Skip to main content

नाचत नाचत येई मयुरा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/08/2010 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
नाचत नाचत येई मयुरा
नाचत नाचत येई मयुरा
वर्षा आली फुलव पिसारा ||धृ||

मेघ वाजती धडधडधड धुम
थेंब जलाचे पडती सरसून
साथ देई घोंगावत वारा
नाचत नाचत येई मयुरा ||१||

रान अवघे हिरवे होईल
पिसार्‍यापरी सारे फुलवील
आनंदूनी नाचवी डोई तुरा
नाचत नाचत येई मयुरा ||२||

लयीत पावले तूझी टाकूनी
डौलाने बघ मान उंचाउनी
सुर केकाउनी कर पुकारा
नाचत नाचत येई मयुरा ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०८/२०१०

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1492
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

छान कल्पना ! ! !
पन्डित रामदास कामत ह्यान्च्या " मयुरा s s s रे फुलवित ये रे पिसारा " ची आठवण झाली