✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लक्ष्मणः व्हेरी व्हेरी स्पेशल!

फ
फारएन्ड यांनी
गुरुवार, 10/07/2010 - 10:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6794 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

लक्षमण रावांचा विजय असो! काय

स्वैर परी
गुरुवार, 10/07/2010 - 10:46 नवीन
लक्षमण रावांचा विजय असो! काय खेळलाय राव! भारि च एकदम!
  • Log in or register to post comments

पत्रकारांना बंदी

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 10/07/2010 - 10:47 नवीन
"....पण सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला ते स्वतः ठरवेपर्यंत निवृत्त कधी होणार हे विचारायची पत्रकारांना बंदी करा." + हे वाक्य करोडो क्रिकेटप्रेमींचे आहे असेच म्हणतो. बाकी व्हीव्हीएसबद्दल बोलताना/लिहिताना सर्वप्रथम काय आठवते ते त्याचे गॅलरीत उत्सुकतेने बसलेल्या, आपल्या सहकार्‍यांच्याकडे पाहत केलेले आश्वासक हास्य ! त्याचे ते हास्य म्हणजे पुढील चमकदार कामगिरीचा एक दाखलाच असतो. अतिशय छान आठवणी सांगितल्या आहेत धागाकर्त्यांनी....विशेषतः गिलीची...जी नजरेतून सुटली होती. इन्द्रा
  • Log in or register to post comments

मस्त!

ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 10/07/2010 - 10:53 नवीन
मस्त रे फारेंडा!
  • Log in or register to post comments

जबरदस्त

योगी९००
गुरुवार, 10/07/2010 - 11:09 नवीन
जबरा खेळी..आणि उत्तम आढावा.. लक्ष्मण निवृत्त झाला की ऑस्ट्रेलिया National Holiday जाहीर करणार (संदर्भ : एक ढकलपत्र) ...हे पटले.
  • Log in or register to post comments

हॅट्स ऑफ टू लक्ष्मण.. !!

भारतीय
गुरुवार, 10/07/2010 - 11:33 नवीन
हॅट्स ऑफ टू लक्ष्मण.. !! लेखही छान लिहिलाय.. मला आलेल्या ढकलपत्रातील हे एक वाक्य :- "#Gandhiji's last words were - 'Hey Ram', Ponting's last words would be 'Hey laxman !' "
  • Log in or register to post comments

मस्त रे !

संदीप चित्रे
गुरुवार, 10/07/2010 - 12:22 नवीन
लक्ष्मणची कलाकुसर नुकती पुन्हा एकदा पाहिली आणि भारत दौर्‍याची सुरूवात मस्त झाली ! >> बाकी विचार स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे. पण सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला ते स्वतः ठरवेपर्यंत निवृत्त कधी होणार हे विचारायची पत्रकारांना बंदी करा १००% सहमत रे मित्रा... @ भारतीय, >> "#Gandhiji's last words were - 'Hey Ram', Ponting's last words would be 'Hey laxman !' :) हे वाक्य एकदम आवडले :)
  • Log in or register to post comments

सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला

गणेशा
गुरुवार, 10/07/2010 - 12:58 नवीन
सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला ते स्वतः ठरवेपर्यंत निवृत्त कधी होणार हे विचारायची पत्रकारांना बंदी करा बरोबर
  • Log in or register to post comments

मस्त लेख

भाऊ पाटील
गुरुवार, 10/07/2010 - 13:09 नवीन
जे.पी. मॉर्गन गायब झाल्यापासुन एवढा सुंदर लेख वाचायला मिळाला नव्हता
  • Log in or register to post comments

छानच. शेवटच्या परिच्छेदाशी

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 10/07/2010 - 13:15 नवीन
छानच. शेवटच्या परिच्छेदाशी खूपच सहमत.
  • Log in or register to post comments

