहे. पण विधान सभेतुन की
In reply to गुंडोआजोबा बोलले म्हणजे हे by परिकथेतील राजकुमार
गावंढळ ...
In reply to सहमत आहे. पण विधान सभेतुन की by अवलिया
अरे डान्राव तुम्ही का? अरं
In reply to गावंढळ ... by छोटा डॉन
डॉनजी
In reply to गावंढळ ... by छोटा डॉन
आम्हीतर विचारनार होतो
In reply to सहमत आहे. पण विधान सभेतुन की by अवलिया
मिपा / उपक्रम
In reply to आम्हीतर विचारनार होतो by Nile
निवडणुक.
In reply to मिपा / उपक्रम by अवलिया
मग मुख्यमंत्री कसे होणार?
In reply to निवडणुक. by छोटा डॉन
नानु..ठाकर्यांना रीमोट
In reply to मग मुख्यमंत्री कसे होणार? by अवलिया
सहमत आणि काहींना आतल्या
In reply to नानु..ठाकर्यांना रीमोट by Dhananjay Borgaonkar
हॅ हॅ, ते माहित नाही, पण
In reply to मिपा / उपक्रम by अवलिया
अरे
In reply to गुंडोआजोबा बोलले म्हणजे हे by परिकथेतील राजकुमार
मराठी शिकेल नक्की शिकेल ...
In reply to अरे by गुंडोपंत
काका?
In reply to मराठी शिकेल नक्की शिकेल ... by अवलिया
काका
In reply to काका? by गुंडोपंत
२०१२ किंग जॉर्ज चे शतकमहोत्सवी वर्ष आहे!
In reply to काका by मिसळभोक्ता
अरे बेसनलाडवा (ठाकरीय शैली),
In reply to २०१२ किंग जॉर्ज चे शतकमहोत्सवी वर्ष आहे! by बेसनलाडू
का बरे?
In reply to अरे बेसनलाडवा (ठाकरीय शैली), by विश्वनाथ मेहेंदळे
का बरे? तेच सत्य
In reply to का बरे? by बेसनलाडू
वेळच वेळ
In reply to का बरे? तेच सत्य by विश्वनाथ मेहेंदळे
प्रचुदोप
In reply to का बरे? by बेसनलाडू
काका किंग जॉर्जवाला?
In reply to काका? by गुंडोपंत
>>त्या राहूल पेक्षा बरा
In reply to अरे by गुंडोपंत
ते ही
In reply to >>त्या राहूल पेक्षा बरा by यशोधरा
हा हा
Parsi is the Shweetest Community I have ever seen
In reply to हा हा by चिरोटा
(विषय दिलेला नाही)
In reply to Parsi is the Shweetest Community I have ever seen by वाहीदा
टोटली सहमत!
In reply to Parsi is the Shweetest Community I have ever seen by वाहीदा
१०० % सहमत
In reply to Parsi is the Shweetest Community I have ever seen by वाहीदा
पारशांची जिरवली ??
In reply to हा हा by चिरोटा
आता इंग्रजी कोनाला येतंय?
In reply to पारशांची जिरवली ?? by मनोहर काकडे
राजकारण्यांची मुले पालकांच्या
+१
In reply to राजकारण्यांची मुले पालकांच्या by रेवती
विद्यार्थी सेनेचे काय ?
हा हा हा हा हा चिंत्यापण ना
काळजी करु नये. नवनिर्माण
In reply to हा हा हा हा हा चिंत्यापण ना by सुहास..
विद्यार्थी कुठे गेले ?
In reply to हा हा हा हा हा चिंत्यापण ना by सुहास..
हम्म
इथे कुणी सदर पुस्तक वाचले
चांगला प्रश्न
In reply to इथे कुणी सदर पुस्तक वाचले by अवलिया
आम्च्या अभ्यास्क्रमात नव्हते
In reply to इथे कुणी सदर पुस्तक वाचले by अवलिया
इफ आय एम राईट, सदर कादंबरी
In reply to इथे कुणी सदर पुस्तक वाचले by अवलिया
बायोडेटा
हा हा
In reply to बायोडेटा by विकास
एका मराठी माणसावरील टिका वाचुन खुप
फोटो
बातमी वाचून वाईट वाटले
(प्रकाशचित्रात आदित्य ठाकरे
In reply to बातमी वाचून वाईट वाटले by धनंजय
१. मुंबईत राहून इंग्रजीत
मस्त प्रतिसाद
In reply to १. मुंबईत राहून इंग्रजीत by अडगळ
(बघतोयस काय रागानं , पंजा
In reply to १. मुंबईत राहून इंग्रजीत by अडगळ
हाहाहा
In reply to १. मुंबईत राहून इंग्रजीत by अडगळ
का हो
In reply to हाहाहा by आमोद शिंदे
समर्पक आरोळी
In reply to १. मुंबईत राहून इंग्रजीत by अडगळ