✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कवितेचा एक प्रयोग

र — रामदास, Wed, 05/14/2008 - 19:00

प्रतिक्रिया द्या
7419 वाचन

💬 प्रतिसाद (21)
ल
लिखाळ Wed, 05/14/2008 - 19:05 नवीन

दोन शब्दांचा उपयोग

लंकेस जाण्या आधी जरा 'उरकून' घेतो आटप रावणा आता पिंडी मी वाळूत ठेवतो --(गोकर्ण महाबळेश्वरचा) लिखाळ.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 05/14/2008 - 19:48 नवीन

क्या बात है!!:))

लिखाळजी, मूळ कवितेपेक्षाही तुमच्या दोन ओळी आवडल्या!!:)) जबरदस्त आणि आशयगर्भ!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
म
मन Wed, 05/14/2008 - 19:56 नवीन

जब्बर्दस्त लिखाळ राव!

:-)) ;-)) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्राजु गुरुवार, 05/15/2008 - 17:13 नवीन

अजब..

आहे बुवा तुमची विचार करण्याची क्षमता... :)) :)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ग
गणपा Wed, 05/14/2008 - 19:09 नवीन

लिखाळ

लंकेस जाण्या आधी जरा 'उरकून' घेतो आटप रावणा आता पिंडी मी वाळूत ठेवतो जबरा =)) =)) =)) फुटलोना मी.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 05/14/2008 - 19:28 नवीन

हम्म्म्म. छान कल्पना आहे.

ऊन तापवी मातीला श्रावण जगवी धरतीला 'रावण' तुमच्या मनातला वाळूत गाडा तरि त्याला चार दिसांच्या नात्याला पापणी जपे ओलाव्याला चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/15/2008 - 17:14 नवीन

क्या बात है...

मी विचारच करत होते की, तुम्ही नक्की काहीतरी लिहिलं असेल... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
द
देवदत्त Wed, 05/14/2008 - 19:32 नवीन

छान प्रयोग

छान प्रयोग आहे. पण कवितेच्या प्रांतात अस्मादिकांची भटकंती कमीच आहे त्यामुळे इथे बहुधा काही नाही :(
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 05/14/2008 - 19:44 नवीन

कसेही

श्रावणात हा खेळ असे ऊन आणि पाऊस दोन्ही पडे चार दिसा॑ हा खेळ पाहुनी पापणी ही फडफडे वाळुची ही घरे बा॑धुनी रावण त्यात झोपी असे
  • Log in or register to post comments
फ
फक्त संदीप Wed, 05/14/2008 - 20:12 नवीन

असेच सुचले म्हणुन

मी संदीप,एक वाचक श्रावण सरला, ऊन तापले होते, तापलेल्या वाळु मध्ये रावण ऊभा स्वप्न सीतेचे पापण्यात होते. एक डिझाईनर :SS :SS :SS
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर गुरुवार, 05/15/2008 - 06:49 नवीन

खाना या रोना?

उन उन श्रावण घेवड्याची भाजी चार मिरच्या जास्तच घातलेला रावणभात खाऊन ज्यांचे डोळ्यात पाणी आलेले दिसत नाही, त्यांनी पापणी मिटलेलीच असणार!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/15/2008 - 08:12 नवीन

मस्त!

मस्त आहे प्रयोग! सगळ्यांच्या कविता आवडल्या...! :) लिखाळराव आणि रंगाने छान लिहिले आहे... रामदासराव, तुम्ही नका कवितांच्या फंदात पडू! तो तुमचा प्रान्त दिसत नाही! (हा असाच आपला मोफत सल्ला बरं का! त्याचं विशेष काही मनावर घेऊ नका!) :) आपला, (किंचितकवी) तात्या.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 05/15/2008 - 10:10 नवीन

श्रावण ऊन

श्रावण ऊन खात झोपला अचानक पाऊस पडू लागला पापणी पावसात भिजली आणि वाळूची घरे वाहून गेली रावणाच्या दहा मधली चार गेली ज्यांचे मनाज रावण त्यांना मिळाली.. :? (अगदी बाळबोध..)
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी गुरुवार, 05/15/2008 - 12:20 नवीन

श्रावण आला

श्रावण आला बरसत सृष्टीने रुप ल्याले नवे | उन पावसाचा खेळ चालतो सामील धरती नवपालवी सवे || रावण बैसला खाली अडकवून कानास जानवे | वाळूत ठेवूनी लिंग गणपती खोड त्याची जिरवे || पापणी मिटोन म्हणतात विजुभाउ मलेशियास जावे | चार घटका करमणूक करण्या घर सखीचे धुंडावे || ज्यांचे बरे त्याच्या म्हणे आंबोळी निंदकाचे घर शेजारी असावे ||
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 05/15/2008 - 17:31 नवीन

श्रावण,उन,रावण,वाळू,पापणी,चार,ज्यांचे.

श्रावणात खुलुन येई उन पावसाचा खेळ पापणीत मिटलेल्या चार घटिकांचा मेळ... शिवलिंग स्पर्शाने वाळू हळूवार पतित झाली रावणाची मस्ती अशी गणेशाने उतरविली रामदासे दिले हे काही शब्द वेगळे ज्यांचे काव्य बनले मिसळगृही आगळे... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Fri, 05/16/2008 - 01:55 नवीन

श्रावण,उन,र

श्रावण,उन,रावण,वाळू,पापणी,चार,ज्यांचे. रावण जाळू नका श्रावण पाळू नका वाळू खाते ऊन तेथे घाम गाळू नका चार खांद्यांची मागणी जिथे मिटली पापणी ज्यांचे त्यांचे देणे-घेणे असे टाळू नका
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 05/16/2008 - 02:25 नवीन

क्या बात है ॐकारा!

फारच सुंदर! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ॐकार
म
मदनबाण Fri, 05/16/2008 - 04:23 नवीन

क्या बात है ॐकारा! +१

अगदी हेच म्हणतो..... मदनबाण.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
र
रामदास Sat, 05/17/2008 - 09:20 नवीन

प्रयोगातला आनंद.

सर्जनशीलता वाढवण्यासाठी केलेल्या कार्यशाळेत सुद्धा अशीच मजा आली. एकूण साठ प्रयोग होते.परंतू आम्ही केवळ पंधरा -विस पूर्ण करू शकलो. कवितेचा प्रयोग कठीणच होता.आम्ही फक्त सहाच करू शकलो. मिपावर मात्र ज्या वेगाने कविता आल्या त्या वाचून एक गोष्ट लक्षात आली ,की मिपावर सर्जन विपुल आहे. वाचन करणार्‍यांचे, कविंचे , मनापासून आभार.
  • Log in or register to post comments
र
रघु सावंत Sun, 07/08/2012 - 12:11 नवीन

फारच छान आहे कवीता सर इथेही

फारच छान आहे कवीता सर इथेही तुमची वाटचाल छान झालेली दिसते. फुढेही लिहित रहा म्हणजे बरं वाटेल. रघू
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 07/08/2012 - 13:17 नवीन

दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण..

चार श्रावण ऊन रावण वाळू झरे पापणी फिरे ज्यांचे चार त्यांचे फार. .... दुर्बोधता हे नवकाव्याचे व्यवच्छेदक लक्षण होय, असे खुद्द गंगाधर गाडगिळानी सांगून ठेऊन आमच्यासारख्यांची चांगली सोय करून ठेवलेली आहे....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा