मला बर्याच मिपासदस्यांना सकाळपासून खरड करायचा अथवा व्यनी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सतत Fatal error: Call to undefined function drupal_mail() in /home/misavcom/public_html/sites/all/modules/guestbook/guestbook.module on line 494 नावाचा मेसेज लिहुन येत आहे.
अजुन कोणाकोणाला हा त्रास सहन करावा लागत आहे का ?
वाचने
29535
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
शांग्रीला...!!
इल्ला !!! मला तर सकाळपासून व्य.नि. + खरडी मिळाल्या आहेत; आणि मी त्यांना प्रतिसादही दिले आहेत. [त्यात डॉनरावांच्याही खरडी आहेत ~ अर्थात धमकीच्या...!!!!]. याचाच अर्थ असा की, आमच्या 'शांग्रीला' त सारं काही आलबेल आहे.... तुमच्या Twilight च्या बेलाच्या गणितात गडबड झालेली दिसत्ये.
इन्द्रा
आमची खव सुविधा बंद असल्याचा
In reply to शांग्रीला...!! by इन्द्र्राज पवार
आमची खव सुविधा बंद असल्याचा आणि आम्ही हा धागा काढल्यावर अंमळ बिज्जी झाल्याचा फायदा घेउन मिपावरील काही कंपुबाज प्रस्थापितांनी आमच्या नावानी इथे जो शिमगा घातला आहे त्याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावेच लागेल ह्याची त्यांनी जाण ठेवावी.
दुर्लक्षीत पॅंथरच्याच सदस्यांना फक्त ह्या समस्येला सामोरे जावे लागले असल्याने हे सर्व तांत्रिक प्रॉब्लेम मुद्दाम घडवुन आणल्याचे स्पष्ट दिसतच आहे. ह्यासर्वाचा निषेध म्हणून आम्ही आज संध्याकाळी ६ वाजता ह्याच धाग्यावर श्री. डॉन्राव तसेच त्यांच्या राको अदितीबै तसेच आमच्या दूरध्वनीची दखल न घेणारे श्री. निदे ह्यांच्या पुतळ्याचे दहन करणार आहोत. तरी सर्व दुर्लक्षित बांधवानी लाखोंच्या संख्येने उपस्थीत राहून प्रस्थापिंताविरुद्धचा आपला आवाज दाखवुन द्यावा.
शनवार वाड्यावर मोर्चा का रे
In reply to आमची खव सुविधा बंद असल्याचा by परिकथेतील राजकुमार
शनवार वाड्यावर मोर्चा का रे पर्या?
इदेशी असेल तर सांग, आपुन बी येवु की राव.
५० डेसिबल ...
In reply to आमची खव सुविधा बंद असल्याचा by परिकथेतील राजकुमार
>>तरी सर्व दुर्लक्षित बांधवानी लाखोंच्या संख्येने उपस्थीत राहून प्रस्थापिंताविरुद्धचा आपला आवाज दाखवुन द्यावा.
बरं बरं, दखवा दाखवा ...
मात्र तो आवाज ५० डेसिबल्सपर्यंतच ठेवा अशी ताकिद देण्यात येत आहे ( थत्तेचाचा तो आवाज मोजतील, त्यांना अनुभव आहे, त्यांच्या शिफारसीनुसार पुढील कारवाई होईल ).
आणि हो, ते "आणीबाणी" चे विसरु नका बरं का ;)
- छोटा डॉन
>>मात्र तो आवाज ५०
In reply to ५० डेसिबल ... by छोटा डॉन
>>मात्र तो आवाज ५० डेसिबल्सपर्यंतच ठेवा अशी ताकिद देण्यात येत आहे
जंगलातला वाघ/सिंह कधी डेसिबलचा विचार करून डरकाळी मारताना पाहिलाय का ?
च्यायला त्या थत्ते चाचांचा
In reply to ५० डेसिबल ... by छोटा डॉन
च्यायला त्या थत्ते चाचांचा पार मिपावरचा ए.के. हंगल करुन टाकलाय तुम्ही लोकांनी !
आमचा आवाज ५० डेसीबलमध्ये मावायचा नाही हे तुम्ही लक्षात घ्यालच ! आणि आणिबाणी आणणार्यांचे पुढे काय झाले हा इतिहास तुम्हास ज्ञात असेलच. जनतेने त्यांना गप्प घरी बसवले.
@निळ्या
विदेशी परवडत नाही ! प्यासामधुन एक चपटी देण्याची व्यवस्था करण्यात येईल.
आणि आणिबाणी आणणार्यांचे पुढे
In reply to च्यायला त्या थत्ते चाचांचा by परिकथेतील राजकुमार
आणिबाणी लादली कोणी हा इतिहास तुम्ही मुद्दामच दुर्लक्षित करता आहात प.रा. राजवाडे! त्यांना घरी कोणी आणि का बसवलं हा इतिहासही शिळा नाही!
बाकी डान्राव आमचे नेते आहेत आणि नवीन सरकारनेच त्यांना मंत्री केले आहे. डान्राव आगे बढो, हम तुम्हारे साथ है।
आणिबाणी लादली कोणी हा इतिहास
In reply to आणि आणिबाणी आणणार्यांचे पुढे by ३_१४ विक्षिप्त अदिती
लादणारे शेवटी तुमच्या सारखे प्रस्थापितच होते हे विसरुन कसे चालेल अवखळकरतै ?
अहो नेते कराल पण नेत्याची बुद्धीमत्ता कुठुन आणाल ? आगे बढो आणि खड्डे पे पडो.
हॅ हॅ हॅ
In reply to आणिबाणी लादली कोणी हा इतिहास by परिकथेतील राजकुमार
>>अहो नेते कराल पण नेत्याची बुद्धीमत्ता कुठुन आणाल
हॅ हॅ हॅ......नेतेपणासाठी लागणारी 'तैल'बुद्धी त्यांच्याकडे आहे हे विसरलात वाटते! :)
हॅ हॅ हॅ......नेतेपणासाठी
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
त्यांच्या डोईवरील तेल त्यांच्या मेंदूपर्यंत झिरपते ह्यावर आमचा विश्वास नाही !
छॅ.....
In reply to हॅ हॅ हॅ......नेतेपणासाठी by परिकथेतील राजकुमार
>>त्यांच्या डोईवरील तेल त्यांच्या मेंदूपर्यंत झिरपते ह्यावर आमचा विश्वास नाही !
अन् त्यांना मेंदुवडा आहे ह्यावर आमचा विश्वास नाही ! :)
कोणत्याही सभेला कधीही
In reply to ५० डेसिबल ... by छोटा डॉन
कोणत्याही सभेला कधीही बंदी/नियंत्रण घालू नये असे मत असल्याने, मोजलेल्या डेसिबलचा अहवाल + शिफारस योग्य त्याप्रकारेच देण्यात येईल.
