✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हे बंध रेशमाचे.. (संपुर्ण)

न
निखिल देशपांडे यांनी
गुरुवार, 09/09/2010 - 22:24  ·  लेख
लेख
(प्रेमदिनी पूर्वप्रकाशित) प्रिय सखे.... तू हे वाचे पर्यंत प्रेमदिन सुरु झालेला असेल... ह्या प्रेमदिनी मी आज हे प्रेमपत्र लिहित आहे. खरे तर ह्या नंतर तुझी रिऍक्शन काय असेल ह्या भीतीने लिहायला हात धजावत नाहीय पण आता याचीही सवय होत आहे असेच म्हणावेसे लागेल... गेल्या तीन वर्षा पासून आपण एकमेकांना ओळखतो... ओळखतो म्हणजे काय? मागचे तीन महिने सोडले तर आपले बोलणे फार कमीच व्हायचे. अर्थात त्याला कारण मीच आहे हे मला मान्य आहेच.. वागलोच होतो मी तसा... त्याची शिक्षा करतोय ना सहन गेले तीन वर्ष.. आता अजुन किती सहन करणार???? माझ्या समोर अजुनही तीन वर्षापूर्वीची तू डोळ्यासमोर आहेस... आपला नोकरीचा पहिला दिवस होता... एका लहानशा शहरातून इंजिनीअरिंग करुन मी ह्या मोठ्या कंपनीत नोकरीला लागलो होतो... अर्थात कँपस मधूनच नोकरी मिळाल्यामुळे फारसा प्रश्न नव्हता आला... "पापा कहतें हैं" सारखी आयुष्यासाठी अनेक स्वप्नं डोळ्यांत घेऊन घरातून निघालो होतो... पहिल्यांदाच बाहेर राहणार होतो... त्यात कंपनीने ट्रेनिंगला भुबनेश्वरला पाठवले होते... आजही तो पहिला दिवस स्पष्ट आठवतो आहे.. कंपनीने दिलेल्या राहायच्या जागेवरून प्रशिक्षण केंद्रावर मी लवकरच पोहचलो होतो... साधारण नेहमीचेच सगळे सोपस्कार सुरवातीला झालेच.. तेच कंपनीची ओळख करुन देणारे प्रेझेंटेशन आणि भरमसाठ जॉइनिंग फॉर्म्स.. मग हळू हळू प्रत्येकाची बॅच सांगण्यात आली... त्यात आमच्या कॉलेजचे कोणीच माझ्या बॅच मधे नव्हते... त्यानंतर पुढे त्यांनी आपल्या बॅच साठी सी. आर. होण्यास कोण उत्सुक आहे विचारले.... आधी तर कोणाचाच हात वर झाला नाही. मग अचानक मुलींच्या बाजुला लक्ष गेले तर एक गोरापान हात वर झालेला दिसला... त्या गोर्‍या हाताला मग स्टेजवर बोलवण्यात आले....होय तुझाच तो हात.... आजही आठवतेय मला तु त्याच रुपात... मोरपंखी रंगाचा तुझा तो पंजाबी ड्रेस... मानेवर रुळणारे केस... कसे विसरु तुझे ते रुप... लव्ह अ‍ॅट फर्स्ट साईट का काय असेच झाले होते... आणि तु अगदी बिनधास्त स्टेजवर जाउन स्वता:ची ओळख करुन देत होतीस...काही सेकंद माझ्यासाठी जगच थांबले होते की काय??? तु जागेवर जाऊन बसे पर्यंत मी तुझ्याच कडे बघत होतो.. कार्यक्रम संपताना आजच्या दिवशीची उपस्थिती प्रत्येकाने सी आर कडे नोंदवायची होती... माझी नजर तुलाच शोधत होती.. आणि मग मी तुझ्याकडे आलो.. तेव्हा पहिल्यांदा तुला जवळून बघितले.... तुझ्या घार्‍या डोळ्यांनी तर मला घायाळच केले म्हणावे!!! त्या मोरपंखी ड्रेस वर मोरापिसाचे कानातले...अगदी आ वासून मी तुझ्या कडे पहात होतो.. कदाचित ते तुझ्या लक्षात आलेही असावे...सगळ्यांची तुझ्याकडच्या कागदावर सही करुन झाली तरी मी तसाच उभा होतो.. शेवटी तूच माझ्या समोर आलीस आणि माझ्या हातात तो कागद दिला "Please sign this"... सही करत असतानाही माझे लक्ष तुझ्याकडेच होते म्हणा... सहीचा कागद तुझ्या हातात देताना आपली नजरा नजर झाली आणि तु माझ्या कडे बघुन गोड हसलीस... अगदी हृदयात कळ यावी असेच होते ते हसू.... आणि त्यानंतर "जोशी, माझ्या कडे बघणे झाले असेल तर वर्गा कडे चला!!!" हा टोला तर खासच होता... त्यानंतरचे काही दिवस असेच गेले.. म्हणजे आपली ओळख तर झाली होती... आपण योगा योगाने एकाच ग्रुप मधे आलो होतो.. एकाच ग्रुप मधे असल्या मुळे रोज ट्रेनिंग संपल्या नंतर आपण एकत्र असायचो... हळु हळु बोलणेही वाढत होतेच.. ओळखीचे रुपांतर मैत्रीत होत होते... माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुला एस एम एस करुनच व्हायची आणि शेवट तुझ्याशी फोनवर बोलतच व्हायचा. आपल्या मैत्रीबद्दल आपल्याच ग्रुप मधे अनेक लोकांना आश्चर्य वाटायचे... तुझी तर अखंड बडबड चालू असायची... तुलाही माझ्यासोबत वेळ घालवणे आवडायचे असे वाटायला लागले होते.. त्यात रोज रात्रीच्या त्या कॉफीशॉप मधल्या गप्पा.. तू तुझ्या शेजारची जागा माझ्यासाठी वर्ग, कॉफीशॉप प्रत्येक ठिकाणी राखून ठेवणे.. ह्या सगळ्यांनी मी खरे तर सुखावतच होतो... साधारण महिना भर हे असेच चालले असेल, अगदी आपल्या चिल्का च्या ट्रिप पर्यंत.... असाच एका विकेंडला आपला चिल्का सरोवर बघायला जायचा प्लॅन होता.... सकाळी मला लवकर उठवायचे कठिण काम तूच फोन करुन केले होतेस. बस तुमच्या बिल्डिंग जवळून सुटणार होती. मी सगळे आवरुन धावत पळतच पोहचलो होतो... बस मधे चढलो तर नेहमी प्रमाणे तु तुझ्या बाजुच्या खुर्चीवरची बॅग उचलून घेतलीस.. नेहमी पेक्षा आज तू वेगळीच वाटत होतीस... बस सुरु झाली आणि एक एक करुन गाणे बजावणे सुरु झाले... बस मधे काय दंगा घातला होता आपण..!!! त्यात सगळ्यात पुढे आपणच दोघेजण होतो हा भाग वेगळा..... मी माझ्या भसाड्या आवजात "प्रथम तुज पाहता" गायला लागताच तुझे ते हसणे आणि नंतर ते लाजणे आजही मला चांगलेच आठवते.... ह्या गाण्याचा वेळेसच मी ठरवले आजच तुला विचारायचे... आपण चिल्काला पोहचलो तिथे मोठ्या बोटीत बसुन डॉल्फिन बघुन आलो.. आणि नंतर कुणीतरी पायडल बोटिंगला जायचे असे ओरडले आणि मग सगळेच तिकडे निघालो... आपण तिथे पोहचेपर्यंत तिथल्या चार माणसांच्या पॅडल बोटस् सगळ्यांनी ढापल्या.. नि आपल्यासाठी दोन लोकांचीच बोट शिल्लक राहिली... न ठरवताच बर्‍याच गोष्टी मला हव्या तशा घडत होत्या!!! ;) नेहमी प्रेमाणच तू तिथे खुललेली होतीस... आपण किनार्‍यापासून बरेच लांब आल्या नंतर अचानक मी बोट थांबवली... तुझ्याकडे बघुन हसलो... अभावितपणे तू पण हसलीस.. मग हळूच मी तुला म्हणालो.. मला तुला काही सांगायचे आहे.... तु अचानक शांत झालीस.. "मी तुझ्यावर प्रेम करतो"!!! तू आधी एक मंद स्मित केलेस आणि म्हणालीस,"चल रे जाउयात" तू उत्तर द्यायचे टाळलेस.. मी परत विचारले तरी उत्तर दिले नाहीस.. आपण तिथून परत निघुन बस मधे परतलो तरी तू शांतच होतीस... परतीच्या प्रवासात आपण एकदाही एकमेकांशी बोललो नाही.. दुसर्‍या दिवशी सकाळी ऑफिसला जाताना बस मधे चढलो पण तुझ्या बाजुला माझ्यासाठी जागा नव्हती... आपण ग्रुप मधे सोबत असायचो पण तू माझ्याशी बोलायचे टाळायचीस... आपल्या ट्रेनिंगच्या शेवटच्या दिवशी मात्र तू माझ्याशी बोलायला आलीस.. "माझे प्रेम म्हणजेच सगळे काही आहे असे समजु नकोस.. मला प्रेमात पडणे शक्यच नाही... मला माझ्या घरच्यांच्या मनाप्रमाणेच लग्न करायचे आहे" एवढे सांगून तू निघून गेलीस. ट्रेनिंग नंतर आपण सगळेच मुंबईत आलो... पहिल्याच दिवशी आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्ट्स मिळाले... त्यामुळे आपला कॉन्टॅक्ट कमी झाला.. आधी तू माझ्या आसपास तर असायचीस पण आता आपले भेटणे केवळ एखाद्या विकेंडला जेव्हा सगळा ग्रुप जमायचा तेव्हाच.. त्यातही तुझा मला टाळण्याच प्रयत्न असायचा... कधीच तू मला बोलायची संधी दिली नाहीस.. तसे मला तुझ्या बद्दल इतरांकडून कळायचे.. पण अजुनही तुझ्या कडुन मला समाधानकारक उत्तर मिळालेच नाही. असेच दिवस जात होते आपल्या भेटी कमी होत होत्या... त्यातच आला तुझा वाढदिवस... खरे तर तुला भेटायची खुप इच्छा होती पण शक्य होईल असे मला वाटतच नव्ह्ते.. पण अजुन एक प्रयत्न म्हणुन मी तुला पुष्पगुच्छ पाठवायचे ठरवले... पुजाशी बोलुन मी एक बुके तुझ्या रुमवर पाठवला... तो पुजानेच रिसिव्ह केला.. तु घरी नव्हतीसच... संध्याकाळी घरी आल्या आल्या तुझा मला फोन!!! जाम चिडली होतीस... मी का बुके पाठवला??... तुला विसरुन जा वगेरे अनेक वेळा सांगितले... ह्या पुढे तुझ्याशी कोणताही संपर्क ठेवू नको असे पण सांगीतले... फार खचलो होतो गं मी...!!! पुढे एक वर्ष आपला कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता... खरे तर ठेवू नये अशी तुझीच इच्छा होती... तुझ्या पुढच्या वाढदिवसापर्यंत मी तुझ्याशी काहीच संपर्क ठेवला नव्हता... तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी पुजाचा मला फोन आला... "काय प्रेमवीर, आज पाठवणार का बुके???" असा खोचक प्रश्न विचारला.. खरे तर मला आता फारशी आशा उरलीच नव्हती.. पण पुजाच्या सांगण्यावरुन मी तुला बुके पाठवला... ह्यावेळेस दिवसभर फोन वर असल्यामुळे मी तुझा फोन नाही घेऊ शकलो... तु खुप चिडली असणार.. त्यांना कसे फेस करायचे हे मला कळत नव्हते.. शेवटी हिंमत करुन तुला फोन लावला... ह्या वेळेस तू खुप शांत असल्याचे तुझ्या पहिल्याच वाक्यात जाणवले... "मी का तुझ्यावर प्रेम करावे??? मी तर तुला नीट ओळखतही नाही... मग तुझ्याशी लग्न करायचा निर्णय कसा घेणार??? " असे काहीसे तुझे प्रश्न होते... माझ्या उत्तराने तुझे समाधान होत होते का हे मला कळत नव्हते... पण शेवटी आपण एकमेकांना जाणून घ्यायचे आणि त्यानंतरच तू माझ्यावर प्रेम करू शकतेस का नाही हे तू मला सांगणार असे आपले ठरले!!! आज तुझा वाढदिवस होऊनही आता तीन महिने झाले आहेत... त्यादिवसा पासून आपण रोजच भेटत आहोत...रोज रात्री किती तास फोन वर बोलणे होतंय याचा हिशेबच नाही.. तुझ्या सोबत घालवलेला क्षणन् क्षण मला आठवतोय.. कुठे कुठे नाही फिरलो आपण मुंबई मधे... पुजाच्या मते आता तू परत पहिल्यासारखी खुलली आहेस... या तीन महिन्यात आपण एकमेकांना खुपच ओळखायला लागलो आहोत... आता एक क्षणही मला तुझ्या शिवाय घालवणे शक्य नाहीय... आणि आपण पुढचे आयुष्य एकमेकांसोबत छान व्यतित करू शकतो हा विश्वास आता मला नक्कीच आहे. म्हणूनच आज ह्या प्रेमदिनी मी तुला परत एकदा विचारतोय... "माझ्याशी लग्न करशील??? तु माझी होशील का???" तुझाच वेडा!!! एवढे लिहुन झाले, लवकर पाठवायला हवे आता.... अरे,आता अशा अवेळी कुणी बेल वाजवली असेल???? बारा वाजायला पाचच मिनिटे बाकी आहेत ... मला बाराच्या ठोक्याला पाठवायचे होते!!! थोड्याशा अनिच्छेनेच दार उघडले तर माझ्यासाठी एक धक्का होता... मिड-नाईट बुके डिलेव्हरी... आणि त्या सोबत एक नोट... "माझ्याशी लग्न करशील????" तुझीच वेडी!!! :) संपुर्ण
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5252 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

