दर्जेदार लेखन म्हणजे काय?
हा अत्यंत गहन प्रश्न आहे. चांगल्या लेखनाची व्याख्या करताना भल्याभल्यांची दमछाक होते. कारण काहीही व्याख्या केली, तरी उत्कृष्ट लेखन ती व्याख्या छेदून दशांगुळे वर उरतंच. मग ते सामावून घेण्यासाठी पुन्हा व्याख्या बदलायची आणि पुन्हा पुढची दहा अंगुळं पसरणारं काहीतरी सापडलं की ये रे माझ्या मागल्या सुरू होतं. पण कधी कधी चांगलं लेखन म्हणजे काय, याचं उत्तर अश्लील म्हणजे काय याला एकाने दिलेल्या उत्तराप्रमाणे होतं "चांगलं लेखन म्हणजे काय हे मला सांगता येणार नाही, but I will know it when I see it". आपल्यापैकी बहुतेकांना हा आतला आवाज असतो - जो चांगल्या लेखनाला दाद देतो. मग भले त्याचं विश्लेषण करून सांगता का येईना. पुरणपोळी तोंडात ठेवल्यावर विरघळली म्हणजे ती मस्त जमली - ती कशी करायची, ती कशामुळे विरघळते हे प्रत्येकाला सांगता येईलच असं नाही.
मला विशेष आवडणाऱ्या लेखनाची वैशिष्ट्य अशी - सरळसाधं, अनुभूतीतून आलेलं, मनाला भिडणारं, वाचकाला नव्या विश्वात अलगदपणे घेऊन जाणारं.... मला माहीत आहे, ही उत्तरं नाहीत. कारण यात पुन्हा मनाला भिडणारं म्हणजे काय असा प्रश्न विचारता येईल. त्याचं उत्तर द्यायचं मी अर्थातच टाळलेलं आहे. मला कविता आवडतात, त्याही अवडंबर न माजवणाऱ्या, सहजसुंदर, ओघवत्या. विनोदी लिखाण आवडतं - तेसुद्धा ओढाताण न करता सहजी फुललेल्या विनोदांचं. कधीकधी अतिशय क्लिष्ट, तांत्रिक, सुरचित लेखनही आवडतं. प्रचंड सोफिस्टिकेटेड विनोदही आवडतात. मला काय आवडतं हे लिहायला लागल्यावर माझ्याच लक्षात यायला लागलंय की चांगलं म्हणजे काय हे जाऊचदेत, मला चांगलं काय वाटतं याचं वर्णन करणंही अवघड आहे.
त्यामुळेच या लेखात मांडलेल्या 'दर्जेदार लेखन म्हणजे काय?' या प्रश्नाच्या रटाळ, तांत्रिक उत्तरापेक्षा वाचकांनी मिपावरची उत्कृष्ट लेखनाची उदाहरणं द्यावीत असं मी आवाहन करतो आहे. यामागे अनेक उद्देश आहेत. एक म्हणजे गेले काही आठवडे मिपावर जे लेखन येतं आहे त्यात दुर्दैवाने फुटकळ कौल, चारोळींचे काथ्याकूट, भंपक व भडक लेखन यांची उदाहरणं मला नेहेमीपेक्षा जास्त दिसली आहेत. त्यात गेल्या काही महिन्यात मिपाची सदस्य संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. इतक्या मोठ्या (नवीन) वाचकवर्गाला मिपावर केवळ फालतू लेखन व टाईमपास होतो अशी कल्पना होणं व्यक्तिश: मला पसंत नाही. मिपावर मी अनेक चांगले लेख, कविता, चर्चा, विडंबनं वाचलेली आहेत. गेल्या काही दिवसांतलं लेखन हे नियम नसून अपवाद आहे हे दाखवण्यासाठी आधीचं चांगलं लेखन नवीन वाचकांना बघायला मिळालं तर बरं होईल असं मला वाटतं. दुसरा उद्देश असा की मी नवीन व जुना यांच्या कुठे तरी मध्ये आहे. त्यामुळे मी सदस्य व्हायच्या आधी मिपावर झालेल्या उत्तमोत्तम लेखनापैकी बरंच मीदेखील वाचलेलं नाही. जर जुन्या व जाणत्या सदस्यांनी आपल्या वाचनखुणा उघडून त्यातलं आवडतं लेखन सादर केलं तर मलाही अनेक चांगलं लिखाण वाचायला मिळेल. तिसरा हेतू असा की या चर्चेला मिळालेल्या प्रतिसादांतून मिपावरच्या उत्तम लेखनाची एक लायब्ररी तयार व्हावी. मग जेव्हा केव्हा त्याज्य लेखन दिसेल तेव्हा हा धागा उघडून त्यातल्या आपल्या आवडत्या लेखनाला प्रतिसाद देऊन चांगले धागे वर काढून गाळ तळात बसवण्याची क्षमता सदस्यांमध्येच येईल.
मी अशी विनंती करतो की प्रतिसाद देताना प्रथम आपल्याला आवडलेल्या लेखनाचे, कवितांचे, चर्चांचे (तीन ते चार) दुवे द्यावेत. जर कोणी एखाद्या लिखाणाचा दुवा दिला असेल तर तो परत देऊ नये - जितके अधिक दुवे मिळतील तितकं चांगलं. शक्यतो कविता, विडंबनं, लेख, कथा, चर्चा, पाककृती, कलादालन अशा वेगवेगळ्या विभागांमधला एक एक दुवा द्यावा. (दुवा ठळक व अधोरेखित करावा) मग त्याखाली अगदी मोजक्या वाक्यांत ते का आवडलं हे नोंदवावं.
सुरूवात मी करतो
कथा : शिंपिणीचे घरटे - रामदास
कविता : समर्थ - क्रान्ति
लेख/चर्चा : कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे - धनंजय
शिंपिणीचे घरटे या कथेत शिंपीण पक्षी धागा धागा जुळवून घरटं उभं करते त्याप्रमाणे जिद्दीने घर आपल्या पायांवर - शिवणयंत्राची पायपट्टी चालवत अक्षरश: - उभं करणाऱ्या आईची कहाणी आहे. ती पूर्ण वाचल्याशिवाय तिची धार जाणवत नाही.
समर्थ कवितेत अतिशय सहजपणे कवयित्रीने आपल्या कवितेचं मागणं, गाऱ्हाणं सांगितलं आहे. अशा फार थोड्या कवितांपैकी आहे की ज्या पहिल्या वाचनातच पाठ होतात, ओठावर रेंगाळतात.
कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे हा लेख म्हणून आलेला आहे. पण तो आत्मानुभव आहे. खूप खोलवर काही साठलेलं एकदम मोकळं केल्याचा प्रत्यय येतो. तो लेख असला तरी त्यावरची चर्चासुद्धा वाचण्याजोगी आहे.
प्रतिक्रिया
मूळ लेखातली वाक्य:
जुन्या व जाणत्या सदस्यांनी आपल्या वाचनखुणा उघडून त्यातलं आवडतं लेखन सादर केलं तर मलाही अनेक चांगलं लिखाण वाचायला मिळेल. तिसरा हेतू असा की या चर्चेला मिळालेल्या प्रतिसादांतून मिपावरच्या उत्तम लेखनाची एक लायब्ररी तयार व्हावी. मग जेव्हा केव्हा त्याज्य लेखन दिसेल तेव्हा हा धागा उघडून त्यातल्या आपल्या आवडत्या लेखनाला प्रतिसाद देऊन चांगले धागे वर काढून गाळ तळात बसवण्याची क्षमता सदस्यांमध्येच येईल.
ब्रिटीश दादूसचा धागा आज वर आलेला दिसलाच होता.
शेवटच्या वाक्यात ध्वनित होणार्या गोष्टीला आहे. मग जेव्हा केव्हा त्याज्य लेखन दिसेल तेव्हा हा धागा उघडून त्यातल्या आपल्या आवडत्या लेखनाला प्रतिसाद देऊन चांगले धागे वर काढून गाळ तळात बसवण्याची क्षमता सदस्यांमध्येच येईल. या वाक्याला मी हुच्चभ्रुपणा म्हणतो. गाळ कोणता हे कसे अन कोण ठरवणार? एखादा नवा धागा नको म्हणुन सदस्य त्यांना आवडतो तो धागा हट्टाने वर आणत बसले तर तो त्या नविन धाग्यावर अन्यायच आहे की. त्यापेक्षा न आवडलेल्या धाग्यावर प्रतिसाद देऊ नका किंवा सरळ आपले मत मांडा. उगीच ही मखलाशी कश्याला? अन लायब्ररी तर आहेच की इथे. लिखाण जतन करुन ठेवलेलेच आहे परत परत वाचायला.
प्रसन्नजींशी सहमत आहे. तसाच प्रतिसादही वर मी दिला आहे.
एखादा नवा धागा नको म्हणुन सदस्य त्यांना आवडतो तो धागा हट्टाने वर आणत बसले तर तो त्या नविन धाग्यावर अन्यायच आहे की.प्रसनदा, सदस्यांना हा 'अधिकार' आत्ता आहेच. थोड्या फार प्रमाणात तुम्ही म्हणता तसं होतंच की - चांगलं लेखन, समर्थ असा लौकिक असलेल्या लेखणीतून आलेलं लेखन लोक अधिक वाचतात (यात प्रतिसादसंख्येवरून दर्जा ठरतो असं म्हणत नाहीये). लोक उगाच कोणाला पिडण्यासाठी तसं करत नाहीत - करणारही नाहीत, याची खात्री आहे. फक्त गेले काही दिवस खूप जण 'इतका कचरा येतोय, संपादक काही करत का नाहीत' वगैरे तक्रार होते आहे. त्यात चांगलं गाडलं जाऊ नये, उत्तम लिखाण करणाऱ्यांची नावं लोकांना माहीत व्हावीत जेणेकरून संपादकांनी काही कृती करण्याऐवजी वाचकांच्या कृतीतून आपोआप योग्य गोष्ट व्हावी ही इच्छा आहे. या धाग्याचा मुख्य उद्देश मी लिहिलेलाच आहे, तो म्हणजे नवीन लोकांना मिपावर किती चांगल्या दर्जाचं लेखन येतं, आलेलं आहे ते दिसेल व तो आदर्श ठेवता येईल. जर वाईट लेखन आलं तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दुर्लक्ष करता येतंच. या धाग्यामुळे चांगलं वाचावंसं वाटलं तर काय वाचायचं हा प्रश्न सुटेल.
प्रसन्नदांशी सहमत. केवळ या धाग्यात आलेले लेखच चांगले म्हणणे म्हणजे एखाद्या सुग्रणीने निगूतीने केलेल्या जेवणाच्या पदार्थांपैकी केवळ चटणीच चांगली आहे असे म्हणणे होईल. (चटणी म्हणजे पुर्ण जेवण नाही अन येथे जाणीवपुर्वक चटचीच म्हटलेले आहे हे लक्षात घ्या.)
जर दहा वेळा एखाद्याच्या घरी जेवायला गेलेल्या शंभर लोकांना विचारलं, की बाबांनो, तुम्हाला कुठले कुठले पदार्थ आवडले ते सांगा. तर ते चटणीच सांगतील असं का वाटतं?
मिपावर हजारो गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. त्यातल्या लक्षात राहाणाऱ्या, आवर्जून पुन्हा वाचाव्याशा वाटणाऱ्यांचं उदाहरण द्या असं अनेकांना म्हटलेलं आहे - त्यामुळे कुणाच्या तरी एकाच्या आवडीचं हे चित्र नाही. यातूनही काही चांगलं लेखन गाळलं जाणार, हे खरंच आहे. पण त्याला नाईलाज आहे.
मला राजेश चे बरेचसे लेखन आवडते वानगी दाखल काही
नाडि वाचुनी अति मी दमले, थकले रे शशिकांता!
ओक साहेबांची पण दिलखुलास दाद आहे
मराठी, पुणेरी, पुस्तकवाला: एक डेडली काँबिनेशन!
पूजेची पथ्ये
माझी लिस्ट तयार करुन देतेच.
मी लिहीलेले कोणालाच आवडत नाही का :दुखी बाहुली: (बाहुली कशी टाकायची?) :quest:
तुमचं नाव वर ऑलरेडी लिहिलय म्हणून मी लिहिलेलं नाही जागुतै :) (ही हसरी बाहुली आहे असं समजा )
तुमच्या प्रतिसादानंतर परत सगळ वाचुन पाहील . तेंव्हा माझ नाव सापडल. धन्यवाद. पण वरची पोस्ट मी मजेत लिहिली होती. दुखी वगैरे काही नाही. उलट माझ नाव पाहून मला आता खुप आनंद झाला आहे.
राजेश घासकडवी
चांगले साहीत्य सर्वांसमोर आणुन एक चांगले काम केले आहेत. कविता आधी वाचलेली होती. पण विस्मृतीत गेली होती. पण बाकी दोन्ही लेख वाचून निःशब्द झालो.
तुमच्यामुळे इतरांनी सुध्दा जोडण्या देउन हातभार लावला या उपक्रमाला.
पुनःश्च आभार.
आवर्जून वाचावे असे,
लेखनामध्ये :
श्रावण मोडक, धनंजय, रामदास, नंदन, विसोबा खेचर, राजेश घासकडवी, संजोपराव, हृषिकेश इ. ह्यांचे लेखन ( अजूनही बरीच नावे आहेत).
पाककृतीमध्ये : गणपा
काव्यप्रकारामध्ये : रामदास, प्राजु, क्रांती
सध्या तरी एक दोनच देते: मोकलाया दाही दिशा!!!
आणि श्रामोंच्या 'काही नोंदी अशा तशा' --> http://www.misalpav.com/newtracker/640
बाकी वरती माझी आवडती कोरांटीची फुले, शिंपीणीचं घरटं , खोबार मालिका आणि गणपाच्या पाकृंची नोंद झालीच आहे..
आता धम्याची शिकार, पर्याचे वेदनांचे हुंकार आवडले असे म्हटले असते, पण लोकांचे अर्धवट लेखनाची शिफारस केल्याबद्दल शिव्याशाप खाण्याची तयारी नाही!!! ;)
समजलं....(संपवलं बाबा हिचं सारखं प्रतिसाद अद्ययावत करणं) ;)
या शिवाय मला अरुंधती आणि भानस या दोघींचं लिखाणही आवडतं. आळशांच्या राजांचे प्रांतही बोर्डावर दिसण्याची वाट पहाते.
बहुगुणी यांची एअरपोर्ट ही लघुकथा मला आवडली होती, त्यांनी आणखी काही चांगलं साहित्य/कथा लिहिल्या असतील तर वाचायला आवडेल.
+१
बहुगुणींचे लेखन : http://www.misalpav.com/newtracker/1074
मी प्रथम मिसळपाव हे साधे सोपे नाव धरण करणारे लिंक पाहीले ते डॉन यांच्या पुणेरी पाट्या मुळे. सभासदांची नावे पण आकर्षक आणि विक्षिप्त तर कुणाच्या नावातच विक्षिप्त पणा.
काही आठवडे साधरण मार्च मध्ये फक्त वाचनाचे काम होते.नंतर काही काळ आद्याक्षरे शोधण्यात वेळ गेला. उदाहरणार्थ प्र. का. टा. आ, .ह.घ्या., हे.वे. सां. न. ल. , पू.ले.शु. धन्यू वगैरे.
सर्वांनी आता इथे दिलेले आहेत.पण मला आवडलेला प्रतिसादक म्हणजे टारझन उर्फ कुबड्या खविस.क्षणभरच टिकणारी पण टारगट सही त्यानेच करावी.
जसे उकडलो ... शिजलो ... उतू गेलो ... तळलो ...वाफाळलो ... करपलो ... शिळा झालो
मुळ लेखकाने काही आगाउ वक्तव्य केले असेल तर त्याचा समाचार घेतला जायचा. सुरूवातीला तर टारझन च्या प्रतिसादासाठी काही धागे काढले आहेत असे वाटावे इतपत त्याचे कॉन्ट्रीब्युशन असायचे.अफ्रीकेतील नोटांच्या फोटो ही आयडीया पण भन्नाट होती.
बाकी काळ्यांची 'फसवेगिरी' आणि कार्यकर्त्यांची ''खोबारगिरी " याचा उल्लेख अनेकांनी केला आहेच.
परदेशी असल्यावर आपल्या आइच्या भाषेत इतके वैविध्य पूर्ण साहीत्य वाचायला मिळणे ही एक पर्वणीच असते.
आणखी एक तात्यांने दिलेले पाक फटू पण उत्तमच. ह्या हॉटेलात असल्याचा मला आनंद आहे.
सर्वांना पु.ले,शु.
मला मिपाचा सदस्य झालो, तेव्हापासुन आजवर वाचलेला आणि सो फार सर्वात आवडलेला लेख:
http://www.misalpav.com/node/14847 "बंडू आणि..." लेखक: नगरीनिरंजन
आम्हाला दिलीप बिरुटे सर यांचे लेखन आवडते. साधे आणि सोपे असते.
त्यांनी उपक्रमावर मराठी भाषेच्या इतिहासाबद्दल सुरेख लेख लिहिला होता. त्यातून खूप नवीन माहिती मिळाली होती.
येथे त्यांनी कुणा रावाची खिल्ली उडवणारा भन्नाट लेख लिहिला होता तो अनेकांच्या लक्षात असेल.
या शिवाय आपले 'सहज' अवघड विषयांना हात घालण्यात वाकबगार आहेत. त्यांच्या लेखनाचेही आम्ही चाहते आहोत. पण हल्ली यांचे लेखन दिसत नाही.
मिभो भारी लिहायचे आणि चर्चा करायचे पण हल्ली एकोळी व्रतामुळे पार पेन्शनीत निघाल्या सारखेच लिहित असतात!
विकास, चित्रा, राजेश घासकडवी, धनंजय, मुक्तसुनित, स्वाती दिनेश, नंदन, प्रियाली, इन्द्र्राज पवार, मितान, केशवसुमार, छोटा डॉन आणि कोलबेर या सोबत इतरांचेही लेखन आवडते.
नगरीनिरंजन यांचा हल्लीच आलेला लेख हे खुसखुशीत लेखन कसे करावे याचा नमुनाच आहे.
धनंजय हल्ली का लिहित नाही हे कळले नाही. बहुदा कार्यबाहुल्य असावे.
प्रतिसाद या बाबतीत कापूसकोन्ड्या यांची सहमत.
आवडलेला प्रतिसादक म्हणजे टारझन उर्फ कुबड्या खविस.क्षणभरच टिकणारी पण टारगट सही त्यानेच करावी.
लेखन करतांना, आपण काय लिहित आहोत, हे किमान एकदा वाचून तरी पाहिले पाहिजे ही माफक अपेक्षा नव्या लेखकांकडून आहे.
"लेखन आवडते" या गटात माझ्या नावाचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. हा विश्वास अनाठायी असणार नाही याची काळजी मी निश्चितच घेत राहीन.
"....आपण काय लिहित आहोत, हे किमान एकदा वाचून तरी पाहिले पाहिजे..."
हे मी कटाक्षाने पाळतो....निव्वळ लेखनातील भावासाठीच नव्हे तर, शुद्धलेखनासाठीही. एखाद्याच्या लेखनातील मुद्दा कितीही भावला तरी जर लिखाण अशुद्ध असेल तर मी पुनश्च त्या पृष्ठाकडे जात नाही.
"ऊस डोंगा परी रस नाही डोंगा..." हे जरी खरं असलं तरी इथे असणारे सदस्य शिक्षणाच्याबाबतीत 'डोंगा' नसल्याने लिखाणातील अशुद्धता माफ करता येण्यासारखी गोष्ट नाही....(अर्थात हे वैयक्तिक मत आहे.)
इन्द्रा
विसोबा खेचर, श्रावण मोडक, रामदास, राजेश घासकडवी, संजोपराव, परा, टारझन, केसु, पिडा, बिपिन कार्यकर्ते, अडगळ, विलासराव, काळे काका, प्राजु, इन्द्र्राज पवार... यादी लै मोठी हाय
हे आनी ह्यांच्यासारखे झकास लिहिनारे मिपा सोडुन मराठी आंतरजाळाव एकत्र कुठच न्हायत!
ह्यो सर्वांना आमचा दंडवत!
अवांतरः ते टारोबा कुठशिक आसत्यात सध्या?
हा धागा वरती काढून मधल्या काळातील दर्जेदार लिखाणे या निमित्ताने सगळ्यांनी सांगावीत म्हणून हा प्रतिसाद देते आहे.
जुने मिपा
धागा वरती काढल्या बद्दल आभार!
साधारणता, २०१० च्या शेवटी मिपा वर आल्याने ह्या धाग्या मुळे दिलेले सर्व लिखाण तेंव्हाच वाचल्याने मिपा बरोबर नाते घट्ट झाले होते..
त्या पुढील(२०१० नंतर चे )आवडलेले लिखाण आणि त्यांच्या लिंक्स लवकरच देतो...
गेल्या पाच वर्षांत वाचल्या गेल्या साहित्यिकांपैकी हमखास वाचनीय....
प्रचेतस,किल्लेदार, चक्कर बंडा,गारगोवलेकर,प्राची अश्विनी,समर्पक,नागनिका ,पाकपद्म भक्ती,टर्मिनेटर, भागो आणी इतर अनेक.
वरिष्ठ म्हणू की जुन्या जाणत्या म्हणू,
"रोशनी",तात्या,मी दिपाली,धन्या,केशवसुमार,,संजोपराव,बिपीन कार्यकर्ते आणी इतर काही.
ज्यांचे लेखन आवडले,प्रतिसादले पण वयापरत्वे लक्षात न राहीले त्या सर्वांचेच मनापासून आभार.
एकंदरीत, माझा पिंड वाचनाचा ,लेखकाचा नाही पण मिपा करांनी सांभाळून घेतल्यामुळे थोडीफार वटवट केली.
प्रश्नचिन्हांची गर्दी झाली डोक्यात....