✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हनुमंताची व्यथा !

च — चिगो, गुरुवार, 09/09/2010 - 16:06
त्या दिवशीच्या पेपरात कूठल्याशा गावची खबर होती खबर जरी लहान असली तरी तिची मजा जबर होती.. गाव म्हणे आकारानं तसं जरा छोटं होतं गावकुसाच्या शिवेवर हनुमानाचं मंदिर मोठं होतं.. जेव्हा कधी गावात लग्नाची वरात यायची व-हाडी मंडळी मंदिराच्या सावलीला आडोशाला हायची.. वरातीतल्या बायका मात्र कधीमधी मंदिरात जायच्या हनुमानच्या मुर्तीसमोर खुशाल अंगावरच्या साड्या बदलायच्या.. सालोसाल असंच घडुन अखेर ती एक रीत झाली मात्र शेवटी हनुमंताच्या ब्रम्हचर्याची जीत झाली.. एकदिवशी भक्तांच्या ध्यानी आलं मुर्तीनं डोळे मिटले होते कदाचित हनुमंताच्याही डोळ्याचे आता पारणे फिटले होते...!

प्रतिक्रिया द्या
6361 वाचन

💬 प्रतिसाद (21)

कदाचित हनुमंताच्याही

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 09/09/2010 - 16:09 नवीन
कदाचित हनुमंताच्याही डोळ्याचे आता पारणे फिटले होते...!
येवड्या ओळी सोडुन बाकी कविता आणि कल्पना झक्कास हो.
  • Log in or register to post comments

सहमत

अवलिया
गुरुवार, 09/09/2010 - 16:13 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सहमत.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 09/09/2010 - 16:27 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अरे हो...

चिगो
गुरुवार, 09/09/2010 - 16:16 नवीन
सॉरी... Disclaimer द्यायला विसरलो.. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश्य नाही..
  • Log in or register to post comments

नाही हो.. गोतमारे. आमच्या

अवलिया
गुरुवार, 09/09/2010 - 16:18 नवीन
नाही हो.. गोतमारे. आमच्या धार्मिक भावना नाही दुखावत. कोण मुद्दाम लिहितं आणि कोण अजाणतेपणे लिहितं हे नक्की कळतं आम्हाला. तेवढी बुद्धी आम्हाला बुद्धिमंत हनुमानाच्या आशीर्वादाने मिळालेली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

कविता आणि कल्पना झक्कास हो.

चिंतामणी
गुरुवार, 09/09/2010 - 16:24 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments

राजकुमाराशी सहमत... बाकी,

मदनबाण
गुरुवार, 09/09/2010 - 16:36 नवीन
राजकुमाराशी सहमत... बाकी, मारुती स्त्री राज्यात गेल्यावर तिथल्या स्त्रीया मारुतीच्या भुभु:कारापासुन गर्भिण राहत, असे वाचल्याचे स्मरते !!! ;) संदर्भ:--- नवनाथ भक्तिसार (अध्याय ३) (अल्लख निरंजन... ;) )
  • Log in or register to post comments

मारुती स्त्री राज्यात

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 09/09/2010 - 17:44 नवीन
मारुती स्त्री राज्यात गेल्यावर तिथल्या स्त्रीया मारुतीच्या भुभु:कारापासुन गर्भिण राहत, असे वाचल्याचे स्मरते
घामाचे थेंब पण चालत बहुदा ;) मकरध्वज आठवतोय ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

ह्म्म. मग त्या मूर्तीचे डोळे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 09/09/2010 - 18:13 नवीन
ह्म्म. मग त्या मूर्तीचे डोळे पूर्वीपासून मिटलेलेच असतील. ध्यानस्थ मारूती असेल तो. ;) लोकांनी आत्ता पाहीले असे. जर त्याने बायकाना आत येताना पाहून भु:भुकार केला असता तर त्या सगळ्याच गाभण झाल्या असत्या ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मकरध्वज आठवतोय ना ? खी खी

मदनबाण
गुरुवार, 09/09/2010 - 17:51 नवीन
मकरध्वज आठवतोय ना ? खी खी खी... ;)
  • Log in or register to post comments

झकास रे

पाषाणभेद
गुरुवार, 09/09/2010 - 18:32 नवीन
झकास रे
  • Log in or register to post comments

झकास कविता...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/09/2010 - 19:06 नवीन
अजून येऊ दे....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अजून येऊ दे....! कोण ?

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/10/2010 - 14:29 नवीन
अजून येऊ दे....!
कोण ? ;) नाही कविता वाचुन भलतीच शंका आली म्हणुन विचारले हो प्रा. डॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> कोण ? कविता येऊ दे असे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/10/2010 - 14:35 नवीन
>>> कोण ? अजून कविता येऊ दे असे म्हणायचे आहे. च्यायला, या पराच्या...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

खुलाशाबद्दल धन्यवाद हो.

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/10/2010 - 14:45 नवीन
Image removed. Image removed. खुलाशाबद्दल धन्यवाद हो. तुम्हाला कविता म्हणजे काव्य अभिप्रेत आहे हे मी समजुन घेतले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आई ग

कार्लोस
गुरुवार, 09/09/2010 - 20:27 नवीन
एक दम सहि
  • Log in or register to post comments

सुरेख...

उपेन्द्र
गुरुवार, 09/09/2010 - 20:38 नवीन
सुरेख...
  • Log in or register to post comments

सुरेख सुन्दर पेक्षा मला ही

स्पंदना
Fri, 09/10/2010 - 14:25 नवीन
सुरेख सुन्दर पेक्षा मला ही एकदम ढिन्च्याक कविता वाटली. सह्ही लिहिल आहे. आडोसा म्हणुन साड्या बदलताना ....बिचारा हनुमान अन बिच्चार्‍या स्त्रिया !!
  • Log in or register to post comments

धन्यवाद....

चिगो
Fri, 09/10/2010 - 17:42 नवीन
धन्यवाद !!
  • Log in or register to post comments

छाण..

मी-सौरभ
Fri, 09/10/2010 - 17:50 नवीन
कल्पना छान आहे...
  • Log in or register to post comments

मस्त.

गंगाधर मुटे
Mon, 09/13/2010 - 10:56 नवीन
अवलियाजींशी सहमत. बाकी कविता एकदम भन्नाटच.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा