मस्तं लेख रे.. आवडेश. स्वैपाक बायकोला यायलाच हवा अशा मताचा मीही आहे.
(४थ्या शतकातला) पेशवे
मला स्वतःला चांगला स्वैपाक येतो पण बायको चांगला स्वैपाक करणारीच बघेन. सगळं स्वतःच्याच हातानं करायचं तर बायको पाहीजेच कशाला. ;)
(आपला हात जगन्नाथ वाला)पेशवे
बाकी लेखनशैली मस्तं खुसखुशीत आहे. काही काही निरीक्षणं तर मस्तंच.
(वाचक) पेशवे
आता १००+ कडे वाटचाल पक्की. आणि धागा प्रवर्तकही प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन तेल ओतत आहेतच.
पुण्याचे पेशवे , प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद....!! :-)
तुमचीही माझ्यासारखीच मते असल्याचे वाचून आनंद झाला....! :-) मुलीना "किमान" , बर्यापैकी स्वयंपाक यायलाच हवा...त्यात अजिबात तडजोड नाही किंवा "स्वयंपाक न येण्याची " मुलींची कुठलीही कारणे खपवून घेतली जाऊ नयेत...!! ( अपवादात्मक कारणे अगदी थोडीच...)
"सगळं स्वतःच्याच हातानं करायचं तर बायको पाहीजेच कशाला. " ह्या मताशी मात्र मी तुझ्याशी सहमत नाही मित्रा....!! :-)
पुप्या.. विचार कर तु काय लिहिलयस.. आणि ते कशासाठी वापरलं जातय त्याचा..
असो.. सुजय.. तुमचं लग्न झालं आहे का?.. तुमच्या बायकोला शुभेच्छा.. नसेल झालं तर तुम्हाला शुभेच्छा..
अर्धवटराव ,
लेख वाचल्याबद्दल धन्यवाद...!
माझे लग्न झालेले नाही....थोडातरी स्वयंपाक येणारी मुलगी मिळावी हि छोटीशी अपेक्षा आहे...!!
शुभेच्छा दिल्याबद्दल आणखी एकदा धन्यवाद...! :-)
तुमची हि खरड स्वानुभव आहे की तुमच्या सारख्या च तुमच्या मित्र मंडळीन चा अनुभव आहे.....? इतरांच्या अनुभवा नी लिहिलेली जर हि मुक्ताफळे असतील तर ती अत्यंत चुकी ची आहे.आणि स्वानुभवा वरून असतील तर तो तुमच्या अनुभवाचा भाग आहे .... या अनुभवा वरून तमाम IT क्षेत्रातल्या बायकांबद्दल घाणेरडे मत प्रदर्शित करणे योग्य नाही ..... हा अनुभव तुम्हाला किंवा तुमच्या मित्र मंडळीना इतर क्षेत्रातल्या मुलींकडून हि येऊ शकतो....!
...... तुमची हि मते निव्वळ न पटण्याजोगी आहेत,,,
तुमच्या पत्नीला शुभेच्छा ......आणि सहानुभूती सुद्धा..
तुमचा हा लेख तुम्ही गंमत म्हणून लिहिला असेल आणि ही तुमची खरोखरची मतं नसतील असं गृहित धरतो आहे.
तसे असल्यास, ठीक आहे लेख.
तसे नसल्यास, एक आयटीतली मुलगी वाचली बिचारी.
सुंदर लेख...
वरच्या प्रतिसादातील बायकांचे प्रतिसाद वाचून खूपच करमणूक झाली. म्हणजे लेखातील मुद्दे नक्कीच खरे दिसतात. नाहीतर इतक्या मिरच्या झोंबल्या नसत्या :) यांच्या नवर्यांची कीव येते. हे म्हणजे "सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही" असे अवघड जागेचे दुखणे आहे. बिचार्या या नवर्यांना माझी सहानुभूती आहे.
याउप्पर या लेखावरून कोल्हापूरकरांवर उगीचच चिखलफेक करणे हे तर वैचारीक दिवाळखोरीचे लक्षण आहे.
लेखाचा मुद्दा हा आहे कि सर्वांना किमान स्वयंपाक करता यावा. ते सोडून काही सभासद उगीच त्रागा करताना दिसतात. मजा आहे.. चालू द्या.. सुजयराव आणखी येउ द्या...
वरच्या प्रतिसादातील बायकांचे प्रतिसाद वाचून खूपच करमणूक झाली. म्हणजे लेखातील मुद्दे नक्कीच खरे दिसतात. नाहीतर इतक्या मिरच्या झोंबल्या नसत्या यांच्या नवर्यांची कीव येते. हे म्हणजे "सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही" असे अवघड जागेचे दुखणे आहे. बिचार्या या नवर्यांना माझी सहानुभूती आहे.
सहमत, सहमत, सहमत!!!!!
लेखकाच्या विचाराशी सहमत..
आत्तापर्यंत जितक्या IT क्षेत्रातील मुली पाहिल्या त्या लेखकाने वर्णन केल्याप्रमाणेच निघाल्या..काही येत नसते पण बडबड मात्र फार..दुसर्यांना सल्ले देण्यास आणि खाणे चांगले झाले तर फुकट credit घेण्यास मात्र पुढे पुढे..
याउप्पर या लेखावरून कोल्हापूरकरांवर उगीचच चिखलफेक करणे हे तर वैचारीक दिवाळखोरीचे लक्षण आहे..
सहमत..
लोकप्रियता मिळवण्याचा सवंग प्रकार.......
लेखात लिहीलेय लग्न झालेय.... प्रतिक्रियेत लिहिलंय.... व्हायचंय....
हा प्रश्न उपस्थित करणा-या प्रतिक्रियेवर काही प्रतिसाद नाही....
वादग्रस्त विषय सुरू करून द्यायचे आणि मग बाजूला झाडावर बसून गंमत बसायची...
मला अंमळ गंमत वाटते.... की लोक (विशेषतः स्त्रिया) त्वेषाने प्रतिक्रिया का देत आहेत?
समजा असेलच हा प्राणी त्याच्या लेखावरून वाटतो तसा ढुढ्ढाचार्य... तर असल्या लोकांकडे दुर्लक्ष करा..... हे तळमळणारे आत्मे आहेत..या जन्मी बदलणार नाहीत....... आणि फक्त प्रसिद्धी साठी असले प्रकार करत असेल....तरी पण दुर्लक्षच करा ...... त्यापेक्षा जास्त काही नाही
-सविता.
मी इथे केवळ वाचनमात्र असते. परंतु हा लेख आणि त्यावरचे काहींचे बिनबुडाचे प्रतिसाद वाचून राहवले नाही.
तुम्हाला नक्की त्रास कशाचा झालाय. लेखात लिहिलेली दुर्दैवाने का होईना पण वस्तुस्थिती आहे म्हणून का या लेखाला प्रसिद्धी मिळती आहे म्हणून.
लेखकाने कुठेही लिहिलेले नाही कि हे त्याचे आत्मचरित्र आहे. तरीही त्याचे लग्न झाले आहे का नाही याच्यात तुम्हाला फार मोठा point दिसतो आहे.
प्रतिसाद वाचून लोकांची करमणूक होत आहेच आणि आपण पण सिद्ध करत आहोत कि बायकांना विनोदबुद्धी खरच कमी असते.
लेखकाने लेख विनोदी आहे असा डिस्कलेमर टाकलेला नव्ह्ता...
आणी ही साईट फक्त विनोदी लेखांना वाहिलेली आहे हे ही वाचकांना माहिती न्व्हतं म्हणून असावं हो बहुतेक.... :D
<<तुम्हाला नक्की त्रास कशाचा झालाय. लेखात लिहिलेली दुर्दैवाने का होईना पण वस्तुस्थिती आहे म्हणून का या लेखाला प्रसिद्धी मिळती आहे म्हणून.
प्रसिद्ध होण्यासाठी ते सत्यच असले पाहिजे हि अट नवीनच ऐकली...आणि मला त्रास होतोय हि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...डॉक्टरकडे जाऊ का तुम्हीच औषधं देता?
आणि लेखकाने स्वताच लग्न झालेय आणि एकदा नाही झालेय असं लिहिलंय? यात आम्हाला काही पॉइंट वाटत नाही...कारण लग्न होऊनही न झालेली व्यक्ती आम्च्यातरी ऐकिवात नाही...आणि हो बायकांना विनोदबुद्धी नसते (नेमके कशावरुन ?) हे दर्शविल्याबद्दल आभार...
लेख विनोदी आहे असे समजून वाचले तरी मुळातच निरिक्षणे चुकीची आहेत.
असं सरसकट नसतं हो .
शिवाय विचार ही चुकीचे आहेत.
त्यामुळे लेख वाचून हसू तर आलेच नाही , लेख भावला पण नाही.
लेखनशैली बरी आहे. सुधारणा केल्यास अजून चांगले लिहू शकाल.