ढकलपत्रातील काही व्हेरी

मृत्युन्जय
गुरुवार, 10/07/2010 - 13:32 नवीन
ढकलपत्रातील काही व्हेरी व्हेरी स्पेशल वाक्ये: #The day VVS LAXMAN retires from Test cricket, it will be a National holiday in Australia #Flash: Home Ministry has issued advisory for all people named Laxman against traveling to Australia #I wont be surprised if Laxman is made honorary Australian citizen: better to have him on your side than a constant thorn in the flesh... #I hereby declare that I am starting proceedings to find LaxmanJanmabhoomi so we can build a Laxman temple. #Last week belonged to Ram. This week belongs to Laxman #Lets demolish the hospital where Laxman was born n build a bhavya Laxman mandir! #Sydney se 50-50 kos door gaon me jab koi cricketer rota hai..toh uski maa kehti hai beta chup hoja nahi toh laxman aa jaega #Gandhiji's last words were - 'Hey Ram', Ponting's last words would be 'Hey laxman'
  • Log in or register to post comments

बीसीसीआय ला नम्र विनंती: जे

फ्रॅक्चर बंड्या
गुरुवार, 10/07/2010 - 14:30 नवीन
बीसीसीआय ला नम्र विनंती: जे काय ५०, २०, ५ ओव्हर्सचे गल्ली क्रिकेट खेळायचे ते खेळा. फालतू बोलर्सना १० यार्डवर असलेल्या बाउंड्रीच्या पलिकडे मारलेल्या फटक्यांना, सिक्सर्स, डीएलएफ मॅक्सिमम काय म्हणायचे ते म्हणा, त्यांना त्याबद्दल मिलीयन डॉलर्स द्या. पण वर्षातून निदान १०-१२ अशा टेस्ट्स होतील याची काळजी घ्या. आणि हो. बाकी विचार स्वातंत्र्य वगैरे ठीक आहे. पण सचिन, द्रविड आणि लक्ष्मण ला ते स्वतः ठरवेपर्यंत निवृत्त कधी होणार हे विचारायची पत्रकारांना बंदी करा आवडला लेख ... शेवटचा परिच्छेद फार आवडला ..
  • Log in or register to post comments

सुंदर!

मेघवेडा
गुरुवार, 10/07/2010 - 14:30 नवीन
लक्ष्मण एक कलाकार आहे कलाकार! कधीही विनाकारण घाईगडबड नाही. चेहर्‍यावर कधी ताणतणाव नाही. थंड डोकं. त्याला खेळताना पाहताना खेळ संपूच नये असं वाटत राहतं. बॅटिंग ही एक कला आहे हे तो त्याच्या एकापेक्षा एक खेळींनी पुन्हा पुन्हा सिद्ध करतो! एखाद्या प्रतिभावंत चित्रकार, कवी अथवा साहित्यिकाइतकाच त्याच्यातला कलाकारही मला भावतो. इतकी सुंदर अदाकारी की एकदा पाहून मन भरत नाही, आणि मी खुळा टिव्हीकडे पाहत म्हणत राहतो, " मज सांग लक्ष्मणा तुज पाहू किती?" नि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सामने म्हणजे कहर. सिवा परवा म्हणाला, "ही ऑल्वेज रिझर्व्हस हिज बेस्ट फॉर ऑसीज!" अगदी योग्य कमेंट. अशा हाय व्होल्टेज रायव्हल्रीज या ट्रिगर ठरत असाव्यात लक्ष्मणासाठी. अथवा तो झिम्बाब्वेविरूद्ध वा बांग्लादेशविरुद्ध खेळणारा लक्ष्मण नि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणारा लक्ष्मण निराळे भासले नसते. छान लिहिलंय फारेण्डा. शेवटच्या परिच्छेदाशी पूर्णपणे सहमत! :)
  • Log in or register to post comments

नाद भरी... "जे पी मोर्गन"

विकाल
गुरुवार, 10/07/2010 - 15:05 नवीन
नाद भरी... "जे पी मोर्गन" यान्ची आठवण झाली. असेच नजाकतदार चौकार मारत राहा...! "शारजाच्या वादळी खेळीत सचिनला सुन्दर साथ देणारा लक्ष्मणच होता. पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध !"
  • Log in or register to post comments

BRAVO V V S!