अनेक दुर्लक्षित पुढे प्रस्थापित होऊन आणीबाणीची भाषा बोलतात हे "उदाहरणां"नी सिद्ध झालेच आहे.
असो. ज्यांना आवाजाचा त्रास होईल त्यांनी दहिसरला जावे.
लाखो?
In reply to आमची खव सुविधा बंद असल्याचा by परिकथेतील राजकुमार
".....तरी सर्व दुर्लक्षित बांधवानी लाखोंच्या संख्येने ...."
~~ असला आचार्य अत्रीय आकडा आणण्याची अवदसा अचानकच अवतरली आहे.
मुळात 'दहन' कार्यक्रम आटोपल्यानंतर उपस्थित असणार्या सो-कॉल्ड दुर्लक्षित बांधवांच्या अमृततुल्य टपरीवरील बिल होईल खच्चून पंधरा-वीस रूपये...! त्यामुळे 'लाखो' आकड्याचे प्रयोजन प.रां. नी कशासाठी योजिल्ये?
तरीदेखील वरील आवाहनातील 'अदितीबै' यांच्या पुतळ्याचे दहन ही बाब मनाला भावली. तिचे याच काय पण अन्य कुठल्याही कारणास्तव तसे होण्यास्/करण्यास माझा हार्दिक पाठिंबा आहे.
इन्द्रा
पुतळा दहनामुळे आमच्या
In reply to लाखो? by इन्द्र्राज पवार
पुतळा दहनामुळे आमच्या केसालाही धक्का लागणार नाही ही बाब श्री. चन्द्रराज गवार यांच्या निदर्शनास आणू इच्छिते. बाकी चालूदेत तुमचे पालथे धंदे, जळजळकुमार!
आमच्या भव्य निषेध
In reply to पुतळा दहनामुळे आमच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्या भव्य निषेध मोर्च्याच्या नुसत्या कल्पनेनेच प्रस्थापितांची पळापळ झाल्याचे स्पष्ट जाणवत आहे.
@ इंद्रदा
ट्रक / गाड्या भरुन माणसे येतील बघा !
गाड्यांचे दोन कोटी रुपये जमा
In reply to आमच्या भव्य निषेध by परिकथेतील राजकुमार
गाड्यांचे दोन कोटी रुपये जमा झाले का ?
झालं!
In reply to गाड्यांचे दोन कोटी रुपये जमा by अवलिया
जमा झाले आणि त्यातले ७०% पराकुमारांनी ३% व्याजावर लावून दोन टक्के गाड्या आधीच कमी केल्या आहेत.
चिंता मिटली ...
In reply to गाड्यांचे दोन कोटी रुपये जमा by अवलिया
आम्हाला ह्या "लाखोंच्या" सभेचे खरोखर टेन्शन होते.
त्यात थत्तेचाचा ऐनवेळी व्यासपिठावर जाऊन बसले.
>>गाड्यांचे दोन कोटी रुपये जमा झाले का ?
मात्र आता नान्या आला आणि आमचे टेन्शन संपले, आता नुस्ती कागदोपत्री "लाखांची" गर्दी जमणार.
प्रत्येक्षात "१ माणुस १० जणांच्या नावे सह्या ठोकुन पैसे ढिले करणार" ह्याबाबत आमच्या मनात अजिबात किन्तु नाही.
नान्याला तशी सवयच आहे ;)
आता शेकडा जमला तरी पुष्कळ, व्यासपिठावरच्या नेत्यापेक्षा खालची जन्ता जास्त असावी हीच सदिच्छा !!! :)
- ( अनुभवी ) छोटा डॉन
मा. संस्थापक परा, पुढील घोषणा
In reply to आमच्या भव्य निषेध by परिकथेतील राजकुमार
मा. संस्थापक परा,
पुढील घोषणा कशा मोर्चासाठी वाटतात? :)
(१) प्रस्थापित मुर्दाबाद
दुर्लक्षित झिंदाबाद
(२) १-२-३-४
दुर्लक्षितांचा जयजयकार
५-६-७-८
दुर्लक्षितांशी आहे गाठ
(३)कंपूबाजी कंपूबाजी
गुंद, उद्दंड भारी पाजी
कुठल्याही द्वेषयुक्त क्रियेला
In reply to लाखो? by इन्द्र्राज पवार
कुठल्याही द्वेषयुक्त क्रियेला आमचा भरघोस पाठिंबा बाय डिफॉल्ट असल्याने आम्ही +१ म्हणत आहोत.
मस्त रे निळ्या ! @नाना हो !
In reply to कुठल्याही द्वेषयुक्त क्रियेला by Nile
मस्त रे निळ्या !
@नाना
हो ! आता झेंड्यांचे काय करायचे ?
आपला भगवाच बरा...
In reply to मस्त रे निळ्या ! @नाना हो ! by परिकथेतील राजकुमार
आपला भगवाच बरा...
आपला भगवाच बरा...
In reply to मस्त रे निळ्या ! @नाना हो ! by परिकथेतील राजकुमार
आपला भगवाच बरा...
=)) =)) अबे रंगाचे नाही
In reply to आपला भगवाच बरा... by अवलिया
=)) =))
अबे रंगाचे नाही पैशाचे काय करायचे असे विचारत होतो. कुठुन आणायचे ? अनिवासी दुर्लक्षितांकडून मदत मागवावी काय?
पैशावर नाव नसते. जिथुन मिळतील
In reply to =)) =)) अबे रंगाचे नाही by परिकथेतील राजकुमार
पैशावर नाव नसते. जिथुन मिळतील तिथुन घ्यावे.
पण रंग असतो ना राव!
In reply to पैशावर नाव नसते. जिथुन मिळतील by अवलिया
पण रंग असतो ना राव! ;)
>> अनिवासी दुर्लक्षितांकडून
In reply to =)) =)) अबे रंगाचे नाही by परिकथेतील राजकुमार
>> अनिवासी दुर्लक्षितांकडून मदत मागवावी काय? >>
म्हणजे? पैसे वगैरे भरावे लागतील क्का???? नको त्यापेक्षा संस्थेमधून बाहेर पडतो आम्ही . आता कुंपणच शेत खातय म्हटल्यावर .... आम्ही दीन दुर्लक्षितांनी कुठे बघायचं? :(
वावावा अजुन होळी पेटतीच आहे
In reply to शांग्रीला...!! by इन्द्र्राज पवार
वावावा अजुन होळी पेटतीच आहे का येतो थोड्या वेळात उलटा तळहात तोंडावर ठेवुन बोंबा मारायला.
