मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिंदूर

सन्जोप राव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मिलिंद फणसेंची अप्रतिम सिंदूर आणि आसपासच्या समाजात साचत चाललेली समृद्ध अडगळ यांची मनात गल्लत झाल्याने उमटलेले हे काही वेडेवाकुडे नि:शब्द होत गेलो, मजबूर होत गेलो हिंदू वाचुवाचूनी हिंदूर होत गेलो ठिणग्या विझून गेल्या, पिकल्या जरी मिशाही हसले पुन्हा नेमाडे मी धूर होत गेलो धारा न अमृताच्या पानेच ही सहाशे डोळ्यात नीज येता मगरुर होत गेलो ही कोसलाबिढारे वाचून पाठ होती 'हिंदू' जुन्या बाजारी - मी शूर होत गेलो स्मरणातुनी पुसेना पुसता कथा 'खंड्या'ची काहीच वाचवेना, मी दूर होत गेलो

वाचने 2957 वाचनखूण प्रतिक्रिया 9

विजुभाऊ 26/09/2010 - 20:24
हम्म. ठीक आहे. या उपर काहीच म्हणावेसे वाटत नाही. दूर शूर धूर मगरूर या शब्दांचा अर्थ माहीत आहे. हिंदूर म्हणजे काय? की तुम्हाला त्या तिथे विधूर हा शब्द वापरायचा होता असो. बाकी एखादी लेखणी थकली की फक्त काहीच वाचवेना, मी दूर होत गेलो हेच म्हणावेसे वाटते. ...................( रावसाहेंबांच्या उत्तम लेखनाचा एक चाहता)

चतुरंग 26/09/2010 - 23:36
अस्वस्थ भावना चांगल्याप्रकारे व्यक्त झाल्या आहेत! रंगा