Skip to main content

...मिपा करांच्या मनातलं!

Published on मंगळवार, 19/10/2010
नेहमीप्रमाणे मिपा log in करताना माझा ID टाईप करताना मलाच हसु आले... क्काय्य्च्या काय?... जाई अस्सल कोल्हापुरी! काहिही!... त्यानंतर म्हटलं पाहुया कोण कोण दोस्त लोग आले आहेत! तर हजर सभासद पाहता पाहता परत तोच विचार डोक्यात येउन गेला. काय मजेशीर मजेशीर नावं आहेत ना ........ वाटलं काय काय thoughts आले असतील ना हे नाव deside करताना या लोकांच्या! का "हाच" आपला ID असावा असे वाटले असावे! काहि नावं तर मस्त interesting आहेत. उदा. धमु,ब्रिटिश टिं., आपली अदिती ...आणि all most each and every मिसळ्पाव ID! पुन्हा एक ओळखपरेड होउन जाउ द्या का?... मला फक्त गमतीशीर ID मागचे thoughts जाणुन घ्यायचेत! so lets have some fun! सुरुवात माझ्यापासून करते.. मिपा बद्दल ऐकलं ...थोडफार वाचलं आणि registration करताना मला 'जाई' इतकंच करायचं होतं. कारण माझं माझ्या नावावर अतिशय प्रेम आहे. पण नाहि...ते शिल्लक नव्हतं....ते आगोदरच कोणीतरी अडवून ठेवलं आहे.(मला ती व्यक्ती आजपर्यंत कधी दिसलीही नाहिये मिपावर! हा भाग अलाहिदा.) आणि त्या दिवशी काहितरी कोणाला तरी जाम वाईट्ट तडकून बोलले होते मी फोनवर्...अगदी अस्सल कोल्हापुरीत! and that clicked mesomehow! आणि ते छापून पाहिलं ....तर ते accept केलं शिश्टीम नी! म्हणून मी " जाई अस्सल कोल्हापुरी"! ...आता कोणाचा लंबर?.... हं तुम्ही सांगा आता!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 13966
प्रतिक्रिया 91

प्रतिक्रिया

मी इथे खर्‍या नावानेच वावरते.

माझ्या आयडीचं मला भयंकर हसू येतं. लोकाना वाटतं काहीतरी विशिष्ट हेतूने मी हा आयडी घेतला असेल. पण तो माझ्या गळ्यात पडलाय! मी माझ्या चांगल्या 'ज्योती' किंवा 'ज्योती कामत' या नावाने २/३ वेळा खातं उघडायचा प्रयत्न केला होता. दरवेळेला मिपा ची इमेल यायची " Your request is pending. Follow this link to log in." पुढे? लॉग इन करायला गेलं तर "प्रवेश प्रतिबंधित". शेवटी वैतागले. पैशाने सगळी दारं उघडतात. हे पण उघडतंय का बघूया म्हणून खातं तयार केलं आणि चक्क यशस्वी झालं की हो! आता असू दे, पैसा तर पैसा! खरं म्हणजे पैसा प्रत्येकालाच आवडतो नाही का?

In reply to by पैसा

ज्यो !! एक नंबर ग !! मला ही तुझ्या आयडीच्या नावाच नवल होत, म्हटल हिला काय झालय आज रहस्य कळल !! जाता-जाता : >>कादरखान मोड - ये पैसा बोलता है

In reply to by मेघवेडा

मला कॉलेजमधल्या मैत्रिणी "ज्यो" म्हणत. आता इतक्या वर्षांनी आणखी कोणीतरी म्हणतंय हे बघून खूप छान वाटलं. पण "शिल्पा" चं संक्षिप्त "शि बै" (हे मात्र कै च्या कै)!!!