आग विझु देउ नकारे तो वर.
या लवकर हो 'कुकरी'कथेतील
In reply to वावावा अजुन होळी पेटतीच आहे by गणपा
या लवकर हो 'कुकरी'कथेतील आयटीकुमार!
अधूनमधून मलाही अशा एरर्स
अधूनमधून मलाही अशा एरर्स यायच्या तेव्हाचं माझं निरिक्षण की प्रोफाईल एडीट केली तर असा मेसेज यायचा! खवच्या उघड्या असलेल्या टॅब्ज एकदा काहीही खरडी न लिहीता रेफ्रेश करून खरडी टाकल्यावर एरर्स येत नाहीत.
कोलटकर
In reply to अधूनमधून मलाही अशा एरर्स by ३_१४ विक्षिप्त अदिती
~~ एकवेळ अरुण कोलटकराची "भिजकी वही" समजेल...पण ही बाई काय लिहित्ये काहीही समजत नाही...! प.रा. यांना वाटेल, 'च्यामारी ते इरर मेसेजेस परवडले, पण हा ठाणेकरी खुलासा नको...."
इन्द्रा
हा हा हा हा हा हा हा!!!
In reply to कोलटकर by इन्द्र्राज पवार
ती हसून लोळणारी स्मायली कुठे गेली राव! आत्ता सगळ्यात जास्त उपयोग झाला असता ना! ;-)
--असुर
भलत्या वयात भलतं काही बघितलं
In reply to कोलटकर by इन्द्र्राज पवार
भलत्या वयात भलतं काही बघितलं नाही की असंच होतं इन्द्रा! या वयात भिजक्या वह्या पाह्यच्या का आणखी काही? तुमच्या भटिंड्यात पाऊस पडतो का नाही??
पाऊस
In reply to भलत्या वयात भलतं काही बघितलं by ३_१४ विक्षिप्त अदिती
".....या वयात भिजक्या वह्या पाह्यच्या का आणखी काही?..."
ये भी कुछ नही समझ्या !!
".....तुमच्या भटिंड्यात पाऊस पडतो का नाही??...."
उंहूं .... भटिंड्यात नाही...इकडे कोल्हापुरात आहे....वकिलाच्या 'त्या' प्रकरणाबाबतच्या नोटीशी आल्यात ढीगभर....आणि तसाच ढीगभर पाऊसदेखील कोसळत आहे कोल्हापुरात...पुण्याप्रमाणेच... डोक्यातदेखील गिज्ज झाल्ये ढीगभर....'भिजकी वही' च जणू सेकंड एडिशन !
इन्द्रा
".....या वयात भिजक्या वह्या
In reply to पाऊस by इन्द्र्राज पवार
केसरी जीवन घेत चला. अगदीच काही नही तर ३०+ तरी. असो.
केसरी जीवन व ३०+
In reply to ".....या वयात भिजक्या वह्या by बिपिन कार्यकर्ते
"....केसरी जीवन घेत चला...."
~~ आता हे काय असतं? मला शनिवारवाडा परिसरातील गायकवाड वाड्यात असणारा 'केसरी' माहित आहे, पण 'केसरी-जीवन' हा कुठला द्वंद्व समास आहे आणि तो कुठे मिळतो वा त्याचा काय उपयोग करतात याचा अभ्यास नाही. त्यामुळे भिजकी वहीच्या संदर्भात ती मात्रा चालणार नाही असे वाटते.
"...अगदीच काही नही तर ३०+ तरी..."
~ हं, याची जाहिरात थोर बोलिवूडचे अभिनयसम्राट तुषार कपूर आणि त्याहुनी थोर्रर्र थोर्रर्र 'क' निर्माती एकताताई यांचे पिताजी करीत होते असे अंधुकसे आठवते.
इन्द्रा
हं, याची जाहिरात थोर
In reply to केसरी जीवन व ३०+ by इन्द्र्राज पवार
ओ पवार, तुमची हार्डडिस्क कीती टीबीची आहे हो? का भरपुर एक्स्टर्नल एच डी पण मिळाल्यात तुम्हाला?
हार्ड डिस्क
In reply to हं, याची जाहिरात थोर by Nile
अहो, तसं काही नाही ओ नाईल जी ! आम्ही आपलं त्या मोकाट सुटलेल्या बकरीसारखं दिसल त्या शेतातील, प्लॉटमधील चारा खात हिंडत असतो आणि तेच मग डोक्यात आपसुक बसतं, पुढे केव्हा केव्हा रंवथ करताना काही मेंदूच्या कप्पात आत जावून बसलेल्या गोष्टी आठवत राहातात, इतकंच !
आणि अजून इथं एकट्याच्या राहाण्याचा पत्ता नाही, अन् मग एक्स्टर्नल एच.डी. कुठून आणू ?
इन्द्रा
ये भी कुछ नही समझ्या !! बाळा,
In reply to पाऊस by इन्द्र्राज पवार
बाळा, या वयात मिपासारख्या सायटींवर वेळ घालवण्यापेक्षा काही बर्या पॉपकॉर्नी साईट्स पहात चल एवढंच बोलू इच्छिते!
'ती' भानगड कोर्टकचेरीत गेली
In reply to पाऊस by इन्द्र्राज पवार
'ती' भानगड कोर्टकचेरीत गेली आणि भटिंडावाल्यांनी नोटीसा पण पाठवल्या ?.... नक्की काय केलस तू तिकडे?
अग
In reply to 'ती' भानगड कोर्टकचेरीत गेली by पुष्करिणी
तो भटिंडात नाही. कोल्हापुरात आहे. एवढं उत्तर पुरेसं आहे ना! जानम समझा करो!
पाय पुढे करा.....नमस्कार करतो....!!
In reply to अग by पैसा
काय नशीब !!! या तिघी खरं म्हणजे म्हणजे रॅमसे बंधूंच्या बहिणीच आहेत...एकापेक्षा एक टेरर...हॉरर !! तुम्ही तिघींनी आपापले पाय पुढे करा म्हणजे मी डोके ठेवतो त्यावर ! अगं बायांनो अजून मी लग्न करेना म्हणून इकडे आई आदळाआपट करीत आहे आणि दुसर्या बाजूला वकील 'त्या' घरबांधणीमुळे रक्त पीत आहेत....इथे भटिंडा आणि तिथली भानगड कुठून आली ????
इथे चिरमुरे फुटाणे खायाला खिशात पाच रुपये नाहीत....आणि भांगरा कुठला करतोय !!
