काश्मिर आणि लेह
लेहच्या नैसर्गिक उत्पाताची माहीती एवाना सगळ्यांना झाली असेलच. हा उत्पात अतिशय भयंकर होता व अजूनही म्हणावी तशी मदत पोचलेली नाही. तरीही सगळा भारत लेह-लडाख मधील दु:खितांच्या जखमांवर आपापल्यापरीने फुंकर घालु पाहत आहे. महाराष्ट्रासकट अनेक राज्यांना मदत देऊ केली आहे. शिवाय जम्मूकाश्मिर राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय प्रशासनातील काही लोक, खासदार जातीने पाहणी करून गेले आहेत. लेखमधील परिस्थिती आटोक्यात येवो व दु:खितांना हा आघात सोसण्याचे बळ मिळो हीच सदिच्छा माझी व अख्ख्या भारताची आहे.
यानिमित्ताने भारताच्या अजून एका अविभाज्य भागाची आठवण झाली - काश्मिर. गेले काही दिवस काश्मिरमधील सामाजिक परिस्थिती बिघडली आहेच. पण त्याच बरोबर निसर्गानेही थैमान घातले आहे. नद्यांना मोठाले पूर आहेत, भुस्खलन मोठ्याप्रमाणावर चालु आहे, अतिवृष्टीने काश्मिरलाही आपल्या जाळ्यात ओढले आहे. मात्र ह्या भारतीय बांधवांचे नशीब त्यांच राज्यातील लेख/लडाख मधील नागरीकांसारखे नाही. त्यांच्यासोबत आहेत केवळ सैन्यदलाचे जवान. अगदी मुख्यमंत्री, खासदार, विरोधी पक्षनेते कोणालाच काश्मिर विषयी काळजी वाटत नाही का? काश्मिर मधील जनता ही भारतीय आहे पण त्यांना भारतीयांसारखे वागवले जाते आहे का? त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना मुख्य धारेतील राज्यांना दिली जाते तद्वत वागणूक मिळते आहे का? जर भारतीय जनता, भारत सरकार त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणार असेल आणि तरीही त्यांनी आम्ही भारताचा भाग आहोत म्हणावे अशी अपेक्षा ठेवणे कितपत योग्य वाटते?
पुन्हा नमुद करतो लेख लडाख किंवा इतर कुठेही दिलेली मदत हे योग्य पाऊल आहेच आहे. इथे ते उदा. घेतले कारण फरक अगदी डोळ्यासमोर आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ते भारतीयच आहेत
स्वतः कांय अनुभवलंय...?
सगळी चर्चा नुसती विडीओ, फोटो,
लेह
सहमत.......
एक महत्वाचा प्रश्न
+१ , आत्तापर्यंत वाचलेल्या
रेडियो
काश्मीर मधुन हिंदु पळत
हाच
+१
....
:(
एक बातमी
गैरसमज नसावा
धन्यवाद
मुळात ही पुरपरिस्थिती
अवांतर - अनुभव
कायद्याच्या भाषेत येथील
काही खरे नाही हो आजकाल....
ढग फुटी नसून तो " बादल बंम
काश्मीर
काश्मीर?
थोडे स्पष्टीकरण
अधिक स्पष्टीकरण