स्वयपाक करताना भाज्या धुणे,चिरणे,कणिक मळणे तसेच रोजच्या कपडे धुणे,पिळणे या क्रिया करत असताना मनातील ताण-तणावांचा निचरा होतो असे वाचले आहे.त्यामुळेच मागच्या पिढीतील स्त्रियांमध्ये Heart attack,B.P या सारखे आजार कमी असतात (अपवाद असू शकतात ).आजच्या IT मधील लोकांनी स्वयपाक या क्रियेकडे या दृष्टीने बघणे गरजेचे आहे,झालेच तर बायको पण खुश आणि आपण पण निरोगी राहू शकतो.
लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल अभिनंदन. खुपच छान लिहिला आहे. भरुन आले एकदम. आता मी एखादी सुगरण शोधुन तिच्याशीच लग्न करेन. बाकी रुप, वय, शिक्षण, वागणुक आणि विचारसरणी गौण आहे याचा मला साक्षात्कार झाला आहे. काळ बदलला आहे असे सगळे तोंड फोडुन बोंबलत असतात ते पुर्णपणे चुकिचे आहे आणि रांधा, वाढा, उष्टी काढा यातच बाईचे आयुष्य गेले पाहिजे, यातच त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे हे आता मला पुर्णपणे उमजुन चुकले आहे.
ओफिसमध्ये ८-१० तास काम करुन आल्यावर (बाय द वे बायकांनी ओफिसमध्ये जाउन काम करावे का यावर तुम्ही एक लेख का लिहीत नाही. त्याबद्दलचे तुमचे विचार ऐकुन पण कान त्रुप्त होतील) बायकोने लगेच पळ्या, उलथने आनी झारेच हातात घेतले पाहिजेत आणि नवरा तंगड्या पसरुन फॅशन टीवी, निओ स्पॉर्ट किंवा तत्सम कुठलेतरी चॅनल बघणार हे द्रुश्य खुपच मनोहारी आहे. हे असेच व्हायला हवे यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. मुलींना शालेय शिक्षण देण्याऐवजी जागोजागी स्वयंपाक वर्ग सुरु केले पाहिजेत, DBMS (धुणी, भांडी, मुले, स्वयंपाक) अभ्यासक्रम मुलींसाठी सक्तीचा केला पाहिजे. मुलींना नौकरी करण्याची मनाई केली पाहिजे आणि एव्हढे सगळे करुन सुद्धा जर मुलींनी स्वयंपाक करण्यात "काकु" केली तर त्यांना जाहीर फटके मारले पाहिजेत.
अगदी अगदी... पुरुषमुक्ती मंचावरून आपण याचा प्रस्ताव मांडूया का? एखादा मोर्चाच काढू काय? आणि आपले नेतृत्व परमपूज्य श्री सुजयजी कुलकर्णीसाहेब ...काय म्हणताय ?
मृत्यूंजय... लेख नीट वाचला नाहीत असे दिसतेय. निदान शीर्षक तरी वाचायचेत...
बाकी रुप, वय, शिक्षण, वागणुक आणि विचारसरणी गौण आहे
बाकीचे राहूदे, पण इथे शिक्षण महत्वाचे आहे.. ती मुलगी आयटी तली असली पाहिजे. म्हणजे किमान बी.ई. झालेली पाहिजे. त्यानंतर तिने नॉन आयटी क्षेत्रात नाही, तर आयटीतच नोकरी करायला हवी. म्हणजे गलेलठ्ठ पगार आलाच. तो पगार तिने ब्रंडेड कपड्यावर आणि महागाच्या मोबाईलवर वाया घालवायचा नाही. आणि त्यानंतर मग ओफिसमध्ये ८-१० तास काम करुन आल्यावर तिने लगेच पळ्या, उलथने आनी झारेच हातात घेतले पाहिजेत आणि उत्तमच स्वयंपाक केला पाहिजे. तो न येण्याबद्दल तिने कारणे द्यायची नाहीत. आणि अगदी पहिल्या दिवसापासून आणि प्रत्येक वेळी तिचा् स्वयंपाक चांगला झालाच पाहिजे. कारण जर तिने योग्य वेळेत स्वयंपाक शिकला असता, तर तिच्यावर स्वयंपाक बिघडण्याची वेळ आली नसती...
कळले का आता???
वाचला हो नीट. म्हणुनच म्हणतो आयटीची दारे मुलींसाठी बंदच करुन टाका ना. कटकटच नाही. लेख आणी शिर्षक नीट वाचुनच मत मांडले. लेखकापेक्षा थोडेसेच वेगळे आहे बघा
तुम्हाला जे अथक प्रयत्नांनी पुर्णपणे उमजून ते चुकले आहे हे तुम्हीच मान्य केल्याबद्दल धन्यवाद..! मी लेखात आणि कुठल्याही प्रतिक्रियेत असे म्हटलेले नाही कि बायकांनीच फक्त स्वयंपाक केला पाहिजे.....दोघांनाही स्वयंपाक यायला हवा हे मी आता इथे ४-५ व्यांदा लिहित आहे...जरा आदल्या मधल्या प्रतिक्रिया पण वाचत चला...!
"काळ बदलला आहे.मुलांनो स्वयंपाक शिका" हे मी लेखाच्या शेवटी लिहिलेले आहे..तुम्हाला नेमका कशाचा प्रोब्लेम आहे हे मला कळले नाही...! तुम्हाला स्वयंपाक शिकायचा नाहीय...का अजून काही....हे काही स्पष्ट झाले नाही...बायकांनी ऑफिसमध्ये जाऊन काम करावे का नाही हा त्यांचा प्रश्न आहे....पण थोडा का होईना स्वयंपाक हा यायलाच हवा हे माझे मत आहे...!
बाकी तुम्ही शेवटी शेवटी विनोदी विचार मांडून सगळ्यांची खूप करमणूक केलीत...मजा आली... :-) बाकी , आगीत तेल ओतण्याची कामे सुरु ठेवा....! तुम्हाला शुभेच्छा...!
दोघांनाही स्वयंपाक यायला हवा हे मी आता इथे ४-५ व्यांदा लिहित आहे...जरा आदल्या मधल्या प्रतिक्रिया पण वाचत चला...!
बूंदसे गयी वो हौदसे नहीं आती म्हणतात. तुम्ही तर उलट केलेत. हौदाने अंगण शिंपलेत आता प्रतिसादातून बुंद्या टाकून काय उपेग?
सोडून द्या! होतं असं कधीतरी. आता रंगपंचमी एंजॉय करा किंवा पुढच्या लेखाची तयारी.
=)) =))
'खतरनाक' प्रियालीदेवींचा विजय असो. प्रतिसादाच्या बुंदी हा शब्दप्रयोग तर फारच जास्त आवडला.
एकूणच मिपावरच्या मुली, बायकांना स्वयंपाक येत नाही या चुकीच्या गृहितकावरच हे माना कापलेले कोंबडे फारच थैमान घालत आहेत.
-- अदित्सु
"काळ बदलला आहे.मुलांनो स्वयंपाक शिका" हे मी लेखाच्या शेवटी लिहिलेले आहे..तुम्हाला नेमका कशाचा प्रोब्लेम आहे हे मला कळले नाही...! तुम्हाला स्वयंपाक शिकायचा नाहीय...का अजून काही....हे काही स्पष्ट झाले नाही...बायकांनी ऑफिसमध्ये जाऊन काम करावे का नाही हा त्यांचा प्रश्न आहे....पण थोडा का होईना स्वयंपाक हा यायलाच हवा हे माझे मत आहे...!
आयटी मधील बायको हवी / ती कमवणारी ही हवी पण आता हा नविन प्रतिसाद सारवा सारव करायला.
अरे व्वा ! सुमडी में लोमडी
मॅच निकालात न लावण्याचा पकका निर्धार केला आहे वाटतं सगळ्यांनी, आत्तापर्यंत या धाग्यांनी प्रियदर्शन, डेविड धवन, राजकुमार संतोषी (अंदाज अपना अपना वाले) यांना सगळ्यांना मागे टाकले आहे.
हसुन हसुन जबडा दुखायला लागलाय गालावर कायमच्या सुरकुत्या पडणार नाहीत म्हणजे झालं.