इन्द्रा
अर्रर्र! इंद्रावर पाशवी
In reply to पाय पुढे करा.....नमस्कार करतो....!! by इन्द्र्राज पवार
अर्रर्र! इंद्रावर पाशवी शक्तींनी हल्ला चढवला म्हणा कि!;)
हो, आणि तू पण एक त्या पाशवी
In reply to अर्रर्र! इंद्रावर पाशवी by रेवती
हो, आणि तू पण एक त्या पाशवी शक्तींना साथ द्यायला!!
"वैयक्तिक गप्पांसाठी दमड्या
In reply to हो, आणि तू पण एक त्या पाशवी by ३_१४ विक्षिप्त अदिती
"वैयक्तिक गप्पांसाठी दमड्या खर्चुन खरडवहीची सोय केलेली आहे" असं म्हणण्याची सोय सुद्धा उरली नाही सद्ध्या!
हा हा हा हा
In reply to "वैयक्तिक गप्पांसाठी दमड्या by Nile
हा हा हा हा ... कसा फसलास पाशवी शक्तींमुळे! ;-)
आमच्या वैयक्तिक गप्पांत
In reply to "वैयक्तिक गप्पांसाठी दमड्या by Nile
आमच्या वैयक्तिक गप्पांत तुम्हांला का हो इतका इंटरेष्ट निळोबा
आणि वैयक्तिक काय , पवारसाहेबांच्या समोर इतका जटिल प्रश्न आहे तो सोडवतोय
तिघी कशाला?
In reply to पाय पुढे करा.....नमस्कार करतो....!! by इन्द्र्राज पवार
अदितीच्या नावात "पाय" आहेच की! ती एकटीच पुरे!
पण ती रामसे बंधूंची भगिनी
In reply to तिघी कशाला? by पैसा
पण ती रामसे बंधूंची भगिनी असल्याने तिचे पाय उलटे (म्हणजे ७/२२ नाही!) असण्याची शक्यता आहे.
अनामिकचं खातं बंद करावं का
In reply to पण ती रामसे बंधूंची भगिनी by अनामिक
अनामिकचं खातं बंद करावं का नाही असा नवीन कौल लवकरच येईल.
अरे वा,एकदम मुहूर्तावर घर
In reply to पाय पुढे करा.....नमस्कार करतो....!! by इन्द्र्राज पवार
अरे वा,एकदम मुहूर्तावर घर बांधायला काढलस की भटिंडात ..अभिनंदन हं!
(होणार्या) सासर्यांना न सांगता असं काही केलं तर कोर्टाच्या नोटीसा येणारच ना..
पण आईलातरी सांगायला हवं होतं हं!
आणि चार - दोन रूपये कशाला हवेत..आख्खी बँक आहेकी खिशात आता
>>>>>अगं बायांनो अजून मी लग्न
In reply to पाय पुढे करा.....नमस्कार करतो....!! by इन्द्र्राज पवार
>>>>>अगं बायांनो अजून मी लग्न करेना म्हणून इकडे आई आदळाआपट करीत आहे >>>>>
माझ्या ना...मामेभावाच्या बायकोच्या/////मावस बहिणीची/////मुलगी..........
ओ.....हो !!
In reply to >>>>>अगं बायांनो अजून मी लग्न by स्पंदना
"....माझ्या ना...मामेभावाच्या बायकोच्या/////मावस बहिणीची/////मुलगी.........!!"
अगं अपर्णा.... आपल्या कोल्हापुरातील मुली या इथल्या तिघींना नको आहेत माझ्यासाठी ! फार दुष्ट आहेत.... मी असाच कायम जसलमेरच्या वाळवंटात राहुटी बांधून सरडे अन् साळींद्र पकडत बसावे असे या तिघींना वाटते.
इन्द्रा
इंद्राचा आयडी हॅक झाला बहुतेक
In reply to ओ.....हो !! by इन्द्र्राज पवार
इंद्राचा आयडी हॅक झाला बहुतेक. फक्त तीन ओळीत प्रतिसाद संपला?
--असुर
हॅ हॅ हॅ इथे झाड धरण्यात कोण
In reply to इंद्राचा आयडी हॅक झाला बहुतेक by असुर
हॅ हॅ हॅ
इथे झाड धरण्यात कोण पटाईत आहे ते तुला सांगाव लागेल का रे असुरा ;)
आपण झाड आहोत की माकड हे
In reply to हॅ हॅ हॅ इथे झाड धरण्यात कोण by गणपा
आपण झाड आहोत की माकड हे इन्द्राला ठरवावे लागेल बॉ
माझ्या मते इंद्रा झाड आहेत
In reply to आपण झाड आहोत की माकड हे by विजुभाऊ
माझ्या मते इंद्रा झाड आहेत आणि त्यांला उलट्या 'पाया'च्या भुतान धरलय ;)
सुलट्या की उलट्या पायांचा प्रश्न
In reply to माझ्या मते इंद्रा झाड आहेत by गणपा
सर्वश्री असुर, विजुभाऊ, गणपा....असे नाही ओ मंडळी....,
तशा त्या तिघी चांगल्याच आहेत....मायाळु आहेत....काळजी घेतात माझी....[म्हणजे त्यांना वाटत असते कायम....आहे एकटाच, करू दे बिचारा लग्न, मग कळेल पुस्तक आणि पासबुक यात महत्वाचे काय असते ते.... आणि लागू दे भाकर्या थापायला, बाजार करायला....यासाठी], त्यामुळे जरी तशा त्या रोहिणी-नीला खाणार्या, रक्तपिपासू असल्या तरी त्यांची नावे माझ्या रेशन कार्डावरून काढून टाकावित असे कधी मला वाटणार नाही.
राहता राहिला....सुलट्या की उलट्या पायांचा प्रश्न.....तर ते लग्नाच्या वेळी पाहून घेतो...त्यावेळी भावाने थोरल्या बहिणींचे पाय धुवायचे असतात, असा काही प्रकार असतो असे म्हणतात ना?
[आहेर, मानपान वगैरे त्यांना काही नको आहे असे त्यांनी यापूर्वीच कळविले आहे....बघा, किती मोठ्या मनाच्या आहेत...]
असुरबाबा,.....ओळी तीनपेक्षा झाल्या आहेत.
इन्द्रा
दवणीय* प्रतिसाद. (शब्दाचे
In reply to सुलट्या की उलट्या पायांचा प्रश्न by इन्द्र्राज पवार
दवणीय* प्रतिसाद.
(शब्दाचे क्रेडिट :- नंदनश्री)
आहेर, मानपान वगैरे त्यांना
In reply to सुलट्या की उलट्या पायांचा प्रश्न by इन्द्र्राज पवार
मी चुकुन मानापमान वाचलं, म्हणणार होतो, हो हो अपमानाची जबाबदारी त्या तिघीच घेतील. ;-)
(पळा च्यामारी)
आम्ही हजर नव्हतो
In reply to आहेर, मानपान वगैरे त्यांना by Nile
याचा असा गैरफायदा घेता काय?
