Skip to main content

नाचत नाचत येई मयुरा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/08/2010 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
नाचत नाचत येई मयुरा नाचत नाचत येई मयुरा वर्षा आली फुलव पिसारा ||धृ|| मेघ वाजती धडधडधड धुम थेंब जलाचे पडती सरसून साथ देई घोंगावत वारा नाचत नाचत येई मयुरा ||१|| रान अवघे हिरवे होईल पिसार्‍यापरी सारे फुलवील आनंदूनी नाचवी डोई तुरा नाचत नाचत येई मयुरा ||२|| लयीत पावले तूझी टाकूनी डौलाने बघ मान उंचाउनी सुर केकाउनी कर पुकारा नाचत नाचत येई मयुरा ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १२/०८/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1460
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

छान कल्पना ! ! ! पन्डित रामदास कामत ह्यान्च्या " मयुरा s s s रे फुलवित ये रे पिसारा " ची आठवण झाली

कविता छान आहे. आवडली.