मला असं वाटतं
हा दोघेही काम करणा-या जोडप्यामधील महत्वाचा मुद्दा आहे- नि:संशय. १९व्या शतकातील बायको IT किंवा तत्सम कामांला जात नव्हती त्यामुळे तिला घरात वेळ जावा म्हणुन पाककृती, शिवणकला इ. शिकणे गरजेचे होतं. हो आता सगळं बदलयं. पण यावर उगाच घराचा कोळसा करत बसण्यात काहीच अर्थ नाही. दोघे ही काम करत असतील तर काम वाटून घेणे गरजेचे आहे. . नवरा घराबाहेरील कामे बघणार (किराणा आणणे, कार/मोटरसायकल सर्व्हीसिंग (दोघांच्याही), बिल पेमेंटस, प्लंबींग, फर्निचर, गॅस, फिटींग, पेपर रद्दी, आणि मोठ्या अवजड कामांसाठी जबाबदार जिथे अनोळखी माणसांबरोबर जास्त संबंध येतो अशी) आणि बायको घरातील कामांसाठी. याचा अर्थ असा नाही की सीमारेषा आखणे एकदाका हे काम झाले (कामे वाटून घेण्याचे) की झालं, आणि हो दोघे कधीही एकमेकांना त्यांच्या- त्यांच्या कामात मदत करू शकतात. उदा. बायको ऑफिसातील कामानिमित्त घरी उशीरा येणार असेल आणि स्वयंपाकाची जबाबदारी तिच्यावर असेल आणि नवरा घरी लवकर आला असेल तर नव-याने तिला सोपे होईल असे काही काम करण्यात(भाजी चिरुन ठेवणे, कणीक तिम्बणे इ.[असं होण्याचे चान्सेस खुप कमी कारण माझ्या मित्रांपैकी दोघेही कामाला जातात तिथे एकतर बाई कामाला आहे किंवा दोनवेळा स्वयंपाक कोण बनवत नाही] तसं नसेल तर महिन्यातून दोन तीनदा बाहेरून जेवण मागविल्याने तुम्ही ’रस्त्यावर येणार नाही”. टेलिफोन ऑफिस बायकोच्या कंपनीच्या रस्त्यावर पडत असेल तर तिने ते काम कधीतरी पार पाडावे. तर माझं असं म्हणणं आहे की उगाच खाजवून आवदान आणू नका.
इथे ब-याच प्रतिसादांवरून असे लक्षात येईल बरेचसे पुरूष समंजस भूमिका घेताना दिसत आहेत की बाबा हो तिला स्वयंपाक करण्यात मदत करणे गरजेचे आहे किंवा स्वयंपाक ही फक्त तिची जबाबदारी नसुन दोघांची आहे. पण ब-यापैकी सगळ्या स्त्रिया जरा कमी प्रमाणात समंजस भुमिका घेताना दिसतात (आर या पार) पुरुष नुसता TV बघत बसत बसतो इ. हां जर तो काहीच घराबाहेरील/घरातील काम करत नसेल तर त्यांचा राग मान्य. पण जर पुरुष बाहेरच्या कामांसाठी जबाबदार आहे आणि तो त्या जबाबदा-यांपासुन का-कू करत नसेल तर स्वयंपाकाची जबाबदारी पार पाडत असताना बायकांनी का-कू करू नये. दोघे प्रेम करतानां एकमेकांवर? मग कशाला पाण्यात बघायचे एकमेकांना?
जेंव्हा जेंव्हा माझी बायको स्वयंपाक करते तेंव्हा तेंव्हा मी भांडी घासतो.
टी-शर्टच्या भाया सारून बसलो आहे.. या.
प्रतिक्रिया
अहो ताई मी पंचवीस वर्षे वयाचा
तरी तुला सांगत होते, "अप्पा" टोपण नाव बदल..नाही ऐकलस
मस्तं लेख रे.. आवडेश. स्वैपाक
पुण्याचे पेशवे
"स्वयंपाक न येणे" ह्याला शक्यतो कुठलेही valid reason नसावे...
पुप्या.. विचार कर तु काय
हा हा हा, पुप्या
अर्धवटराव , लेख वाचल्याबद्दल
"स्वयंपाक न येणे" ह्याला
जबरा रे पुपे.. ४ थ्या
लेख आवडला.........!
??????????????????????????????????????
आपलं तर काय टेंशन
हाहाहा
आपलं तर काय टेंशन
तुमचा हा लेख तुम्ही गंमत
वा!!!
अगायाया.... =))
सहमत
अर्र, या काही सभासदांचीच
इथेही तेच उपायः इनो नाय तर
लेख आवडला
लेखकाशी सहमत..
(विषय दिलेला नाही)
उगाच....
दुर्लक्षच केले असते पण हे
नक्की त्रास कशाचा
लेखकाने लेख विनोदी आहे असा
<<तुम्हाला नक्की त्रास कशाचा
आयला गायछाप संपलि...
संपादित
तुम्ही पण युयुत्सुंच्या
लेख विनोदी आहे असे समजून
सुधारणा लेखनशैलीत का विचारात?
स्वयपाक करताना..
१+
चालू द्या...
लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल
अगदी अगदी... पुरुषमुक्ती
४९८अ सारखे ४९८आ पण टाकुन
तुमच्यासारख्या अजिबात
मृत्यूंजय... लेख नीट वाचला
=)) मेला बिचारा मृत्युंजय!
नक्की कोण मारणार ते सांगा
वाचला हो नीट. म्हणुनच म्हणतो
तुम्हाला जे अथक प्रयत्नांनी
बूंदसे गयी...
खतरनाक
हा ! हा ! हा !
सगळेच तेंडूलकर