गैरफायदा घेणार्यांचा जाहीर णीसेद!
In reply to आम्ही हजर नव्हतो by पैसा
गैरफायदा घेणार्यांचा जाहीर णीसेद! णीसेदसभा दि. २० रोजी पणजी/पुणे/ठाणे/बेसिंगस्टोक या ठिकाणी होईल. :-)
मा. इन्द्रादा ('चंद्ररावजीपंतसाहेब' हे आलंच), मी सर्वश्री असुर की असुरबाबा हे ठरवा की आधी! एकाच प्रतिसादात नानाविध अवतार घेण्याइतकी ताकद अजून नाहीये माझ्यात. तुमचा प्रतिसाद सुरु होताच संपला म्हणून एक शंका वाटून गेली इतकंच. आपल्याकडे लोक कशावरुन दंगा घालतील काय नेम नाही! :-)
आणि कोण तो ज्याने तुमच्यावर हे आरोप केले, त्याला पाशवी शक्ती कधीच माफ करणार नाहीत. त्याचा कुकर आणि तवा लवकरच चोरीला जातो की नै बघा! ;-)
--असुर
सर्वश्री असुर
In reply to गैरफायदा घेणार्यांचा जाहीर णीसेद! by असुर
पाशवी शक्तीना तुमच्या आसुरी शक्तीचा पाठिंबा मिळालेला पहून धन्य धन्य वाटलं! णिसेद सभेला लाखोंच्या संख्येने गर्दी करा असे आवाहन सर्व पाशवी शक्तीना करण्यात येत आहे.
तरी सांगत होतो परा की जरा नीट
तरी सांगत होतो परा की जरा नीट वाग. उगाच नडु नकोस कुणाला =)) =))
+१
In reply to तरी सांगत होतो परा की जरा नीट by गणपा
+१
हेही कारण असू शकते.
बाकी तुला तसाही खरडवहीचा ऑप्शन नाहिये आज, तर एकतर्फी खरडी टाकायला बरा दिवस आहे. :-)
--असुर
हो!! मलापण ही एरर आली. बिका
हो!!
मलापण ही एरर आली. बिका आणि बिरूटे सरांना लिंक देताना. मला वाटले लिंकमध्ये एखादे अक्षर मागेपुढे झाले असेल. पण पुन्हा तेच.
मलाही आली.. दोन वेळा.
In reply to हो!! मलापण ही एरर आली. बिका by यशवंतकुलकर्णी
मलाही आली.. दोन वेळा.
पेश्शल कार्यवाही
तुमच्या खरडवहीवर पेश्शल कार्यवाही झालेली आहे. ;) इतरांना नडणार्या सदस्यांना तांत्रिक कारणांनी नडवण्याचा संपादक मंडळाने नवा मार्ग शोधला आहे. ;)
(ह. घ्यावे)
या निमित्ताने संपादक मंडळातील
In reply to पेश्शल कार्यवाही by प्रियाली
या निमित्ताने संपादक मंडळातील काही जण सदस्यांना नडवावे या मताचे आहेत हे समजलं.
(अजिबात हलके घेऊ नये ;) )
होय होय
In reply to या निमित्ताने संपादक मंडळातील by अवलिया
या चर्चेतून गळही टाकणार आहेत. पुढले मासे पकडायला. ;)
हा हा हा चालु द्या (देवमासा)
In reply to होय होय by प्रियाली
हा हा हा चालु द्या :)
(देवमासा) अवलिया
मधून मधून व्यनि करताना मिपा
मधून मधून व्यनि करताना मिपा कोलमडतंय. :(
हम्म्म अधुन मधुन ट्राय करत जा
In reply to मधून मधून व्यनि करताना मिपा by बिपिन कार्यकर्ते
हम्म्म अधुन मधुन ट्राय करत जा :)
व्यनिसंदर्भात ...
In reply to मधून मधून व्यनि करताना मिपा by बिपिन कार्यकर्ते
>>मधून मधून व्यनि करताना मिपा कोलमडतंय.
व्यनीसंदर्भात केवळ "सहजरावां"च्या तक्रारीची दखल घेतली जाईल.
बाकीच्या वापरकर्त्यांचा चिल्लर वापर लक्षात घेता सदर निर्णय घेण्यात आला आहे.
तोवर बाकीच्यांनी उगाच "माझी फ्री-किक आजकाल झॅवीसारखी जात नाही"च्या सुरात व्यनीच्या तक्रारी करु नये.
आम्हाला आमचे काम करु द्यात ( म्हणजे नक्की काय ते विचारु नये, अपमान आणि इतर बरेच काही होईल )
- छोटा डॉन
मला तर असा कोणताही एरर येत नाही.
मला असा कोणताही अनुभव मिपावर वावरतांना येत नाही.
-दिलीप बिरुटे
[ कोलमडलेला ]
त्यासाठी खरड व्यनी करावे
In reply to मला तर असा कोणताही एरर येत नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यासाठी खरड व्यनी करावे लागतात. तुमचं आपलं "गुपचुप बैठे हो जरुर कोई बात है" असं असतं
+/- १
मला पण मधून मधून हा प्रॉब्लेम आज येत आहे. :(
पण मिपाविषयक तांत्रिक अडचणी धाग्यावर लिहू नयेत असा नियम असल्याने मी इथे तक्रार करत नाहीये. ;)
थत्तेचाचा ...
In reply to +/- १ by नितिन थत्ते
>>मिपाविषयक तांत्रिक अडचणी धाग्यावर लिहू नयेत असा नियम असल्याने मी इथे तक्रार करत नाहीये
हां ऽऽऽ
थत्तेचाचा, बीग ब्रदर इज वॉचिंग हां !!
- छोटा डॉन
हॅहॅहॅ. म्हणून तर तक्रार
In reply to थत्तेचाचा ... by छोटा डॉन
हॅहॅहॅ.
म्हणून तर तक्रार केलीच नाही. :P
पण मिपाविषयक तांत्रिक अडचणी
In reply to +/- १ by नितिन थत्ते
बघा, बघा, हे खरे चाचा. इतरांबद्दल किती कळवळा. किती कणव. किती दया. किती हे. किती ते. पाणावले.
;)
अरेरे. याने पुसा डोळे.
In reply to पण मिपाविषयक तांत्रिक अडचणी by बिपिन कार्यकर्ते
अरेरे.
याने पुसा डोळे. :)
मला यात वरती आन्ग्लभाषेत
मला यात वरती आन्ग्लभाषेत उल्लेख केलेल्या 'द्रुपालचा' हात दिसतोय. बहुधा तुमचा आयपी ड्रेस मिळाला असावा त्याला.
पापं ऽऽऽऽ
ज्यांना ज्यांना असे एरर येताहेत त्यांना त्यांची पापं भोवत आहेत असे स्पष्ट सांगु इच्छितो.
पापाच्या प्रमाणानुसार देव शिक्षा करत आहे, ह्या हिशेबाने अदितीचे खातेच ब्लॉक व्हायला हवे, पण असो. ;)
आमचे मास्तर नेहमी म्हणायचे " डॉन्या, बाबा रे आपण जी पापं करतो ती आपल्या एक ना एक दिवस इथेच फेडावी लागतात", बहुतेक आज तो दिवस आला आहे.
माझा आजपासुन देवावर व मास्तरांवर विश्वास वाढला.
आलोच मी महादेवाला नारळ वाढवुन.
तोवर पराने माझ्या खरडवहीत "माझी चुक झाली" ही खरड १०० वेळा टाकावी असे सुचवतो.
- छोटा डॉन
अंधश्रद्धेला प्रोत्साहन
In reply to पापं ऽऽऽऽ by छोटा डॉन
अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारा प्रतिसाद. निषेध.
विचारजंती निषेध
In reply to अंधश्रद्धेला प्रोत्साहन by अवलिया
अशा विचारजंती निषेधांना आम्ही भीक घालत नाही. ;)
आमचे मास्तर नेहमी म्हणायचे "
In reply to अंधश्रद्धेला प्रोत्साहन by अवलिया
आता डान्याए मास्तरच डान्याला बाबा म्हणत होते हे ऐकून पापं कोणाची जास्त तेच कळेना मला. असो. आपल्याला काय...
जपुन ...
In reply to आमचे मास्तर नेहमी म्हणायचे " by बिपिन कार्यकर्ते
ओ मालक*, जरा जपुन.
इथे प्रत्येक गोष्टीचा हिशेब ठेवला जातो, उगाच पुन्हा मागाहुन तक्रार करु नका.
* मालक : इथे मालक हे संबोधन आहे, ह्याचा अर्थ असा नाही की बिपिनदा खरेच मालक आहेत. तसेच बाबाचेही आहे, पण मालक असलेले बिपिनदा हे सम्जुन घेण्याची शक्यता नाही, म्हणुनच ते कदाचित मालक आहेत ;)
- छोटा डॉन
हा हा हा !!! फुटले हे ऐकुन.
In reply to आमचे मास्तर नेहमी म्हणायचे " by बिपिन कार्यकर्ते
हा हा हा !!!
फुटले हे ऐकुन.
फाट्यावर ...
In reply to अंधश्रद्धेला प्रोत्साहन by अवलिया
विज्ञान, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी ( ह्यावर खरे तर मला एक डिट्टेल लेख लिहायचा आहे / होता, पण असो ) ह्याविषयी घोर अज्ञान असणार्या उपरोक्त प्रतिसादाला "फाट्यावर" मारले आहे.
कळावे.
- छोटा डॉन
तुम्ही तरी उजेड पाडा तिकडे,
In reply to फाट्यावर ... by छोटा डॉन
तुम्ही तरी उजेड पाडा तिकडे, नाय रजनीकांत फेल झाला यांच्या केस मध्ये, आता फक्त तुमचीच आशा आहे.
ज्यांचा पराक्रम थोर, शत्रू मारिला वारंवार|
In reply to पापं ऽऽऽऽ by छोटा डॉन
ज्यांचा पराक्रम थोर, शत्रू मारिला वारंवार|
त्यांसी दिसतो देव 'लवकर', असुर म्हणे||
पराजीरावांना पुखशु!!!!
--असुर
आलोच मी महादेवाला नारळ
In reply to पापं ऽऽऽऽ by छोटा डॉन
आलोच मी महादेवाला नारळ वाढवुन. >>>
एक शंका : हे महादेवाला नारळ कसे वाढतात ?
मेल्या ते वाढुन नाहीये...
In reply to आलोच मी महादेवाला नारळ by सुहास..
मेल्या ते वाढुन नाहीये... वाढवुन असे आहे. पाली अर्धमागधीचा अभ्यास कमी करून मराठी शिका जरा. ;)
जाऊ द्या हो ...
In reply to मेल्या ते वाढुन नाहीये... by बिपिन कार्यकर्ते
कशाला उगाच सुहाश्याला शिकवायच्या भानगडीत पडतात ?
सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच त्याच्या डोक्याचा ताप वाढवणे
सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवुन घेणे
( बाळ सुहास, आज एवढाच शब्द घोटुन ये, उद्या बाकीचे पाहु, कसें ? )
- छोटा डॉन
सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच
In reply to जाऊ द्या हो ... by छोटा डॉन
सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच त्याच्या डोक्याचा ताप वाढवणे
सुहाश्याला शिकवणे म्हणजे उगाच स्वतःच्या डोक्याचा ताप वाढवुन घेणे >>>
हे हे हे ..चल तस तर तस !! पण माझा प्रश्न अनुत्तरीतच रहातो ना ?
वत्स डॉन !!
महादेवाला नारळ कसा काय वाढवितात .हे म्हणजे (नारळाच्या काथ्यासदृश दिसणारा)आपल्या (नारळाईतकाच मठ्ठ)डोक्यावरील महिरप वाढवण्यासारखं काही आहे का ?
मेल्या ते वाढुन नाहीये...
In reply to मेल्या ते वाढुन नाहीये... by बिपिन कार्यकर्ते
मेल्या ते वाढुन नाहीये... वाढवुन असे आहे. पाली अर्धमागधीचा अभ्यास कमी करून मराठी शिका जरा >>>
असो ...
नवीन लेख लिहावा वाटत आता ..अर्धमागधीचा ऊगम आणी एक फटाल ऐरर
विचार
In reply to मेल्या ते वाढुन नाहीये... by बिपिन कार्यकर्ते
निट विचार केल्यास हा फरक कळायला फारशा अभ्यासाची गरज नाही.
मास्तरांनी केलेल्या
In reply to विचार by विनायक प्रभू
मास्तरांनी केलेल्या विश्लेषणाशी असहमत आहे ..
प्रश्न फरकाचा नव्हताच मुळी , प्रश्न होता की
महादेवाला नारळ कसा काय वाढवितात .
वाढवून आणि वाढून मधला फरक
In reply to आलोच मी महादेवाला नारळ by सुहास..
वाढवून आणि वाढून मधला फरक कळाला असता तर असा प्रश्न पडला नसता..
म्हनुन सांगित व्हतो शेट.. शालंत जा शालंत जा.. बगलात .. हिशेब चुकला ना..
:D
"Fatal error: Call to
"Fatal error: Call to undefined function drupal_mail() in /home/misavcom/public_html/sites/all/modules/guestbook/guestbook.module on line 494" हा मेसेज मला देखील येतोय दुर्लक्षीत पँथर चे संस्थापक काही कार्यवाही करतील काय? :P का ते स्वतःच गंडले आहेत?
दुर्लक्षीत पँथर चे संस्थापक
In reply to "Fatal error: Call to by शुचि
हे कोण म्हणे?
दुर्लक्षीत पँथर चे संस्थापक
In reply to "Fatal error: Call to by शुचि
दुर्लक्षीत पँथर चे संस्थापक काही कार्यवाही करतील काय >>>
अहो शुचीतै !!
त्यांनीच तर प्रकरणाला धागावाचा फोडली ना !!
मेम्बर
दुर्लक्षीत पँथर
सुहास तुम्ही कुठे दीन आहात
In reply to दुर्लक्षीत पँथर चे संस्थापक by सुहास..
सुहास तुम्ही कुठे दीन आहात तुम्ही कशाला दुर्लक्षीत पँथर चे सभासद झालात? माझं ठीक आहे. :( =))
तुम्ही कुठे दीन आहात तुम्ही
In reply to सुहास तुम्ही कुठे दीन आहात by शुचि
तुम्ही कुठे दीन आहात तुम्ही कशाला दुर्लक्षीत पँथर चे सभासद झालात? माझं ठीक आहे >>>
अभ्यास , अभ्यास ,अभ्यास कमी पडतोय आपला शुचितै !!
आम्ही पर्याच्या कुठल्याही मिपाजामिक संघटनेत बाय डिफॉल्ट असतो चित्र उपलब्ध नाही
अरेरे साक्षात खरडवही उचकपाचक
अरेरे साक्षात खरडवही उचकपाचक मंडळाचे अध्यक्ष श्री. प. रा. राजवाडे यांना असा त्रास सहन कारवा लागत आहे हे पाहुन डोळे पाणावले.
निषेध! निषेध! निषेध!
बिका तुम्हाला मिळालेला एक
In reply to अरेरे साक्षात खरडवही उचकपाचक by इंटरनेटस्नेही
बिका तुम्हाला मिळालेला एक रुमाल यांना पण द्या.
बाकी पर्याचा धागा हॅक कसा करावा ते या संपादकांना विचारा ;)
बाकी पर्याचा धागा हॅक कसा
In reply to बिका तुम्हाला मिळालेला एक by गणपा
गप बे... मोठ्याने बोलू नको.
बाय द वे... पराला दसर्याच्या शुभेच्छा दिल्या की नाही? तो लै भारी शुभेच्छा देतो. ;)
खवची सुविधा गेली म्हणजे
In reply to बिका तुम्हाला मिळालेला एक by गणपा
खवची सुविधा गेली म्हणजे आख्खा पराच हॅक झाल्यासारखा आहे.
इंट्या
In reply to अरेरे साक्षात खरडवही उचकपाचक by इंटरनेटस्नेही
उर्फ इण्टरनेटप्रेमी, तुझ्या खवमधे काही लिहिलं तर fatal error मेसेज येतोय. पण मेवे, प्रभो, इंद्रा यांच्या खव नीट चालू आहेत. काही खास लोकाना प्रॉब्लेम आहे असं वाटतंय. ;)
काही खास लोकाना प्रॉब्लेम आहे
In reply to इंट्या by पैसा
काही खास लोकाना प्रॉब्लेम आहे असं वाटतंय
ही ही ही ही ही हहे हेहे हे एहे हेह हॅ हॅ हॅ! (खास हे संबोध्न वाचुन जसं हसायला आलं तसं टंकलं आहे!)
(खास) इंट्या.
तू खफश्री
In reply to काही खास लोकाना प्रॉब्लेम आहे by इंटरनेटस्नेही
आहेस बाबा! खासच ना मग?
ध.मु. साहेब
ख.व. सम्राट ध.मु. साहेब आजुन लॉगिन नाय झाले म्हनुन 'सिस्टिम' हे आसल फालतु दुखन काढतिया...
कोण किडे करतोय रे कोडात?
कोण किडे करतोय रे कोडात? डान्रावांना सांगा की कोड दुरुस करायला, ते नुसते कोडकडे पाहुन कोड कंपाईल करतात!!
रोजच्या गप्पा टप्पा मारायला
रोजच्या गप्पा टप्पा मारायला मालकानी पैशे खर्चून रडवहीची सोय करून दिलेली आहे.
कोण मालक ?
In reply to रोजच्या गप्पा टप्पा मारायला by विजुभाऊ
कोण मालक ?
वा स्टाईल तर जमली.
In reply to कोण मालक ? by गणपा
वा स्टाईल तर जमली. त्याखाली
अशी सही करायची होतीस. पण नाही केलेस ते चांगले झाले. नाहीतर 'गणात्या' म्हणजे गणा + आत्या असे समजून गणा हा हा नसून ही आहे अशा गैरसमजातून काही जेष्ठ सभासदांनी 'मज्यंशी मयत्री कर्नर कं' अशा खरडी टाकल्या असत्या. असो. गणपा वाचलास रे.
मालकानी पैशे खर्चून रडवहीची
मालकानी पैशे खर्चून रडवहीची सोय करून दिलेली आहे. >>
पण आम्ही तर ऐकले होते की खरडवही फक्त 'हाय हॅल्लो ' करण्यासाठी आहे ते ?
नुकत्याच हाती आलेल्या
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, डान्रावांचा केस कोडात अडकल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
पुढची अपडेट :
In reply to नुकत्याच हाती आलेल्या by Nile
ह्या अडचणी सोडवताना "Nile" ह्या सदस्याच्या खात्याचे किंचित नुकसान झाले आहे.
ते दुरुस्त करोस्तोवर सदर खाते पुढील घोषणेपर्यंत बंद राहिल.
गैरसोईकरता क्षमस्व !!!
- छोटा डॉन
बरं मग ते लिस्ट मधले दुसरे
In reply to पुढची अपडेट : by छोटा डॉन
बरं मग ते लिस्ट मधले दुसरे सुरु करता काय?
सहज आणि धमु
या धाग्यावर अद्याप सहज आणि धमु यांचे प्रतिसाद नाहीत. म्हणजेच हा प्रश्न खरा नाही. पऱ्याने टाकलेला "दूसरा" आहे हा.
काय माहित त्यांचे प्रतिसाद पण
In reply to सहज आणि धमु by श्रावण मोडक
काय माहित त्यांचे प्रतिसाद पण ब्लॉक केले असतील. डान्याला काय अशक्य आहे सांगा??
