खरंच मला तरी सगळा स्वयंपाक येतो बुवा... पुरणपोळी सोडुन... आणी हो आमच्याकडे आठवड्यातुन ३ दिवस खिचडी असते.. पण इथे एक जागतीक सत्य अनुभवास आले... ( कुठले ते विचारु नका, आमचा पण सुजय कुलकर्णी होईल)
आणी हो आमच्याकडे आठवड्यातुन ३ दिवस खिचडी
खिचडी तुम्ही करता की तुमची बायको करते?
बायको करत असेल तर ती आय टी मध्ये आहे का?
आय टी मध्ये नसेल तर तिने खिचडी करणे योग्य आहे का?
ज्या दिवशी खिचडी नसते त्या दिवशी स्वयंपाक तुम्ही करता की बायको करते?
स्वयंपाक बायको करते तेंव्हा तुम्ही घरी जेवता का की स्वतः वेगळा स्वयंपाक करुन खाता?
बायको आय टी मध्ये नसेल तर आय टी मधली असली असती तर बरे झाले असते, खिचडी खाण्यापेक्षा होटेलातील बिर्याणी खाता आली असती असे मनात येते क?
लेखकाशी अंशतः सहमत! पुरुषांनी कितीही झक मारली तरी आईचा, बहिणीचा, पत्नीचा प्रेमामृत वर्षाव झालेले अन्न .. अहाहा!! त्याची चवच वेगळी.. आपल्याकडे शिजवण्यापेक्षा त्याच्या मागच्या भावनांना जास्त महत्व आहे.
केवळ IT मध्ये काम करतात म्हणुन, सकाळ संध्याकाळ पिझ्झा, पावाचे तुकडे, सिरियल, नुडल आणि काय काय पाश्चात्य पदार्थ न रांधता, साजुक तुपातला शिरा केला तर बिघडत नाही.
पण म्हणुन स्त्रियांनीच राबायचे हे मात्र चुकच,, IT मध्ये कामाच्या नावाखाली शिमगा असतो हे मान्य आहे (IT वालाच मी) पण बाकीचे ताप कमी नसतात.. त्यामुळे मानसिक थकवा जस्त येतो. हे पन लक्षात घ्या!
स्वयंपाक = स्वतः शिजविलेले, इथे लिंग भेद कुठे आला?
कधी तुम्ही करा, कधी तिला करुदेत, कधी दोघे मिळुन करा.. पण हे सगळं पण चार भिंतींच्या आत, बाहेर सावळा गोंधळ कशाला?
प्रतिक्रिया
मी या लेखकाची पंखा झालेय...
वा वा
आणी हो आमच्याकडे आठवड्यातुन ३
उम्म्म
बरोबर
एक चांगला विनोदी लेख
बायकोबी पायजे सुंदरबी
मजा येतेय..