Skip to main content

IT WIFE आणि स्वयंपाक

लेखक सुजय कुलकर्णी यांनी शनिवार, 31/07/2010 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झाल्यानंतर साधारणपणे १०-१५ दिवसांनी "स्वयंपाक" हा मुद्दा किती महत्वाचा होता हे तरुणांना कळून चुकते. लग्न ठरवताना सुंदरता, शिक्षण, आणि नोकरी हे तीनच मुद्दे विचारात घेतल्याने हा अनर्थ तरुणांवर ओढवतो. मुलीही "लग्नानंतर स्वयंपाकाच बघू..." असाच विचार करत असाव्यात किंबहुना करतात. खरंतर लग्न झालेल्या ह्या मुलींना बाई किंवा काकू म्हणायला हरकत नाही. पण "बाई" म्हटल्यावर ह्या मुलींना प्रचंड राग येतो. विशेषत: सॉफ्टवेअर मधल्या मुलीला. स्वयंपाक आणि घरकामाची जबाबदारी एकटीच्याच अंगावर येईल का काय असं बहुधा त्यांना वाटत असावं.ह्या फील्डमधल्या मुलींशी ज्यांच लग्न झालेले आहे त्यांच्याबद्दल मला मनापासून सहानुभूती व्यक्त करावीशी वाटते. स्वयंपाक आणि जॉब अशी दुहेरी भूमिका आपण उत्तमरीतीने पार पाडत आहोत असा ह्या बायकांचा गोड गैरसमज असतो. स्वयंपाकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वप्रथम लग्न न झालेल्या तरुण वर्गाला माझा सल्ला आहे की लग्न ठरवताना, "स्वयंपाक येतो का?" हा प्रश्न आवर्जून विचारावा. " थोडा-थोडा स्वयंपाक येतो" असे उत्तर मिळाल्यास " थोडा म्हणजे किती??" हे विचारायला विसरू नका. प्रत्येकीची definition वेगळी असते. माझ्या पत्नीने "सगळं बनवता येतं..." असं म्हटलेलं मला आठवतं. "चांगलं" , "बर्‍यापैकी" हे शब्द ती जाणूनबुजून म्हणाली नसावी हे मला तिचे पाककौशल्य बघितल्यावर कळाले. आठवड्याचे सातही दिवस स्वयंपाकाचा कंटाळा असणार्‍या ह्या बायका तुम्हाला सॉफ्टवेअर मध्येच सापडतील.सदानकदा आजचा स्वयंपाक करायचं कसं चुकवता येईल ह्याच खटाटोपात त्या असतात. " आज बाहेर खायला जायचे का?" हा प्रश्न नवर्‍याने विचारून होण्याआधी त्या "सही...... कित्ती छान......आलेच हं आवरून...." असे म्हणत क्षणार्धात दिसेनाश्या होतात. एकदा बाहेर जायचं ठरवल्यावर , हुशार आणि शहाण्या नवर्‍याने ते कधीही कॅन्सल करू नये. अन्यथा भांडण होण्याचे ९९% चान्सेस असतात.शेवटी बाहेरून हॉटेलमधले जेवण मागवावे लागते आणि मगच ह्या बायका शांत होतात हे सांगण्याची गरज नसावी. वीक एन्ड ला बाहेर पडण्याची वेळही ह्या बायका अचूक हेरतात.संध्याकाळीच बाहेर पडायचं म्हणजे नवरा "रात्री बाहेरच जेवू" असे म्हणतो हे त्यांना चांगलेच ठाऊक असते. चुकून कधी स्वयंपाक करण्याचा योग आलाच तर, "आपण" आज खिचडी बनवूया का? असे प्रेमाने बोलून नवर्‍यालाही स्वयंपाक घरात ओढून काम करायला लावण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. काही नवरेमंडळी ह्याला बळी पडतात. काहीजण "आपण" ह्या शब्दावरून "तू" ह्या शब्दावर नेण्याचा निष्फळ प्रयत्न करतात. एकटीने स्वयंपाक करणे हा आपल्यावर अन्याय आहे अस ह्यांना नेहमी वाटतं. "दोघे खातो ना?? मग दोघे मिळून स्वयंपाक करू" असा professionalism त्या घरातही आणतात. ह्या बायका स्वयंपाक करताना नवरा बाहेर आरामात TV बघत असेल तर हे त्यांना अजिबात बघवत नाही. स्वयंपाक करताना ह्या आळशी माणसाला कुठलं काम देता येईल ह्याचा विचारच त्या करत असाव्यात. गरज नसलीतरी थोडं का होईना आपल्या नवर्‍याने काम केलच पाहिजे असा त्यांचा अट्टाहास असतो.