मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

युगलगीत: रुसली ग रुसली, माझी बायको रुसली

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
रुसली ग रुसली, माझी बायको रुसली
हिरो: रुसली ग रुसली, माझी बायको रुसली बसली ग बसली, कोपर्‍यात जावून बसली हिरो: तूला प्रफुल्लची साडी आणू का ग? तूला नवा मोबाईल घेवून देवू का ग? तूला कसला कंटाळा आलाय का ग? मग टिव्हीवर 'सासबहू' बघ ना ग हिरवीन: जावा तिकडं नका येवू इकडं नशीब माझं फुटकं काय वस्तू देता असली कसली? कशी वेळ माझ्यावर आली हिरो: आत्तां? साडी नको अन मोबाईलबी नको तुझी तर्‍हा ही असली कसली? रुसली ग रुसली, माझी बायको रुसली हिरो: नको घरी सैपाक करू आज बाहेर हाटेलीतच जेवू या ग तूला काय लागते ते सांग ना ग आणून देतो का नाय मग बघ हिरवीन: हाटेल नको न बिटेलबी नको मला नका लालूच दावू कसली हिरो: रुसली ग रुसली, माझी बायको रुसली हिरो: तूला मॉलला घेवून जातो बॉक्समधी सिनेमा दावतो मधी आयस्क्रीम थंडगार खावू आत्ता तुझा राग शांत कर पाहू हिरवीन: मॉल नको मला सिनेमाबी नको नका माझ्या रावन्या करू रातदिस तूमची डूटी हाय सुरू तुमच्यासाठी किती मी झुरू सोडा की नोकरी असली हिरो: रुसली ग रुसली, माझी बायको रुसली हिरो: तू घरचं काम नको करू धुनं भांड्याला बाई कर सुरू सासू तूझी काय बोलली का ग? जरा जिवाला खात पित जा ग हिरवीन: घरच्या कामाला माझी ना नाही सासू हाय चांगली, काय बोलत नाही तुमाला काय करावं समजत नाही अशा एकांताच्या वेळी हिरो: आँ?! आस्सं हाय का!! हिरो: आगं मग चल ये ना जरा इकडं नको जावू सोडून मला तिकडं आज मी डूटीवर जातच न्हाई शेवटी माझी अक्कल परत आली हिरवीन: या बया! चला जावा तिकडं हिरो: हसली ग हसली, माझी बायको हसली फसली ग फसली, माझ्या मिठीत बायको फसली (वरील गाण्यात ग्रामीण शब्द काढून टाकायचे असतील तर शहरी हिरो-हिरवीन यांची जोडी डोळ्यासमोर येवूद्या.) - पाषाणभेद (दगडफोड्या) १४/१०/२०१०

वाचने 2554 वाचनखूण प्रतिक्रिया 4

विसोबा खेचर 14/10/2010 - 20:28
मस्त :) तात्या. -- तात्या-धर्मेन्द्र भेट हा लेख मिपावर लौकरच! :)