"....पण सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला ते स्वतः ठरवेपर्यंत निवृत्त कधी होणार हे विचारायची पत्रकारांना बंदी करा."
+ हे वाक्य करोडो क्रिकेटप्रेमींचे आहे असेच म्हणतो.
बाकी व्हीव्हीएसबद्दल बोलताना/लिहिताना सर्वप्रथम काय आठवते ते त्याचे गॅलरीत उत्सुकतेने बसलेल्या, आपल्या सहकार्यांच्याकडे पाहत केलेले आश्वासक हास्य ! त्याचे ते हास्य म्हणजे पुढील चमकदार कामगिरीचा एक दाखलाच असतो.
अतिशय छान आठवणी सांगितल्या आहेत धागाकर्त्यांनी....विशेषतः गिलीची...जी नजरेतून सुटली होती.
इन्द्रा
हॅट्स ऑफ टू लक्ष्मण.. !!
लेखही छान लिहिलाय..
मला आलेल्या ढकलपत्रातील हे एक वाक्य :-
"#Gandhiji's last words were - 'Hey Ram', Ponting's last words would be 'Hey laxman !' "
लक्ष्मणची कलाकुसर नुकती पुन्हा एकदा पाहिली आणि भारत दौर्याची सुरूवात मस्त झाली !
>> बाकी विचार स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे. पण सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला ते स्वतः ठरवेपर्यंत निवृत्त कधी होणार हे विचारायची पत्रकारांना बंदी करा
१००% सहमत रे मित्रा...
@ भारतीय,
>> "#Gandhiji's last words were - 'Hey Ram', Ponting's last words would be 'Hey laxman !' :)
हे वाक्य एकदम आवडले :)
ढकलपत्रातील काही व्हेरी व्हेरी स्पेशल वाक्ये:
#The day VVS LAXMAN retires from Test cricket, it will be a National holiday in Australia
#Flash: Home Ministry has issued advisory for all people named Laxman against traveling to Australia
#I wont be surprised if Laxman is made honorary Australian citizen: better to have him on your side than a constant thorn in the flesh...
#I hereby declare that I am starting proceedings to find LaxmanJanmabhoomi so we can build a Laxman temple.
#Last week belonged to Ram. This week belongs to Laxman
#Lets demolish the hospital where Laxman was born n build a bhavya Laxman mandir!
#Sydney se 50-50 kos door gaon me jab koi cricketer rota hai..toh uski maa kehti hai beta chup hoja nahi toh laxman aa jaega
#Gandhiji's last words were - 'Hey Ram', Ponting's last words would be 'Hey laxman'
बीसीसीआय ला नम्र विनंती: जे काय ५०, २०, ५ ओव्हर्सचे गल्ली क्रिकेट खेळायचे ते खेळा. फालतू बोलर्सना १० यार्डवर असलेल्या बाउंड्रीच्या पलिकडे मारलेल्या फटक्यांना, सिक्सर्स, डीएलएफ मॅक्सिमम काय म्हणायचे ते म्हणा, त्यांना त्याबद्दल मिलीयन डॉलर्स द्या. पण वर्षातून निदान १०-१२ अशा टेस्ट्स होतील याची काळजी घ्या. आणि हो. बाकी विचार स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे. पण सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला ते स्वतः ठरवेपर्यंत निवृत्त कधी होणार हे विचारायची पत्रकारांना बंदी करा
आवडला लेख ...
शेवटचा परिच्छेद फार आवडला ..
लक्ष्मण एक कलाकार आहे कलाकार! कधीही विनाकारण घाईगडबड नाही. चेहर्यावर कधी ताणतणाव नाही. थंड डोकं. त्याला खेळताना पाहताना खेळ संपूच नये असं वाटत राहतं. बॅटिंग ही एक कला आहे हे तो त्याच्या एकापेक्षा एक खेळींनी पुन्हा पुन्हा सिद्ध करतो! एखाद्या प्रतिभावंत चित्रकार, कवी अथवा साहित्यिकाइतकाच त्याच्यातला कलाकारही मला भावतो. इतकी सुंदर अदाकारी की एकदा पाहून मन भरत नाही, आणि मी खुळा टिव्हीकडे पाहत म्हणत राहतो, " मज सांग लक्ष्मणा तुज पाहू किती?"
