✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपावरची दर्जेदार लेखनाची उदाहरणे.

र
राजेश घासकडवी यांनी
Tue, 08/31/2010 - 15:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32761 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

ह्या धाग्यावरुन देवबाप्पांनी

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/31/2010 - 15:24 नवीन
ह्या धाग्यावरुन देवबाप्पांनी लिहिलेल्या सिद्धहस्त लेखकवाल्या धाग्याची आठवण झाली :)
  • Log in or register to post comments

कविता

भडकमकर मास्तर
Tue, 08/31/2010 - 15:32 नवीन
मला कविता आवडतात, त्याही अवडंबर न माजवणाऱ्या, सहजसुंदर, ओघवत्या. डोळे पाणावले.. जियो माझी आवडती कविता डंकर्कचे विद्धविवेचन कवयित्री : शरदिनी
  • Log in or register to post comments

मास्तर,

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 08/31/2010 - 15:44 नवीन
डुडल गावचा गोलंदाज जखमी चित्रबलाकाचा अलारिपु "> विसरलात वाटत काय छळल होत दोन्ही कवितांनी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

फारच छान कल्पना

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 08/31/2010 - 15:37 नवीन
फारच छान कल्पना, या निमीत्ताने चांगले जुने लेख परत एकदा वाचता येतील पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

चांगला धागा

सहज
Tue, 08/31/2010 - 15:41 नवीन
चांगला धागा याकरता की मिपावरच्या उत्तमोत्तम लेखनाची येथे पुन्हा उजळणी होणार. कितीवेळा सांगूनही वाचनखुण साठवा ही सोय का उपलब्ध करुन दिली जात नाही आहे हे कळत नाही. स्मृतीगंध ही वामनसुत यांची लेखनमाला
  • Log in or register to post comments

सगळं क्लियर झालेलं बरं

यशवंतकुलकर्णी
Tue, 08/31/2010 - 15:45 नवीन
अरे वा! चांगल्या-वाईटाचा विचार करणारी माणसं आहेत म्हणायची (म्हणजे काय?? एक आवाज) सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मला "चांगलं" कशाला म्हणावे ते कळत नाही आणि "लेखन" म्हणजे काय ते पण कळत नाही.. फक्त डोक्यात काहीतरी चमकू लागते आणि बोटं किबोर्डवर पडून अक्षरे उमटू लागतात आणि त्यांचे शब्द होतात आणि शब्दांना आधीच अर्थ चिकटलेले असतात एवढंच मला माहित आहे...
भंपक व भडक लेखन यांची उदाहरणं मला नेहेमीपेक्षा जास्त दिसली आहेत. त्यात गेल्या काही महिन्यात मिपाची सदस्य संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. इतक्या मोठ्या (नवीन) वाचकवर्गाला मिपावर केवळ फालतू लेखन व टाईमपास होतो अशी कल्पना होणं व्यक्तिश: मला पसंत नाही.
तुमचा आक्षेप नव्या लोकांनी लिहिण्यावर आहे का? असेल तर त्यात मी आहे का?? कारण मी चार-पाच दिवसच झाले इथे आलोय. सगळं क्लियर झालेलं बरं.
  • Log in or register to post comments

कृपया नवे जुने असा गैरसमज करून घेऊ नका

राजेश घासकडवी
Tue, 08/31/2010 - 15:53 नवीन
नवीन लोकांनी लिहिण्याबद्दल, थोडं चाचपडण्याबद्दलही आक्षेप नाही. माझा मिपावर आत्तापर्यंत आलेल्या चांगल्या लेखनावर फोकस करण्याचा हेतू आहे. नवीन सदस्यांचा उल्लेख वाचक म्हणून त्यांच्यावर होणारा परिणाम या दृष्टिकोनातून केला होता. जुनं, चांगलं वर यावं आणि त्यातून मिपावरच्या दर्जेदार लेखनाचा प्रत्यय नव्यांनाही व्हावा हा मुख्य हेतू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

शतश: धन्यवाद!

यशवंतकुलकर्णी
Tue, 08/31/2010 - 15:59 नवीन
वॉव्व!! अशी कल्पना आहे तर!
जुनं, चांगलं वर यावं आणि त्यातून मिपावरच्या दर्जेदार लेखनाचा प्रत्यय नव्यांनाही व्हावा हा मुख्य हेतू.
याबद्दल शतश: धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

चांगला धागा, आवडला.