वाचतोय

सुनील
गुरुवार, 09/09/2010 - 22:27 नवीन
येऊ दे लवकर
  • Log in or register to post comments

वाचतेय

पैसा
गुरुवार, 09/09/2010 - 22:29 नवीन
पण पूर्वप्रकाशित आहे ना? मग दुसरा भाग तयार असेलच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

व्वोके :: कॅटॅगिरी :

सुहास..
Fri, 09/10/2010 - 00:28 नवीन
व्वोके :: कॅटॅगिरी : प्रेमकाव्य समीक्षण : कॉपी मार्क्स : शुन्य लेखनशैली : वाचल्यावर,पुस्तकी वाक्ये,ऊदा. (पुजाच्या मते आता तू परत पहिल्यासारखी खुलली आहे) समीक्षण : पुन्हा कॉपी-कॅट मार्क्स : शुन्य शिर्षक : हे बंध रेशमाचे समीक्षण : 'रेशमा' हा शब्द अवांतराला आमंत्रित करणारा (संपादकांकडुन अनपेक्षित) मार्क्स : शुन्य नको ते : ... चा स्वैर वापर (निखीलच शाईपेन नावाच्या आयडीचे लेख वाचा कधीतरी) समीक्षण : गोंधळी बरे गातात या पेक्षा मार्क्स : पुन्हा श्युन्य स्पष्टता : संपादक आहात म्हणुन पाहिजे ती 'टायली' कराल काय ? 'भंगार' लेख आहे , मिपा आहे म्हणुन खपला.(बाकी कंपु आहेच मदतीला) अवांतर : च्या,मारी !! कोणी एकेकाळी 'पाहुणे' म्हणुन का असेना 'संपादक' काय लिहायचे राव मिपावर !! संभोगाचा विषय देखील 'जाणता' व्हायचा, नाहीतर आत्ताचे , डोळे पाणावले !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

ओ क्रमशः ची फॉर्मॅलिटी नका हो

प्रीत-मोहर
गुरुवार, 09/09/2010 - 22:38 नवीन
ओ क्रमशः ची फॉर्मॅलिटी नका हो करु...टाका बर पुढ्चा भाग चट्कन........आणि पुर्वप्रकाशित असल्याने टंकलेल असेलच ....सो टाका बरे चट्चट.............
  • Log in or register to post comments

हम्म.... ह्याला

धमाल मुलगा
गुरुवार, 09/09/2010 - 22:38 नवीन
हम्म.... ह्याला 'आत्मचरित्राची सुरुवात' असं म्हणावं का? ;)
  • Log in or register to post comments

ह्याला 'आत्मचरित्राची

मस्त कलंदर
गुरुवार, 09/09/2010 - 22:46 नवीन
ह्याला 'आत्मचरित्राची सुरुवात' असं म्हणावं का?
धमालबाप्पूंशी सहमत!!!! बहुतेक मी पहिल्यांद धम्याला +१ दिले असेल... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आत्मचरित्राची सुरवात नाय काय

प्रभो
Fri, 09/10/2010 - 00:12 नवीन
आत्मचरित्राची सुरवात नाय काय वेड्यांनो....प्रेमात पडल्यावर तो स्वतःचा थोडाच रहिला... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

इनट्रेस्टींग... पुर्वप्रकाशीत

अनामिक
गुरुवार, 09/09/2010 - 22:46 नवीन
इनट्रेस्टींग... पुर्वप्रकाशीत आहे तर मग टाक ना एकदाच पूर्ण कहाणी... उगाच का ताटकळत बसवायचं लोकांना?
  • Log in or register to post comments

ज्यांना क्रमशःची उत्सुकता नको

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 09/09/2010 - 22:48 नवीन
ज्यांना क्रमशःची उत्सुकता नको आहे त्यांनी पुढील भाग येथे वाचावा. बाकी आमचा निख्या लिहीतोच खूप छान.
  • Log in or register to post comments

हाऊ चीऽऽप गेम रेऽऽ...........

धमाल मुलगा
गुरुवार, 09/09/2010 - 22:48 नवीन
हाऊ चीऽऽप गेम रेऽऽ...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

गेम

पैसा
गुरुवार, 09/09/2010 - 22:54 नवीन
गेम झाला खरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धागा इथेच उद्यायावत केला आहे.

निखिल देशपांडे
गुरुवार, 09/09/2010 - 22:57 नवीन
धागा इथेच उद्यायावत केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आता छान!

पैसा
गुरुवार, 09/09/2010 - 22:58 नवीन
आता छान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

लेख उत्तम. लिहित रहा. आम्ही

अवलिया
Fri, 09/10/2010 - 11:10 नवीन
लेख उत्तम. लिहित रहा. आम्ही नेहमी म्हणतो संपादकांनी सुद्धा लिहित राहिले पाहीजे. मागे आम्ही संपादकांनो लिहिते व्हा असे आवाहन केले होते. त्यातले काही वाक्य परत देत आहे
तेव्हा आम्ही यानिमित्ताने संपादकांना आवाहन करतो, आपले लेखन सामर्थ्य गमावु नका. टवाळखोर प्रतिसादक आणि लेखकांना अजिबात घाबरु नका. मिपावाचकांना आपले संपादक लिहितात कसे, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांना कोणकोणत्या विषयात किती गती आहे वगैरे गोष्टींची फार जिज्ञासा आहे. त्यांच्यावर अन्याय करु नका. आपण भयभीत नाही हे सिद्ध करा. आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टिमटिमणा-या पणत्याच सूर्य म्हणुन मिरवित रहाणार, कारण सूर्याचे दर्शनच वाचकांना होत नसेल तर मायबाप वाचक करणार तरी काय?
बाकी धागा अद्ययावत केला या खुलाशासाठी ! ऑ ! धागा अद्ययावत केला ? कसा केला? का केला? ही सुविधा सामान्य सदस्यांना का नाही? संपादकांना मिळणारी सवलत सामान्य सदस्यांना का नाकारली जात आहे? की संपादक सामान्य सदस्यांहुन विशेष कर्तबगार आहेत? नक्की काय ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

निख्या निख्या लेका

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/10/2010 - 12:25 नवीन
निख्या निख्या लेका तोडलस... मस्तच लिहिले आहेस एकदम, आवडले आपल्याला. बाकी सविस्तर चर्चा तु आल्यावर करुच ;) अवांतर :-
ऑ ! धागा अद्ययावत केला ? कसा केला? का केला? ही सुविधा सामान्य सदस्यांना का नाही? संपादकांना मिळणारी सवलत सामान्य सदस्यांना का नाकारली जात आहे?
इथे +१ आणि -१ पण ;) संपादक म्हणुन काहि विशेष अधिकार संपादकांना असावेत आणि हा त्यातलाच एक अधिकार आहे असे मान्य करायला हरकत नाही. पण असेही वाटुन गेले की काही सदस्य स्वसंपादनाच्या अधिकारावरुन विनाकारण गोंधळ माजवत असताना हि कृती म्हणजे त्यांच्या हातात कोलित दिल्यासारखेच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

