Skip to main content

पाकव्याप्त काश्मीरमधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?

लेखक सुधीर काळे यांनी रविवार, 29/08/2010 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
काश्मीरमधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण? खालील दुवा उघडा: http://hindu.com/2010/08/29/stories/2010082955490900.htm ही बातमी सर्वप्रथम मी इंडियन एक्सप्रेसच्या ई-पेपरवर आज सकाळी वाचली पण थोड्या वेळानंतर भारतीय दूतावासातील एका अधिकार्‍याला दाखविण्यासाठी म्हणून शोधली तर ती इंडियन एक्सप्रेसवरून अदृश्य झाली होती. इंडियन एक्सप्रेसवर 'सर्च' वापरून दुवा तर मिळाला पण 'ही लिंक उघडल्याने आपला काँप्यूटर खराब होईल' अशी 'धमकी' दिसली. मग open domainवर सर्च केल्यावर 'हिंदू'मध्ये हा दुवा मिळाला. बातमी 'न्यू यॉर्क टाइम्स'मधील आहे. या बातमीनुसार आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये गिलगिट-बाल्टिस्तान भागात चीनचे ११,००० सैन्य तैनात आहे व पाकिस्तानने या चिनी सैन्याला हळूच, गाजावाजा न करता या भागाचे संपूर्ण नियंत्रण व ताबा देऊन टाकला आहे. या भागात पाकिस्तानी सरकारविरोधी बंडाच्या हालचाली फारच वेगात होत असून (कदाचित हा भाग पाकिस्तानच्याही ताब्यात रहाणार नाहीं म्हणून?) त्यामुळेच ही पावले उचलण्यात आली आहेत असे 'न्यू यॉर्क टाइम्स' म्हणत आहे. 'न्यू यॉर्क टाइम्स'नुसार दोन महत्वाच्या घडामोडी गिलगिट/बाल्टिस्तान विभागात होत आहेत. एक तर पाकिस्तानविरुद्ध बंड व दुसरे चिनी सैन्याचे आगमन. (हा भाग एरवी जगाला 'बंद'च आहे!) चीनला पाकिस्तानमधून रस्ते व रेल्वेचा सर्रास वापर हवा आहे. त्यासाठी पाकिस्तानातून जाणारी जलदगती रेल्वेही चीन बांधत आहे. पूर्व चीनमधून तेल व इतर माल बलुचिस्तानात चीनच्याच सहाय्याने बांधलेल्या ग्वादार, पास्नी व ओरमारा इथल्या पाकिस्तानी नौदलाच्या तळावर ४८ तासात आणायची योजना आहे. इथून सर्व आखाती देश जवळच आहेत. हे सैनिक काराकोरममधून चीनच्या 'शिंज्यांग' प्रंताला जोडणारा रस्ता बाधतील, रेल्वेवर काम करतील, धरणें, द्रुतगती मार्ग यासारख्या इतर प्रकल्पांवरही काम करतील असे 'न्यू यॉर्क टाइम्स'ने म्हटले आहे. इराणहून चीनला नैसर्गिक वायू नेणार्‍या २२ बोगद्यांच्या कामावर तर पाकिस्तान सरकारलाही जाण्याची बंदी आहे. पण या बोगद्यांत प्रक्षेपणास्त्रेही ठेवता येऊ शकतील. हे सैनिक तात्पुरत्या छावणीवजा घरात रहात होते व आपले काम संपवून परतही गेले. आता तिथे कायम स्वरूपात रहाण्याची सोय असणारी गृहयोजना राबविली जात आहे. या घटनेने वॉशिंग्टनला चिंतेत टाकले आहे. आपल्या सरकारला याची संपूर्ण माहिती असेलच व या घटनेवर ते सखोल विचारही करत असेलच. तेंव्हां चिंतेचे तसे कारण दिसत नाहीं! फक्त मला माहीत नसलेले वृत्त वाचले म्हणून इथे पोस्ट केले इतकेच

वाचने 22993
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

ही खनिजे खरोखर आहेत कीं अमेरिकेचे सैन्य तिथे ठामपणे जास्त ठेवण्याच्या समर्थनार्थ हे प्रचाराचे पडघम वाजविले जात आहेत हे कसे कळणार? इराकवर हल्ला करायच्या आधी अशाच तर्‍हेच्या बातम्या 'पेरल्या' जात!