इथे खाते बनवताना पुलंची ऑडिओबुक्स ऐकत होतो... त्यात "रत्नांग्रीच्या सार्‍या म्हैशी तुर्तास गाभण काय रे झंप्या?" हे आपल आवडतं वाक्य. आपसुकच ठरलं... अंतु बर्वा... :-)

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

नवीन "मेम्बर्स" ना.. काम्पुबाजांच्या तावडीतून सोडवून त्यांचं चांगभलं करण्यासाठी.. पामराने हे नाव धारण केले आहे

In reply to by अंतु बर्वा

इथे खाते बनवताना बिक्लिंचा कबुलीजबाब बघत होतो. त्यातील "indeed I did have a relationship with Ms. Lewinskey that was not appropriate. In fact it was wrong" हे आपल आवडतं वाक्य. आपसुकच ठरलं...क्लिंटन...:)

परमहंस हा मिसळपाववरचा माझा जुना आयडी होता. त्यावेळी इंटरनेट, मराठी टायपींग वगैरेची जास्त ओळख नव्हती. नंतर तो आयडीपण विसरून गेला. पुन्हा एकदा मिसळपावचे सदस्यत्व घेताना यशवंत कुलकर्णी या नावाने घेतले; त्यातही काहीतरी टेक्नीकल भानगड झाली आणि तोही हरवला. मग पुन्हा तिसर्‍यांदा सदस्यत्व घेताना यशवंत आणि कुलकर्णी मधली रिकामी जागा पुसून टाकली तेव्हा कुठे मिसळपावकडून मंजूरीचा स्टॅम्प त्यावर उमटला! आता यशवंतकुलकर्णीऔरंगाबादमहाराष्ट्रभारत असा भारदस्त, लांबझडप आयडी घेण्याच्या विचारात आहे!

In reply to by मुक्तसुनीत

लांबझडप : लय भारी शब्द. >>> बास !! ईतकच !! तुमचही रहस्य सांगा की ? का एकुलत्या एक कट्ट्यावरच रहस्य काढु बाहेर ? मोड ची गरज नाही >> हमारे जासुस चारोंतरफ फैलै हुवे है>> मोड संपला

ऋषिकेश माझे खरे नाव आहे.. आता ते कोणाला गमतीशीर वाटल्यास मी जबाबदार नाही :P

ह्म्म.. मागेसुद्धा अश्या चर्चा झाल्या आहेत. चालू द्या.. मराठी रायटिंग मध्ये आलेले इंग्लीश वर्डस फॉर वॉट रिझन आले आहेत असा विचार करतोय...

In reply to by लिखाळ

आज आभाळ अंशतः ढगाळ राहील आणि तीव्र ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडतील किंवा पडणार नाहीत. किंवा कसेही कसेही असे कसे? नेमके कसे?? ;-) लई जबराट वाक्य आहे. ;-)

In reply to by लिखाळ

ए लिखाळा, तुला इंग्लिश येतं ना, देन मला deside अँड mesomehow यांचे मराठी मीनींग्ज टेल ना रे प्लीज!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आयला ते इंग्लिश आहे होय ? मला वाटल, की जाईताईंना खास पहिल्या धारेची देशी हवी आहे. मी निघालो होतो गाळायला.

In reply to by मिसळभोक्ता

असेलच अशी काही खात्री नाही ब्वॉ देता येत! तुम्ही म्हणत असाल तर तसंही खरं असेल! शेवटी काय, मी सध्या पुण्यात आहे, आणि तिथे पगडी-मराठी (किंवा बंगाली किंवा चांगलं इंग्लिश) नाही बोल्ली तर मला समजत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

deside = जरा साईड दे = जरा बाजूला हो (औपचारिक बोलतना 'जरा सरकून घ्या !') mesomehow = मी थोडासा कसा ? आता न्यू वर्डसचे मिनिंग वॉन्ट असतील तर डिक्षनरी रेफर करा..

In reply to by लिखाळ

deside = जरा साईड दे = जरा बाजूला हो (औपचारिक बोलतना 'जरा सरकून घ्या !')
या शब्दाला थोडी वेगळी छटा आहे असं वाटतं आहे का रे तुला? म्हणजे पहा, की deactivate म्हणजे जे activate नाही ते, किंवा derail म्हणजे जे रूळावर नाही ते, तसंच deside म्हणजे जे साईडला नाही ते!! तुम्हाला काय वाटतं हो लिखाळ भाऊजी आणि मिभोकाका??
mesomehow = मी थोडासा कसा ?
हं, हे मान्य होण्यासारखं आहे, किंवा अमान्य करता येईल किंवा कसेही!

In reply to by प्रभो

अरे हो रे, पण ते न्यू-इंग्लिश न्यू-यॉर्क किंवा न्यू-जर्सीमधे ठीक आहे! न्यू-मिपा*वर त्याचं काय काम? *कठीण शब्दांचा अर्थ न्यू-मिपा = नवनिर्माण झालेले मिपा.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

न्यु-मिपावरही काही 'ब्रिटीश' (टिंग्या,दादू) लोक्स आहेत ना..त्यांच्यासाठी.... ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

न्यु जर्सीचं नाव मध्ये आणु नका उगाच. जर्सी थिंग इज एकदमच वेगळा बिजनेस. http://en.wikipedia.org/wiki/It%27s_a_Jersey_Thing

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ते नव-इंग्लिशमधे स्पेलिंग्ज बदलतात ती अशी का?? आम्हाला अजून जुनंच विंग्रजी जमत नाय तर नव काय जमणार. आणि तसं बी लोकांना वाटते की आम्ही फक्त "जुनं ते सोनं"असे समजतो म्हणून.. :-)

In reply to by विकास

त्यांनी भो बघितलं असेल आणि घाईघाई ने मैदानात उतरले..

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

...deside म्हणजे deSIDE च..... :) decide नाही! आणि ते दुसरं मी सम हाssssss ऊ असं म्हणायचे होते आम्हांस!

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

डिसाईड वरून खिचडी मधला एक (पांचट) जोक आठवला... हंसा - प्रफुल, डिसाईड मतलब? प्रफुल - अरे अपना कॅसेट प्लेयर में है ना, A side और B side, वैसे ही D side!!!

In reply to by परिकथेतील राजकुमार

च्यायला मला वाटत होतं पर्‍यानेच अदितीला त्याच्या धागे हिट करण्याच्या मोबदल्यात वाटा दिला की काय! म्हणजे अदिती पर्‍याला कंपिटीशन देउन राहिली तर!!

In reply to by लिखाळ

हं ....अहो नवे आयडी आहेत की बरेच्.....त्यांना लिहु द्या...आणि नविन माणसांना जुने विचार कळु द्या...! माझ्या जिभेचं नैसर्गिक वळणच "बाटकं" आहे. आणि माझ्या तोंडुन/ धाग्यात 'प्राज्ञ' मराठी मिपाकरांना झेपत नाही. त्यांनाही इंग्रजाळलेलं मराठी ऐकायची ..आणि वाचायची सवय झाली आहे....! मागे मी प्रयत्न केला होता...पण न्हाय रुचला जनु!

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

जाईताई, अस्सल कोल्हापूरी हे शब्द वाचले की उगचंच हॉटेलमध्ये बसून दाल तडक्याची ऑर्डर देणं चालू आहे असं वाटतं.. म्हणजे, दाल तडका- पण कसा? कोल्हापूरी? मग मिडीयम की तेज? तेज-तेज!!

In reply to by यशवंतकुलकर्णी

क्काय्य च्या काय्य वाटतं ... हो ना! :) पण का कराचं..... जाई १२३... हे पण कायच्या काय वाटलं असतं.. आणि जाई-जुई....अगदीच घिसं पिटं......

In reply to by लिखाळ

मराठी रायटिंग मध्ये आलेले इंग्लीश वर्डस फॉर वॉट रिझन आले आहेत असा विचार करतोय... मी पण असेच थिंकिंग करतो आहे. आय गेस, न्यू मेंबर्सना इथे राईट करताना मराठी वर्डस कोणते वापरावेत अ‍ॅन्ड हाऊ असा क्वश्चन फॉलत-- आपलं, पडत असेल.

अय्या!!! जाई तू होय? कुठे होतीस इतके दिवस? छान वाटलं लेख वाचुन...लिहित राहा (असेच विषय घेऊन)

हा धागा मिसळ्पाव.कॉम वर कसा बघायचा? मला all most जमलं होतं पण mesomehow मिसळपाव.कॉमवरच जातोय!

अदितीच्या भाषेत : सत्य टेलायचं झाल्यास हीअर मी हायली इनइलिजिबल कॅन्डीडेट आहे....कारण अगदी फस्ट डे ला मला मुसु ने इथं फिंगर धरून आणलं आणि सोडलं (...आणि स्वतः गायब झाले) त्यावेळी फॉर्ममधील क्वेशन्स सोल्व्ह करताना नेमच्या बॉक्समध्ये डायरेक्ट सत्य (म्हणजे ट्रू...) नाव 'इन्द्रराज पवार' टंकले (मीन्स टाईपले...) गेले आणि दुसर्‍याच मोमेन्टला मिपा मॅनेजमेंटने ते स्वीकारलेदेखील. सो इन शॉर्ट (म्हणजे थोडक्यात....शॉर्ट म्हणजे हाफ पॅण्टही असते, ते इथे मीनिंग नाही...) कसलेही कोडेड वा रास्ता छोडके हटके नाव नाही. सर्व सरकारी कागद्पत्रावरदेखील हेच नाव आहे. घरात मात्र इन्द्रा किंवा इंदू असे बोलाविले जाते....(च्यामारी 'इंदू' लई चाईल्डीश वाटते...पण आता काय करणार ? असू दे !) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