नि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने म्हणजे कहर. सिवा परवा म्हणाला, "ही ऑल्वेज रिझर्व्हस हिज बेस्ट फॉर ऑसीज!" अगदी योग्य कमेंट. अशा हाय व्होल्टेज रायव्हल्रीज या ट्रिगर ठरत असाव्यात लक्ष्मणासाठी. अथवा तो झिम्बाब्वेविरूद्ध वा बांग्लादेशविरुद्ध खेळणारा लक्ष्मण नि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारा लक्ष्मण निराळे भासले नसते.
छान लिहिलंय फारेण्डा. शेवटच्या परिच्छेदाशी पूर्णपणे सहमत! :)
नाद भरी...
"जे पी मोर्गन" यान्ची आठवण झाली.
असेच नजाकतदार चौकार मारत राहा...!
"शारजाच्या वादळी खेळीत सचिनला सुन्दर साथ देणारा लक्ष्मणच होता. पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध !"
लक्ष्मण खरोखर गुणी खेळाडू आहे! कदाचित १५ वर्षे आधी जन्माला आला असता, तर अनेक विक्रम स्वत:च्या नावे केले असते त्याने!
त्याची नजाकत, अदाकारी, स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, कट, फ्लीक तर अप्रतिम आहेच, पण तितकाच वाखाणण्याजोगा आहे तो त्याचा शांतपणा, पेशन्स आणि त्याची एकाग्रता!
आत्ताच्याच सामन्यात पहा, सचिन आणि त्याने फटकेबाजी करुन मॅच आवाक्यात आणली पण त्यानंतर सचिन औट झाला, आणि मग रांगच लागली! तिथेच समोरच्या बाजूने हा मनुष्य गीतेतले श्लोक वाचून आल्यासारखा 'कर्म करतो, फळाची अपेक्षा करित नाही' च्या चालीवर रन्सा ठोकतोय. कुठेही विषाद नाही, चिडचिड नाही, हाराकिरी करुन विकेट फेकणं नाही! धोनी औट झाला तेव्हा सुद्धा त्याची एकाग्रता तीळमात्रही ढळली नाही! इशांतला हाताशी धरुन त्याने विजय अक्षरश: कांगारुंच्या घशातून ओढून आणला. विजय मिळाल्यावर सुद्धा कुठेही त्याचं अतिरेकी प्रदर्शन नाही. फक्त बॅट आणि हेल्मेट उंचावून ड्रेसिंग रूम कडे बघून एक स्माईल, आणि रैना-ओझाला एक कडकडून मिठी!
नव्या खेळाडूंनी त्याच्याकडून शिकाव्यात अश्या अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत !
फारएंडभौ, तुम्ही लैच भारी लेख वाचायला दिल्याबद्दल धन्स!
--असुर
ओ फारएन्ड शेठ, जरा कुठे गुंगलो लेखनात तोवर तुमचा लेख संपला पण :( ह्याला काय अर्थ आहे ? अहो व्हेरी व्हेरी स्पेशल माणसावर जरा अजुन जोरदार आणि त्याच्या लाँग इनिंग सारखाच एक लेख येउ द्या :)
वरचे लेखन आवडले हे वे सां न ल.
फारेंडा मस्त लिहीलयस पण फारच आटोपतं घेतलस.. एखाद्या टेस्ट सारखं येउंदे क्रमशः वर क्रमशः :-)) मला वाटलंच जे.पी., मेवे. डानराव ह्यांच्याकडून येईलच आता मेजवानी आणि हो मस्त फोटू चढव त्याचा ह्या लेखात..
*शेवटचा परिच्छेद विशेष आवडला*
प्रतिक्रिया
लक्षमण रावांचा विजय असो! काय
पत्रकारांना बंदी
मस्त!
जबरदस्त
हॅट्स ऑफ टू लक्ष्मण.. !!
मस्त रे !
सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला
मस्त लेख
छानच. शेवटच्या परिच्छेदाशी
ढकलपत्रातील काही व्हेरी
बीसीसीआय ला नम्र विनंती: जे
सुंदर!
नाद भरी... "जे पी मोर्गन"
BRAVO V V S!
ओ फारएन्ड शेठ, जरा कुठे
छान
क ड क
+१
मस्त रे!
मस्तच!!!! क्रिकेट बघण्याचा
मस्त!
छान..
मस्त लिहीलं आहेस फारेण्डा,
.
फार फार आवडलेला लेख.