✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पुणेरी विक्षिप्तपणा!

इ
इंटरनेटस्नेही यांनी
Wed, 08/11/2010 - 03:08  ·  लेख
लेख
पुणेरी विक्षिप्तपणा _______________________________________________________ सदर लेख केवळ आपल्या मनोरंजनासाठी, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. _______________________________________________________ ही घटना 'मे २००७' मधली, या काळात मी 'चाणक्य मंडल परिवारचा एक अभ्यासक्रम' पूर्ण करण्यासाठी म्हणून पुण्यात सुमारे एक महिना वास्तव्याला होतो. सदाशिव पेठेतील एका विद्यार्थी गृहात मी आणि माझा मित्र राहत असताना आलेला हा एक गंमतीशीर अनुभव. *** (वार: रविवार, वेळ: सुमारे १४:२०) दुपारी काहीश्या उशिरानेच जाग आली आणि घड्याळात बघून दचकलो, अरे १४:२०? ओह माय गोड इट्स टू लेट... घाई घाईत आन्हिक उरकली आणि आता संध्याकाळ होई पर्यंत काहीतरी टीपी करू म्हणून जवळच्या सायबर ची वाट धरू म्हणून विचार केला. पण भूक लागली होतीच ना..तितक्यात आमच्या शेजारील रुम मधला विद्यार्थी म्हणाला आपला मालक आहे ना श्री. XXXX (या श्री. XXXX चे एक छोटेसे अल्पोपहारगृहपण आहे)तो एकदम उत्कृष्ट आम्लेट बनवतो.. यु मस्ट गिव इट अ ट्राय.. मी म्हटलं ठीकाय जाऊ त्यांच्याकडेच. *** (वेळ: 15:00) त्यांच्या रूम वर पहिल्या माळ्यावर गेलो. तेव्हा तर मालक झोपलेले असून ते १६:३० वाजता उठतील असे समजलं. *** (वेळ: १६:3०) मी पुन्हा त्यांच्या रूम वर पहिल्या माळ्यावर गेलो. तर मालक अजूनही झोपलेले असून ते आता आपल्या पुनः निर्धारित वेळेस म्हणजे १७:०० वाजता उठतील अस समजलं. *** (वेळ १७:००) मालक झोपेतून जागे आणि अस्मादिकांना खास पुण्याचं वैशिट्य असलेल्या शैलीत "काय पाहिजे?" म्हणून विचारते... आता पुढचा संवाद पहा: (इं: इंटरनेटप्रेमी, मा: मालक) इं: काका मला एक दोन आम्लेट हवी आहेत.. मा: ओ नीट काय ते सांगा एक का दोन? इं: दोन, दोन.. मा: बर कशाबरोबर खाणार पोळी का ब्रेड? इं: ब्रेड. मा: ठीक आहे, अर्ध्या तासाने या. इं: ठीक, पण काका मला जरा बाहेर जायचं आहे, लवकर नाही का मिळणार? ('मा' एक तुच्छता पूर्ण कटाक्ष टाकतात.) इं: ठीक आहे मग मी १७:३० वाजता येतो. मा: हम्म.. *** (वेळ: १८:00) भुकेने पोटात कावळे ओरडू लागले आणि आम्ही चला आता आम्लेट घेऊन येऊ आणि मस्त पैकी ब्रेड बरोबर हाणू अस विचार करून मालकांकडे रवाना. (वेळ: १८:१०) मा: हे घ्या आम्लेट तयार.. इं: छान , किती झाले पैसे? मा: २५ रु. इं: हे घ्या.. [मा', 'इं' कडुन पैसे घेतात, (आणि वाचकांना अतिशयोक्ती वाटेल, पण ते रु.१० च्या नोटांच्या खरेपणाची चाचणी देखील घेतात!) असो.] मा: ब्रेड कुठायत? 'इं' अवाक, मालकानेच ब्रेड आणार असे आश्वासन दिल्याने, अस्मादिकांनी ब्रेड आणलेच नव्हते! मा : अरे काय तुम्ही मुंबईकर? ब्रेड कुठायत..? मी तुम्हाला विचारलेल ना कशाबरोबर खाणार म्हणून? इं: मा, हो आणि मी तुम्हाला सांगितलेलं की ब्रेड बरोबर खाणार. मा: अरे मग आणायचे नाही का ब्रेड? तुम्ही मुंबईकर असेच बावळट! इं पुन्हा एकदा अवाक, खरतर तुम्हाला एखादी गोष्ट कशाबरोबर खाणार अस एखादा खाद्य सेवा पुरवठादार विचारतो, तेव्हा तोच ती वस्तू मुख्य वस्तू सोबत पुरवणार असाच त्याचा साधा सरळ अर्थ होतो. इथे मात्र 'मा' मात्र सरळ माझ्यावरच घसरले.. आणि शेवटी मलाच पायपीट करत जाऊन, ब्रेड आणून ते आम्लेट खावं लागलं! (एक्स पुणेकर)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15971 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