नाव 'इन्द्रराज पवार' टंकले ज्याच्या नावात साक्षात इंद्र, राज आणि पवारयेते त्याला परवानगी नाकारण्याच्या कोणी भानगडीत पडेल का? ;)

In reply to by पक्या

हा हा हा हा, पक्या भाउ हाउ कमेडी तुम्ही यार... बंडरफुल!! (इंग्रजी लिहताना आपसुक मराठी माणसावर हिंदीचा प्रभाव जाणवुन व चा ब होतो म्हणतात)

आमचे काय सांगू, खर्या नावाने केले पण किती तरी महिने PENDING च आहेत. http://www.esakal.com/esakal/20100727/5291903974553732731.htm योगायोगाने म्हणा कि दुर्दैवाने म्हणा , आम्ही त्या दिवशी तिथे जवळच होतो. ह्या घटनेची आठवण म्हणून आम्ही एक नाव घेतले आणि लगेचच कार्यान्वित झाले. पहिले उपक्रमावर घेतले आणि नंतर सहज इथे घेऊया तर लगेच ते चालू झाले. आता असे वाटते कि हेच राहूदे हेच. (नम्रपणे नमूद करू इच्छितो कि लेखन करताना कोणत्याही महान व्यक्तीचा अनादर, वा चेष्टा करण्याचा उद्देश नसतो )

प्रकाटाआ

S (आहे नाव एक .... ;) ) P (प्रसन्न) A ( आपटे) सध्या हा ID तेवढा राहिलाय.......

लहानपणीच्या काही प्रेमळ आठवणी. माझी एक मैत्रीण होती. माझ्यापेक्षा चांगली पंधरा वर्षानी मोठी. मी तिला रोज विचारायचो -"माझ्याशी लग्न करणार?" ;) तिन माझं नाव रंग्या ठेवले होत!

In reply to by शिल्पा ब

तसच असेल बहुदा. ;) मी तिला तेंव्हा बर्याचवेळी रंग्या का म्हणतेस म्हणून विचारल होत तिला. तेंव्हा ती " काही नाही रे सहजच" अस गोड उत्तर द्यायची. गेले ते बालपनीचे दिवस !

सक्रिय सदस्य मधे " सध्या ** सदस्य आणि ** पाहुणे आलेले आहेत." तिथुन कॉपी पेस्ट केला....

मला मनीमाऊ आवडते...म्हणून म्हटलं मनीमाऊ टाकाव पण ते मिपा घेतच नव्हतं (म्हणे already exist ..) म्हणीन फक्त मनी टाकल त्याच पण तेच ... :-( मग म्हटलं जाऊदे आता शेवटचा try ... मग "मनी२७ " टाकल... २७ जन्मतारीख माझी.. झाल मग final एकदाच... :-) बाकी इतरांची नाव पाहून खूप हसू आल...eg - परीकथेतील राजकुमार :-) :-) ..., खादाड माऊ, सहज, पैसा, (चक्क) घाशीराम कोतवाल, शिल्पा ब( ब म्हणजे काय ???? )मुकावाचक, इंटरनेट स्नेही /प्रेमी ,शानबा... आणि parnal नेने मराठे .. हि तर पहिले मला मुलगि आहे हे कळलच नाही तिच्या ID वरून.... ;-) अजून यादी लांब लचक आहे ब्ला ब्ला ब्ला........

मध्यन्तरी काही भन्नाट आयडीज पहाण्यात आले होते खचलेला दरबार जृंभण श्वान ते आयडी त्यानी का घेतले होते ते ते स्वतःचा जाणोत.

In reply to by विजुभाऊ

जृंभणश्वान अतिशय प्रतिभावान ब्लॉगकर्ते आहेत. मी त्यांचा फॅन आहे, असे सांगू इच्छितो. इच्छुकांकरता दुवा १, दुवा २

एकदा आमची मैत्रीण रागाने म्हणत होती की माझ्यापेक्षा तु इंटरनेटलाच नेहमी प्रायॉरिटी देतोस, माझ्यापेक्षा तुझं इंटरनेटवरच प्रेम* जास्त आहे म्हणुन.. म्हणुन आमचं सदस्य नाम इंटरनेटप्रेमी (इंटरनेटवर प्रेम असणारा).. नंतर सुहास.. या आमच्या आंजा मित्राने केलेल्या सुचवणीनुसार माननीय संपादक मंडळ यांना विनंती करुन नावात बदल करुन घेतला इंटरनेटस्नेही (इंटरनेटशी स्न्हेह असणाता असा). जे जरा अधिक सोपं, सोबर, आणि पॉलिश्ड वाटतं. (*हे 'प्रेम' म्हणजे मैत्रीतलं प्रेम, मी आजतायगत सिंगल आहे.)

एकदा आमची मैत्रीण रागाने म्हणत होती की माझ्यापेक्षा तु इंटरनेटलाच नेहमी प्रायॉरिटी देतोस, माझ्यापेक्षा तुझं इंटरनेटवरच प्रेम* जास्त आहे म्हणुन >> हे हे हे आपल्याला एक मैत्रीण आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न !!

In reply to by सुहास..

आणि "मी आजतायगत सिंगल आहे." अशी जाहिरात ही :) (ह. घ्या.) आवांतर : आजतायगत - हा शब्द बरोबर आहे का?

In reply to by एमी

>>आवांतर : आजतायगत - हा शब्द बरोबर आहे का? आजतागायत असा खरा शब्द आहे. तागायत म्हणजे 'पर्यंत'. अवांतर: आवांतर हा शब्द खरा अवांतर असा आहे. :-)

In reply to by नगरीनिरंजन

(*हे 'प्रेम' म्हणजे मैत्रीतलं प्रेम, मी आजतायगत सिंगल आहे.) सिंगल इंटरनेट भाऊ नी "आजतायगत" लिव्हल कि हो

नाव श्रीकांत कुलकर्णी. पण लहान पणा पासुन सगळेच आप्पा म्हणतात म्हणुन आप्पा. मिपा ने ही तेच स्विकारले.

मी वरीजनल नावानंच वावरतो ब्वॉ. माझ्या जन्ममासाचं नाव वापरुन एक आयडी क्रीएट केला, पण रीक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करेनात. मग काय ओरिजनल ते ओरिजनल.

टॅग बंद करायला आले होते.. तोवर यकुंनी स्वाक्षरीत माघार घेतल्याने काम झाल्याचे दिसले.. असो..

In reply to by मस्त कलंदर

टॅग बंद करायला आले होते.. तोवर यकुंनी स्वाक्षरीत माघार घेतल्याने काम झाल्याचे दिसले..
नमस्ते पाटकरकाकु __/\__ विस्थापित

In reply to by मस्त कलंदर

टॅग बंद करायला आले होते.. तोवर यकुंनी स्वाक्षरीत माघार घेतल्याने काम झाल्याचे दिसले..
नमस्ते पाटकरकाकु __/\__ विस्थापित

अहो एकदा गंमतच झाली... अशी पहाटेची वेळ होती. आणि एकदम जन्मलोच एकदम. मग घरात उदाहरणार्थ आनंदी आनंद वगैरे झाला. सगळ्यांना बरं वाटलं... मग असेच काही दिवस गेले तर मग अजून नाव ठेवलं नाही अशी नावं ठेवू नयेत लोकांनी म्हणून घरच्यांनी हे नाव ठेवलं. आडनाव तर आधी होतंच जन्मल्यापासून. मग हेच नाव चिकटलं... मिपावर आलो तेव्हा काय नाव घ्यायचं असा विचार करत होतो. पण म्हणलं कशाला स्वतःला इतकी नावं ठेवा. म्हणून घरच्यांनी ठेवलेलंच नाव कायम ठेवलं. असो. जाई ताईंचे शंकासमाधान झाले असावे. :D

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अरे हो खरच की! टर्मिनेटर असाच एकदम म्हणजे एकदम येतो नाही का अचानक भूतलावर शिवाय पेशाने पण आपण टर्मिनेटर आहोत दाखवायचा केविलवाणा प्रयत्न!