रोहिंटन मिस्त्री वि. आदित्य ठाकरे - महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाची पहाट?
एका वीस वर्षांच्या वाघाच्या बच्च्यानं नुकतीच आपली नखं दाखवून आपल्या उज्ज्वल कारकीर्दीची सुरुवात केली आहे. उध्दवजी ठाकरे यांचे सुपुत्र आणि सन्माननीय श्री. बाळासाहेबांचे नातू आदित्यजी ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून एका यःकश्चित कादंबरीची जी रातोरात हकालपट्टी केली आहे ते पाहून मराठी माणसाची मान अभिमानानं पुन्हा एकदा उंचावली गेली आहे.
रोहिंटन मिस्त्री नावाच्या एका पारशाच्या 'सच अ लाँग जर्नी' या कादंबरीला २००७ मध्ये जेव्हा मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. (इंग्रजी) अभ्यासक्रमाचा एक वैकल्पिक भाग म्हणून निवडण्यात आलं तेव्हा आमचा वाघाचा बच्चा जरा वयानं लहान होता. यथावकाश मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये बी.ए. (इतिहास) करण्यासाठी त्यानं प्रवेश घेतला त्यानंतर कधीतरी बहुधा या कादंबरीत केल्या गेलेल्या ऐतिहासिक अपराधांची त्याला जाणीव झाली असावी. अगदी अशोकरावजी चव्हाणांनीही त्याची री ओढली आहे. आहात कुठे? कुणीतरी म्हटलंच आहे ना की
आणि त्या मिस्त्रीनं म्हणे असं म्हटलं आहे की या वीस वर्षांच्या मुलाबद्दल कीव, किळस की करुणा बाळगावी ते कळत नाही! त्याला म्हणावं तिथे कॅनडात बसून अशा गमजा करण्याऐवजी आमच्या गल्लीत ये, मग दाखवतो तुला आमचा बडगा! काय म्हणालात, आमचा बडगा फक्त आमच्याच गल्लीत दिसतो? थांबाच जरा, आमचा बछडा अजून थोडा मोठा होऊ दे, मग लावू पुन्हा अटकेपार झेंडा. आहात कुठे?
आमच्या आदित्यजींच्या कॉलेजातल्या मुख्याध्यापकांनी पण त्या शिंच्या मिस्त्रीचीच बाजू घेतली म्हणे. 'एकविसाव्या शतकात एका राजकीय पक्षानं आपल्यावरची टीका सहन करण्याची आणि आपल्या वागणुकीतून टीकाकारांना चोख उत्तर देण्याची प्रगल्भता दाखवायला पाहिजे. निव्वळ आपल्यावरच्या टीकेपोटी पुस्तकावर बंदी घालणं हे अयोग्य आहे', असं त्यांनी म्हटलं आहे म्हणे. आता तो मिस्त्री पण त्यांच्याच कॉलेजातला आणि त्यात पुन्हा जागतिक किर्तीचा वगैरे. मग त्यांना ही दादरची मुर्गी दाल बराबर वाटणार नाही तर काय? पण आमची मुर्गी नाही बरं, वाघ आहे वाघ! वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त बोचरे चिमटे!
कादंबरी वाचली आहे
धन्यवाद
वा वा वा मज्जाच मज्जा चालु
हेच बोल्तो. चिंजं : उत्तम
या छोट्या ठाकर्यांना
युवराजांचे युवराज
आरे हो की. हे लक्षातच आले
युवयुवराज की युयुवराज असे
एक कौलच टाका ना मालक त्यासाठी
आपल्याला
अगदी अगदी
तर काय?
त्यांचा आजा मोठा ठाकरे असता
आजा मोठा ठाकरे?
गुंडोआजोबा बोलले म्हणजे हे
सहमत आहे. पण विधान सभेतुन की
गावंढळ ...
अरे डान्राव तुम्ही का? अरं
डॉनजी
आम्हीतर विचारनार होतो
मिपा / उपक्रम
निवडणुक.
मग मुख्यमंत्री कसे होणार?
नानु..ठाकर्यांना रीमोट
सहमत आणि काहींना आतल्या
हॅ हॅ, ते माहित नाही, पण
अरे
मराठी शिकेल नक्की शिकेल ...
काका?
काका
२०१२ किंग जॉर्ज चे शतकमहोत्सवी वर्ष आहे!
अरे बेसनलाडवा (ठाकरीय शैली),
का बरे?
का बरे? तेच सत्य
वेळच वेळ
प्रचुदोप
काका किंग जॉर्जवाला?
>>त्या राहूल पेक्षा बरा
ते ही
हा हा
Parsi is the Shweetest Community I have ever seen
(विषय दिलेला नाही)
टोटली सहमत!
१०० % सहमत
पारशांची जिरवली ??
आता इंग्रजी कोनाला येतंय?
राजकारण्यांची मुले पालकांच्या
+१
विद्यार्थी सेनेचे काय ?