रंगाशेठ,
अमच्या पेटंटेड विषया मध्ये आपले स्वागत असो..;)
झकास विडंबन..
(वाचक) केशवसुमार..
कन्यका तुमची
माझी ताई!... वरून आम्हाला आमच्या मिपावरच्या पहिल्या रेशमाच्या बाबांनी विडंबनातील
भीड नाही केली आल्यागेल्याची
मागितली माफी मी त्या मेल्याची
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !
ओळी आठवल्या...
(स्मरणशील)केशवसुमार
ठेवतो अपेक्षा
होईल रंजन
करीता मी फोन
आज तुला
एकएकी तुझे
सुजे कानफाट
चालताच हात
बायकोचे
सत्वरी धाडीतो
छडी ही चिंचेची
बाईल तुमची
माझी ताई
सरले तारुण्य
उरले कारूण्य
प्रार्थनेचे पुण्य
घेई रंगा
छंदः महाद्वाड
:)
कसली अपेक्षा?
कसले रंजन?
कशाला तो फोन
उगा करा
का बरे करावी
आमची उपेक्षा
कानफाटी दीक्षा
कोणी दिली?
कशास धाडिता
चिंचेच्या फोकास
बाईल टिपेस
ओरडते!
सरले ते मोह
संसाराची हाय
धरतो मी पाय
डांबीसाचे!
छंद : शरणद्वार
रंगाशेठ,
काय हे लगेच शरणव्दार... आहो त्याच चिंचेच्या फोकानं डांबिसाला इंगा दाखवायचा नां..
(माचिस)केशवसुमार
शेवटी काय 'सारी दुनिया एक तरफ आणि जोरू का भाई एक तरफ' म्हणतात हेच खरं
(जोरुका गुलाम)केशवसुमार
जबर्या, एक से एक ...
ही आमची विनंती
---------------------------------------------
आधार जीवाला
इथे मिपावर
दंगा धाग्यावर
रोजचाच ..
प्रार्थनेच्या नादा
योजले दर्शन
जाहले मर्दन
दुर्दैवाने ..
विडंबने इथे
एकाहुनी एक
धमाल कडक
प्रतिसाद ...
रोजच्या कामाचा
गंडला हिशेब
बघतो साहेब
चष्म्यातुनी ...
करितो विनंती
व्हावे हे मतैक्य
हसणे अशक्य
हापिसात ...
छंद : कामाचा'भार'
-------------------------------------------
ठेवतो अपेक्षा
मिळावे दर्शन
घरात मर्दन
आज तुझे..
एक एक तुझे
प्रकटती धंदे
कलंत्र हे वदे
अरे चोरा!...
ठोकण्या पाठवी
चिंचेच्या फोकास
पिवळा डांबिस
भाऊ राया!...
अवकळा उरे
सरली नेणीव
'उरली' जाणीव
संपला रे...
छंदः बंदव्दार
परपीडे मन,
दु:खी झाले बहु
म्हणोनिया बाहु,
पुढे केले.
विषाच्या मिषाने,
लाचावली जिव्हा,
मोक्ष देता केव्हा,
चतुरंगा ?
जिन्याची ती वाट,
मुक्तीचे ते पीठ,
खोलीत वैंकुठ,
चतुर्भुज.
दीनांच्या दयाळा,
पुरवावा चाळा,
तोषावे या बाळा,
अडगळा.
स्वतःला बडवुन घेण्याचा तो एक सण अस्तो ना तो हाय का आज?
आता तो आपला न्हव पण चालु द्या..कोपरापासुन वगैरे नमस्कार पुरायचे न्हाइती हिथ म्हणुन आमचा दंडवत कबुल करा.
धन्य ती प्रार्थना
धन्य विडंबन
साष्टांग वंदन
रंगाकाका
एकाहून एक
प्रतिसाद भारी
मुक्त-बंद द्वारी
किती छंद
वेड लागेल रे
किती हासवावे
आता वाचवावे
पांडूरंगा!
झाली ना उपेक्षा?
मिळाले दर्शन?
हिशेब घेईन
आज तुझा!
सांग कितीकांचे
प्रकटले तात
झाली रूजवात
अरे चोरा!
शेकलेल्या पाठी
बाभळीची काठी
त्यांचे दादा-भाई
माझे नवरोजी!...
अवकळा झाली
उरली ऊणीव
आता तरी मेल्या
सावर रे...
छंदः घरदार
आणि इतक्या मोठ्या संखेने मिपाकर त्यात सहभागी झाले हे पाहून डोळे पाणावले! ;)
सर्व सहभागी मिपाकरांचे आभार मानून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा घ्यायच्या नाहीयेत! ;) पण तरिही म्हणावेसे वाटते ...
नको ते दर्शन
नको ती उपेक्षा
कशाला अपेक्षा
मोक्षाची ती!
एकामागे एक
प्रकटले सात
ओव्या टाकतात
शीघ्रकवी!
शेकल्या जीवाला
पडतो आराम
वाचना विश्राम
आता नको!
शब्दकळा भारी
ओव्यांचा सुखांत
सरली हो भ्रांत
म्हणे रंगा!
छंद : मिपाद्वार
नको ते लिखाण
अतिच बाष्कळ
कशाला उपेक्षा
माध्यमाची
एकामागे एक
ठाकले की उभे
'जुळारी' मिपाचे
सिद्धहस्त
तापल्या हवेला
हवी होती शांती
आता ही मिळाली
जय यशो
'रंगा'चा आरंभ
अडगळ डॉन्या
बहुगुणी केसु
पिडां भारी
छंद - भाराभार
कवितेची 'वृत्ती' जरी चांगली असली तर 'वृत्ता'त मार खाल्ला हो ऽऽऽऽ
वृत्ताला पार फाट्यावर मारले आहे की ;)
स्वगत : आयला हा नियम माहित नव्हता, नाहीतर ढीग लावला असता की विडंबनाचा ;)
डान्राव तुमची वृत्तीच वाईट असल्याने तुम्ही वृत्ताच्या भानगडीत पडू नका. गणित यावं लागतं त्यासाठी, चार आणि सहा अक्षरं मोजावी लागतात.
बादवे, 'अडगळ' हा शब्द विशेषनाम म्हणून वापरला असला तरी तुमच्या पूर्वग्रहदूषित दृष्टीला ते थोडंच दिसणार!
आणि हो, तुम्ही विडंबनांचा ढीग लावण्याआधी केशकलपावर, आपलं केशकलापाबद्दल लिहीणार आहात ना ...
डान्राव तुमची वृत्तीच वाईट असल्याने तुम्ही वृत्ताच्या भानगडीत पडू नका. गणित यावं लागतं त्यासाठी, चार आणि सहा अक्षरं मोजावी लागतात.
आमच्या वृत्तीचे एक सोडा ( तसे म्हणले तर आमच्या बाबतीत सगळेच सोडा )
असो.
नुसती अक्षरे मोजुन कुठला 'छंद' पुर्ण होत नाही.
अजुन बरेच काही असते, असो.
मला कळालेला देवद्वार छंद :
१. ४ ओळींची एक रचना
२. पहिल्या ३ ओळीत प्रत्येकी ६ अक्षरे
३. शेवटची ओळ ४ अक्षरांची
४. दुसर्या व तिसर्या ओळींचा शेवट "सारख्याच शब्दांनी" झाला पाहिजे.
अवांतर : मात्रांची माहिती नाही, स्वारी !!!
हे पहा ...
http://www.misalpav.com/node/4503
- ( छंदबद्ध ) डॉनोपंत
'अडगळ' हा शब्द विशेषनाम म्हणून वापरला असला तरी तुमच्या पूर्वग्रहदूषित दृष्टीला ते थोडंच दिसणार!
नव्हे, तो आमचा आक्षेपच नव्हे.
आमचा आग्रह फक्त काव्याची साधनशुचिता ( म्हणजे काय ते देवाला माहित ) पाळणे हा होय.
- ( साधनशुचितेच्या मोहातला ) डॉन्या गडकरी
तुम्ही विडंबनांचा ढीग लावण्याआधी केशकलपावर, आपलं केशकलापाबद्दल लिहीणार आहात ना ...
१००% लिहणार आहे.
बाभळी धरणाचा प्रश्न सुटला आणि त्यावर मी एक लेख लिहला की पुढचा लेख हाच ...
- ( आण्णा ) डॉन्या नायडु
यावर
ठ्यो!!!!!! =)) =)) =))
=))
फुटलो !
येप्प
छंदः परद्वार =)) मान्यवरांची
खल्लास!
सिक्सर!!
हा हा हा..
हाहाहा!!! रेवती काय बोलणार
असं आहे काय? आँ?
त्यापेक्षा 'बंदद्वार' आंदोलन
ओता तुम्ही अजुन तेल. बाकी
काही खरं नाही रंगाण्णांच! =))
म्येलं आता हे!!!:)
>>एकएकी तुझे सुजे
हेहेहेहे
सहमत ...
अगागागा
कसली अपेक्षा?कसले
छ्या..
हाण्ण तिच्यायला ...
कामाचा'भार'
हे हे हे
=)) =)) =)) लै भारी!
(प्रार्थना)-२
अरे
मांडवली
अडगळ राव करु नका मौज येते मग
परपीडे मन,
धमाल...
ये ब्बात है!!! शेवटी म्हटले
स्वतःला बडवुन घेण्याचा तो एक
हॅहॅहॅ
वाय झेड
जबरा चालु आहे.. लगे रहो
(विषय दिलेला नाही)
भन्नाट
तीच नारी ।तोच पलंग
खण्ण!!!!
लगे रहो
धन्य धन्य!
'घरचा आहेर' अपुरा राहिला होता असं वाट्लं...हा घ्या
यशोधरेने प्रार्थना काय म्हटली
नको ते लिखाण अतिच
मार खाल्ला ...
नवख्या लोकांना माहित नसल्यास ह. घ्या ही नम्र विनंती.
जळजळ पोहचली ...
छंदफंद
मजा आला !