कराचीच्या 'डॉन'ने प्रसिद्ध केलेले माझे पत्र
'मिपा'करांनो,
कराचीहून प्रकाशित होणार्या 'डॉन' या आंग्ल वृत्तपत्राला मी एक पत्र पाठविले होते. साधारणपणे टीकात्मक पत्रे छापली जात नाहींत, पण या पत्राला हिरवा झेंडा मिळाला.
मूळ संपादकीयाचे आणि माझ्या पत्राचे दुवे दिले आहेत आणि मजकूर स्पष्ट असल्यामुळे कांहीं अवांतर किंवा अधिक लिहिण्याचे टाळले आहे.
मूळ संपादकीयः https://tinyurl.com/23k6h5l किंवा
https://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-news…
माझे प्रकाशित झालेले पत्र (कांहीं भाग 'डॉन'ने कापला आहे): https://tinyurl.com/34ctdhs किंवा https://www.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-news…
धन्यवाद,
सुधीर काळे
वाचने
4033
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन हो काकानु पण तिथे
अभिनंदन हो काकानु :)
पण तिथे 'K.B. KALE Jakarta' असे दिले आहे :) K = ??
अरे वा वा
अभिनंदन.
अवांतारः मला वाटले कास्कराच्या कार्ट्याने छापलय का काय पत्र. :)
छाण! हबिणंद्ण!
छाण! हबिणंद्ण!
अभिनंदन काळे काका...
अभिनंदन काळे काका... :)
ठीक
पत्र ठीक आहे.
साधारणपणे टीकात्मक पत्रे छापली जात नाहींत
हे खरे नाही. मी डॉनमध्ये अशी अनेक टीकात्मक पत्रे वाचली आहेत.
अवांतर - पाकिस्तानी वृत्तपत्रांतून अनेक भारतीयांची पत्रे वेळोवेळी पसिद्ध होत असतात परंतु मी आजपावेतो एकाही भारतीय वृत्तपत्रात कुणा पाकिस्तानी व्यक्तीचे पत्र वाचल्याचे आठवत नाही. याचा अर्थ पाकिस्तानी येथे पत्रेच पाठवीत नाहीत की काय?
हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
In reply to ठीक by सुनील
हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. पण दोन शब्द महत्वाचे आहेत. एक "साधारणपणे" आणि दुसरा न लिहिलेला शब्द "भारतीयांची".
अजीबात छापली जात नाहींत असे नाहीं पण फारच क्वचित. तसेच टीकात्मक पत्रे बरीचशी बाहेरदेशी रहाणार्या पाकिस्तानी नागरि़कांची असतात. (हाही माझा वैयक्तिक अनुभव आहे.)
डॉन???
'चोता दोन'बद्दल ऐकले होते. हा 'कराचीचा दोन' कोण? (कृ. हा प्रतिसाद सर्वांनी ह. घ्या. हे वे. सां. न ल.)
असो. आता थोडे गभीरपणे:
हे खरे नाही. नेमके उदाहरण देता येणार नाही, पण अनेकदा अशी पत्रे पाहिल्याचे आठवते.
यातील 'हिरवा झेंडा' या शब्दांमधील श्लेष अपेक्षित आहे की अपघाती? कृ. खुलासा व्हावा. (अपेक्षित असल्यास आवडलेला नाही, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.)
असो. 'डॉन'मान्यतेच्या शिक्कामोर्तबाबद्दल अभिनंदन.
साधारणपणे टीकात्मक पत्रे
In reply to डॉन??? by पंगा
साधारणपणे टीकात्मक पत्रे छापली जात नाहींत ह्यामधे 'माझी' हा शब्द टाकायला काळे विसरले असतील. समजून घ्या ना :)
त्याचबरोबर...
In reply to साधारणपणे टीकात्मक पत्रे by आमोद शिंदे
...'टीकात्मक' हा शब्द (चुकून) जास्तीचा पडला असावा काय?
शक्य आहे! तसाच 'डॉन' हा
In reply to त्याचबरोबर... by पंगा
शक्य आहे! तसाच 'डॉन' हा शब्दही दर वेळेस बदलता असावा.
नाही! टीका नसलेली माझी पत्रे फट्कन चापून आली आहेत.
In reply to त्याचबरोबर... by पंगा
नाही! टीका नसलेली माझी पत्रे फट्कन छापून आली आहेत. टीकात्मकही आली आहेत पण प्रमाण फारच थोडे.
विसरलेला शब्द?
In reply to साधारणपणे टीकात्मक पत्रे by आमोद शिंदे
मी वैयक्तिक अनुभवावरून लिहिले होते. पण एरवीही कांहींफार प्रमाणात माझे म्हणणे बरोबर असावे.
अगदी अपघाती!
In reply to डॉन??? by पंगा
अगदी अपघाती! तुमचा उल्लेख वाचेपर्यंत माझी 'ट्यूब पेटली नव्हती'.
जय हो !!
सर तुम्ही धन्य आहात !
_/\_
(सुधीरकाकांचा पंखा) अर्धवटराव
अभिनंदन
डॉन सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रात प्रतिक्रिया छापून आल्याबद्दल अभिनंदन.'whistle blowers' ची गरज पाकिस्तान आणि भारत ,दोघानाही आहे असे वाटते.भारतापुरते बोलायचे तर मिडिया,पत्रकार (सर्वच नाही!!) ईतर दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या तुलनेत चांगले काम करत आहेत असे म्हणता येइल का?गेल्या काही वर्षात भ्रष्टाचाराची गंभीर प्रकरणे(बोफोर्स्,तेहलका,सध्या चर्चेत असलेली कॉमन्वेल्थ मधली खाबूगिरी) पत्रकारांमुळे/मिडियामुळे बाहेर आली ही चांगली गोष्ट आहे.
---
इंग्रजी समजत नाही
इंग्रजी समजत नाही
पत्र कसे वाटले याबद्दल कुणीच कांहीं लिहिले नाहींय्!
पत्र कसे वाटले याबद्दल कुणीच कांहीं लिहिले नाहींय्!
लिहून झाल्यावर अवलियांच्या फर्माइशीनुसार इथे नक्कीच पोस्ट करेन
आता या पत्रावर आधारित एक लेख ई-सकाळच्या पैलतीरवर पाठवायचा विचार आहे. तो लिहून झाल्यावर अवलिया-जींच्या फर्माइशीनुसार इथे नक्कीच पोस्ट करेन.
पत्रातील कमी महत्वाच्या शब्दांबद्दल/ओळींबद्दल खूपच उलट-सुलट चर्चा झाली पण मजकुराबद्दल मात्र जवळ-जवळ नाहींच.
साधारणपणे 'मिपा'वर प्रगल्भ वाचन असणार्यांचे उच्च प्रतीचे प्रतिसाद येतात व त्याचा फायदा मी 'सकाळ'च्या लेखांत वापरतो. यावेळी मात्र असा उच्च प्रतीचा प्रतिसाद आला नाहीं. त्याऐवजी शब्दच्छलच जास्त झाला.
क्षमस्व.
सुधीर
????
आव ते सगळ विग्रजित व्हत तुमि म्हराठीत लिवा मग येतिल परतिसाद !
सकाळसाठी लिहिला कीं लावेन इथे.
जगतापसाहेब,
सकाळसाठी लिहिला कीं लावेन इथे.
काळे