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/31/2010 - 15:45 नवीन
माझे काही आवडते लेखः चवीने खाणार त्याला... - सुबक ठेंगणी खाण्यापिण्याचं, वेगवेगळ्या संस्कृतींचं एवढं सुबक वर्णन सुबकच करू जाणे. माझं खोबार ही संपूर्ण मालिका - बिपिन कार्यकर्ते एका वेगळ्याच संस्कृतीत राहून, तिथले अनुभव लिहीताना, पुन्हा माणूस इथून तिथून सारखाच हे बिपिनच्या शैलीत वाचायला आवडलं. कोणार्कच्या मंदीरातील शिल्पे, रामदास काकांचे बहुतेक सर्वच धागे आणि वामनसुत यांची स्मृतीचित्रे हे सुद्धा आवडतात. एकदा उल्लेख आल्यामुळे पुन्हा लिंक्स दिलेल्या नाहीत.
  • Log in or register to post comments

कथा - एक होती वैदेही -

मेघवेडा
Tue, 08/31/2010 - 15:47 नवीन
कथा - एक होती वैदेही - नीधप आणि अर्थातच जेपी मॉर्गन यांची हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा ही लेखमाला!
  • Log in or register to post comments

+१ जेपी मॉर्गन यांची एका

प्रशान्त पुरकर
Tue, 08/31/2010 - 18:13 नवीन
+१ जेपी मॉर्गन यांची एका खेळियाने सुद्धा अप्रतिम आहे...... (पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

चांगली idea :)

येडबंबू
Tue, 08/31/2010 - 15:48 नवीन
चांगली idea :) मला आवडलेले काही : धिस टाईम फॉर आफ्रिका (पूर्ण लेखमाला). हॅकर्स अंडरग्राऊंड (कथा अजून वेग पकड्तेय, पण मस्त मजा येतेय). संपूर्ण फुट्बॉल विश्वचषक लेखमाला (अप्रतीम) अजून बरेच काही आहे, पण अत्ता एवढेच लगेच आठवले. (लिंक कशा देतात ते अजून माहीत नाही). ----
  • Log in or register to post comments

चांगली कल्पना. वाचनखुणांमधे

ऋषिकेश
Tue, 08/31/2010 - 17:07 नवीन
चांगली कल्पना. वाचनखुणांमधे बरेच चांगले धागे होते.. आता आठवून शोधावे लागतील आठवतील व मिळतील तसे देत जाईन लगेच आठवणारे: चतुरंग यांचे बुद्धीबळ विश्वकपाच्या सामन्याची वर्णने ले गई दिल दुनिया जापान की - स्वाती तै प्रियाली तैच्या बर्‍याच भयकथा नंदनचे जवळजवळ सगळे लिखाण रामदास काकांच्या अनेक कथा/लेख/कविता कवितांमधे क्रान्ति, प्राजु, बेसनलाडू, अनिरुद्ध अभ्यंकर यांच्या अनेक कविता/गझला व चतुरंग व केसुंची विडंबने आहेतच याशिवाय मिसळपाववर एकेकाळी चाललेल्या [ संपादकीय ] ह्या सदरातही एकापेक्षा एक सुरेख लेखन झाले आहे
  • Log in or register to post comments

मला आवडलेल श्रावण मोडक यांचे

प्रकाश घाटपांडे
Tue, 08/31/2010 - 18:28 नवीन
मला आवडलेल श्रावण मोडक यांचे बरेच लेख आहेत. त्यातल्या त्यात अधिक राजे बाकी रामदास यांचे लेखन आवडते. तसेच वर उल्लेखलेले सर्व बाकी जसे आठवतील तसे मांडु
  • Log in or register to post comments

वाचन खुण

मीनल
Tue, 08/31/2010 - 18:32 नवीन
हे खरे की ` चांगले लेखन ` याच्या व्याख्या एकसमान नाही. पण` फुटकळ लेख `याची व्याख्या ब-याच प्रमाणात एकसमान होऊ शकेल. बरेच ` चांगले ` म्हणजे मला आवडलेले लेख वाचन खुणेमधे साठवून ठेवले होते. त्यात ब-याच कविता, लेख, कथा होत्या. ते आता शोधणे शक्य नाही होत आहे. मला आठवले /मिळाले ते --- मूख दूर्बळ माझी हॉस्पीटल भरती http://misalpav.com/node/11480 अवलिया -मौन- http://mimarathi.net/node/1328 प्रा. बिरूटे -निगरगट्ट आठवांचा चिखल..http://misalpav.com/node/13244 दत्ता काळे हा स्पंद फुलण्याचा http://misalpav.com/node/4469 आनंद घारे यांचे बरेचसे लेख मला आवडतात. एक सकाळ - मुंबईतली आणि अमेरिकेतली http://misalpav.com/node/5747 ती -http://misalpav.com/node/12997 प्राजु- फुलोरा -http://misalpav.com/node/7095 क्रांती- चैत्रगौर -http://misalpav.com/node/7151 टारझनच्या प्रेमाचे तीन्ही पोपट -http://misalpav.com/node/10383 अरूंधती -प्राचीन साहित्यातील वसंतोत्सव http://misalpav.com/node/11457
  • Log in or register to post comments