असुर
गुरुवार, 10/07/2010 - 15:31 नवीन
लक्ष्मण खरोखर गुणी खेळाडू आहे! कदाचित १५ वर्षे आधी जन्माला आला असता, तर अनेक विक्रम स्वत:च्या नावे केले असते त्याने! त्याची नजाकत, अदाकारी, स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, कट, फ्लीक तर अप्रतिम आहेच, पण तितकाच वाखाणण्याजोगा आहे तो त्याचा शांतपणा, पेशन्स आणि त्याची एकाग्रता! आत्ताच्याच सामन्यात पहा, सचिन आणि त्याने फटकेबाजी करुन मॅच आवाक्यात आणली पण त्यानंतर सचिन औट झाला, आणि मग रांगच लागली! तिथेच समोरच्या बाजूने हा मनुष्य गीतेतले श्लोक वाचून आल्यासारखा 'कर्म करतो, फळाची अपेक्षा करित नाही' च्या चालीवर रन्सा ठोकतोय. कुठेही विषाद नाही, चिडचिड नाही, हाराकिरी करुन विकेट फेकणं नाही! धोनी औट झाला तेव्हा सुद्धा त्याची एकाग्रता तीळमात्रही ढळली नाही! इशांतला हाताशी धरुन त्याने विजय अक्षरश: कांगारुंच्या घशातून ओढून आणला. विजय मिळाल्यावर सुद्धा कुठेही त्याचं अतिरेकी प्रदर्शन नाही. फक्त बॅट आणि हेल्मेट उंचावून ड्रेसिंग रूम कडे बघून एक स्माईल, आणि रैना-ओझाला एक कडकडून मिठी! नव्या खेळाडूंनी त्याच्याकडून शिकाव्यात अश्या अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत ! फारएंडभौ, तुम्ही लैच भारी लेख वाचायला दिल्याबद्दल धन्स! --असुर
  • Log in or register to post comments

ओ फारएन्ड शेठ, जरा कुठे

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 10/07/2010 - 17:34 नवीन
ओ फारएन्ड शेठ, जरा कुठे गुंगलो लेखनात तोवर तुमचा लेख संपला पण :( ह्याला काय अर्थ आहे ? अहो व्हेरी व्हेरी स्पेशल माणसावर जरा अजुन जोरदार आणि त्याच्या लाँग इनिंग सारखाच एक लेख येउ द्या :) वरचे लेखन आवडले हे वे सां न ल.
  • Log in or register to post comments

छान

श्रावण मोडक
गुरुवार, 10/07/2010 - 17:57 नवीन
वेळीच आलेलं छान स्फुट.
  • Log in or register to post comments

क ड क

गणपा
गुरुवार, 10/07/2010 - 18:16 नवीन
+१ सर्वांशी सहमत.
  • Log in or register to post comments

+१

मी-सौरभ
Sat, 10/09/2010 - 07:35 नवीन
गणपा भौ शी सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मस्त रे!

उपास
गुरुवार, 10/07/2010 - 19:03 नवीन
फारेंडा मस्त लिहीलयस पण फारच आटोपतं घेतलस.. एखाद्या टेस्ट सारखं येउंदे क्रमशः वर क्रमशः :-)) मला वाटलंच जे.पी., मेवे. डानराव ह्यांच्याकडून येईलच आता मेजवानी आणि हो मस्त फोटू चढव त्याचा ह्या लेखात.. *शेवटचा परिच्छेद विशेष आवडला*
  • Log in or register to post comments

मस्तच!!!! क्रिकेट बघण्याचा

प्रभो
गुरुवार, 10/07/2010 - 19:59 नवीन
मस्तच!!!! क्रिकेट बघण्याचा एवढा आनंद देणार्‍या लक्ष्मणाबद्दल न बोलता फक्त बॅटींग बघत बसावं वाटतं..... :)
  • Log in or register to post comments

मस्त!

बेसनलाडू
गुरुवार, 10/07/2010 - 20:50 नवीन
समयोचित आणि सुंदर लेखन. आवडले. (लक्ष्मणफ्यान)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

छान..

चिगो
गुरुवार, 10/07/2010 - 23:03 नवीन
मस्त ओघवतं विवेचन.. लक्ष्मण म्हणजे "नेमेसिस" आहे कांगारुंसाठी..
  • Log in or register to post comments

मस्त लिहीलं आहेस फारेण्डा,

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/07/2010 - 23:07 नवीन
मस्त लिहीलं आहेस फारेण्डा, आणि शिवाय लक्ष्मणचा देव बनवलेला नाही हे जास्तच आवडलं.
  • Log in or register to post comments

.

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 10/07/2010 - 23:07 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

फार फार आवडलेला लेख.

उत्खनक
Tue, 03/19/2013 - 14:33 नवीन
फार फार आवडलेला लेख. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा