काश्मीरमधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?
खालील दुवा उघडा:
http://hindu.com/2010/08/29/stories/2010082955490900.htm
ही बातमी सर्वप्रथम मी इंडियन एक्सप्रेसच्या ई-पेपरवर आज सकाळी वाचली पण थोड्या वेळानंतर भारतीय दूतावासातील एका अधिकार्याला दाखविण्यासाठी म्हणून शोधली तर ती इंडियन एक्सप्रेसवरून अदृश्य झाली होती. इंडियन एक्सप्रेसवर 'सर्च' वापरून दुवा तर मिळाला पण 'ही लिंक उघडल्याने आपला काँप्यूटर खराब होईल' अशी 'धमकी' दिसली. मग open domainवर सर्च केल्यावर 'हिंदू'मध्ये हा दुवा मिळाला. बातमी 'न्यू यॉर्क टाइम्स'मधील आहे.
या बातमीनुसार आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये गिलगिट-बाल्टिस्तान भागात चीनचे ११,००० सैन्य तैनात आहे व पाकिस्तानने या चिनी सैन्याला हळूच, गाजावाजा न करता या भागाचे संपूर्ण नियंत्रण व ताबा देऊन टाकला आहे. या भागात पाकिस्तानी सरकारविरोधी बंडाच्या हालचाली फारच वेगात होत असून (कदाचित हा भाग पाकिस्तानच्याही ताब्यात रहाणार नाहीं म्हणून?) त्यामुळेच ही पावले उचलण्यात आली आहेत असे 'न्यू यॉर्क टाइम्स' म्हणत आहे.
'न्यू यॉर्क टाइम्स'नुसार दोन महत्वाच्या घडामोडी गिलगिट/बाल्टिस्तान विभागात होत आहेत. एक तर पाकिस्तानविरुद्ध बंड व दुसरे चिनी सैन्याचे आगमन. (हा भाग एरवी जगाला 'बंद'च आहे!)
चीनला पाकिस्तानमधून रस्ते व रेल्वेचा सर्रास वापर हवा आहे. त्यासाठी पाकिस्तानातून जाणारी जलदगती रेल्वेही चीन बांधत आहे. पूर्व चीनमधून तेल व इतर माल बलुचिस्तानात चीनच्याच सहाय्याने बांधलेल्या ग्वादार, पास्नी व ओरमारा इथल्या पाकिस्तानी नौदलाच्या तळावर ४८ तासात आणायची योजना आहे. इथून सर्व आखाती देश जवळच आहेत.
हे सैनिक काराकोरममधून चीनच्या 'शिंज्यांग' प्रंताला जोडणारा रस्ता बाधतील, रेल्वेवर काम करतील, धरणें, द्रुतगती मार्ग यासारख्या इतर प्रकल्पांवरही काम करतील असे 'न्यू यॉर्क टाइम्स'ने म्हटले आहे.
इराणहून चीनला नैसर्गिक वायू नेणार्या २२ बोगद्यांच्या कामावर तर पाकिस्तान सरकारलाही जाण्याची बंदी आहे. पण या बोगद्यांत प्रक्षेपणास्त्रेही ठेवता येऊ शकतील.
हे सैनिक तात्पुरत्या छावणीवजा घरात रहात होते व आपले काम संपवून परतही गेले. आता तिथे कायम स्वरूपात रहाण्याची सोय असणारी गृहयोजना राबविली जात आहे. या घटनेने वॉशिंग्टनला चिंतेत टाकले आहे.
आपल्या सरकारला याची संपूर्ण माहिती असेलच व या घटनेवर ते सखोल विचारही करत असेलच. तेंव्हां चिंतेचे तसे कारण दिसत नाहीं! फक्त मला माहीत नसलेले वृत्त वाचले म्हणून इथे पोस्ट केले इतकेच
वाचने
22993
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
इराकवर हल्ला करायच्या आधी अशाच तर्हेच्या बातम्या 'पेरल्या' जात!
ता. क.
In reply to इराकवर हल्ला करायच्या आधी अशाच तर्हेच्या बातम्या 'पेरल्या' जात! by सुधीर काळे
प्रचारावर विश्वास ठेवण्याआधी तो पडताळणे हितावह असते
जास्त सोपे
In reply to प्रचारावर विश्वास ठेवण्याआधी तो पडताळणे हितावह असते by सुधीर काळे
धन्यवाद!
In reply to जास्त सोपे by प्रदीप
अगदी...
In reply to धन्यवाद! by सुधीर काळे
मी शक्यतो एकांगी लिहीत नाहीं!
In reply to अगदी... by सुनील
मी शक्यतो एकांगी लिहीत नाहीं!
In reply to अगदी... by सुनील
आणि हेही..
In reply to अगदी... by सुनील
जगाचे मत काय याकडे लक्ष न देता जे ठरविले आहे ते करत रहावे
In reply to आणि हेही.. by प्रदीप
२० सप्टेंबरनंतरच वाचू शकेन व त्यावर मत देऊ शकेन
In reply to अगदी... by सुनील
हा दुवा उघडा आणि वाचा आपल्या लोकसभेतील चर्चा
दुवा
In reply to हा दुवा उघडा आणि वाचा आपल्या लोकसभेतील चर्चा by सुधीर काळे
लोकसभेबद्दलचे तुमचे observation बरोबर आहे व त्याबद्दल धन्यवाद
बातमी
In reply to लोकसभेबद्दलचे तुमचे observation बरोबर आहे व त्याबद्दल धन्यवाद by सुधीर काळे
बरोबर
In reply to बातमी by श्रावण मोडक
http://tinyurl.com/34xsyg2
In reply to बरोबर by नितिन थत्ते
-१
In reply to http://tinyurl.com/34xsyg2 by सुधीर काळे
लोकसभेत चर्चेला आली तेंव्हा सरकारने पडताळण्याची गरज सांगितली
In reply to -१ by नितिन थत्ते
२००९ सालचा डिफेन्स रिपोर्ट
उपाय
लयी छान आईडिया, पण एक
In reply to उपाय by सुनील
PMO हा एक bottomless pit नक्कीच नाहीं
काका तुम्ही पिंडाकाकाची
व्हिडीयो अपडेट...
चीन शांततेसाठी तयार!
चीन शांततेसाठी तयार! छ्या,
In reply to चीन शांततेसाठी तयार! by विकास
असल्या क्लृप्तींवर विश्वास ठेऊन निष्काळजी रहाणे ही घोडचूकच ठरेल
In reply to चीन शांततेसाठी तयार! by विकास
काय खरे, काय खोटे, देव जाने.
In reply to असल्या क्लृप्तींवर विश्वास ठेऊन निष्काळजी रहाणे ही घोडचूकच ठरेल by सुधीर काळे
मी आत्ताच त्यांना खरे-खोटे स्पष्ट करण्याची विनंती केली आहे
In reply to काय खरे, काय खोटे, देव जाने. by गांधीवादी
नियंत्रणरेषेलगत चिनी लष्कर?
पूर्वी हे सैन्य रेल्वे व
In reply to नियंत्रणरेषेलगत चिनी लष्कर? by सुधीर काळे
चीनला ठोकू शकत नाहीं हे समजते पण त्याचे भले कशाला करायचे?
In reply to पूर्वी हे सैन्य रेल्वे व by मदनबाण
ले.ज. जस्वाल यांनाच नेता म्हणून पाठवायला हवे