सर्वात आधी

प्रियाली
Tue, 08/31/2010 - 18:02 नवीन
सर्वात आधी
  • सटासट शिंका दिल्यासारखे येणारे कौल थांबवा
  • मनात आलेले वाट्टेल ते लिहून टाकणारे लेख थांबवा
  • चौकशी खेरीज इतर एकोळी धागे थांबवा
  • ढापलेले, चोरलेले, मारलेले इतरांचे साहित्य इथे लावणे थांबवा
  • लेखन करताना माफक विचार करून (हे बरेच कठिण काम असावे) लेख टाकावा आणि विरामचिन्हांचा सुकाळ असणारे लेखन थांबवा
उरलेले सर्व आणि सर्वांचे लेखन वाचनीय असेल असा माझा दावा आहे. ;)
  • Log in or register to post comments

येकदम करेक्ट की वो!!

असुर
Tue, 08/31/2010 - 18:49 नवीन
>>>सटासट शिंका दिल्यासारखे येणारे कौल थांबवा <<< +१० >>>मनात आलेले वाट्टेल ते लिहून टाकणारे लेख थांबवा <<< +१. इथे संपादक्स महत्वाचे ठरतात! >>>चौकशी खेरीज इतर एकोळी धागे थांबवा <<< +२ >>>ढापलेले, चोरलेले, मारलेले इतरांचे साहित्य इथे लावणे थांबवा <<< +५० >>>लेखन करताना माफक विचार करून (हे बरेच कठिण काम असावे) लेख टाकावा आणि विरामचिन्हांचा सुकाळ असणारे लेखन थांबवा <<< +१. गुर्जींच्या सुचनेवरुन मी स्वतःत बदल घडवतो आहे. >>>उरलेले सर्व आणि सर्वांचे लेखन वाचनीय असेल असा माझा दावा आहे. <<< +१००० अशा रितीने प्रत्येक मुद्याशी एक वा अनेक वेळा सहमत! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

+१

सहज
Tue, 08/31/2010 - 18:49 नवीन
>उरलेले सर्व आणि सर्वांचे लेखन वाचनीय असेल असा माझा दावा आहे. हे एकदम पटेश!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

चांगली कल्पना

भाऊ पाटील
Tue, 08/31/2010 - 18:05 नवीन
सदस्यत्व मिळाल्यानंतर बरेच जुने-नवे लेख वाचले आणि काही आवडले, काही विनोदी वाटले म्हणून तर काही उपयुक्त वाटले म्हणून लिंका साठवून ठेवल्या. त्या खाली देत आहे- http://www.misalpav.com/node/6241 http://www.misalpav.com/node/6332 http://www.misalpav.com/node/7176 http://www.misalpav.com/node/3302 http://www.misalpav.com/tracker/707/707 http://www.misalpav.com/node/10279 http://www.misalpav.com/node/10229 http://www.misalpav.com/node/10101 http://www.misalpav.com/node/8686 http://www.misalpav.com/tracker/185/185 http://misalpav.com/node/9179 http://www.misalpav.com/node/11254 http://www.misalpav.com/node/12076 http://www.misalpav.com/node/11998 http://www.misalpav.com/tracker/4691/4691 http://www.misalpav.com/node/7176 http://www.misalpav.com/node/12853 http://www.misalpav.com/node/12858 http://www.misalpav.com/node/13593 http://www.misalpav.com/node/13485 आता कुठल्या लिंक मधे काय आहे आणि कशासाठी त्या साठवल्या ते मलाही सांगणे अवघड आहे. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

गणेशा
Tue, 08/31/2010 - 18:19 नवीन
नविनच पुन्हा आलो आहे. जुने लेख वाचायला मिळत आहेत या धाग्यामुळे . छान वाटले. २-३ दिवस झाले active झालो आहे. सध्या आफ्रिकेतील प्रवास वर्णन वाचत आहे. मस्त आहे
  • Log in or register to post comments

काही आवडतं लिखाण ....उर्फ़

पुष्करिणी
Tue, 08/31/2010 - 18:42 नवीन
काही आवडतं लिखाण ....उर्फ़ सुगरणीचा सल्ला : मेघना भुस्कुटे भयाण विनोदी कविता अरूंधती, रामदास, अवलिया यांच बहुतेक सगळंच लिखाण आवडत.
  • Log in or register to post comments

लेखनाचे दुवे

चित्रा
Tue, 08/31/2010 - 18:45 नवीन
मिपावरील लेखन वैविध्यपूर्ण आहे, आणि त्यातून काही थोड्याच लेख/कविता निवडायच्या तर दुसर्‍यांवर अन्याय होणार. तरी काही पटकन आठवले ते देते आहे. प्रकाश घाटपांडे यांचे फलज्योतिष, नाडीपट्टी इ. वरील लेखन प्रसिद्धच आहे. तरी यंदा कर्तव्य आहे, या लेखन मालिकेत आलेले त्यांचे लेख मी ओळखीतील एका विवाहेच्छु मुलीला दाखवले. यंदा कर्तव्य आहे ? धनंजय आणि रामदास यांचे बरेचसे लेखन आवडते. रामदास यांची शिंपीणीची गोष्ट विशेष आवडते (पण त्याचा दुवा घासकडवी यांनी दिलाच आहे) वानगीदाखल - बेसामे मुचो नंदनने हल्ली जास्त लिहीलेले नाही, पण हे आठवले -बरेच काही उगवून आलेले बाकी कलादालनाकडे दुर्लक्ष होते, पण कलादालनात अनेक सुंदर भ्रमंत्या वाचायला मिळतील. विमुक्त यांचे हे उदाहरणादाखल - कोकणातली भटकंती पण खरे तर असे आहे, की हे अलिकडे सतत चालले आहे तसे अतिशय फुटकळ लेखन प्रियाली म्हणते तसे थांबवले तर मिसळपावावर वाचायला खूप काही आहे. वेगवेगळ्या वेळी आवडतील अशा कथा/कविता/लेख सगळे भरपूर आहे.
  • Log in or register to post comments

सहमत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/31/2010 - 20:09 नवीन
अलिकडे सतत चालले आहे तसे अतिशय फुटकळ लेखन प्रियाली म्हणते तसे थांबवले तर मिसळपावावर वाचायला खूप काही आहे. वेगवेगळ्या वेळी आवडतील अशा कथा/कविता/लेख सगळे भरपूर आहे. सहमत आहे....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

राजहंसाची चाल डौलदार व लयबद्ध

अविनाशकुलकर्णी
Tue, 08/31/2010 - 18:59 नवीन
राजहंसाची चाल डौलदार व लयबद्ध असते.. म्हणुन ईतरांनी चालुच नये का? अशी माउलिची एक उपमा आठवली
  • Log in or register to post comments

+१ काय बोललात कुलकर्णी साहेब

शुचि
Tue, 08/31/2010 - 19:16 नवीन
+१ काय बोललात कुलकर्णी साहेब !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

चालावे की

प्रियाली
Tue, 08/31/2010 - 19:55 नवीन
राजहंसाची चाल डौलदार व लयबद्ध असते.. म्हणुन ईतरांनी चालुच नये का?
इतरांनी अवश्य चालावे पण आपण राजहंसासारखेच चालतो हा तोरा ठेवू नये, चालता येत नसेल तर चप्पल वाकडी म्हणू नये आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे.. राजहंसाप्रमाणे चालण्याचा थोडा सराव करा की. बिघडते कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

+१

मधुशाला
Wed, 09/01/2010 - 02:47 नवीन
करेक्ट... (थोडक्यात, माझे सोडून इतर सर्वांचे लिखाण थांबवा.. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

मला आवडणारं लेखन इथे सापडेल

शुचि
Tue, 08/31/2010 - 23:28 नवीन
मला आवडणारं लेखन इथे सापडेल सन्जोप राव यांचं सर्वच लेखन मला अतोनात म्हणजे अतिशय आवडतं- http://www.misalpav.com/newtracker/26/26 http://www.misalpav.com/node/11707 ....... नाचरी गाय केवळ अ-प्र-ति-म बालगीत - चित्रा यांनी भाषांतरीत केलेलं!!!! http://www.misalpav.com/node/206 ..... प्रा डॉ दिलीप बिरुटे यांचा अतिशय तरल, हळवा लेख. सुरेख!!! http://www.misalpav.com/node/6238 .... पिवळा डांबिस यांचा हा विनोदी लेख वाचून हसून मरायची वेळ आली होती. http://www.misalpav.com/node/462 ...... मुक्तसुनीत यांचं छोटेखानी पण बावनकशी लिखाण!!! http://www.misalpav.com/node/12242, http://www.misalpav.com/node/12321, http://www.misalpav.com/node/13267 ........ मेघवेडा यांचं काव्यशास्त्रविनोद. http://www.misalpav.com/node/12162 ..... अरुंधती विशेषतः विनोदी लेखन खूपच फुलवते असं माझं मत आहे. http://www.misalpav.com/node/13028, http://www.misalpav.com/node/12605 ...... पुष्करिणी चे इतिहासावरचे "डंकर्क" आणि "पर्ल हार्बर" लेख क्या केहेने!!! मास्टरपीस! http://www.misalpav.com/node/11239 .... अर्धवटराव यांचा हा पुलंवरचा लेख माझा आवडता http://www.misalpav.com/node/12400 .... ३_१४ विक्षिप्त्_आदिती यांच्या स्त्रीची आजची प्रतिमा मधील हा लेख आता बास करते. :) पण लेखनाइतकीच हुषारी, चातुर्य, भाषेवरील प्रभुत्व, आणी मुख्य म्हणजे " RIGHT ATTITUDE" प्रतिक्रिया द्यायला लागते. माझे आवडते प्रतिसादकर्ते - मिभो (नंबर १), चिंतातूर जंतू, मुसु, सन्जोप राव, अरुंधती, घासकडवी, चतुरंग आणि पिडा
  • Log in or register to post comments

मला आवडलेले लेखन चांगले..

llपुण्याचे पेशवेll
Tue, 08/31/2010 - 20:00 नवीन
मला आवडलेले लेखन चांगले.. त्यात साहीत्यमूल्य असल्या फुटकळ गोष्टी मी शोधत नाही.
  • Log in or register to post comments

विनंती

राजेश घासकडवी
Tue, 08/31/2010 - 20:17 नवीन
लेखात आवाहन केलं आहे त्याप्रमाणे चांगल्या लेखनाची उदाहरणं द्यावीत ही कळकळीची विनंती. 'मिपावरचं वाईट लेखन म्हणजे काय, ते कसं टाळावं' यावर चर्चा नाही झाली तर बरं. या लेखाचा उद्देश चांगल्याचं कौतुक व्हावं, व सर्वच नव्या जुन्या लेखकांसमोर आदर्श राहावेत इतकाच मर्यादित आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

चांगलं लेखन (म्हणजेच चांगल

पाषाणभेद
Tue, 08/31/2010 - 20:39 नवीन
चांगलं लेखन (म्हणजेच चांगल वाचनीय का?) हे व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. व्यक्ती तितक्या प्रकृती. अन आता एखादा लेख मुड असेल तर वाचला की चांगला वाटेल. तो मनुष्य आजारी असेल अन वाचला तर त्याची प्रतिक्रीया कदाचित भिन्न असू शकते. दोन वाचकांची परिस्थीती भिन्न असू शकते. अर्थात यात लोकशाहीचा निकष लावायचा झाल्यास जास्त मते तो लेख (लेखक) विजयी असे होवू शकते. माझी आवडः येथील सर्व लेखन या लेखाचे शिर्षकः 'वाचकांच्या नजरेतून मिपावरची उत्कृष्ट लेखनाची उदाहरणं ' असे हवे होते काय?
  • Log in or register to post comments

शीर्षक

राजेश घासकडवी
Tue, 08/31/2010 - 20:58 नवीन
या लेखाचे शिर्षकः 'वाचकांच्या नजरेतून मिपावरची उत्कृष्ट लेखनाची उदाहरणं ' असे हवे होते काय?
होय. किंवा 'मिपावरची दर्जेदार लेखनाची उदाहरणं' हेही चालेल. संपादक कृपया बदल करतील काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

तात्यांशिवाय आहेच कोण?

हेम
Tue, 08/31/2010 - 21:49 नवीन
नाटकांत जसे '......आणि काशिनाथ घाणेकर' , तसे इथे '......आणि विसोबा खेचर'
  • Log in or register to post comments

सहमत आहे!

पिवळा डांबिस
Tue, 08/31/2010 - 22:05 नवीन
तात्याचं लिखाण तर इथे प्रथम घेऊन आलं!!! तात्याच्या लिखाणाचा फॅन! -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेम

माझे आवडते (आणि म्हणूनच

बिपिन कार्यकर्ते
Tue, 08/31/2010 - 22:52 नवीन
माझे आवडते (आणि म्हणूनच त्यांनी लिहित रहावं आणि उत्तमोत्तम लिहावं असा आग्रह आहे) जालिय लेखक रामदास, तात्या, अवलिया, मुक्तसुनित, पिडां, श्रावण मोडक, संजोप राव, चिंतातुर जंतु, आळश्यांचा राजा, टार्‍या, केशवसुमार, मेघना भुस्कुटे, धनंजय, मिष्टर घासकडवी .... लिस्ट अजून आहेच पण पटकन डोळ्यापुढे येणारी ही नावं... अर्थात सगळंच लेखन आवडलेलं आहे असं नाही पण या लोकांचे लेखन बहुतांशी आवडलेलं आहेच. या लोकांचे नाव मेन बोर्डावर दिसले की धागा लगेच उघडला जातोच जातो.
  • Log in or register to post comments

रामदासांचे काटेकोरांटीची

मृत्युन्जय
Tue, 08/31/2010 - 23:05 नवीन
रामदासांचे काटेकोरांटीची फुले. मि पा वर अजुन एक भिक्कार लेखन करणार्‍या हौशी लेखकाची भर काटेकोरांटीची फुले मुळेच पडली. त्यांचे बाकीचे लेखनही अप्रतिम. राघागुर्जींचे लेखनही आवडते. विलासराव आणि अर्धवटांची (आयडी बदला राव हा) प्रवासवर्णनेही आवडली. बाकी धागाप्रवर्तकाशी आणि प्रियालीशी १०१% सहमत.
  • Log in or register to post comments

मला अरुंधती , भडकमकर

शिल्पा ब
Tue, 08/31/2010 - 23:07 नवीन
मला अरुंधती , भडकमकर मास्तरांचे वर्ग, अर्धवट यांची आफ्रिकन सफारी, विलासरावांची ब्रज़िलिअन सफारी असे बरेच लेख आहेत जे आवडले... आणि आता संपादकांनी वायफळ कौल, एकोळी धागे काढून टाकावेत..
  • Log in or register to post comments

भाषेची ताकद

इन्द्र्राज पवार
Tue, 08/31/2010 - 23:30 नवीन
शब्दात आणि त्यामुळे पर्यायाने भाषेत किती विलक्षण अशी ताकद आहे हे या सुंदर लेखावरून समजते. श्री.घासकडवी यांना केवळ मिसळपाववरीलच लेखन यासाठी अभिप्रेत नसून एकूणच हा लेखनाचा प्रपंच अन्य क्षेत्रातही किती परिणामकारक होऊ शकतो हेही त्यांनी छानपणे अधोरेखित केले आहे. (पुरणपोळीचा दाखला तर नोंदनीय असाच आहे.) मी ज्यावेळी मिपाचा सदस्य झालो त्याला कारणही नेमका भाषेचा डौल हेच होते. त्यावेळी श्री.छोटा डॉन यांचा त्यांच्या एका अफाट प्रतिसाद लाभलेल्या लेखाचा उल्लेख वर्तमानपत्रातून वाचला आणि त्यातून त्यांच्या लेखनाची जादू मोहित करून गेली. आयपीएलने "पुणे" केन्द्र मंजूर केले आणि डॉनरावांच्या भन्नाट कल्पनेने पंख पसरले आणि त्यातून त्यांच्या ब्लॉगवर अवतरले होते "आयपीएल पुणे आणि पुणेरी पाट्या". वाचनाचा निखळ, अकृत्रीम आविष्कार, जिथे रागलोभद्वेषचीडरुसवाफुगवाआदेशआक्रोशअगतिकता या वा तत्सम विकारांना अजिबात स्थान नव्हते; होती ती निव्वळ धमाल आणि कल्पनाविष्काराचा अमर्यादित अनुभव. सदस्यत्वाचा माझा पहिला आठवडा त्या वाचनातच गेला होता. (मला वाटते त्याच काळात "स्टार माझा" ने काही मिपाकारांना ब्लॉग लिखाणाबाबत पारितोषिकेही जाहीर केली होती, त्याचा उल्लेख येथील लेखनात धाग्यास्वरूपात केला गेला होता.) तिथून मग मी थेट "मिसळपाव" वर आलो अन् लेखनाच्या अन्य कुठल्याही उपविभागापेक्षा 'जनातलं मनातलं' या सदरात त्यातील वैविध्यामुळे गुंतून गेलो. प्रसिद्धी तारखा आता लक्षात नाहीत त्यामुळे मनात (त्यातील लेखनशैलीमुळे, तसेच चांगल्या प्रतिसादांमुळे) राहिलेले लेख जसे आठवतील तसे देण्याचा प्रयत्न केल्यास, प्रकर्षाने आठवतात ते म्हणजे 'तीळ व त्यांचे अर्थ' ~ श्री.सोनार (प्रथम नाव विसरलो), 'चेतन भगतला अनावृत्त पत्र' ~ श्री.विनायक पाचलग, 'व्यभिचार : पाप आणि पुण्य?' ~ डॉ.श्रीराम दिवटे आणि खुद्द डॉनराव यांची "मिपा फूटबॉल टीम'. (थोडेसे अवांतर : टिकावूसोबत टाकाऊ लेखनाचाही ~ वा प्रकाराचा ~ काही सदस्य (नाव न घेता) उल्लेख करतात. पण मला वाटले ही बाब आपण काळावर सोडून द्यावी. सकस कोणते आणि निकस लिखाण कुठले हे कोणतेही निकष न लावतादेखील नजरेत येत असतेच. भाषा जशी समाजसापेक्ष वस्तू आहे तद्वतच लेखनदेखील मिपाकारांनी स्वीकृत केल्याशिवाय इथे अर्थपूर्ण होतच नाही. एखाद्या लेखाने १००+ प्रतिसाद खेचले म्हणजे तो 'अकादमी' पुरस्कार प्राप्तीचा झाला असे नाही; त्याच सूरात भाषेच्या महत्वाबाबतच्या लेखास दहापेक्षा कमी प्रतिसाद मिळाले म्हणजे त्याचे मूल्य नाही असेही मानू नये.)
  • Log in or register to post comments