संपादक म्हणुन काहि विशेष

अवलिया
Fri, 09/10/2010 - 12:54 नवीन
संपादक म्हणुन काहि विशेष अधिकार संपादकांना असावेत आणि हा त्यातलाच एक अधिकार आहे असे मान्य करायला हरकत नाही.
+१ आणी -१ संपादकांना विशेष अधिकार असावेत आणि असु नयेत. त्यांच्या अधिकाराची मर्यादा कूठलेही लिखाण हे धोरणात बसत आहे की नाही याचा "विवेकपुर्ण" आणि "सारासार" विचार करुन असे मिपावर लेखन असावे की नसावे इतपतच असावी असा आमचा कयास आहे.
पण असेही वाटुन गेले की काही सदस्य स्वसंपादनाच्या अधिकारावरुन विनाकारण गोंधळ माजवत असताना हि कृती म्हणजे त्यांच्या हातात कोलित दिल्यासारखेच आहे.
स्वसंपादनासारखा एक आवश्यक अधिकार सर्वसामान्य सदस्यांना नसतांना केवळ संपादकीय भुमिकेमुळे मिळणार्‍या या सुविधेचा अनावश्यक कामासाठी वापर करणे हे बेकायदेशीर जरी नसले तरी अनैतिक आहे. अशा प्रकारच्या सुविधा मिळत नाही म्हणुन त्यासाठी योग्य मार्गाने पाठपुरावा करुन अशा सोयी सर्वसामान्य सदस्यांना मिळाव्या अशा प्रकारे समविचारी सदस्यांच्या सहकार्याने एक उपयुक्त कार्य करणार्‍या सदस्यांना ते विनाकारण गोंधळ माजवत असुन अशा प्रकारच्या घटनांचा कोलीत म्हणुन वापर करत आहेत अशा प्रकारे हिणवणे हे कोत्या मनोवृत्तीचे द्योतक आहे असे आमचे स्पष्ट मत आहे. आमचे म्हणणे एकच आहे. जेव्हा तुम्ही लेखन, प्रतिसाद देता तेव्हा तुम्ही सर्वसामान्य सदस्यांसारखेच आचरण ठेवा. संपादकीय सुविधांचा वापर केवळ संपादकीय भुमिकेसाठीच करा. इतरत्र वेळी सदस्य म्हणुनच वागा अन्यथा "अरे तुच ना तो ? ह्या २-२ हैसियती आल्या म्हणुन काय आतला तु बदलतोस का ?" असे प्रश्न विचारण्याची वेळ येईल. अशी वेळ येऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

स्वसंपादनासारखा एक आवश्यक

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/10/2010 - 13:01 नवीन
स्वसंपादनासारखा एक आवश्यक अधिकार सर्वसामान्य सदस्यांना नसतांना केवळ संपादकीय भुमिकेमुळे मिळणार्‍या या सुविधेचा अनावश्यक कामासाठी वापर करणे हे बेकायदेशीर जरी नसले तरी अनैतिक आहे. अशा प्रकारच्या सुविधा मिळत नाही म्हणुन त्यासाठी योग्य मार्गाने पाठपुरावा करुन अशा सोयी सर्वसामान्य सदस्यांना मिळाव्या अशा प्रकारे समविचारी सदस्यांच्या सहकार्याने एक उपयुक्त कार्य करणार्‍या सदस्यांना ते विनाकारण गोंधळ माजवत असुन अशा प्रकारच्या घटनांचा कोलीत म्हणुन वापर करत आहेत अशा प्रकारे हिणवणे हे कोत्या मनोवृत्तीचे द्योतक आहे असे आमचे स्पष्ट मत आहे.
नानबा योग्य मार्गाने पाठपुरावा करणार्‍यांविषयी आदरच आहे :) पण अयोग्य मार्गाने गोंधळ घालणारे कोण आहेत, हे मी तुला सांगायला नकोच. बरोबर ना ? त्यांना एका धाग्यात नीलकांतनी समजही दिली होती, जी तु वाचली असशीलच :) माझा रोख केवळ आणि केवळ त्या सदस्यांवर आहे. तरी गैरसमज नसावा.
आमचे म्हणणे एकच आहे. जेव्हा तुम्ही लेखन, प्रतिसाद देता तेव्हा तुम्ही सर्वसामान्य सदस्यांसारखेच आचरण ठेवा. संपादकीय सुविधांचा वापर केवळ संपादकीय भुमिकेसाठीच करा. इतरत्र वेळी सदस्य म्हणुनच वागा अन्यथा "अरे तुच ना तो ? ह्या २-२ हैसियती आल्या म्हणुन काय आतला तु बदलतोस का ?" असे प्रश्न विचारण्याची वेळ येईल. अशी वेळ येऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा!
आपल्या मताचा आदरच आहे. मात्र संपादकांना काही ठिकाणी (आणि चांगल्या कामासाठी) अधिकाराचा वापर करताना माझा तरी विरोध नसेल अशी माझी भुमीका आहे. ती योग्यच आहे किंवा असेल असे नाही पण मी तीचे पालन करीन. (हरकत नसल्यास पुढील गोंधळ खवत घालुयात ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

मस्त लिहिलयस. अभिनंदन

पुष्करिणी
गुरुवार, 09/09/2010 - 23:04 नवीन
मस्त लिहिलयस. अभिनंदन
  • Log in or register to post comments

ग्रेट

विलासराव
गुरुवार, 09/09/2010 - 23:14 नवीन
सिंप्ली ग्रेट!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

परत वाचायला मजा आली! छान

मेघवेडा
गुरुवार, 09/09/2010 - 23:22 नवीन
परत वाचायला मजा आली! छान लिहिलंय! :)
  • Log in or register to post comments

गोड!

शुचि
गुरुवार, 09/09/2010 - 23:39 नवीन
गोड!
  • Log in or register to post comments

मनापासुन आवडले..! पण हे

माजगावकर
गुरुवार, 09/09/2010 - 23:45 नवीन
मनापासुन आवडले..! पण हे 'पीरेम' फार डेन्जर असतं ब्वॉ..
  • Log in or register to post comments

माजगावकर

विलासराव
Fri, 09/10/2010 - 00:01 नवीन
पण हे 'पीरेम' फार डेन्जर असतं ब्वॉ.. अहो जरा लवकर सांगितलं असत तर बर झाल असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माजगावकर

अहो जरा लवकर सांगितलं असत तर

माजगावकर
Fri, 09/10/2010 - 00:08 नवीन
अहो जरा लवकर सांगितलं असत तर बर झाल असतं.
खरंय तुमचं.. मला पण जरा लवकर कळलं असतं तर फार्फार बरं झालं असतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

हॅत्तिच्यायला....

धमाल मुलगा
Fri, 09/10/2010 - 12:59 नवीन
आमच्यासोबत आणखीही समदु:खी आहेत हे पाहुन काळीज अंमळ हललं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माजगावकर

ऑ

विलासराव
Fri, 09/10/2010 - 13:32 नवीन
च्यायला ही नविनच माहीती हाती आली आणी पूढच्या पार्टीचा विषयही मिळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अभिनंदन!

सुनील
Fri, 09/10/2010 - 00:11 नवीन
बरं वाटलं!
  • Log in or register to post comments

आँ!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 09/10/2010 - 00:15 नवीन
आँ!!!
  • Log in or register to post comments

बेस्ट्ट!!

यशवंतकुलकर्णी
Fri, 09/10/2010 - 03:01 नवीन
बेस्ट्ट!!
  • Log in or register to post comments

स्सही रे.....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/10/2010 - 13:01 नवीन
विरहात होता तोपर्यंतचा भाग आवडला. पुढे सक्सेस ष्टोरीनं मूड घालवला. ;) पुढील भागाच्या प्रतिक्षेत. लेखन बाकी मस्त झालंय....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त!

समंजस
Fri, 09/10/2010 - 13:45 नवीन
आणखीही लिखाण येउ द्या :) [अवांतरः प्रेमाचं रुपांतर लग्नात झाल्यावर साहित्यप्रतिभा आटते म्हणे असे काही ठिकाणी वाचल्याचं आठवतयं :) ]
  • Log in or register to post comments

वाचलेलं अवांतर खरंय.

धमाल मुलगा
Fri, 09/10/2010 - 14:13 नवीन
वाचलेलं अवांतर खरंय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समंजस

अवांतरः प्रेमाचं रुपांतर

परिकथेतील राजकुमार
Fri, 09/10/2010 - 14:18 नवीन
अवांतरः प्रेमाचं रुपांतर लग्नात झाल्यावर साहित्यप्रतिभा आटते म्हणे असे काही ठिकाणी वाचल्याचं आठवतयं
+१ साहित्यप्रतिभेची शिकार होते. पार मातीत मिळते ती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

+२

अवलिया
Fri, 09/10/2010 - 17:02 नवीन
म्हणुन अनेक जण अविवाहित राहुन प्रतिभेला "रोशन" करतात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा