नाचत नाचत येई मयुरा
नाचत नाचत येई मयुरा
वर्षा आली फुलव पिसारा ||धृ||
मेघ वाजती धडधडधड धुम
थेंब जलाचे पडती सरसून
साथ देई घोंगावत वारा
नाचत नाचत येई मयुरा ||१||
रान अवघे हिरवे होईल
पिसार्यापरी सारे फुलवील
आनंदूनी नाचवी डोई तुरा
नाचत नाचत येई मयुरा ||२||
लयीत पावले तूझी टाकूनी
डौलाने बघ मान उंचाउनी
सुर केकाउनी कर पुकारा
नाचत नाचत येई मयुरा ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०८/२०१०
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1460
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी
छान कल्पना ! ! !
सहमत
In reply to छान कल्पना ! ! ! by निरन्जन वहालेकर
मस्त.....