समरमध्ये इथे, म्हणजे अमेरिकेत, फार्मर्स मार्केट नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे जागोजागी आठवड्याचा बाजार भरतो. आम्ही सबर्बमध्ये राहतो, खरेदी सुपरमार्केटमध्ये करतो. त्याऐवजी एखाद्या शनिवारी किंवा रविवारी सकाळी शहरांमध्ये जागोजागी आसपासच्या शेतांतून येणारा ताजा भाजीपाला व फळं विकण्यासाठी शेतकरी व मळेवाले येतात. खरेदीसाठी भारतीय व चिनी लोक तसेच ऑर्गॅनिक व फ्रेश खाण्याची हौस असलेले अनेक अमेरिकन तिथे येतात. या बाजारातून नुसता फेरफटका मारणे हादेखील अतिशय उल्हसित करणारा अनुभव असतो.
परवाच आमच्या इथल्या भाजीबाजारात एका अनोळखी अमेरिकन बाईशी माझे बोलणे झाले. भाजी निवडताना "तो पलिकडचा भोपळा इथे देता का?" "घेवडा फार छान आहे नाही?" "तुमच्याकडे कसा करतात" इत्यादी झाल्यावर तिने मला विचारले,
"तुम्ही हिंदू आहात, हो ना?" आता तसं म्हटलं तर मी कुठलाच धर्म रूढार्थाने पाळत नाही. म्हणून मी म्हटले,
"नाही, मी भारतीय आहे"
"पण भारतीय म्हणजेच हिंदू ना?" तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसले.
"हिंदू हा धर्म आहे. जसे ख्रिश्चन, मुस्लीम तसेच हिंदू. खूपसे भारतीय हिंदू असतात. पण इतर धर्माचेही अनेक लोक भारतात राहतात." मी म्हटले
नवीन मिळालेल्या ज्ञानाने तिचा गोंधळ उडालेला दिसत होता. खरे तर भारतीय या विषयावर एखादे लघु व्याख्यानही झोडायला मला आवडले असते. पण स्थळ काळ अनुकूल नव्हते.
आणखीन असाच एक दुसरा अनुभव.
इथल्या एका लायब्ररीत मला काही हिंदी पुस्तकं बघायची होती. लायब्ररीयनने सांगितलं की "या इथून पलिकडे परदेशी भाषांचा विभाग आहे. तिथे तुम्हाला "हिंडू" भाषेतली पुस्तकं मिळतील." तिथेही मला तिचं हिंदी भाषा व हिंदू धर्म या बाबतीत थोडंसं प्रबोधन करावं लागलं. सगळे हिंदी भाषिक हिंदू नसतात, सगळे हिंदू हिंदी बोलत नाहीत, आणि सगळे भारतीय हिंदू किंवा हिंदीभाषिक नसतात हे समजावून सांगायला थोडे कष्ट घ्यावे लागले.
तसे बघितले तर इंडियन शब्दाचे मूळ हिंदू शब्दाच्या जवळच जाते. सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे ते हिंदू आणि त्या प्रदेशाचे नाव हिंद किंवा हिंदुस्तान. सिंधूचं इंडस रिव्हर झालं तसं हिंदचं इंडिया झालं. त्यात हिंदी हे भाषेचं नाव त्याच मुळांमधून आलेलं. मात्र आजच्या काळात हिंदू शब्दाने धर्म सूचित होतो, तर भारतीय शब्दाने भारतावर निष्ठा असणारे सर्वधर्मी नागरिक सूचित होतात.
भारतीय समाजाशी इतका संपर्क येऊनही परदेशातल्या लोकांमध्ये इतक्या मूलभूत बाबतींमध्ये गोंधळ असू शकतो, याचं आश्चर्य वाटलं. वरील प्रसंगांमध्ये शब्दांमधल्या साम्यामुळे व अज्ञानामुळे हे झाले असावे, त्यामुळे मला त्यांचा राग आला नाही. मात्र आपला समाज, आपली संस्कृती, आपला देश, आपली ओळख (आयडेंटीटी) याबद्दल आपण जिथे राहतो त्या परदेशी समाजात जास्त अवेअरनेस असावा असे मनापासून वाटते. तुम्हाला असे काही अनुभव आले आहेत का?
वाचने
29063
प्रतिक्रिया
110
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>म्हणजे त्यांना काही हरकत
In reply to >>म्हणून पर्यायाने भारतीय by अर्धवट
व्यापक
In reply to >>म्हणजे त्यांना काही हरकत by आमोद शिंदे
मी जेव्हा इतर धर्मांचा संदर्भ
In reply to व्यापक by विकास
वाटते ना
In reply to मी जेव्हा इतर धर्मांचा संदर्भ by आमोद शिंदे
तसे असेल तर तुमच्या मूळ
In reply to वाटते ना by विकास
>>हिंदू ह्या शब्दाच्या वरील
In reply to तसे नाही by विकास
- वास्तव्य / जन्म
- पितृभू
- पुण्यभू
तीनही अटी अर्थातच व्यापक अर्थाने घ्यायच्या आहेत.माझ अनुभव - इथे अमेरीकेत एका
हिन्दी
मस्तच प्रभाकरराव.
In reply to हिन्दी by प्रभाकर कुळ्कर्णी
>>ईन्ग्लंड च्या लोकांना
In reply to हिन्दी by प्रभाकर कुळ्कर्णी
प्रभाकर , आपला माय-मराठी
उत्तर भारत आणि मराठा
इंद्रा, तुझ्या उत्तरेतला
In reply to उत्तर भारत आणि मराठा by इन्द्र्राज पवार
मस्त ...
In reply to इंद्रा, तुझ्या उत्तरेतला by पुष्करिणी
>>बाहेर एकच हैसियस सांगणारा )
In reply to मस्त ... by छोटा डॉन
शब्दांचा घोटाळा
फार छान प्रतिसाद. ह्या
In reply to शब्दांचा घोटाळा by राजेश घासकडवी
गुर्जी आले.. गुर्जी आले..
In reply to शब्दांचा घोटाळा by राजेश घासकडवी
>>सगळ्या भारतीय खिचडीऐवजी
In reply to गुर्जी आले.. गुर्जी आले.. by अर्धवट
हिंदू आणि भारतीय ह्यां दोन