मला वाटलं होतं की

राजेश घासकडवी
Fri, 08/13/2010 - 14:44 नवीन
मला वाटलं होतं की चोप्य - चोप देण्यायोग्य पस्ते - बघ हं पस्तावशील असं काहीसं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

खल्लास!!!!

असुर
Fri, 08/13/2010 - 14:56 नवीन
>>>चोप्य - चोप देण्यायोग्य पस्ते - बघ हं पस्तावशील असं काहीसं...<<< खल्लास!!!! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अस्सल

हुप्प्या
Fri, 08/13/2010 - 16:46 नवीन
अस्सल पुणेरी. मानले बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

माझा प्रतिसाद (आभार आणि खुलासा)

इंटरनेटस्नेही
Sun, 08/15/2010 - 03:40 नवीन
काही व्यक्तिगत कामांत व्यस्त असल्याने मी थोडक्यात प्रतिक्रिया देतो. @ शेखर काळे, दीपक कासुरे, विश्वनाथ मेहंदळे, राजेश घासकडवी, बबलू, बेसनलाडू, वात्रट, गोगोल, विकास, चिंतामणी, अप्पाजोगळेकर, नगरीनिरंजन, प्रकाश घाटपांडे, मनि२७ संजयशिवाजीगडगे, हेमा, ३ _१४ विक्षिप्त आदिती आणि सर्व अनामिक वाचक, आपण माझ्या लेखाला आपुलकीने प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. ----------------------------------------------------------------------------------------- @ पाषाणभेद, विजुभाऊ, धनंजय बोरगावकर, असुर, केशसुमार, पंगा, सविता, साधासुधासौरभ, प्राजक्ताची फुले, मृत्युन्जय, मराठमोळा, दत्ता काळे, लिमाउजेट, परिकथेतील राजकुमार, सुहास.., हुप्या, पेन, आणि ते सर्व अनामिक वाचक त्यांच्या मनात अशा स्वरूपाच्या भावना आहेत. आपण /आपल्या पैकी काहींनी मांडलेल्या काही निवडक मुद्द्यांचा मी परामर्श घेतो: 1. हा लेख मी पुणेकरांवर टीका करण्यासाठी लिहिलेला नाही. प्रत्येक भारतीयाबद्दल मला सारखेच प्रेम आहे, आणि मला त्यांच्या संस्कृतीचा आदर आहे. 2. खरंतर, पुणे शहराशी आणि इथल्या मातीशी माझी भावनिक जवळीक आहे कारण पुणे हे विद्येचे माहेरघर असुन इथल्या 'चाणक्य मंडल परिवार' या भव्य आणि उदात्त हेतूने कार्य करणा-या संस्थेने माझे जीवन घडवले आहे. 3. सदर लेखाच्या सुरवातीला दिल्याप्रमाणे केवळ वाचकांचे मनोरंजन करणे हाच या लेखाचा एकमेव उद्देश आहे. 4. मी आदल्या रात्री सुमारे 03.30 वाजेपर्यंत अभ्यास करत असल्याने मला उशीरा पर्यंत (१४.२० पर्यंत) झोप लागली. 5. एकदा ऑर्डर दिल्या नंतर ती रद्द करणे मला योग्य वाटले नाही. त्यामुळे मालकांना गैरसोय झाली असती, किंवा तो पदार्थ वाया गेला असता, आपल्या देशात लोकसंख्येचा मोठा भाग अन्नाला मुकत असताना असे करणे मला योग्य वाटले नाही. 6. जेव्हा आपल्याला कोणत्याही अल्पोपहार गृहात ऑर्डर दिल्यानंतर विचारले जाते की, 'हा पदार्थ आपण कशाबरोबर खाणार?', तेव्हा आपण त्या प्रश्नाला उत्तर देतो आणि त्याला 'ठीक आहे' असे प्रत्युत्तर मिळते त्याचा अर्थ साहजिकच तो 'सोबतचा पदार्थ' देखील आपल्यला दिला जाईल असाच होतो. हे माझ्या लेखातील निम्नलिखित संवादातून स्पष्ट होते. : "मा: बर कशाबरोबर खाणार पोळी का ब्रेड? इं: ब्रेड. मा: ठीक आहे, अर्ध्या तासाने या." पण मालकाच्या वेंधळेपणाला, मीच काही गोष्टी गृहीत धरल्या असे म्हणून 'कव्हर' करण्याचा प्रयत्न अजिबात आवडला नाही. 7. १० रु. ची चाचणी घेतली; त्याबाबतीत माझे काही म्हणणे नाही. हे माझ्या 'असो' 'मधून स्पष्ट होते. 8. माझ्या माहिती प्रमाणे सदर ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची पाटी नव्हती. पण तरी देखील, आपण माझ्या लेखाला आपुलकीने प्रतिसाद दिल्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
  • Log in or register to post comments

धागा संपला म्हणायच का?

मी-सौरभ
Sun, 08/15/2010 - 23:06 नवीन
???
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

शिल्पा ब
Mon, 08/16/2010 - 01:54 नवीन
;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

प्रत्युत्तरे

इंटरनेटस्नेही
Mon, 08/16/2010 - 02:10 नवीन
@ मा. साधासुधासौरभ, धागा संपलेला नाही. पण मला अपेक्षित असे सर्व प्रकारचे प्रतिसाद आले आहेत. मी समाधानी आहे. :) @ मा. शिल्पा ब, मला आपल्या ;) चा अर्थ कळला नाही. @ वाचुन लुफ्त उठवणारे पण प्रतिसाद न देण्याचा मानभावीपणा करणारे सर्व सदस्य, मी आपला विशेष आभारी आहे. लोभ असावा. :)
  • Log in or register to post comments

शहाणे

कर्ण
गुरुवार, 08/19/2010 - 17:13 नवीन
पुणेकर महन्जे विहीरीतले शहाणे आहेत....
  • Log in or register to post comments

मस्तच्

लेखक
गुरुवार, 08/19/2010 - 17:37 नवीन
अनुभव मस्त आहे .... मला पन ओम्लेट खाव वतायल लागल अहे....काय करनार श्रावण चालु आहे.....!!!! मला पण असाच एक अनुभव आहे ...एकदा मी पुण्यातल्या एका दुकानात आण्डी आहेत का विचरले ....तर उत्तर काय मिलाव " हे दुकान शाकाहारी आहे ....!! "
  • Log in or register to post comments

अरे हे तर काहिच नाय, एकदा

मधुकर
गुरुवार, 08/19/2010 - 17:59 नवीन
अरे हे तर काहिच नाय, एकदा त्या चितळेच्या दुकानात जाऊन ये, मग कळेल पुणेरी प्रकार काय असतो तो. तुमच्याकडे पैसे व ईच्छा आहे म्हणुन तुम्ही विकत घेऊ शकत नाही (ईथे अर्थशास्त्राच्या नियमाला छेद देणार दुकान आहे ते चितळे म्हणजे) त्याला तुम्ही ग्राहक म्हणून आवडलात, त्याच्या नियमाचे पालन केलात व कसलिही कुरबुर न करता मान खालि घालुन दिलेलि वस्तु मुकाटयाने घेण्याची तयारी दाखविलात तरच तुम्हाला वस्तु मिळतील. ये है पुणे.
  • Log in or register to post comments

त्याला तुम्ही ग्राहक म्हणून

मृत्युन्जय
गुरुवार, 08/19/2010 - 18:32 नवीन
त्याला तुम्ही ग्राहक म्हणून आवडलात, त्याच्या नियमाचे पालन केलात व कसलिही कुरबुर न करता मान खालि घालुन दिलेलि वस्तु मुकाटयाने घेण्याची तयारी दाखविलात तरच तुम्हाला वस्तु मिळतील. म्हणजे नक्की काय करतात हो चितळे? माझ्या डोळ्यासमोर एकदम फुल्ल बाह्यांचा पांढराशुभ्र बनियान घातलेला जान्हवेधारी चष्मीश म्हातारा आला की जो दारात उभा राहुन आत येणार्‍या माणसाला नखशिखांत न्याहाळतो. आणि माणुस आवडला तर टीक करुन आत पाठवतो नाहीतर बाहेर रांगेत उभे करतो (इथे माझ्या डोळ्यासमोर असहाय्यपणे चेहेरा पाडुन उभे असलेले पुणेकर आले. त्यांच्या चेहेर्‍यावर एकुणच खुप दीन भाव असतो. आणि ते सारखे त्या म्हातार्‍याला "ओ मालक जाउ द्यात की आत. खुप दिवसात बाकरवडी खाल्लेली नाही आहे. घेउ द्यात की अर्धा छटाक" असे म्हणत असतात. चाणाक्ष नॉन पुणेरी वाचकांना ध्यानात आले असेलच की ग्राहक पुणेकर असल्यामुळे त्याची अर्धा छटाक पेक्षा जास्त बाकरवडी घ्यायची एकुण लायकी नसणारच. तर असो. खुप अवांतर झाले). त्यानंतर आत पाट्यांच्या जंजाळातुन वाट काढत (जे आत प्रवेश मिळण्यात सुदैवी ठरलेले असतात त्यांनाच फक्त) पाट्या वाचत वाचत आत जावे लागते. आत अजुन एक तस्साच म्हातारा असतो. तो परीक्षा घेतो की सगळे नियम (पाट्यांवर लिहिलेले) पाठ आहेत की नाही ते बघतो. त्यानंतर एक लेखी परिक्षा द्यावी लागते आणि पाटीवर (ग्राहकाने स्वतः आणलेल्या) मी चितळ्यांच्या नियमांचे पालन करेन असे १०० वेळा लिहावे लागते. एव्हढी सगळी दिव्ये पार केल्यावर काउंटरवरचा माणुस वस्सकन ओरडुन मान खाली घालायला सांगतो. आणि मग (मान खाली घातली गेली असेल तर) ग्राहकापुढे त्याला जी आवडेल ती वस्तु ठेवतो. ग्राहकाने जर बाकरवडीच हवी किंवा चिवडाच हवा असा आग्रह धरला तर परत एकदा वस्सकन ओरडतो " जे देतो आहे ते घ्यायचे असेल तर घ्या नाहीतर बाहेर व्हा आधी. वेळ वाया घालवु नका. बाहेर बरीच लोक वाट बघताहेत आम्ही जे देउ ते घेण्यासाठी" आणि मग ग्राहकाने ती वस्तु घेतली तर (घेतली तर म्हणजे काय घ्यावीच लागते न घेउन सांगतो कोणाला. पुढच्या वेळेस हे ही मिळायचे नाही) कॅश काउंटरवरचा माणुस प्रत्येक नोट आणि प्रत्येक नाणे सुर्यप्रकाशात धरुन ३ वेळा चाचपुन बघतो आणि मगच ग्राहकाला बाहेर पडायची परवानगी मिळते. असेच होत असेल नाही का हो? तर्‍हेवाईकच शिंचे हे पुणेकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुकर

एक बौध्दीक.. वरील प्रतिसादात

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 08/19/2010 - 18:35 नवीन
एक बौध्दीक.. वरील प्रतिसादात एकुण किती कंस आहेत. (दाढी खाजवणारी स्माईली.) - (नीरबुध्द) योगेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सगळे पुणेकर "कंस"च असता हो.

मृत्युन्जय
गुरुवार, 08/19/2010 - 18:39 नवीन
सगळे पुणेकर "कंस"च असतात हो. कृष्ण नाहीच कोणी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

पेटलायस तू! चितळ्यांच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/19/2010 - 23:59 नवीन
पेटलायस तू! चितळ्यांच्या डेक्कनच्या दुकानातली सेवा आणि सिस्टम मलातरी जाम आवडली. (अ-पुणेरी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

हॅहॅहॅहॅहॅहॅ ... हे आपले

मृत्युन्जय
Fri, 08/20/2010 - 00:33 नवीन
हॅहॅहॅहॅहॅहॅ ... हे आपले असेच कधीतरी. पु लं नी म्हणले आहे ना पुणेकर होण्यासाठी पुण्याचा जाज्वल्य अभिमान असणे गरजेचे आहे म्हणुन. त्याचा प्रताप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मी चितळ्यांच्या नियमांचे पालन

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/19/2010 - 18:33 नवीन
मी चितळ्यांच्या नियमांचे पालन करेन असे १०० वेळा लिहावे लागते.
'चि' पहिली का दुसरी ह्याचा विचार करण्यात वेळ घालवला तर ऑन द स्पॉट त्या माणसावर ६ महिन्यांची बंदीपण आणतात म्हणे. महा नाठाळ हे पुणेकर. मला तर कधी कोणी पुण्यात येऊ का विचारले तर मी सरळ सांगतो "*** जा ! पण पुण्यात येउ नका."
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा