Skip to main content

IT WIFE आणि स्वयंपाक

लेखक सुजय कुलकर्णी यांनी शनिवार, 31/07/2010 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झाल्यानंतर साधारणपणे १०-१५ दिवसांनी "स्वयंपाक" हा मुद्दा किती महत्वाचा होता हे तरुणांना कळून चुकते. लग्न ठरवताना सुंदरता, शिक्षण, आणि नोकरी हे तीनच मुद्दे विचारात घेतल्याने हा अनर्थ तरुणांवर ओढवतो. मुलीही "लग्नानंतर स्वयंपाकाच बघू..." असाच विचार करत असाव्यात किंबहुना करतात. खरंतर लग्न झालेल्या ह्या मुलींना बाई किंवा काकू म्हणायला हरकत नाही. पण "बाई" म्हटल्यावर ह्या मुलींना प्रचंड राग येतो. विशेषत: सॉफ्टवेअर मधल्या मुलीला. स्वयंपाक आणि घरकामाची जबाबदारी एकटीच्याच अंगावर येईल का काय असं बहुधा त्यांना वाटत असावं.ह्या फील्डमधल्या मुलींशी ज्यांच लग्न झालेले आहे त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती व्यक्त करावीशी वाटते. स्वयंपाक आणि जॉब अशी दुहेरी भूमिका आपण उत्तमरीतीने पार पाडत आहोत असा ह्या बायकांचा गोड गैरसमज असतो. स्वयंपाकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वप्रथम लग्न न झालेल्या तरुण वर्गाला माझा सल्ला आहे की लग्न ठरवताना, "स्वयंपाक येतो का?" हा प्रश्न आवर्जून विचारावा. " थोडा-थोडा स्वयंपाक येतो" असे उत्तर मिळाल्यास " थोडा म्हणजे किती??" हे विचारायला विसरू नका. प्रत्येकीची definition वेगळी असते. माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले. आठवड्याचे सातही दिवस स्वयंपाकाचा कंटाळा असणार्‍या ह्या बायका तुम्हाला सॉफ्टवेअर मध्येच सापडतील.सदानकदा आजचा स्वयंपाक करायचं कसं चुकवता येईल ह्याच खटाटोपात त्या असतात. " आज बाहेर खायला जायचे का?" हा प्रश्न नवर्‍याने विचारून होण्याआधी त्या "सही...... कित्ती छान......आलेच हं आवरून...." असे म्हणत क्षणार्धात दिसेनाश्या होतात. एकदा बाहेर जायचं ठरवल्यावर , हुशार आणि शहाण्या नवर्‍याने ते कधीही कॅन्सल करू नये. अन्यथा भांडण होण्याचे ९९% चान्सेस असतात.शेवटी बाहेरून हॉटेलमधले जेवण मागवावे लागते आणि मगच ह्या बायका शांत होतात हे सांगण्याची गरज नसावी. वीक एन्ड ला बाहेर पडण्याची वेळही ह्या बायका अचूक हेरतात.संध्याकाळीच बाहेर पडायचं म्हणजे नवरा "रात्री बाहेरच जेवू" असे म्हणतो हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. चुकून कधी स्वयंपाक करण्याचा योग आलाच तर, "आपण" आज खिचडी बनवूया का? असे प्रेमाने बोलून नवर्‍यालाही स्वयंपाक घरात ओढून काम करायला लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. काही नवरेमंडळी ह्याला बळी पडतात. काहीजण "आपण" ह्या शब्दावरून "तू" ह्या शब्दावर नेण्याचा निष्फळ प्रयत्न करतात. एकटीने स्वयंपाक करणे हा आपल्यावर अन्याय आहे अस ह्यांना नेहमी वाटतं. "दोघे खातो ना?? मग दोघे मिळून स्वयंपाक करू" असा professionalism त्या घरातही आणतात. ह्या बायका स्वयंपाक करताना नवरा बाहेर आरामात TV बघत असेल तर हे त्यांना अजिबात बघवत नाही. स्वयंपाक करताना ह्या आळशी माणसाला कुठलं काम देता येईल ह्याचा विचारच त्या करत असाव्यात. गरज नसलीतरी थोडं का होईना आपल्या नवर्‍याने काम केलच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो.अश्या बायकांचे नवरे साधारणत: ताट-वाट्या घेणे, कोथिंबीर निवडणे,डायनिंग टेबल पुसणे अशी कामे करतात. IT मधल्या बायकांना उत्तम व चविष्ट भाजी बनवता येते ही संकल्पना निव्वळ अशक्य आहे. बनवलेल्या भाजीचा पहिला प्रयोग त्या आपल्या नवर्‍यावरच करतात. एवढ्यावरच त्या थांबत नाहीत. वर तोंड करून "कशी झालीय भाजी?" हा प्रश्न विचारायला ते अजिबात विसरत नाहीत. "suggestions " म्हणजे त्यांना अपमानकारक वाटते. त्यांना suggestion देणे म्हणजे नवर्‍याने वादाला सुरुवात केल्यासारखी असते. भांडण नको म्हणून हे नवरे " भाजी मस्त झालीय..." म्हणत हळूच फ्रीजमधून थोडा सॉस, लोणचे घेताना दिसतात. त्यातूनही हिम्मत करून कुणी suggestion दिलेच तर त्यांची प्रतिक्रिया ठरलेली असते. "झालं? ठेवलास नावं??"....."थोडं कमी जास्त होणारच की रे"......."तू करायचं होतास मग"......"एवढं केलय त्याचं काही नाही..." असा उपकाराचा टोला लगवायलाही ते मागेपुढे बघत नाहीत. नुकतचं लग्न झालेल्या मुली कंपनीत बसून google वर रेसिपी शोधताना दिसतात. "आपल्याला काहीही बनवता येत नाही" हे नवर्‍याला इतक्या लवकर कळू नये हा त्यामागचा उद्देश असावा. रेसिपी मिळाली नाही तर आईला,आत्याला,मामीला फोन करून तासभर ह्या बायका रेसिपी विचारण्यात काढतात. "योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" हे मात्र नवर्‍याने दिसत असूनही म्हणू नये. ह्या बायकांचा "जेवण बनवण्याचा" मूड अशाने केंव्हाही जाऊ शकतो. चौरस आहार सोडून दररोज नवनवीन छोटे छोटे पदार्थ बनविण्यावर ह्यांचा भर असतो. हे भयंकर आणि अयशस्वी प्रयोग करण्यामागचा उद्देश प्रेमापोटी असतो की " उद्यापासून स्वयंपाकाला बाई लावू" हे नवर्‍याने स्वत:हून म्हणण्यासाठी? हे त्या बायकांनाच माहित...! ह्या बायका मंडईतल्या गर्दीमध्येही सहज ओळखून येतात. ब्रँडेड जीन्स आणि टी-शर्ट , एका हातात महागडा मोबाईल व दुसर्‍या हातात पर्स हि त्यांची ओळख. मल्टीप्लेक्स , शॉपिंग मॉल मध्ये बिनधास्त पैसे वाया घालवणार्‍या ह्या बायका मंडईमध्ये १-२ रुपयासाठी घासाघीस करताना पहावयास मिळतात. "too costly ......ohh.....too much ......" असे उद्गार ऐकल्यास ती शक्यतो सॉफ्टवेअर मधलीच समजावी. इथे bargaining हा त्यांच्यादृष्टीने मूळ मुद्दा नसून " IT मधली असले म्हणून काय झाले? मलाही भाज्यांमधले कळते म्हटलं...." हे जगाला पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मजेची गोष्ट म्हणजे अश्या बायकांना मंडईतले विक्रेतेही ४-५ रुपये आधीच वाढवून सांगतात. एज्युकेटेड बायकांना हे अजूनही कळालेले नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मित्र हो, हा लेख लिहण्याचा उद्देश हाच की, तुम्ही सॉफ्टवेअरमधल्या मुलीशी लग्न करत असाल तर पुन्हा विचार करा. बोटांवर मोजण्याइतक्या बायकांना स्वयंपाक येत असेलही, पण होणारी बायको त्यांपैकीच आहे का नाही ते तुम्हालाच ठरवावे लागेल. तुम्हाला स्वत:ला चांगला स्वयंपाक येत असल्यास उत्तमच. पण ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा. लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही. चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36749
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

आयला , आमच्या गावची माण्सं सुधरायची न्हाईत. लै कष्ट असतात मालक स्वयपाक म्हणजे . चेष्टा नव्हे. आता बायको दिवसभर काम करुन आली आणि तुमी तांबडा पांढरा मागाय लागला तर काय रडायचं तिनं ? कोंबडी आणा , दही , कांदा , हळद , तंबाटं , कोथ्मीर, आलं, लसून ,तीळ , खोबरं , खस्खस्, जमवा. बोंबलत मंगळ्वारात जाऊन ओला मसाला आणा. कोंबडी शिजवून , सुक्कं बाजूला काढून , तांबड्याची तयारी , पांढर्‍याचं वाटण वाटायला घ्या.. नायगावकर काका हुशार आहेत. आयला आमी बहिणाबाईंचा सत्कार पण निर्लेप चा तवा देऊनच करणार. (म्हादेव प्रसाद , दौलत मध्ये पडिक आणि रस्सामंडळाच्या ष्टो चा मेस्त्री , राजारामपुरीतला ) अडगळ. बाकी जाता जाता " तु तर फक्कड मासिक हुंडा" ही नायगावकर काकांची कवितापण आठवली.

आता बायको दिवसभर काम करुन आली आणि तुमी तांबडा पांढरा मागाय लागला तर काय रडायचं तिनं ? कोंबडी आणा , दही , कांदा , हळद , तंबाटं , कोथ्मीर, आलं, लसून ,तीळ , खोबरं , खस्खस्, जमवा. बोंबलत मंगळ्वारात जाऊन ओला मसाला आणा. कोंबडी शिजवून , सुक्कं बाजूला काढून , तांबड्याची तयारी , पांढर्‍याचं वाटण वाटायला घ्या..
=)) =)) =)) हे मात्र १००% पटले बरं का !

ह्म्म्म लेखकाने आपले विचार खुप वादग्रस्त रीतीने मांडलेत. पहिल्याच लिखाणात १०० ओलांडणार बहुतेक. आगावु अभिनंदन. २+ वर्ष झाली पण आम्ही अजुन ६० नाही ओलांडली. :( असो. मी पण आयटीतलाच, फार चांगला नाही पण उपाशी मरणार नाही इतपत स्वयंपाक जमतो. घरुन मुलगा / मुलगी हा भेद न करता आईबाबांनी मला आणि बहिणीला सगळी काम शिकवली. अगदी कपडे धुणे / वाळत घालणे ते स्वयंपाक. मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला. जेव्हा बायको(लग्नाआधी) मला पहायला आली (हो बरोबर लिहिलय. भेटण्याचा कार्यक्रम मुद्दाम मीच घरी ठरवला होता.) तेव्हा गप्पा मरताना जेव्हा एक-मेकांच्या छंदा विषयी विषय निघाल्यावर मी कुकिंग म्हटल्यावर ती फक्त गोड हसली. लग्न झाल्या वर त्या हसण्या मागचं गुपीत कळलं. बाईसाहेबांना फक्त चहा येत होता. पण ती १-२ महिन्यात सगळं शिकली. आणि हो माझी बायको नॉन आयटी वाली आहे :)

In reply to by चतुरंग

'असा मी असामी' मधे एके ठिकाणी पुलनी लिहिलंय - " तिचं वय अनेक वर्षे सोळावर येउन थांबलं आहे. या हिशोबाने धाकट्या भावंडांच्या वयाचा विचार केला तर काही भावंडाना वयच रहात नाही. कींवा बीजगणितातल्यासारखं मायनस एक, मायनह दोन असं रहातं!!". तसं, गणपा जर 'उपाशी मरणार नाही इतपत स्वयंपाक जमतो.' म्हणणार असेल तर माझी अवस्था म्हणजे .... !!!!

In reply to by मिसळपाव

पु.ल. म्हणजे ग्रेटच हो ! धाकट्याभावंडांच गणित वाचून खूप हसलो ! मनमुराद ! तुम्हि दाखला पण छान दिला आहे. जबरी !

In reply to by गणपा

मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला.
हमारा भी ऐसाईच हुव्या! बाय द वे, स्वयंपाक हि गोष्ट कर्तव्य म्हणुन हद्दपार होउन एक छंद्/आवड/Passion च्या रुपात वर येत आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. असो. १. नवरा बायको दोघेही IT/Non-IT पण नोकरी करणारे असतील तर स्वयंपाक हि दोघांची जबाबदारी हवी २. तसे नसल्यास ज्याने घर सांभाळायची जबाबदारी घेतली असेल (स्त्री/पुरुष) त्याने स्वयंपाक करावा पण महत्वाचे म्हणजे संसारात असे कोणतेही नियम लागु होत नाहित. परस्पर-सामंजस्य आणी आपापल्या कर्तव्याची जाणीव ह्यावर गाडा चालत असतो. तेव्हा स्वयंपाक कोणी करायचा हा मुद्दा जरा गौण ठरतो. मी IT मधे आहे (काय करता!) आणी बायको घर सांभाळते. पण अनेकदा ऑफीसमधुन आल्यावर मी स्वंयपाक करतो. कारण हात फार वळवळ करतात. घरात सगळ्यांनाच स्वयंपाक येतो. स्वयंपाक करण्यात गम्मत आहे हे कळले तर तो शिकवायची अथवा शिक म्हणुन मागे लागायची गरज पडत नाहि. माझ्या मुली मी कु़कींग (हा शब्द मला स्वयंपाक करण्या पेक्षा बरा वाटतो) करत असतांना कधी कधी observe करत असतात. त्यातुन त्या शिकतीलहि. आणी त्यांनी शिकलेच पाहिजे कारण ते स्वावलंबी बनण्यासाठि गरजेचे आहे (just for the sake of it मला मुलं असती तरीही मी त्यांना cooking शिकवले असते!). तेव्हा अधिक सांगणे नको! असो, फारच अवांतर झाला वाटतं प्रतिसाद.

In reply to by पांथस्थ

मुळात जीभेचे चोचले फार त्यामुळे स्वयंपाक करणे हा छंद झाला. हमारा भी ऐसाईच हुव्या! आमचेही अगदी असेच झाले. (स्वयंपाकी)बेसनलाडू बाय द वे, स्वयंपाक हि गोष्ट कर्तव्य म्हणुन हद्दपार होउन एक छंद्/आवड/Passion च्या रुपात वर येत आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. आणी शिकलेच पाहिजे कारण ते स्वावलंबी बनण्यासाठि गरजेचे आहे. १००% सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू

साहेब, लोकांना यडे बनवायचे आ़णि उचकवायचे धंदे सोडा.. लेखात म्हणताय लग्न झालंय, बायको अमुक अमुक म्हणाली आणि प्रतिसादात म्हणताय लग्न झालेलं नाही. . स्वयंपाक जाउंदे पण लग्न होणं म्हणजे काय हे तरी कळतय का? तुमचा राग नक्की कशावर आहे, आयटीवाल्या बायकांवर, त्यांच्या जिन्सवर (फीट ठेवलेली तब्येत), त्यांच्या महागड्या मोबाईलवर (म्हणजे श्रीमंतीवर?) कि स्वयंपाक ऑऊटसोर्स करण्याच्या (तुमच्या भाषेत आळशी) वृत्तीवर.. जरा इनो घ्या.. ती मुलगी आयटी मधे आहे म्हणजे तिने चार भिंतीतून आणि स्वयंपाकघरातून बाहेर येऊन (अथवा तिथे न घुसमटता) मान मोडेस्तोवर अभ्यास केलाय, इंजिनिअरींग वगैरे केलय आणि स्पर्धात्मक जगात पाऊल ठेवून ती पैसे कमवतेय.. त्याच्यावर तुमचा राग का? उलट तिचं, तिच्या वडिलांच (ज्यांनी तिला असं चाकोरीबाहेर यायला प्रोत्साहन दिलय) त्यांच कौतुक करायला हवं.. तुम्हाला पोळ्या लाटून हव्या असतील तर आयटीची मुलगी लागतेच कशाला.. तुमच्या सारख्यांना पैसा हवा आयटीतल्या मुलीचा आणि तिने गाढवासारख्म घरात राबायलाही हवं.. तुम्ही स्वयंपाक करण, धुणी भांडी आउटसोर्स करु शकता पण पैसे कमवणारी बायको कशी आउटसोर्स करणार? तेव्हा ती तुम्हाला चार घास घालतेय खायला त्याचे आभार माना.. (बायको असेल तर) सुखाने मिळून मिसळून संसार करा.. आणि कांदा चिरणे, कोथिंबीर निवडणे ह्यापलिकडे तुमचा रिझुमे जातो का ह्यावर विचार आणि प्रयत्न करा.. लागली तर गणपाशेठ, पेठकर काकांची मदत घ्या.. आणि अशा स्वतच्या वैचारिक मर्यादांची बुंदी पाडणार्या लेखांना पसरवणे शक्य झालं तर थांबवा.. - (हितचिंतक) उपास

गाय छाप, चुना पुडि घ्यावि आन पाराव जाउन निवांत धुळवड बघत बसावि....

सर्वप्रथम, सुजयचे अभिनन्दन, खरोखर, पहिल्याच लेखात सेन्च्यरी मारणार तुम्ही राव. बाकि , योग्य वयात हा लेख वाचायला मिळाला, वेळीच सावध केल्याबद्दल धन्यवाद :) इतक्या तिखट प्रतिक्रिया पाहून खरेतर हसूच आले, हा लेख एक fiction + real experinces चा ब्लेन्ड असू शकतो, म्हणूनच माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले. या प्रकारचे लेखन आलेले असावे, केवळ अश्या क्षुल्लक गोष्टीला पकडून वैयक्तिक चिखलफेक करणे योग्य नाही. काही मंडळींनी हा लेख फारच वैयक्तिक घेतलेला दिसतो :) तर लोकहो, just chill, लेखाच मूळ उद्देश हा केवळ स्रियांनीच स्वयंपाक करावा आणि उत्तमच करावा असा मूळीच वाटत नाही, उलट पुरुषांनीही स्व्यंपाक शिकावा आणि आजच्या IT युगात बायकोकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नयेत असाच दिसतो. शेवटी, सुजय भाऊ, लेख कम्प्लीट नादखुळा, अगदी, कोल्हापूरी, रश्श्यसारखा झणझणीत :)

लेख म्हणूनही भिकार. विषय तर त्याहून बाद!! विनोदी म्हणावं या लेखाला तर क्षणोक्षणी तिडीक जाणारी गृहितकं...

हाहाहाहाहा.. शिर्षक वाचुनच आत काय असेल याची कल्पना आली होती... अपेक्षेला खरा उतरला लेख आणी प्रतिसाद्स. :) आयटी असो वा नॉन आयटी, घरातील सर्व कामे पहाणार्‍या स्त्रियांची संख्या जास्तच आहे.. पुरुष मोजकेच. नोकरी करणार्‍या, पण तरी स्वयंपाक घरात नवर्‍याला पाऊल न ठेवु देणार्‍या बायका सुद्धा मी पाहिल्यात. पण स्वयंपाकासारख्या क्षुल्लक गोष्टीवरुन जर तुम्ही चांगल्या जीवनसंगिनीला मुकणार असाल तर त्याहुन वाईट काहीही नाही.. एक प्रामाणिक सल्ला: जर तुम्हाला परफेक्ट गृहिणी बायको म्हणुन हवी असेल तर मग शिक्षण्/नोकरी अशी अपेक्षा ठेवु नका. लग्नाच्या बाजारात हवे तसे पॅकेजेस उपलब्ध आहेत.. ;) नशिब थोर असेल तर तुम्हाला हवे असलेले सर्व गुण एकाच मुलीत सुद्धा मिळतील कदाचित, बी ऑप्टीमिस्टीक. :) शेवटी लग्न हा एक जुगारच असावा/ लव असो वा अरेंज. ज्याचे त्याचे नशिब आणी ज्याचा त्याचा अनुभव. :) (लग्नासाठी फक्त विचार जुळण्याला महत्व देणारा )

चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.
अगदी!!!! इथल्या बायकांचे टक्के टोणपे ऐकण्यापेक्षा आणि असले लेख लिहिण्यात आपला वेळ घालवण्यापेक्षा नवनवीन पाककृती करा आणि इथल्या पाककृती विभागात लावा. पुढील पाककृतीकरता शुभेच्छा!!

In reply to by प्रियाली

वा वा! अजून एक बल्ल्वाचार्य मिपावर येणार काय? आम्ही मिपावरच्या पा़कृ वाचूनच स्वयंपाक शिकलो आहोत! -- असुर

नोकरी, पैसा, सौंदर्य, छंद, शिक्षण, स्वभाव इ.इ. गोष्टींचा प्राधान्यक्रम लावुन/प्राधान्यता ठरवुन मगच जोडीदाराची निवड करावी म्हणजे असे लेख लिहायची गरज नाही भासणार. बादवे: हा लेख काल्पनिक आहे हे लेखकाच्या? सद्य वैवाहीक स्थितीवरुन उमजले.

लेख मजेशीर वाटला. शेवटी ज्याच त्याच स्वातंत्र्य
लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही. चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.
लग्न न झालेल्या मित्रांनो अस म्हणायचय का? असो (इकडची काडी तिकडे न करणारा आळशी नवरा) ( हे कोणरे तिकडे म्हणतय रे तिकडे वा! काय पण प्रौढीने सांगतोय)

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रकाश काका, प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद...! खरतर लग्न झालेल्या किंवा लग्न न झालेल्या दोघानाही स्वयंपाक यायलाच हवा....! एकटे असताना कधीही स्वयंपाक करायला लागू शकतो....!! आणि आळशी नवरा मी म्हणत नाहीय हो..... :-) आजकालच्या काही IT मुलींच्या( पुन्हा वाद नकोत ;-) ) डोक्यातले विचार आहेत हे....!!

मज्जा आली. काय टीआरपी आहे. आणि हाणामारी तर सॉलिड. च्यामारी आमचे वातुळ धागे २५ च्या वर जात नाहीत. ह्यांची आल्या आल्याच फटकेबाजी सुरु. इथे खूप सूज्ञ पुरुष आणि महिला आहेत. बरेच विवाहितसुद्धा असतील. प्रत्येक लग्नाऊ व्यक्तीस स्वयंपाक येणे अनिवार्य आहे. असा रिप्लाय एकानेही टाकला नाही की याचं आश्चर्य वाटतंय. वर कोणीतरी ( मला वाटतं ३_१४ वाल्या ताईंनी. चूकभूल देणेघेणे ) जेवण बाहेरुनही आणता येतं, विचार आणता येतं नाहीत, जेवणासाठी माणूस ठेवता येतो असला काहीतरी विनोदी रिप्लाय टाकला आहे. जेवणासाठी किंवा आणखी कशाकशासाठीसुद्धा पुरुष / बाई ठेवता येते आणि विचारमंथन की काय म्हणताय त्यासाठी पुस्तकं असतात किंवा उपक्रम सारख्या वेबसाईट असतात आणि पोरं सांभाळायला बेबीशीटरपण असतात . हे सगळं एकाच जागी सहकार आणि सहभाग तत्वावर व्हावं म्हणून पब्लिक लग्न करतं असा माझा अंदाज आहे. प्रत्येकाला जेवण बनवता आलं पाहिजे. त्या तुलनेत विचार्मंथन ही तुच्छ गोष्ट आहे. - एक अविवाहित

In reply to by अप्पा जोगळेकर

>> एक अविवाहित योग्य वयात लग्नं केलं असतात ना अप्पा आजोबा तर असा बोळा तुंबला नसता! असो. तुम्हाला बोळा निघण्यासाठी शुभेच्छा!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो ताई मी पंचवीस वर्षे वयाचा अविवाहित आहे. आणखीन ५-७ वर्ष लग्न झालं नाही तर बोळा तुंबला असं म्हणू शकता. एकदम मोडीत काढलंत मला.

In reply to by अप्पा जोगळेकर

झाला ना गोंधळ, सौरभ ? बेवकूफ, (कृपया ह घेणे ) ऐसे अपना नाम लिखोगे तो "तुम्हें कोई लडकी दिल देने भी वाली होगी, तो दिल थांम लेगी"

मस्तं लेख रे.. आवडेश. स्वैपाक बायकोला यायलाच हवा अशा मताचा मीही आहे. (४थ्या शतकातला) पेशवे मला स्वतःला चांगला स्वैपाक येतो पण बायको चांगला स्वैपाक करणारीच बघेन. सगळं स्वतःच्याच हातानं करायचं तर बायको पाहीजेच कशाला. ;) (आपला हात जगन्नाथ वाला)पेशवे बाकी लेखनशैली मस्तं खुसखुशीत आहे. काही काही निरीक्षणं तर मस्तंच. (वाचक) पेशवे आता १००+ कडे वाटचाल पक्की. आणि धागा प्रवर्तकही प्रत्येक प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊन तेल ओतत आहेतच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पुण्याचे पेशवे , प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद....!! :-) तुमचीही माझ्यासारखीच मते असल्याचे वाचून आनंद झाला....! :-) मुलीना "किमान" , बर्‍यापैकी स्वयंपाक यायलाच हवा...त्यात अजिबात तडजोड नाही किंवा "स्वयंपाक न येण्याची " मुलींची कुठलीही कारणे खपवून घेतली जाऊ नयेत...!! ( अपवादात्मक कारणे अगदी थोडीच...) "सगळं स्वतःच्याच हातानं करायचं तर बायको पाहीजेच कशाला. " ह्या मताशी मात्र मी तुझ्याशी सहमत नाही मित्रा....!! :-)

In reply to by सुजय कुलकर्णी

पुप्या.. विचार कर तु काय लिहिलयस.. आणि ते कशासाठी वापरलं जातय त्याचा.. असो.. सुजय.. तुमचं लग्न झालं आहे का?.. तुमच्या बायकोला शुभेच्छा.. नसेल झालं तर तुम्हाला शुभेच्छा..

In reply to by अर्धवट

अर्धवटराव , लेख वाचल्याबद्दल धन्यवाद...! माझे लग्न झालेले नाही....थोडातरी स्वयंपाक येणारी मुलगी मिळावी हि छोटीशी अपेक्षा आहे...!! शुभेच्छा दिल्याबद्दल आणखी एकदा धन्यवाद...! :-)

In reply to by सुजय कुलकर्णी

"स्वयंपाक न येणे" ह्याला शक्यतो कुठलेही valid reason नसावे... म्हणजे किमान ९०% बाप्ये invalid.....

लेख आणि निरीक्षण आवडले.....! आधुनिक स्त्रीयांच्या प्रतिसादांनी लेखाच्या निमित्ताने मात्र चांगली करमणूक केली, मजा आली.........! -दिलीप बिरुटे

तुमची हि खरड स्वानुभव आहे की तुमच्या सारख्या च तुमच्या मित्र मंडळीन चा अनुभव आहे.....? इतरांच्या अनुभवा नी लिहिलेली जर हि मुक्ताफळे असतील तर ती अत्यंत चुकी ची आहे.आणि स्वानुभवा वरून असतील तर तो तुमच्या अनुभवाचा भाग आहे .... या अनुभवा वरून तमाम IT क्षेत्रातल्या बायकांबद्दल घाणेरडे मत प्रदर्शित करणे योग्य नाही ..... हा अनुभव तुम्हाला किंवा तुमच्या मित्र मंडळीना इतर क्षेत्रातल्या मुलींकडून हि येऊ शकतो....! ...... तुमची हि मते निव्वळ न पटण्याजोगी आहेत,,, तुमच्या पत्नीला शुभेच्छा ......आणि सहानुभूती सुद्धा..

आपलं तर काय टेंशन नाय्....लग्न करून बायकोला म्हणणार तू नोकरी कर्..मी घर संभाळतो... हाय काय अन नाय काय??? ;) आम्ही आयटीवाले बरंका.. :D

In reply to by प्रभो

द्येवा द्येवा, एक लंबर! आजकाल प्रभ्याशी धाग्याधाग्यावर सहमत होणे होत आहे! ;) इथंही आहेच. फक्त ते शेवटचं वाक्य वगळून. :)

In reply to by प्रभो

आपलं तर काय टेंशन नाय्....लग्न करून बायकोला म्हणणार तू नोकरी कर्..मी घर संभाळतो... +१००. हे माझंसुद्धा स्वप्न आहे.

तुमचा हा लेख तुम्ही गंमत म्हणून लिहिला असेल आणि ही तुमची खरोखरची मतं नसतील असं गृहित धरतो आहे. तसे असल्यास, ठीक आहे लेख. तसे नसल्यास, एक आयटीतली मुलगी वाचली बिचारी.

सुंदर लेख... वरच्या प्रतिसादातील बायकांचे प्रतिसाद वाचून खूपच करमणूक झाली. म्हणजे लेखातील मुद्दे नक्कीच खरे दिसतात. नाहीतर इतक्या मिरच्या झोंबल्या नसत्या :) यांच्या नवर्‍यांची कीव येते. हे म्हणजे "सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही" असे अवघड जागेचे दुखणे आहे. बिचार्‍या या नवर्‍यांना माझी सहानुभूती आहे. याउप्पर या लेखावरून कोल्हापूरकरांवर उगीचच चिखलफेक करणे हे तर वैचारीक दिवाळखोरीचे लक्षण आहे. लेखाचा मुद्दा हा आहे कि सर्वांना किमान स्वयंपाक करता यावा. ते सोडून काही सभासद उगीच त्रागा करताना दिसतात. मजा आहे.. चालू द्या.. सुजयराव आणखी येउ द्या...

In reply to by मधुशाला

अगायाया.... =)) =)) खुर्चीतुन पडलो मी हा प्रतिसाद वाचुन. पॉपकॉर्न संपलेच होते की शो पुन्हा सुरु झालाच. ह्या धाग्याचा वेगळा टॅबच उघडुन ठेवलाय. =)) =))

In reply to by मधुशाला

वरच्या प्रतिसादातील बायकांचे प्रतिसाद वाचून खूपच करमणूक झाली. म्हणजे लेखातील मुद्दे नक्कीच खरे दिसतात. नाहीतर इतक्या मिरच्या झोंबल्या नसत्या यांच्या नवर्‍यांची कीव येते. हे म्हणजे "सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही" असे अवघड जागेचे दुखणे आहे. बिचार्‍या या नवर्‍यांना माझी सहानुभूती आहे. सहमत, सहमत, सहमत!!!!!

In reply to by मधुशाला

अर्र, या काही सभासदांचीच संख्या बरीच जास्त दिसते ... WPTA च्या न्यायाने काही खडे मात्र बाजूलाच राहिले!

खुसखुशीत शैलीतला लेख आवडला. (मला उत्तम स्वयंपाक करता येतो.)

लेखकाच्या विचाराशी सहमत.. आत्तापर्यंत जितक्या IT क्षेत्रातील मुली पाहिल्या त्या लेखकाने वर्णन केल्याप्रमाणेच निघाल्या..काही येत नसते पण बडबड मात्र फार..दुसर्‍यांना सल्ले देण्यास आणि खाणे चांगले झाले तर फुकट credit घेण्यास मात्र पुढे पुढे.. याउप्पर या लेखावरून कोल्हापूरकरांवर उगीचच चिखलफेक करणे हे तर वैचारीक दिवाळखोरीचे लक्षण आहे.. सहमत..

लोकप्रियता मिळवण्याचा सवंग प्रकार....... लेखात लिहीलेय लग्न झालेय.... प्रतिक्रियेत लिहिलंय.... व्हायचंय.... हा प्रश्न उपस्थित करणा-या प्रतिक्रियेवर काही प्रतिसाद नाही.... वादग्रस्त विषय सुरू करून द्यायचे आणि मग बाजूला झाडावर बसून गंमत बसायची... मला अंमळ गंमत वाटते.... की लोक (विशेषतः स्त्रिया) त्वेषाने प्रतिक्रिया का देत आहेत? समजा असेलच हा प्राणी त्याच्या लेखावरून वाटतो तसा ढुढ्ढाचार्य... तर असल्या लोकांकडे दुर्लक्ष करा..... हे तळमळणारे आत्मे आहेत..या जन्मी बदलणार नाहीत....... आणि फक्त प्रसिद्धी साठी असले प्रकार करत असेल....तरी पण दुर्लक्ष करा ...... त्यापेक्षा जास्त काही नाही -सविता.

In reply to by सविता

दुर्लक्षच केले असते पण हे महाशय कुठपर्यंत ताणू शकतात हे पहायचं... बाकी लेख फक्त प्रसिद्धीसाठीच लिहिला आहे याच्याशी सहमत.

In reply to by शिल्पा ब

मी इथे केवळ वाचनमात्र असते. परंतु हा लेख आणि त्यावरचे काहींचे बिनबुडाचे प्रतिसाद वाचून राहवले नाही. तुम्हाला नक्की त्रास कशाचा झालाय. लेखात लिहिलेली दुर्दैवाने का होईना पण वस्तुस्थिती आहे म्हणून का या लेखाला प्रसिद्धी मिळती आहे म्हणून. लेखकाने कुठेही लिहिलेले नाही कि हे त्याचे आत्मचरित्र आहे. तरीही त्याचे लग्न झाले आहे का नाही याच्यात तुम्हाला फार मोठा point दिसतो आहे. प्रतिसाद वाचून लोकांची करमणूक होत आहेच आणि आपण पण सिद्ध करत आहोत कि बायकांना विनोदबुद्धी खरच कमी असते.