श्रामो काका, व्यनी आणि खव
In reply to सहज आणि धमु by श्रावण मोडक
श्रामो काका, व्यनी आणि खव अनुक्रमे सहजराव आणि धम्याला वचकुन असावेत.
आय बिशाद लागुन गेली आहे त्यांची या महानुभवांना नडण्याची. ;)
काका ?
In reply to श्रामो काका, व्यनी आणि खव by गणपा
काका ?
ही हिंमत ?
श्रामोकाका, तुम्हाला काका म्हटल्याबद्दल ह्या गणपावर काय अॅक्शन घेऊ ते नुस्ते सांगा, चांगला धडा शिकवु ह्याला.
काय म्हणता ?
- छोटा डॉन
डान्राव, गणपाकडून तेल
In reply to काका ? by छोटा डॉन
डान्राव, गणपाकडून तेल हिसकावून घ्या, म्हणजे तुमचीही सोय आणि त्याचा "धंदा"ही (तुमच्या केसांसारखाच!) बसेल.
तुम्ही मध्ये मध्ये काडी करु
In reply to काका ? by छोटा डॉन
तुम्ही मध्ये मध्ये काडी करु नका. आम्ही काका-पुतणे काय ते पाहुन घेउ ;)
हलकट
In reply to काका ? by छोटा डॉन
हलकट! निमित्त साधून घेतोस काय? बघून घेईन. पुढं मागं संधी मिळेलच. अजून दोनाचे चार व्हायचे आहेत तुझे. नीट होऊ द्यायचं आहे ना? ;)
आता हे सगळं ह घ्या हेही सांगावं लागणार आहे का?
काठ्याकूट
In reply to हलकट by श्रावण मोडक
"श्रावण मोडक यांचं खातं का गोठवलं" असा काठ्याकूट लिहीण्यास सुरूवात करत आहे!
काथ्याकुट शब्दाचा शोर्ट फॉर्म
In reply to काठ्याकूट by ३_१४ विक्षिप्त अदिती
काथ्याकुट शब्दाचा शोर्ट फॉर्म = काकू
थ्यांक्यू विभा*! *विभा -
In reply to काथ्याकुट शब्दाचा शोर्ट फॉर्म by विजुभाऊ
थ्यांक्यू विभा*!
*विभा - विजुभाऊ
हा हा हा! आधी दचकलेच!
In reply to थ्यांक्यू विभा*! *विभा - by ३_१४ विक्षिप्त अदिती
हा हा हा! आधी दचकलेच!;)
बरंय आता तुझं पाशवी नाव वेगळं
In reply to हा हा हा! आधी दचकलेच! by रेवती
बरंय आता तुझं पाशवी नाव वेगळं लक्षात नाही ठेवावं लागणार!!
काय झालं मग शेवटी? निदे आहे
काय झालं मग शेवटी? निदे आहे की झोपला ?
संपादक मंडळाला धन्यवाद खरड
संपादक मंडळाला धन्यवाद खरड पाठवली आहे :)
उई उई उई हुई......
उई उई उई हुई......
काय राव! हॅट! लोकांना मूळ
काय राव! हॅट! लोकांना मूळ प्रश्न सोडवण्यापेक्षा त्यावर चर्चा करण्यातच भारी इंट्रेस्ट असतो.
ती एररची भानगड अजून तशीच आहे.
मला असा कोणताही एरर येत
मला असा कोणताही एरर येत नाहीये!
ढिन चॅक! ढिन चॅक! ढिन चॅक!
इन्टरनेटस्नेही
In reply to मला असा कोणताही एरर येत by इंटरनेटस्नेही
तुझ्या खवमधे काही लिहिता येत नाहिये मला.
Hmmmmmmmmmmmmmmmmm
अजून एक XXXXधागा. :(
सुज्ञास अधिक सांगणे न लगे.
(वैधानीक इशारा- Xच्या संख्येचा आणि अपेक्षित शब्दातील अक्षरांची संख्या सारखीच असेल असे नाही) ;)
हे हे हे
मला बर्याच मिपासदस्यांना सकाळपासून खरड करायचा अथवा व्यनी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र सतत Fatal error: Call to undefined function drupal_mail() in /home/misavcom/public_html/sites/all/modules/guestbook/guestbook.module on line 494 नावाचा मेसेज लिहुन येत आहे.
मिपाचा लाडका डायलॉगपापी लोकांना फटु दिसत नाही.
हा प्रकार तसाच असावा असे वाटते.
तज्ञांनी मार्गदर्शन करावे अशी पामराची माफक इच्छा आहे. :(
;)
जरी पाठवणार्याला फेटाल एरर
जरी पाठवणार्याला फेटल एरर आली तरी व्यनि पोचतोय बरं का तेव्हा सांभाळून =))
१०० वा प्रतिसाद..! आमचे लाडके
१०० वा प्रतिसाद..! आमचे लाडके प रा यांच्या धाग्यवरील हा शतकी प्रतिसाद आमचाच आहे हा आम्ही आमचा बहुमान समजतो!
म्हणुन तो काही बोलावणार नाही.
In reply to १०० वा प्रतिसाद..! आमचे लाडके by इंटरनेटस्नेही
१०० प्रतिसाद होउन गेलेत आणि "आमचे लाडके प रा यांच्या धाग्यवरील हा शतकी प्रतिसाद आमचाच आहे हा आम्ही आमचा बहुमान समजतो" असे गौरवोद्गार (?) काढलेत म्हणुन प रा बसायला बोलवेल (कमीशन मिळाले तरी) अशी अपेक्षा ठेवु नका.
हा हा हा ...
In reply to म्हणुन तो काही बोलावणार नाही. by चिंतामणी
परा जेवायला बोलावेल आणि वर जेवण कुठे आहे असं विचारेल!
परा जेवायला बोलावेल आणि वर
परा जेवायला बोलावेल आणि वर जेवण कुठे आहे असं विचारेल!
परा च्या ( पुणे ३० च्या ) भाषेत जेवायला या . म्हणजे तुम्ही जेवण घेऊन आमच्या कडे या असा होत असावा
आम्ही तर पुणे - ३० मध्ये
In reply to परा जेवायला बोलावेल आणि वर by विजुभाऊ
आम्ही तर पुणे - ३० मध्ये वास्तव्यालाच होतो काही काळ...
आम्ही तिकडे अनुभवलेला पाहुणाचार https://www.misalpav.com/node/13771 इथे वाचता येईल. :)
बाय द वे.. पुणे ३० मधील सुगरन्स या हॉटेलातील मटणाची सर कशालाच येणार नाही!
(नॉनव्हेज प्रेमी) इंट्या.
माझा पण खव आणि मेसेज अडकतोय.
माझा पण खव आणि मेसेज अडकतोय.