मंडळी, सर्वात आधी क्षमाच मागतो. अहो त्याचं काय आहे की, बोलवायचं-बोलवायचं करून राहूनच गेलं बघा. नाही म्हणजे, हल्ली आमच्याकडच्या गणपतीला सार्वजनिक ठेवलाच नाहीये आम्ही. फक्त निमंत्रितांनाच बोलावतो. म्हणजे कसं आहे बघा की वर्गणीदार आणि ऊत्सवकाळात त्यांच्या घरी आलेले पाहूणे, एवढेच लोक मिळून गणपती साजरा करतो. वाटलेलं, इकडच्या सर्व मंडळींना आमंत्रण (की निमंत्रण, जे काय असेल ते) धाडेन या वर्षी, पण नाही जमलं.
काय विचारलत, आमच्या मंडळाच्या गणपतीमधे विशेष काय म्हणून? अहो, आमच्या मंडळाचा गणपती आहे ना त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याच नवसाला पावत नाही. सहाजिकच, २४ तास ते ५ किलोमीटर (भाषानिष्ठांनी किलोमीटरला पर्यायी शब्द सुचवावा) या अगाध आकड्यांच्या रांगा त्याच्यासाठी लागत नाहीत. त्या तसल्या रांगेतल्या (किंवा सिद्धिविनायकाच्या सोमवार रात्रीपासून मंगळवार संध्याकाळच्या रांगेतल्याही) गणपतीनिष्ठांना एक प्रश्न विचारावासा वाटतो की, "लालबागके और तत्सम तथाकथित नवसको पावनेवाले गणपती और घरके फोटुवाले गणपती में क्या-क्या फरक होते हय?" असो, तर अमुक-तमुक नगरचा राजाही नाहीये आमच्या मंडळाचा गणपती. मुर्तीही 'छप्परचुंबी' नाहीये शिवाय किर्तीही आमच्या २-४ चाळींपुरतीच. कोणावरचीही संकटं वगैरे पार करायला किंवा सगळ्यांना सुखी ठेवायला अजिबात धावून जात नाही. त्याच्यासमोर तारांकीत लोक दर्शनाला येऊन, वर त्यालाच उपकृत केल्यासारखं मिडीयासमोर भाषणं करत नाहीत. आत गणपतीसाठीचे भव्य देखावे आणि बाहेर कार्यकर्त्यांच्या पत्त्यांच्या नवनवीन बंगल्यांचेही देखावे नाहीयेत. विसर्जनाच्या मिरवणूकीत गुलाल तसेच, दारू(फटाक्याची आणि 'शोभेची')ही नसते.
आमच्याकडच्या गणपतीला बोलवायचं कारण इकडे प्रत्येकजण गणपतीच्या दैवी मान्यतेपेक्षा मानतो तो टिळकांच्या ऊत्सव सुरू करण्याच्या स्पिरीटला. कोणताही कार्यकर्ता किंवा भक्त मंडपात गणपतीकडे गार्हाणं मांडायला न येता सार्वजनिक संघटनेच्या वैयक्तिक गरजेची पूर्तता करायला येतो. रात्री दिव्यातलं तेल संपतं म्हणून आमचा गणपती कोपत नाही. रोज भले मोठाले हारही लागत नाहीत त्याला कारण मुर्तीची उंचीच मुळी २ फूट. उगाच 'उशीरा आलो तरी पुढच्याचा आधी मी' असे कोणीच म्हणत नाही कारण मूळात ताठकळत रहावं लागेल एवढी रांगच नसते. असल्या ऊत्सवासाठी खंडणी काढली जात नाही. रस्त्यात मधेच मंडप उभारून, चोरीची विज घेऊन लोकांची गैरसोय केली जात नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणपतीच्या नावाखाली स्वत:ची प्रसिद्धी करायचा सोस कोणालाच नाही.
बघा मग, पुढच्या वर्षी जमलं तर या नक्की.
भारी समर्थ
वाचने
2808
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
>> "लालबागके और तत्सम तथाकथित
भानावर या.
In reply to >> "लालबागके और तत्सम तथाकथित by शुचि
यात कीव करण्यासारखं काय आहे?
In reply to भानावर या. by chipatakhdumdum
मनातील तळमळ कळाली . छान
जियो! मस्त लिहिलंय. एकदम हळुच
आणलात ना!
भांडुपच्या गणरायासारखा रुसून बसलाय?
In reply to आणलात ना! by पैसा
लय भारि लिवलय राव मेरेकु भि
हा हा हा.
उत्तम
नक्की कोणाला बोलावता?
आमचा गणपती श्रीमंत हाय
अशा प्रकारचा अंनिस चा गणपती
खरेच गणेशोस्तव करावा का?