In reply to by पद्माक्षी

लेखकाने लेख विनोदी आहे असा डिस्कलेमर टाकलेला नव्ह्ता... आणी ही साईट फक्त विनोदी लेखांना वाहिलेली आहे हे ही वाचकांना माहिती न्व्हतं म्हणून असावं हो बहुतेक.... :D

In reply to by पद्माक्षी

तुम्हाला नक्की त्रास कशाचा झालाय. लेखात लिहिलेली दुर्दैवाने का होईना पण वस्तुस्थिती आहे म्हणून का या लेखाला प्रसिद्धी मिळती आहे म्हणून. प्रसिद्ध होण्यासाठी ते सत्यच असले पाहिजे हि अट नवीनच ऐकली...आणि मला त्रास होतोय हि माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...डॉक्टरकडे जाऊ का तुम्हीच औषधं देता? आणि लेखकाने स्वताच लग्न झालेय आणि एकदा नाही झालेय असं लिहिलंय? यात आम्हाला काही पॉइंट वाटत नाही...कारण लग्न होऊनही न झालेली व्यक्ती आम्च्यातरी ऐकिवात नाही...आणि हो बायकांना विनोदबुद्धी नसते (नेमके कशावरुन ?) हे दर्शविल्याबद्दल आभार...

आयला गायछाप संपलि... पन हि धुळवड काय संपाल आस दिसत नाय...

संपादित

तुम्ही पण युयुत्सुंच्या पावलावर पाउल टाकलन. लेख कसा का असेना १००+ प्रतिक्रिया यणार. बाय द वे अगदीच पुचाट लेख आणि फालतु विचार.

लेख विनोदी आहे असे समजून वाचले तरी मुळातच निरिक्षणे चुकीची आहेत. असं सरसकट नसतं हो . शिवाय विचार ही चुकीचे आहेत. त्यामुळे लेख वाचून हसू तर आलेच नाही , लेख भावला पण नाही. लेखनशैली बरी आहे. सुधारणा केल्यास अजून चांगले लिहू शकाल.

स्वयपाक करताना भाज्या धुणे,चिरणे,कणिक मळणे तसेच रोजच्या कपडे धुणे,पिळणे या क्रिया करत असताना मनातील ताण-तणावांचा निचरा होतो असे वाचले आहे.त्यामुळेच मागच्या पिढीतील स्त्रियांमध्ये Heart attack,B.P या सारखे आजार कमी असतात (अपवाद असू शकतात ).आजच्या IT मधील लोकांनी स्वयपाक या क्रियेकडे या दृष्टीने बघणे गरजेचे आहे,झालेच तर बायको पण खुश आणि आपण पण निरोगी राहू शकतो.

In reply to by चन्द्रशेखर सातव

स्वयपाक करताना भाज्या धुणे,चिरणे,कणिक मळणे तसेच रोजच्या कपडे धुणे,पिळणे या क्रिया करत असताना मनातील ताण-तणावांचा निचरा होतो असे वाचले आहे
मला हा अनुभव आहे. स्वयंपाक करतांना कशी मस्त तंद्री लागते!

लेख प्रसिद्ध झाल्याबद्दल अभिनंदन. खुपच छान लिहिला आहे. भरुन आले एकदम. आता मी एखादी सुगरण शोधुन तिच्याशीच लग्न करेन. बाकी रुप, वय, शिक्षण, वागणुक आणि विचारसरणी गौण आहे याचा मला साक्षात्कार झाला आहे. काळ बदलला आहे असे सगळे तोंड फोडुन बोंबलत असतात ते पुर्णपणे चुकिचे आहे आणि रांधा, वाढा, उष्टी काढा यातच बाईचे आयुष्य गेले पाहिजे, यातच त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे हे आता मला पुर्णपणे उमजुन चुकले आहे. ओफिसमध्ये ८-१० तास काम करुन आल्यावर (बाय द वे बायकांनी ओफिसमध्ये जाउन काम करावे का यावर तुम्ही एक लेख का लिहीत नाही. त्याबद्दलचे तुमचे विचार ऐकुन पण कान त्रुप्त होतील) बायकोने लगेच पळ्या, उलथने आनी झारेच हातात घेतले पाहिजेत आणि नवरा तंगड्या पसरुन फॅशन टीवी, निओ स्पॉर्ट किंवा तत्सम कुठलेतरी चॅनल बघणार हे द्रुश्य खुपच मनोहारी आहे. हे असेच व्हायला हवे यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. मुलींना शालेय शिक्षण देण्याऐवजी जागोजागी स्वयंपाक वर्ग सुरु केले पाहिजेत, DBMS (धुणी, भांडी, मुले, स्वयंपाक) अभ्यासक्रम मुलींसाठी सक्तीचा केला पाहिजे. मुलींना नौकरी करण्याची मनाई केली पाहिजे आणि एव्हढे सगळे करुन सुद्धा जर मुलींनी स्वयंपाक करण्यात "काकु" केली तर त्यांना जाहीर फटके मारले पाहिजेत.

In reply to by मृत्युन्जय

अगदी अगदी... पुरुषमुक्ती मंचावरून आपण याचा प्रस्ताव मांडूया का? एखादा मोर्चाच काढू काय? आणि आपले नेतृत्व परमपूज्य श्री सुजयजी कुलकर्णीसाहेब ...काय म्हणताय ?

In reply to by शिल्पा ब

४९८अ सारखे ४९८आ पण टाकुन देण्याची शिफारस करु शकतो आपण. स्वयंपाक करायला नकार देणारी बायको या कलमाखाली गजाआड टाकता आली पाहिजे.