अश्या बायकांचे नवरे साधारणत: ताट-वाट्या घेणे, कोथिंबीर निवडणे,डायनिंग टेबल पुसणे अशी कामे करतात. IT मधल्या बायकांना उत्तम व चविष्ट भाजी बनवता येते ही संकल्पना निव्वळ अशक्य आहे. बनवलेल्या भाजीचा पहिला प्रयोग त्या आपल्या नवर्‍यावरच करतात. एवढ्यावरच त्या थांबत नाहीत. वर तोंड करून "कशी झालीय भाजी?" हा प्रश्न विचारायला ते अजिबात विसरत नाहीत. "suggestions " म्हणजे त्यांना अपमानकारक वाटते. त्यांना suggestion देणे म्हणजे नवर्‍याने वादाला सुरुवात केल्यासारखी असते. भांडण नको म्हणून हे नवरे " भाजी मस्त झालीय..." म्हणत हळूच फ्रीजमधून थोडा सॉस, लोणचे घेताना दिसतात. त्यातूनही हिम्मत करून कुणी suggestion दिलेच तर त्यांची प्रतिक्रिया ठरलेली असते. "झालं? ठेवलास नावं??"....."थोडं कमी जास्त होणारच की रे"......."तू करायचं होतास मग"......"एवढं केलय त्याचं काही नाही..." असा उपकाराचा टोला लगवायलाही ते मागेपुढे बघत नाहीत. नुकतचं लग्न झालेल्या मुली कंपनीत बसून google वर रेसिपी शोधताना दिसतात. "आपल्याला काहीही बनवता येत नाही" हे नवर्‍याला इतक्या लवकर कळू नये हा त्यामागचा उद्देश असावा. रेसिपी मिळाली नाही तर आईला,आत्याला,मामीला फोन करून तासभर ह्या बायका रेसिपी विचारण्यात काढतात. "योग्य वयात स्वयंपाक शिकली असतीस तर हि वेळ आली नसती" हे मात्र नवर्‍याने दिसत असूनही म्हणू नये. ह्या बायकांचा "जेवण बनवण्याचा" मूड अशाने केंव्हाही जाऊ शकतो. चौरस आहार सोडून दररोज नवनवीन छोटे छोटे पदार्थ बनविण्यावर ह्यांचा भर असतो. हे भयंकर आणि अयशस्वी प्रयोग करण्यामागचा उद्देश प्रेमापोटी असतो की " उद्यापासून स्वयंपाकाला बाई लावू" हे नवर्‍याने स्वत:हून म्हणण्यासाठी? हे त्या बायकांनाच माहित...! ह्या बायका मंडईतल्या गर्दीमध्येही सहज ओळखून येतात. ब्रँडेड जीन्स आणि टी-शर्ट , एका हातात महागडा मोबाईल व दुसर्‍या हातात पर्स हि त्यांची ओळख. मल्टीप्लेक्स , शॉपिंग मॉल मध्ये बिनधास्त पैसे वाया घालवणार्‍या ह्या बायका मंडईमध्ये १-२ रुपयासाठी घासाघीस करताना पहावयास मिळतात. "too costly ......ohh.....too much ......" असे उद्गार ऐकल्यास ती शक्यतो सॉफ्टवेअर मधलीच समजावी. इथे bargaining हा त्यांच्यादृष्टीने मूळ मुद्दा नसून " IT मधली असले म्हणून काय झाले? मलाही भाज्यांमधले कळते म्हटलं...." हे जगाला पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मजेची गोष्ट म्हणजे अश्या बायकांना मंडईतले विक्रेतेही ४-५ रुपये आधीच वाढवून सांगतात. एज्युकेटेड बायकांना हे अजूनही कळालेले नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मित्र हो, हा लेख लिहण्याचा उद्देश हाच की, तुम्ही सॉफ्टवेअरमधल्या मुलीशी लग्न करत असाल तर पुन्हा विचार करा. बोटांवर मोजण्याइतक्या बायकांना स्वयंपाक येत असेलही, पण होणारी बायको त्यांपैकीच आहे का नाही ते तुम्हालाच ठरवावे लागेल. तुम्हाला स्वत:ला चांगला स्वयंपाक येत असल्यास उत्तमच. पण ह्याचा फायदा IT मधल्या मुली घेणार नाहीत ना हे तपासून पहा. लग्न झालेल्या मित्रांनो , काळ बदलला आहे. मी स्वयंपाक करायला शिकलो. तुम्ही केंव्हा शिकणार?? अजून वेळ गेलेली नाही. चला , उठा....आतातरी स्वयंपाक करायला शिका.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36749
प्रतिक्रिया 158

प्रतिक्रिया

In reply to by शिल्पा ब

तुमच्यासारख्या अजिबात स्वयंपाक घरात पाऊल न ठेवणाऱ्या मुली आजच्या काळात असतील तर नक्कीच मोर्चा काढावा लागणार....!

In reply to by मृत्युन्जय

मृत्यूंजय... लेख नीट वाचला नाहीत असे दिसतेय. निदान शीर्षक तरी वाचायचेत...
बाकी रुप, वय, शिक्षण, वागणुक आणि विचारसरणी गौण आहे
बाकीचे राहूदे, पण इथे शिक्षण महत्वाचे आहे.. ती मुलगी आयटी तली असली पाहिजे. म्हणजे किमान बी.ई. झालेली पाहिजे. त्यानंतर तिने नॉन आयटी क्षेत्रात नाही, तर आयटीतच नोकरी करायला हवी. म्हणजे गलेलठ्ठ पगार आलाच. तो पगार तिने ब्रंडेड कपड्यावर आणि महागाच्या मोबाईलवर वाया घालवायचा नाही. आणि त्यानंतर मग ओफिसमध्ये ८-१० तास काम करुन आल्यावर तिने लगेच पळ्या, उलथने आनी झारेच हातात घेतले पाहिजेत आणि उत्तमच स्वयंपाक केला पाहिजे. तो न येण्याबद्दल तिने कारणे द्यायची नाहीत. आणि अगदी पहिल्या दिवसापासून आणि प्रत्येक वेळी तिचा् स्वयंपाक चांगला झालाच पाहिजे. कारण जर तिने योग्य वेळेत स्वयंपाक शिकला असता, तर तिच्यावर स्वयंपाक बिघडण्याची वेळ आली नसती... कळले का आता???

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नक्की कोण मारणार ते सांगा अदितीतै (तै जरा जास्त होतय नाही?) . म्हणजे तसा बचाव करायचा प्रयत्न करतो.

In reply to by मस्त कलंदर

वाचला हो नीट. म्हणुनच म्हणतो आयटीची दारे मुलींसाठी बंदच करुन टाका ना. कटकटच नाही. लेख आणी शिर्षक नीट वाचुनच मत मांडले. लेखकापेक्षा थोडेसेच वेगळे आहे बघा

In reply to by मृत्युन्जय

तुम्हाला जे अथक प्रयत्नांनी पुर्णपणे उमजून ते चुकले आहे हे तुम्हीच मान्य केल्याबद्दल धन्यवाद..! मी लेखात आणि कुठल्याही प्रतिक्रियेत असे म्हटलेले नाही कि बायकांनीच फक्त स्वयंपाक केला पाहिजे.....दोघांनाही स्वयंपाक यायला हवा हे मी आता इथे ४-५ व्यांदा लिहित आहे...जरा आदल्या मधल्या प्रतिक्रिया पण वाचत चला...! "काळ बदलला आहे.मुलांनो स्वयंपाक शिका" हे मी लेखाच्या शेवटी लिहिलेले आहे..तुम्हाला नेमका कशाचा प्रोब्लेम आहे हे मला कळले नाही...! तुम्हाला स्वयंपाक शिकायचा नाहीय...का अजून काही....हे काही स्पष्ट झाले नाही...बायकांनी ऑफिसमध्ये जाऊन काम करावे का नाही हा त्यांचा प्रश्न आहे....पण थोडा का होईना स्वयंपाक हा यायलाच हवा हे माझे मत आहे...! बाकी तुम्ही शेवटी शेवटी विनोदी विचार मांडून सगळ्यांची खूप करमणूक केलीत...मजा आली... :-) बाकी , आगीत तेल ओतण्याची कामे सुरु ठेवा....! तुम्हाला शुभेच्छा...!

In reply to by सुजय कुलकर्णी

दोघांनाही स्वयंपाक यायला हवा हे मी आता इथे ४-५ व्यांदा लिहित आहे...जरा आदल्या मधल्या प्रतिक्रिया पण वाचत चला...!
बूंदसे गयी वो हौदसे नहीं आती म्हणतात. तुम्ही तर उलट केलेत. हौदाने अंगण शिंपलेत आता प्रतिसादातून बुंद्या टाकून काय उपेग? सोडून द्या! होतं असं कधीतरी. आता रंगपंचमी एंजॉय करा किंवा पुढच्या लेखाची तयारी.

In reply to by प्रियाली

=)) =)) 'खतरनाक' प्रियालीदेवींचा विजय असो. प्रतिसादाच्या बुंदी हा शब्दप्रयोग तर फारच जास्त आवडला. एकूणच मिपावरच्या मुली, बायकांना स्वयंपाक येत नाही या चुकीच्या गृहितकावरच हे माना कापलेले कोंबडे फारच थैमान घालत आहेत. -- अदित्सु

In reply to by सुजय कुलकर्णी

"काळ बदलला आहे.मुलांनो स्वयंपाक शिका" हे मी लेखाच्या शेवटी लिहिलेले आहे..तुम्हाला नेमका कशाचा प्रोब्लेम आहे हे मला कळले नाही...! तुम्हाला स्वयंपाक शिकायचा नाहीय...का अजून काही....हे काही स्पष्ट झाले नाही...बायकांनी ऑफिसमध्ये जाऊन काम करावे का नाही हा त्यांचा प्रश्न आहे....पण थोडा का होईना स्वयंपाक हा यायलाच हवा हे माझे मत आहे...! आयटी मधील बायको हवी / ती कमवणारी ही हवी पण आता हा नविन प्रतिसाद सारवा सारव करायला. अरे व्वा ! सुमडी में लोमडी

मॅच निकालात न लावण्याचा पकका निर्धार केला आहे वाटतं सगळ्यांनी, आत्तापर्यंत या धाग्यांनी प्रियदर्शन, डेविड धवन, राजकुमार संतोषी (अंदाज अपना अपना वाले) यांना सगळ्यांना मागे टाकले आहे. हसुन हसुन जबडा दुखायला लागलाय गालावर कायमच्या सुरकुत्या पडणार नाहीत म्हणजे झालं. मला असं वाटतं हा दोघेही काम करणा-या जोडप्यामधील महत्वाचा मुद्दा आहे- नि:संशय. १९व्या शतकातील बायको IT किंवा तत्सम कामांला जात नव्हती त्यामुळे तिला घरात वेळ जावा म्हणुन पाककृती, शिवणकला इ. शिकणे गरजेचे होतं. हो आता सगळं बदलयं. पण यावर उगाच घराचा कोळसा करत बसण्यात काहीच अर्थ नाही. दोघे ही काम करत असतील तर काम वाटून घेणे गरजेचे आहे. . नवरा घराबाहेरील कामे बघणार (किराणा आणणे, कार/मोटरसायकल सर्व्हीसिंग (दोघांच्याही), बिल पेमेंटस, प्लंबींग, फर्निचर, गॅस, फिटींग, पेपर रद्दी, आणि मोठ्या अवजड कामांसाठी जबाबदार जिथे अनोळखी माणसांबरोबर जास्त संबंध येतो अशी) आणि बायको घरातील कामांसाठी. याचा अर्थ असा नाही की सीमारेषा आखणे एकदाका हे काम झाले (कामे वाटून घेण्याचे) की झालं, आणि हो दोघे कधीही एकमेकांना त्यांच्या- त्यांच्या कामात मदत करू शकतात. उदा. बायको ऑफिसातील कामानिमित्त घरी उशीरा येणार असेल आणि स्वयंपाकाची जबाबदारी तिच्यावर असेल आणि नवरा घरी लवकर आला असेल तर नव-याने तिला सोपे होईल असे काही काम करण्यात(भाजी चिरुन ठेवणे, कणीक तिम्बणे इ.[असं होण्याचे चान्सेस खुप कमी कारण माझ्या मित्रांपैकी दोघेही कामाला जातात तिथे एकतर बाई कामाला आहे किंवा दोनवेळा स्वयंपाक कोण बनवत नाही] तसं नसेल तर महिन्यातून दोन तीनदा बाहेरून जेवण मागविल्याने तुम्ही ’रस्त्यावर येणार नाही”. टेलिफोन ऑफिस बायकोच्या कंपनीच्या रस्त्यावर पडत असेल तर तिने ते काम कधीतरी पार पाडावे. तर माझं असं म्हणणं आहे की उगाच खाजवून आवदान आणू नका. इथे ब-याच प्रतिसादांवरून असे लक्षात येईल बरेचसे पुरूष समंजस भूमिका घेताना दिसत आहेत की बाबा हो तिला स्वयंपाक करण्यात मदत करणे गरजेचे आहे किंवा स्वयंपाक ही फक्त तिची जबाबदारी नसुन दोघांची आहे. पण ब-यापैकी सगळ्या स्त्रिया जरा कमी प्रमाणात समंजस भुमिका घेताना दिसतात (आर या पार) पुरुष नुसता TV बघत बसत बसतो इ. हां जर तो काहीच घराबाहेरील/घरातील काम करत नसेल तर त्यांचा राग मान्य. पण जर पुरुष बाहेरच्या कामांसाठी जबाबदार आहे आणि तो त्या जबाबदा-यांपासुन का-कू करत नसेल तर स्वयंपाकाची जबाबदारी पार पाडत असताना बायकांनी का-कू करू नये. दोघे प्रेम करतानां एकमेकांवर? मग कशाला पाण्यात बघायचे एकमेकांना? जेंव्हा जेंव्हा माझी बायको स्वयंपाक करते तेंव्हा तेंव्हा मी भांडी घासतो. टी-शर्टच्या भाया सारून बसलो आहे.. या.

मी या लेखकाची पंखा झालेय...:) (कितीहि सहमती/विरोध असला तरी) स्वगतः नक्की नविनच सदस्य आहेत का हे? (परखड) माया. --------------------------------------------------------------------------------------- © "बादवे"

खरंच मला तरी सगळा स्वयंपाक येतो बुवा... पुरणपोळी सोडुन... आणी हो आमच्याकडे आठवड्यातुन ३ दिवस खिचडी असते.. पण इथे एक जागतीक सत्य अनुभवास आले... ( कुठले ते विचारु नका, आमचा पण सुजय कुलकर्णी होईल)

In reply to by अमोल मेंढे

आणी हो आमच्याकडे आठवड्यातुन ३ दिवस खिचडी खिचडी तुम्ही करता की तुमची बायको करते? बायको करत असेल तर ती आय टी मध्ये आहे का? आय टी मध्ये नसेल तर तिने खिचडी करणे योग्य आहे का? ज्या दिवशी खिचडी नसते त्या दिवशी स्वयंपाक तुम्ही करता की बायको करते? स्वयंपाक बायको करते तेंव्हा तुम्ही घरी जेवता का की स्वतः वेगळा स्वयंपाक करुन खाता? बायको आय टी मध्ये नसेल तर आय टी मधली असली असती तर बरे झाले असते, खिचडी खाण्यापेक्षा होटेलातील बिर्याणी खाता आली असती असे मनात येते क?

एकंदरीत सुजयच्या कोल्हापुरी मिरच्या बऱ्याच जणांना झोम्बलेल्या दिसतायेत

In reply to by इरसाल

+१००० पण स्वतःला स्वयंपाक येतोय असे म्हणणाऱ्या (का वाटणाऱ्या?) लोकांना मिरच्या का झोंबल्या ते कळत नाही :)

बायकोबी पायजे सुंदरबी पायजे भल्ली गोडबी पायजे आयटीबी पायजे कमवणारीबी पायजे अन सैपाक करणारीबी पायजे जरा जास्तच ना भौ...

लेखकाशी अंशतः सहमत! पुरुषांनी कितीही झक मारली तरी आईचा, बहिणीचा, पत्नीचा प्रेमामृत वर्षाव झालेले अन्न .. अहाहा!! त्याची चवच वेगळी.. आपल्याकडे शिजवण्यापेक्षा त्याच्या मागच्या भावनांना जास्त महत्व आहे. केवळ IT मध्ये काम करतात म्हणुन, सकाळ संध्याकाळ पिझ्झा, पावाचे तुकडे, सिरियल, नुडल आणि काय काय पाश्चात्य पदार्थ न रांधता, साजुक तुपातला शिरा केला तर बिघडत नाही. पण म्हणुन स्त्रियांनीच राबायचे हे मात्र चुकच,, IT मध्ये कामाच्या नावाखाली शिमगा असतो हे मान्य आहे (IT वालाच मी) पण बाकीचे ताप कमी नसतात.. त्यामुळे मानसिक थकवा जस्त येतो. हे पन लक्षात घ्या! स्वयंपाक = स्वतः शिजविलेले, इथे लिंग भेद कुठे आला? कधी तुम्ही करा, कधी तिला करुदेत, कधी दोघे मिळुन करा.. पण हे सगळं पण चार भिंतींच्या आत, बाहेर सावळा गोंधळ कशाला?