आगरी विनोदी लेखन

धनंजय
Wed, 09/01/2010 - 02:16 नवीन
ब्रिटीश यांचे आगरी लेखन मजेदार असते. आवर्जून वाचतो.
  • Log in or register to post comments

मेलो मेलो

यशवंतकुलकर्णी
Wed, 09/01/2010 - 03:46 नवीन
http://www.misalpav.com/node/8554
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

मेले मेले

पैसा
Wed, 09/01/2010 - 19:44 नवीन
हा! हा! हा!हा! हा! हा!हा! हा! हा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशवंतकुलकर्णी

हुच्च कविता!!!

सुनील
Wed, 09/01/2010 - 02:52 नवीन
काही हुच्च कविता! (अद्याप अर्थ शोधतोय!) http://misalpav.com/node/7919 http://misalpav.com/node/9976 http://misalpav.com/node/9944 http://misalpav.com/node/12353 http://misalpav.com/node/9621 http://misalpav.com/node/10234 http://misalpav.com/node/8849 http://misalpav.com/node/7049 http://misalpav.com/node/8753
  • Log in or register to post comments

जवळपास सर्वांनीच यादी दिली

सुहास..
Wed, 09/01/2010 - 10:40 नवीन
जवळपास सर्वांनीच यादी दिली आहे .. मला जे आवडत ते ह्या लेखकांच सर्वकाही आणी कारणे १ ) ब्रिटीश (आगरी बोली आणी अतिशय वेगळे कधी विनोद तर कधी संवेदनशील लिखाण, ह्या दादुसच्या एका कविनेने मिपाकरांच्या अक्षरश डोळ्यातुन पाणी काढले होते.). २) मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला 'आपला अभीजीत' म्हणजे आपला अभिदा (शब्द-पाल्हाळ न लावता कमीत कमी शब्द योजनेत वाचकापर्यंत आपला निरोप वाचका पर्यंत कसा पोहोचवायचा हे अभिदा कडुन शिकावं, ह्या लेखकाचा एक लेख 'शेण कसे खावे' मला आवडतो.) ३)जागु (साध्या शब्दातल्या कविता लिहीण्यात हिचा हातखंडा आहे, पण जागुने दिलेली श्रावण-भाज्यांची मेजवानी केवळ मिपा नव्हे तर समस्त आंतरजालावर अप्रतिम.अश्या प्रकारच्या पाकृ पहिल्यांदाच आतंरजालावर पाहिल्या गेल्या.) ४) निखिल देशपांडे (हे सध्या संपादक झाले म्हणुन की काय लिखाण कमी झाले आहे बहुतेक, दोन घडीच्या प्रॅक्टीकल आणी ईमोशनल लाईफची सांगड घालत लिहीणारा लेखक) ५) श्रावण मोडक (का आवडते हे सांगायची बहुधा गरज नसावी.) ६) सगळ्यात महत्त्वाच नाव म्हणजे परिकथेतील राजकुमार (हा लेखक जितका टवाळ लिहु शकतो तितकच ताकदीच,सवेंदनशील आणी वेग-वेगळ्या विषयावर,जे जगाला माहीतही नसेल अस लिखाण करतो,करु शकतो.) ७) पुणेरी (वास्तवाशी परिचय करून देणारा लेखक.) अनिरुध्द अभ्यंकराच्या गजला,केसुगुर्जींची विडंबन,आमचे परममित्र पुण्याचे पेशवेंची विडबंनात्मक कविता,प्राजुच्या कविता,शिवाय क्लिंटन, नितीन थत्तें,ईन्दजदा.मराठमोळा,नुकतेच टिममध्ये शिरलेले 'पंडित गागाभट्ट' म्हजेच पंगाशेठ ह्याचे अभ्यासपुर्ण प्रतिसाद देखील आपल्याला आवडतात आणी तसच प्रतिसादाला पर्सनल टच देणारे, थोडेसे खोडी काढणारे धमाल मुलगा,छोटा डॉन ह्यांचे प्रतिसाद देखील मस्त असतात.
  • Log in or register to post comments

यादीत नाव पाहून आनंद झाला.

जागु
Wed, 09/01/2010 - 17:39 नवीन
यादीत नाव पाहून आनंद झाला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

मलाही येथील ब-याच लोकांचे

विसोबा खेचर
Wed, 09/01/2010 - 11:09 नवीन
मलाही येथील ब-याच लोकांचे लेखन आवडते.. रामदास, पिडा, संजोप, बिपिन, रंगा, नाना, धनंजय, ब्रिटिश, क्रान्ती, प्राजू, ..... नावं अनेक आहेत. अनवधानाने काही राहिली असल्यास क्षमस्व.. माझे लेखन आवडते असे ज्यांनी वर म्हटले आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.. तात्या.
  • Log in or register to post comments

छ्या.. ! ज्या मित्रांच्या

दशानन
Wed, 09/01/2010 - 12:06 नवीन
छ्या.. ! ज्या मित्रांच्या सांगण्यावरुन मी जवळ जवळ ३००+ लेख / कथा / कविता लिहल्या त्यांनाच माझे लेखन आवडत नाही की काय बॉ ??? काय रे मला असाच सगळ्यांनी प्रतिसाद देऊन चढवुन ठेवला होता की काय .. ऑ ! ** असो, येथे माझ्या सर्व लेखनाचे दुवे कसे द्यावेत हे माहित नाही म्हणून हा माझा दुवा.
  • Log in or register to post comments

३०० + ? काय हो तुम्हाला काही

शिल्पा ब
Wed, 09/01/2010 - 13:05 नवीन
३०० + ? काय हो तुम्हाला काही काम बीम नसतं का? म्हणजे पोटापाण्याचा उद्योग वगैरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

मिपावर रोज काही ना काही अवडेल

मनीषा
Wed, 09/01/2010 - 13:04 नवीन
मिपावर रोज काही ना काही अवडेल असे सापडतेच. मिपा ची तुलना दिवसांच्या सर्व प्रहरांशी केली तर .. कधी पहाटे सारख शांत, पवित्र, कधी सकाळच्या कोवळ्या उन्हासारखं अवखळ, थोडं हट्वादी, कधी मध्यान्ही सारखं प्रखर, तापलेलं, तर कधी संध्ये सारखं जाणतं, मग कधी पौर्णिमेच्या रात्री सारखं प्रेमात, स्वप्नात तर कधी अमावस्ये सारखं दु:खात , विरहात तळमळणारं ... मला मिपाची ही सर्वं रुपं आवडतात. क्रांतीच्या जवळ जवळ सगळ्या कविता आवडतात, प्राजु आणि जयवी च्याही कविता छान असतात. स्वाती दिनेश यांच्या पाककृती ही आवडतात (वाचायला) . आणि श्री रामदास, तात्या अभ्यंकर आणि जयंत कुलकर्णि यांचे लेखन
  • Log in or register to post comments

धन्यवाद !

जयंत कुलकर्णी
Wed, 09/01/2010 - 18:53 नवीन
चला ! कोणाला तरी आवडते माझे लेखन. :-) Not Bad !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

अजून काही

नंदन
Wed, 09/01/2010 - 13:51 नवीन
वरील प्रतिसादांत उल्लेख केलेल्या नावांव्यतिरिक्त क्लिंटन, प्रदीप, यशोधरा, विमुक्त आणि चिंतातुरजंतू यांचे लेखन आणि पांथस्थ व गणपाभौंच्या पाककृती/लेखन आवर्जून वाचावे असे. संगीतविषयक लेखनात तात्या आणि प्रदीप यांच्याबरोबरच बहुगुणी आणि डॉ. दाढे यांच्या प्रतिक्रिया/लेख दर्दी असतात. बाकी रामदास, गणपा आणि स्वातीताई यांच्या लेखन/पाकृवर प्रतिक्रिया द्यायला दर वेळी नवीन विशेषणं कुठून आणावी असा प्रश्न पडतो :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा