Skip to main content

कराचीच्या 'डॉन'ने प्रसिद्ध केलेले माझे पत्र

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 07/08/2010 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
कराचीच्या 'डॉन'ने प्रसिद्ध केलेले माझे पत्र 'मिपा'करांनो, कराचीहून प्रकाशित होणार्‍या 'डॉन' या आंग्ल वृत्तपत्राला मी एक पत्र पाठविले होते. साधारणपणे टीकात्मक पत्रे छापली जात नाहींत, पण या पत्राला हिरवा झेंडा मिळाला. मूळ संपादकीयाचे आणि माझ्या पत्राचे दुवे दिले आहेत आणि मजकूर स्पष्ट असल्यामुळे कांहीं अवांतर किंवा अधिक लिहिण्याचे टाळले आहे. मूळ संपादकीयः http://tinyurl.com/23k6h5l किंवा http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newsp… माझे प्रकाशित झालेले पत्र (कांहीं भाग 'डॉन'ने कापला आहे): http://tinyurl.com/34ctdhs किंवा http://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newsp… धन्यवाद, सुधीर काळे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3976
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

अभिनंदन. अवांतारः मला वाटले कास्कराच्या कार्ट्याने छापलय का काय पत्र. :)

पत्र ठीक आहे. साधारणपणे टीकात्मक पत्रे छापली जात नाहींत हे खरे नाही. मी डॉनमध्ये अशी अनेक टीकात्मक पत्रे वाचली आहेत. अवांतर - पाकिस्तानी वृत्तपत्रांतून अनेक भारतीयांची पत्रे वेळोवेळी पसिद्ध होत असतात परंतु मी आजपावेतो एकाही भारतीय वृत्तपत्रात कुणा पाकिस्तानी व्यक्तीचे पत्र वाचल्याचे आठवत नाही. याचा अर्थ पाकिस्तानी येथे पत्रेच पाठवीत नाहीत की काय?

In reply to by सुनील

हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. पण दोन शब्द महत्वाचे आहेत. एक "साधारणपणे" आणि दुसरा न लिहिलेला शब्द "भारतीयांची". अजीबात छापली जात नाहींत असे नाहीं पण फारच क्वचित. तसेच टीकात्मक पत्रे बरीचशी बाहेरदेशी रहाणार्‍या पाकिस्तानी नागरि़कांची असतात. (हाही माझा वैयक्तिक अनुभव आहे.)

कराचीच्या 'डॉन'ने प्रसिद्ध केलेले माझे पत्र
'चोता दोन'बद्दल ऐकले होते. हा 'कराचीचा दोन' कोण? (कृ. हा प्रतिसाद सर्वांनी ह. घ्या. हे वे. सां. न ल.) असो. आता थोडे गभीरपणे:
साधारणपणे टीकात्मक पत्रे छापली जात नाहींत,
हे खरे नाही. नेमके उदाहरण देता येणार नाही, पण अनेकदा अशी पत्रे पाहिल्याचे आठवते.
पण या पत्राला हिरवा झेंडा मिळाला.
यातील 'हिरवा झेंडा' या शब्दांमधील श्लेष अपेक्षित आहे की अपघाती? कृ. खुलासा व्हावा. (अपेक्षित असल्यास आवडलेला नाही, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.) असो. 'डॉन'मान्यतेच्या शिक्कामोर्तबाबद्दल अभिनंदन.

In reply to by पंगा

साधारणपणे टीकात्मक पत्रे छापली जात नाहींत ह्यामधे 'माझी' हा शब्द टाकायला काळे विसरले असतील. समजून घ्या ना :)

In reply to by पंगा

नाही! टीका नसलेली माझी पत्रे फट्कन छापून आली आहेत. टीकात्मकही आली आहेत पण प्रमाण फारच थोडे.

In reply to by पंगा

अगदी अपघाती! तुमचा उल्लेख वाचेपर्यंत माझी 'ट्यूब पेटली नव्हती'.

सर तुम्ही धन्य आहात ! _/\_ (सुधीरकाकांचा पंखा) अर्धवटराव

डॉन सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रात प्रतिक्रिया छापून आल्याबद्दल अभिनंदन.'whistle blowers' ची गरज पाकिस्तान आणि भारत ,दोघानाही आहे असे वाटते.भारतापुरते बोलायचे तर मिडिया,पत्रकार (सर्वच नाही!!) ईतर दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या तुलनेत चांगले काम करत आहेत असे म्हणता येइल का?गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराची गंभीर प्रकरणे(बोफोर्स्,तेहलका,सध्या चर्चेत असलेली कॉमन्वेल्थ मधली खाबूगिरी) पत्रकारांमुळे/मिडियामुळे बाहेर आली ही चांगली गोष्ट आहे. ---

आता या पत्रावर आधारित एक लेख ई-सकाळच्या पैलतीरवर पाठवायचा विचार आहे. तो लिहून झाल्यावर अवलिया-जींच्या फर्माइशीनुसार इथे नक्कीच पोस्ट करेन. पत्रातील कमी महत्वाच्या शब्दांबद्दल/ओळींबद्दल खूपच उलट-सुलट चर्चा झाली पण मजकुराबद्दल मात्र जवळ-जवळ नाहींच. साधारणपणे 'मिपा'वर प्रगल्भ वाचन असणार्‍यांचे उच्च प्रतीचे प्रतिसाद येतात व त्याचा फायदा मी 'सकाळ'च्या लेखांत वापरतो. यावेळी मात्र असा उच्च प्रतीचा प्रतिसाद आला नाहीं. त्याऐवजी शब्दच्छलच जास्त झाला. क्षमस्व. सुधीर

आव ते सगळ विग्रजित व्हत तुमि म्हराठीत लिवा मग येतिल परतिसाद !