In reply to by सुधीर काळे

इराकमध्ये तेलाव्यतिरीक्त कोणती खनिजे आहेत असा प्रचार झाला होता ? अफगाणिस्तान मध्ये चिन्यांनी खोदायलासुद्धा सुरुवात केली आहे. आहात कुठे ?

इराकमध्ये अमेरिकेने स्वारी करावी म्हणून काय-काय (अप)प्रचार केला गेला याच्यावर "The Fall of the House of Bush: The Untold Story of How a Band of True Believers Seized the Executive Branch, Started the Iraq War, and Still Imperils America's Future" हे Craig Unger लिखित पुस्तक वाचल्यास कळेल. अमेरिकेचे कांहीं राष्ट्रपती आपल्याला जे हवे आहे त्या बाजूला लोकमत वळविण्यासाठी असा मीडियाचा दुरुपयोगही करतात! तरी अशा प्रचारावर विश्वास ठेवण्याआधी तो पडताळणे हितावह असते. चिनी लोक अफगाणिस्तानात(ही) पोचल्याचे मात्र वाचनात आलेले नाहीं. लिंक दिल्यास वाचायला आवडेल!

In reply to by सुधीर काळे

चिनी लोक अफगाणिस्तानात(ही) पोचल्याचे मात्र वाचनात आलेले नाहीं. लिंक दिल्यास वाचायला आवडेल!
मिभोंचे म्हणणे बरोबर आहे, मीही चिनी अफगाणिस्तानात खनिजांसाठी गेले आहेत असे वाचलेले आहे, तूर्तास हा दुवा बघा. तसेच हाही. आणि हाही. चिनी लोक तेल, गॅस व खनिजे ह्यांच्यासाठी कुठे पोहोचले नाहीत अद्याप, हे खरे तर थोडक्यात सांगता येईल.

In reply to by प्रदीप

धन्यवाद! वाचल्यावर परत कांहीं लिहिण्यासार वाटले तर पुन्हा लिहीन.

In reply to by सुधीर काळे

वाचल्यावर परत कांहीं लिहिण्यासार वाटले तर पुन्हा लिहीन अगदी जरूर लिहा. परंतु, लिहिण्यापूर्वी खालील दुवेदेखिल नजरेखालून घाला म्हणजे लेख एकांगी होणार नाही. धन्यवाद!

In reply to by सुनील

चिनी अफगाणिस्तानात गेले खनिजांचे अ‍ॅसेट्स उभारण्यासाठी, ज्याचा त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीत उपयोग व्हावा. आपण तिथे मोठ्या प्रमाणात गेलो आहोत, ते राजकिय हेतूने. आपल्या तेथील कार्यामुळे पाकिस्तानला पाचर बसणार आहे, हे अत्यंत चांगले व ठोस पाउल आपल्या सरकारने उचलले आहे. पण इथे पहा. सदर लेखक श्री. मायकेल शूयर हा सी. आय. ए. चा वरीष्ठ अधिकारी होता. ही व अशाच प्रकारची कोल्हेकुई गेले आठ-दहा महिने अमेरिकन व ब्रिट तथाकथित 'थिंक टँक्स', तेथील 'राजकीय निरीक्षक' ह्यांच्याकडून सातत्याने ऐकू येते आहे. त्यांच्या म्हणण्याचा सारांश असा की भारत जोपर्यत अफगाणीस्तानात कार्यरत आहे, तोपर्यंत पाकिस्तानी सरकारला अस्वस्थ वाटत राहील, त्यामुळे तिथे व काश्मिरमधे अशांतता राहील. तेव्हा 'सब लफडों का अक्सीर इलाज--': भारताने अफगाणिस्तानातून काढता पाय घ्यावा ज्यायोगे पाकिस्तान खूष होईल, मग भारताचे व पाकिस्तानचे काश्मिर इ. प्रश्न चुटकीसरशी सुटतील. ह्या रीतसर (orchestreted) म्हणावी अशा कोल्हेकुईमागे काही पाश्चिमात्य सरकारे असावीत काय? हे असे दडपण आपल्या सरकारवर ह्यापुढे येत राहील, व सुरूवातीस अगदी तुरळक म्हणावी अशी ही थियरी ही राष्ट्रे आपल्या गळी उतरवण्याचा प्रयत्न आज ना उद्या करतील. तेव्हा आपण खंबीर राहणे जरूरी आहे.

In reply to by प्रदीप

मागे एका तरुण मित्राने फारच छान मुद्दा मांडला होता. तो म्हणाला होता कीं भारतीय लोकांना एक तर्‍हेचा न्यूनगंड आहे. त्यामुळे त्यांच्या मनात त्यांनी केलेल्या प्रत्येक कृतीला जगाने-विशेषतः गोर्‍या लोकांनी-पसंतीची मान डोलवावी अशी एक सुप्त इच्छा असते. हे आपण नकळत करत असतो असेही त्याचे मत होते! मला त्याचे म्हणणे पटते. कारण मी १९६२पासून चीनच्या अनेक कृत्यांकडे पहात आलो आहे. ते त्यांना जे करायचे असते ते करतात बाकीच्यांच्या मतांना "फाट्यावर मारतात"! अगदी पहिली आठवण आहे ती चीनने अण्वस्त्रचांचणी करू नये म्हणून त्यांना समजावून सांगायला गेलेल्या शिष्टमंडळाची! त्यांचं म्हणणं चीननं शांतपणे ऐकून घेतलं आणि स्वतःला जे हवं होतं ते (आणि तेच) केलं! संयुक्त राष्ट्रसंघटनेबद्दलही तेच. या संघटनेत आधी चीन आलाच नाहीं. पण त्याने बाहेरून उच्छाद मांडल्यावर तो बाहेर रहाण्यापेक्षा आत आलेला बरा या विचाराने सगळ्यांनी मिळून त्याला बोलावल्यावर आला, पण आपल्या अटींवर.,सुरक्षा समितीचे कायमचे सभासदत्व व व्हेटोचा अधिकार घेऊनच आला! भारतानेही असे करायला हवे होते (व आहे) असे माझे 'अज्ञ' मत आहे! जगातल्या लोकसंख्येचा चीन इतकाच मोठ्ठा हिस्सा जिथे रहातो त्या देशाला असे कमीपणाने कां वागविले जाते हे कधी कळलंच नाहीं. आपण जर बाहेर पडलो तर आपलं काय नुकसान आहे? फारसं नाहीं, कदाचित थोडे पैसे वाचतीलच. पण आपण बाहेर पडलो तर संयुक्त राष्ट्रसंघटनेला नक्कीच फरक पडेल. चीनने कुठल्याही मुद्द्यावर एक इंचसुद्धा पाऊल मागे घेतले नाहीं, मग तो तैवानचा प्रश्न असो, तिबेटचा असो, अक्साईचीनचा असो वा उद्या अरुणाचलचा असो. चीनचा निर्णय ठाम असतो व त्या निर्णयाला ते बरे-वाईट कांहींही झाले तरी चिकटून असतात! आज चीन भरभराटीला आलाय्, पण गरीब होता तेंव्हांही त्याची वागणूक वेगळी होती अशी आठवण मला तरी नाहीं. तेंव्हा आपण अफगाणिस्तानात गेलो आहोत ते आपल्या उद्दिष्टांसाठी! म्हणून त्याबाबतीत जगाचे मत आपल्याला अनुकूल आहे कीं नाहीं याच्याकडे लक्ष न देता जे ठरविले आहे तसे करावे हेच उत्तम.

In reply to by सुनील

सुनील-जी, वरील सर्व लेख मी डाऊनलोड केले आहेत, पण सध्या दिवाळी अंकासाठी मी जे लिखाण करीत आहे त्याची अंतिम तारीख जवळ येत असल्याने २० सप्टेंबरनंतरच वाचू शकेन व त्यावर मत देऊ शकेन.

हा दुवा उघडा आणि वाचा आपल्या लोकसभेतील चर्चा. न्यूयॉर्क टाइम्समध्ये ही बातमी आली नसती तर आपल्या सरकारला कळली असती कीं नाहीं हे समजत नाहीं! कारण ही बातमी लोकसभेत चर्चेला आणली तेंव्हा सरकारने पडताळून पहाण्याची (verificationची) गरज सांगितली! http://tinyurl.com/23otqcm

लोकसभेत देण्यात आलेले खालील निवेदन मी वाचले होते. पण मुख्य मुद्दा उरतोच कीं आपल्या गुप्तहेरखात्याला ही माहिती मिळाली नव्हती कीं मिळाली होती पण मुद्दाम जनतेत Panic होऊ नये म्हणून त्यांनी कुणालाही सांगितली नव्हती! पण वरील टाइम्समधील बातमी लोकसभेच्या चर्चेबद्दल नाहीं हे तुझे observation बरोबर आहे व त्याबद्दल धन्यवाद. २-३ दिवसांपूर्वी याबद्दल चर्चा लोकसभेत झाली होती. दुवा सापडतो का ते पहातो व सापडला तर इथे देईन. तुला सापडला तर तूही इथे दिलास तर चालेल. कारण ही बातमी लोकसभेत चर्चेला आणली तेंव्हा सरकारने पडताळून पहाण्याची (verificationची) गरज सांगितली!

In reply to by श्रावण मोडक

ह्म्म्म्म. The Indian Army brass has taken note of the deployment of 1,000 troops at Khunjerab Pass but is not unduly alarmed about the build-up. असे त्या बातमीत म्हटले आहे.

In reply to by नितिन थत्ते

हा दुवा राज्यसभेतील चर्चेबद्दलचा आहे. लोकसभेबद्दलचा दुवाही दिसतोय् (gilgit - Interceder: real time news feed - [ Terjemahkan laman ini ] 30 Aug 2010... today chided the government in the Lok Sabha for its casual approach and silence ... Chinese troops in Gilgit result of UPA's weak foreign policy: Sinha ... China deploys 11000 troops in Gilgit area in Occupied Kashmir - Express .... Time to tell Pakistan to return Kashmir areas: Farooq Abdullah ... interceder.net/list/gilgit - Tembolok) पण "Server is too busy" असा शेरा येऊन तो दुवा उघडत नाहींय्. http://tinyurl.com/34xsyg2

In reply to by सुधीर काळे

या दुव्यात सदस्यांनी सरकार काय उपाय करीत आहे हे जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारल्याचे म्हटले आहे. सरकारने "काय कल्पना नाही ब्बॉ....माहिती काढावी लागेल" असे उत्तर दिल्याचे दिसत नाही.

In reply to by नितिन थत्ते

आधी दिलेल्या प्रतिसादात मी "कारण ही बातमी लोकसभेत चर्चेला आणली तेंव्हा सरकारने पडताळून पहाण्याची (verificationची) गरज सांगितली!" हे वाक्य आहे ना! तेही वृत्तपत्रातलेच आहे.

२००९ सालचा डिफेन्स रिपोर्ट मिळाला होता, तरी सुद्धा त्यावर कारवाई झालेली दिसत नाही.चीन रस्ते बांधेल असा अंदाज व्यक्त केलेला या व्हिडीयोत पाहिला मिळतो. मिडीया रिपोर्ट खरे असतील तर खरचं भारत सरकार काही ठोस पावले उचलताना दिसेल काय ? खरचं किती चीनी सैन्य तिथपर्यंत पोहचले आहे ? इतक्या मोठ्या संख्येनी सैन्य जमा होण्याचे कारण काय असु शकेल ?

भारत सरकारने आपले अत्यंत कुचकामी गुप्तहेर खाते लवकरात लवकर बंद करून त्याऐवजी एक अत्यंत आटोपशीर असे खाते निर्माण करावे, जे सर्व मराठी संस्थळावर नजर ठेवण्याचे काम करील. याचे फायदे - १) सध्याच्या गुप्तहेर खात्यावर होणार्‍या अफाट खर्चात बचत २) शत्रूच्या कारनाम्यांसंबंधी अत्यंत वक्तशीर आणि खात्रीलायक अपडेट्स ३) चार मराठी माणसांना नोकर्‍या वरील आशयाचे पत्र (क्रमांक ३ चा फायदा दडवून) मी लवकरच राष्ट्रपती, पंतप्रधान, तीनही सैन्यदलाचे प्रमुख, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पाठवणार आहे. आपणही पाठवावे ही विनंती!

In reply to by सुनील

लयी छान आईडिया, पण एक प्रोब्लेम, चिन्यांनी मराठी शिकून इथेच मिपावार सदस्यत्व घेतले तर ? आपण मेहनत करून माहिती मिळवायच्या आणि त्यांना फुकट एकदम पदरात, (मी एक चीनी/चीनचा गुप्तहेर नाही हे कशावरून ?)

पहिली गोष्ट म्हणजे मी आतापर्यंत पंतप्रधानांच्या कार्यालयाला ५ किंवा ६ पत्रे लिहिली त्यापैकी दोन पत्रांना त्यांच्या OSD कडून मला उत्तरेही आली. म्हणजे PMO हा एक bottomless pit नक्कीच नाहीं. तरी अशा कुत्सित किंवा sarcastic टोमण्यांची गरज नाहीं असे वाटते. एक जागरुक नागरिक या नात्याने अशी पत्रे लिहावीत असे माझे मत आहे. ज्यांचे याबद्दल दुमत आहे किंवा असे न लिहिणे जास्त योग्य वाटत असेल त्यांनी लिहू नयेत. आग्रह कसलाच नाहीं. (मी ई-मेलने पाठवतो. हो! पोस्टाला त्याचा ताप नको!) दुसरे असे कीं प्रत्येक सरकारात एकापेक्षा जास्त हेरखाती असतात. फसवणूकमध्ये CIA, Pentagon, State Deptt वगैरेंची हेरखाती होती असा उल्लेख येतो. आपली किती आहेत ते मला माहीत नाहीं. फक्त 'रॉ' हे एक आहे एवढेच ऐकीवात आहे. फसवणूक या पुस्तकाचा अनुवाद करताना मला ज्या कांहीं आधी माहीत नसलेल्या नव्या गोष्टी कळल्या त्यातच ही एक गोष्ट होती. पण 'रॉ'बद्दल मी स्वत: तरी कांहीं अनुदार उद्गार काढल्याचे मला आठवत नाहीं. पण असे प्रतिसाद इथे व इतरत्र आले आहेत. इथेही मी त्यांना माहीत होते कां व माहीत असूनही panic निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी ते उघड केले नसेल काय असेच विचारले आहे. कधी कधी एकापेक्षा जास्त खाती असल्यास व त्यात समन्वय नसल्यासही असे होऊ शकते. ओबामांनी ख्रिसमसबाँबरच्या बाबतीत म्हटलेले "We failed to connect the dots" हे विधान त्याचेच निदर्शक आहे. तसेच फसवणूक या पुस्तकात हेरखात्यांकडून माहिती असूनही सरकारने ती कशी दडपली याची कितीतरी उदाहरणे माझ्या अनुवादात आलेली आहेत. पण जेंव्हां सरकारच म्हणते की आम्हाला पडताळावे लागेल तेंव्हां शंका येते पण ती सरकारी अधिकार्‍यांची अकार्यक्षमताही असू शकते, 'रॉ'ची किंवा इतर गुप्तहेरखात्यांची नाहीं. 'मिपा'करांपैकी कांहीं जण दिल्लीच्या केंद्रीय सचिवालयात सचीवांना/उपसचीवांना भेटले असतीलच. मलाही दोन-तीन वेळा जावे लागले होते. 'ब्लास्ट फर्नेस' असलेल्या कंपनीचा अध्यक्ष (CEO) या नात्याने मी metallurgical cokeसाठी तिथे गेलो होतो. तेंव्हां त्या विभागाचे सचीव किती अज्ञानी होते, त्यांचे ज्ञान कसे अद्ययावत् नव्हते याचा मी प्रथम-पुरुषी-एक-वचनी अनुभव घेतला आहे! पण याचा अर्थ सगळेच सचीव असे असतात असाही नव्हे किंवा त्यांना माहिती पुरवली जात नव्हती असाही नव्हे. दिलेली माहिती वाचायची तसदी त्यांनी घेतली नव्हती अशीही शक्यता असू शकते. एकाद्याला जर कुणाबद्दल पूर्वग्रह झाला असेल तर असे होऊ शकते. पण मला तरी भारतीय गुप्तहेरखात्याबद्दल पूर्वग्रह नाहीं कारण या विषयावरची पुस्तके माझ्या वाचनात अद्यापी आलेली नाहींत. असो. माझे भारताच्या राजकीय नेतृत्वाबद्दल अजीबात चांगले मत नाहीं-भाजपा असो वा सध्याचे सरकार असो- पण तिथेही माझे चुकत असेल. पण माझे मत चांगले नाहीं यात शंका नाहीं. पण मी इथे जो मुद्दा मांडला तो हा कीं चीनचे लष्कर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आले आहे काय, आले असल्यास कां आले आहे, त्याने आपल्याला धोका संभवतो कां, व याबाबतीत सरकारला माहिती आहे कां, असल्यास आपल्याला प्रतिनिधींना ती माहिती मिळत आहे कां, देत नसल्यास ती देणे देशहिताचे नाहीं म्हणून देत नाहीं आहे कां वगैरे. त्याच्यावर भाष्य करावे ही विनंती.

गौतम बुध्दावरची कथा वाचली नाहीत का?तो धागा परत काल वर आला होता.तुम्ही जे करताय ते योग्य करताय. लोकाना टिका करु दे.

चीनने जमीन हडपली आहे... लडाखचा बराच भाग चीनच्या ताब्यात. :(

आजची टाईम्स ऑफ इंडीया मधील बातमी पहा: Willing to work with India for peace in South Asia: China तेंव्हा आता निर्धास्त होऊया ;) आणि मस्तपैकी कौल काढूया, स्त्रीया वाईट की पुरूष वगैरे सारख्या महत्वांच्या विषयांवर चर्चा करायला लागूया. :)

In reply to by विकास

चीन शांततेसाठी तयार! छ्या, आपण उगाच ब्राम्होसचे परिक्षण वगरै करत बसतो... ;) http://economictimes.indiatimes.com/news/politics/nation/BrahMos-cruise… (अग्नी ५ ची वाट पाहणारा)

In reply to by विकास

विकास-जींनी पाठविलेला दुवा मी वाचला होता, पण मला ही बातमी आपल्याला 'बेसावध' ठेवण्यासाठी योजलेली क्लृप्तीच वाटली होती. त्यानंतर मी खालील दुवा पाहिला आणि मग जुनेच विचार पुन्हा मनात आले. http://timesofindia.indiatimes.com/world/china/China-hands-out-map-lice… म्हणजे आता अरुणाचल आपण संभाळणार कीं नाहीं हे विचार मनात येऊ लागले. त्यात एका प्रदर्शनात आपल्या सरकारी स्टॉलवरचे भारताचे नकाशे चिनी अधिकार्‍यांनी काढून टाकले होते कारण त्यात अरुणाचल हा (अर्थातच) भारताचा भाग दाखविला होता. त्यानंतर आपण निषेधार्थ तो स्टॉल बंद करून परत येण्याचा बणेदारपणा दाखविला कीं प्रदर्शन पूर्ण होईपर्यंत (मुकाट्याने) स्टॉल चालू ठेवला याबद्दल वाचनात आले नाहीं. 'मिपा'करांनी याबाबत लिहावे ही विनंती. आता नोकिया भारतातील बाजारपेठेकडे पाहून अशा तर्‍हेने अरुणाचल चीनचा भाग दाखवायला नकार देतो कीं चिनी बाजारपेठेकडे पहात मुकाट्याने चीनचे ऐकतो आणि अरुणाचल चीनचा भाग दाखविल्यास भारतीय जनता काय करेल वगैरेबद्दल विचार आतापासूनच करायला हवा. तसेच भारतीय सरकारनेसुद्धा नोकियावर दबाव आणायला हवा. (हेलसिंकीला मी गेलेलो असताना अनेक भारतीय उपहारगृहे दिसल्याने मी चकित झालो होतो. चौकशी करता कळले कीं नोकियात खूप भारतीय आहेत. त्यांच्यावरसुद्धा याचा परिणाम होईल का हेही मनात आले!) (याशिवाय आधीची हिंदूमधील बातमी आता इतर ठिकाणीही पोस्ट झालेली दिसली: http://www.ndtv.com/article/world/pakistan-handing-over-control-of-pok-…) आपण असल्या क्लृप्तींवर विश्वास ठेऊन निष्काळजी रहाणे ही घोडचूकच ठरेल. जय हो!

In reply to by सुधीर काळे

हे मागेच वाचले आहे, Beijing removed Indian maps from Expo, back in July आणि हेही वाचत आहे. 'No Chinese interference in Indian pavilion' काय खरे, काय खोटे, देव जाने.

In reply to by गांधीवादी

आपण आपल्या परराष्ट्रमंत्र्यांना याबद्दल खरे-खोटे विचारू शकता. नव्हे विचाराच. त्यांचा ई-मेलचा पत्त आहे: eam@mea.gov.in मी आत्ताच त्यांना खरे-खोटे स्पष्ट करण्याची विनंती केली आहे. उत्तर येईलच असे नाहीं, पण आले तर नक्कीच इथे पोस्ट करेन.

कांहीं महिन्यापूर्वी मी "पाकव्याप्त काश्मीरमधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?" हा धागा सुरू केला होता (http://www.misalpav.com/node/14126) त्याला १०० प्रतिसादही आले होते. त्यावेळी आलेल्या बातमीत आता भर इतकीच कीं हे सैन्य आता नियंत्रणरेषेवर (LoC) आले आहे आणि ही बातमी स्वतंत्रपणे अमेरिकन गुप्तहेर खात्याने confirm सुद्धा केला आहे. पूर्वी हे सैन्य रेल्वे व रस्ते बांधत होते पण आता LoC वर का आले आहे हे समजत नाहीं. खालील दुवे उघडून वाचावेत. http://tinyurl.com/4yaefca किंवा http://timesofindia.indiatimes.com/india/US-agencies-confirm-presence-o… कधी-कधी वाटते कीं पाकिस्तानी सरकारने आपला (पाकिस्तानचा) दुबळेपणा ओळखून चीनला प्रदेश देऊन दोस्ती व इतरही अनेक गोष्टी मिळविल्या. आपणही प्रदेश गमावला (अक्साईचीन) पण मिळविले मात्र कांहीं माहीं. आपण दुर्बळ आहोत तर कुणा बलाढ्य राष्ट्राशी करार केला पाहिजे किंवा तडजोड केली पाहिजे. पण सरकारला सर्व माहिती असेलच! आपले पंतप्रधान १२ एप्रिलला चीनला जाणार आहेत त्यावेळी हू जिंतावना याबद्दल सांगणार आहेत असेही टाइम्सने लिहिले आहे. पण चीनशी व्यापार वाढविण्याचे अलीकडेच केलेले करार आपण का केले?

In reply to by सुधीर काळे

पूर्वी हे सैन्य रेल्वे व रस्ते बांधत होते पण आता LoC वर का आले आहे हे समजत नाहीं. माझा तर्क,चीन त्यांचा मिसाईल बेस इथे बनवेल ज्यामुळे हिंदुस्थानातील प्रत्य्हेक महत्वाचे शहर त्यांच्या मार्‍याच्या टप्प्यात येईल. :( चीनशी व्यापार वाढविण्याचे अलीकडेच केलेले करार आपण का केले? फेंगशुई शास्त्रात याचे बहुधा विवेचन सापडावे !!!

In reply to by मदनबाण

खरंच आपण हा व्यापारवृद्धीचा करार कां केला? चीन आपला एक नंबरचा शत्रू आहे. आपल्या दुबळेपणामुळे आपण त्याला ठोकू शकत नाहीं इथपर्यंत ठीक आहे, पण out of the way जाऊन त्याचेच भले करायचे म्हणजे कुणी आपल्या एका गालावर थप्पड मारल्यास दुसरा गाल पुढे करण्यासारखे नाहीं का? कारण या व्यापारवृद्धीत भारताच्या हाती कांहींच लागणार नाहीं, सगळे फायदे चीनचेच आहेत! शिवाय WTO सारख्या करारांमुळे आपण त्या देशातील मालावर बंदी घालू शकत नसू, पण सरकारने सर्व प्रथम आपल्या उद्योगपतींना विश्वासात घेऊन चीनमधून होणार्‍या आयातीमुळे देशाचे सर्वांगीण नुकसान कसे होणार आहे याबद्दल माहिती, ती न पुरल्यास 'समज' देऊन तरीही परिस्थितीत सुधारणा न झाल्यास इतर कांहीं मार्गांनी त्याना सवलती नाकारून किंवा त्यांच्या धंद्यात तत्सम अडचणी आणण्याचे तंत्र वापरून ;सरळ' करता येणार नाहीं का? शिवाय सामान्य जनतेला चिनी वस्तू न घेण्याबद्दल आवाहन करावे व त्याचा प्रचार वारंवार करत रहावे. तेही होताना दिसत नाहीं.

जम्मू आणि काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर यांच्यामधील "प्रत्यक्ष नियंत्रणरेषे"वर (Actual Line of Control) चिनी सैनिक असल्याच्या बातम्या या महिन्याच्या सुरुवातीपासून मी वाचत आलो आहे. http://www.zeenews.com/news697908.html http://www.zeenews.com/news698875.html http://www.internationalopinion.com/id356.html झी न्यूजवरील बातम्यांत त्या रेषेवर असलेले चीनचे सैनिक खालील चित्रांत दाखविले आहेत! याबद्दल आपले पंप्र श्री म.मो. सिंग BRIC च्या बैठकीसाठी चीनला जातील तेंव्हां याबद्दल चिनी नेतृत्वाबरोबर चर्चा करतील असेही वाचले होते. पण तिथे झालेल्या चर्चेत याबद्दल कांहींही उल्लेख माझ्या वाचनात आलेला नाहीं. कुणी वाचले असल्यास इथे त्याबद्दलचा दुवा द्यावा. याउलट http://m.timesofindia.com/PDATOI/articleshow/8002654.cms या दुव्यावर एक वेगळीच बातमी वाचायला मिळाली. ती म्हणजे भारत व चीन दरम्यान लष्करी शिष्टमंडळाच्या परस्पर भेटी पुन्हा सुरू करण्याबाबतची. पण त्यात बरेच उलट-सुलट मुद्दे दिसले. त्यात असे म्हटले आहे कीं According to government sources, the Army delegation to be led by Maj-Gen Singh will comprise representatives of the Army’s Central and Eastern Commands as well as the Army Headquarters. The Sino-Indian border is guarded by Indian Army units under the Northern, Central and Eastern Commands. पुढे असे म्हटले आहे कीं: Sources here said it was the Chinese side that suggested the compromise of a divisional commander from the Udhampur-based Northern Command leading the Indian Army delegation, because it was concerned about loss of face if they went back on their refusal to give visa to the Northern Army Commander. पण आपल्या शिष्टमंडळात Northern Command चा प्रतिनिधी नाहींच. म्हणजे इथेही आपन माघार घेतली आहे काय? खरे तर ज्या आपल्या अधिकार्‍याला आधी चीनने व्हिसा नाकारला त्यांनाच (ले.ज. जस्वाल यांनाच) पुन्हा पाठविण्याबद्दल आपण आग्रह धरायला हवा होता कारण face savingची गरज चीनपेक्षा आपल्याला होती. (ले. ज. बलजीत जस्वाल) मग आपण झालेला अपमान का गिळला? या परस्पर भेटीत आपला कांहीं तरी फायदा होतो कां? यावर जाणकार जरा प्रकाश टाकतील काय?