Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रेशमाच्या बाबांनी

क — केशवसुमार, गुरुवार, 09/20/2007 - 00:06

प्रतिक्रिया द्या
38046 वाचन

💬 प्रतिसाद (43)
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/20/2007 - 00:31 नवीन

अवचित आला बाबा म्होऱ्यात :)

आणि आम्हाला ते 'प्रसव' का काय म्हणतात त्या वेदना सुरू झाल्या अच्छा! म्हणजे आपलं मराठी आंतरजालीय वाचन साईनऑफ स्थितीत राहूनसुद्धा बर्‍यापैकी सुरूच असतं वाटतं! की अलिकडेच कधी विल्मिंगटनच्या काकांकडे च्चक्कर टाकली होतीत? :) असो! 'रेघांनी' च्या जागी 'बाबांनी' हा शब्द फार आवडला. तसेच 'हात नगा लावू माझ्या बॉडिला' ही ओळ इतकी चित्रदर्शी वाटली की ती वाचताना, संजोपरावांच्या बंगल्यावर भेटलो असताना टीशर्ट आणि लुंगी या पेहेरावात पाहिलेली तुमची बेताची (!) बॉडीही डोळ्यासमोर आली! :) जात होती वाटेनं ती तोऱ्यात अवचित आला बाबा म्होऱ्यात ह्यातला 'बाबा' हा शब्द फार आवडला. जवानीत आम्ही ज्या पोरीवर जिवापाड लाईन मारत होतो तिचा खत्रूड चेहेर्‍याचा जन्मदाता डोळ्यासमोर आला! व्वा, फारच चित्रदर्शी विडंबन..:) म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला हात नगा लावू माझ्या बॉडीला ! सुंदर..:) केशवराव, मिसळपाववर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपली उत्तमोत्तम विडंबने आणि कविता आम्हाला येथे वाचावयास मिळोत हीच सदिच्छा! 'कच्चा माल' हवा असेल तर तूर्तास आम्ही अशोक गोडबोले या आमच्या कवीमित्रास येथे आणलेले आहे. त्यांना जमल्यास एखाददा ट्राय करा! :) आपाला, (परमस्नेही व आडनांवबंधू!) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 09/20/2007 - 06:49 नवीन

सहमत / सावधगिरी

'रेघांनी' च्या जागी 'बाबांनी' हा शब्द फार आवडला. तसेच 'हात नगा लावू माझ्या बॉडिला' ही ओळ इतकी चित्रदर्शी वाटली सहमत आहे. त्याचबरोबर तुमच्या घोडीला ताई म्हणेन, हे तर खल्लास!!! विषयात तोचतोचपणा असला, तरी फिट्ट बसणारी शब्दयोजना लेखनाला वेगळाच स्वाद प्राप्त करून देते, याचे हे विडंबन उत्तम उदाहरण म्हणता येईल. की ती वाचताना, संजोपरावांच्या बंगल्यावर भेटलो असताना टीशर्ट आणि लुंगी या पेहेरावात पाहिलेली तुमची बेताची (!) बॉडीही डोळ्यासमोर आली! :) याबाबत काही मत मांडणे तूर्तास शक्य नाही. जवानीत आम्ही ज्या पोरीवर जिवापाड लाईन मारत होतो तिचा खत्रूड चेहेर्‍याचा जन्मदाता डोळ्यासमोर आला! व्वा, फारच चित्रदर्शी विडंबन..:) पुन्हा सहमत!!! केशवराव, मिसळपाववर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपली उत्तमोत्तम विडंबने आणि कविता आम्हाला येथे वाचावयास मिळोत हीच सदिच्छा! 'कच्चा माल' हवा असेल तर तूर्तास आम्ही अशोक गोडबोले या आमच्या कवीमित्रास येथे आणलेले आहे. त्यांना जमल्यास एखाददा ट्राय करा! :) बापरे!! अनेक होतकरू विडंबनकारांसाठी 'मिसळपावचे सदस्यत्त्व घेतल्यास कच्चा माल आणि तो पुरवणारे दोन्ही फ्री' छापाची जाहिरात तर नाही ना वाटत ही? सावधगिरी बाळगा हो तात्या; उद्या कविता/गीते/गझलाबिझला लिहिणारे कच्चा माल म्हणून विडंबने आणि केशवसुमार वा तत्सम कुणीतरी ट्राय करायला मागायचे ;) :) (सावध) बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सन्जोप राव गुरुवार, 09/20/2007 - 07:04 नवीन

केशवसुमारांची बॉडी बेताची?

संजोपरावांच्या बंगल्यावर भेटलो असताना टीशर्ट आणि लुंगी या पेहेरावात पाहिलेली तुमची बेताची (!) बॉडीही डोळ्यासमोर आली! दोन चुका तात्या. बंगला सन्जोप रावांचा नाही (जशी सर्किटला तुम्ही जीतून फिरवले ती गाडी तुमची नाही!) आणि केशवाची बॉडी बेताची? हां अर्थात तुमच्या आमच्या तुलनेत बेताचीच, पण तरीही आज उद्या नंबर तपासून घ्या. (चाळीशी आली आता!) सन्जोप राव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
क
केशवसुमार Fri, 09/21/2007 - 18:42 नवीन

नजर नगा लावू माझ्या बॉडीला

देवगडच्या तात्यांनू अन कोल्हापूरच्या रावांनू विषय माझ्या बॉडीचा का काढीला नजर नगा लावू माझ्या बॉडीला.. चूक झाली माझी लाखमोलाची दाखिवीली बॉडी तुम्हा बेताची विसरलो आहेकोण आहेकोण जोडीला नजर नगा लावू माझ्या बॉडीला ! भीड काही ठेवा आल्यागेल्याची वाकडी ही नजर तुम्हा मेल्यांची घाबरून असतो "केश्या" , तात्या तुमच्या जाडीला नजर नगा लावू माझ्या बॉडीला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव
व
विसोबा खेचर Fri, 09/21/2007 - 18:48 नवीन

:))

ख ल्ला स !!! अरे केशवा, लेका किती कविता आणि विडंबनं प्रसवशील?! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 21:42 नवीन

तात्काल प्रसव

घाबरून असतो "केश्या" , तात्या तुमच्या जाडीला हा हा हा !!! केशवसुमारजी, साष्टांग दंडवत ! दुसरे शब्दच नाहीत ! आपल्याला एक आयडीया देतो. एकाच कवितेची शंभर विडंबने करून त्याचा संग्रह प्रकाशित करावा. मराठीत तार काय, कुठल्याही भाषेत आजवर असा प्प्रयोग झाला नाही. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
क
केशवसुमार Sat, 09/22/2007 - 12:15 नवीन

शंभर !!!

काय राव गमज्या करताय का गरीबाची.. बाकी सर्किटशेठ आयडीयेची युक्ती बेस्टच आहे.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/20/2007 - 00:51 नवीन

धमाकेदार सुरुवात !

मागील पानावरून पुढे चालू ! मस्तच ! - सर्किट
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत गुरुवार, 09/20/2007 - 02:20 नवीन

वा

सहर्ष स्वागत आहे! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 09/20/2007 - 06:34 नवीन

मस्त

दिवसाची सूरवात तर छान झाली!!
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 09/20/2007 - 08:20 नवीन

स्वागत

धमाकेदार सुरुवात.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना गुरुवार, 09/20/2007 - 11:20 नवीन

स्वासुगम्मत!

वा! वा! सुस्वागतम्म! तुमच्या विडंबनामुळेच लोकांना (केवळ कुतुहलापोटी) मूळ कविताही वाचणे भाग पडते. तुम्ही आलात.. आता लिहायला हरकत नाही. ;)
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/20/2007 - 11:50 नवीन

हेच

तुमच्या विडंबनामुळेच लोकांना (केवळ कुतुहलापोटी) मूळ कविताही वाचणे भाग पडते. असेच... स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
स
सुरेखा पुणेकर गुरुवार, 09/20/2007 - 11:32 नवीन

फरमास

हात नगा लावू माझ्या बॉडीला ! यिडांबान फरमास हाये. आनकी यखाद्या लावनीचं यिडांबान द्या की आमास्नी करून. नका जाऊ पावनं जरा थांबा ....
  • Log in or register to post comments
झ
झकासराव गुरुवार, 09/20/2007 - 11:45 नवीन

मी म्हणतो

जवानीत आम्ही ज्या पोरीवर जिवापाड लाईन मारत होतो>>>>>>>>.. तात्या मग आता खरच म्हातार झालात की काय? आता लायनी मारण बंद केल की काय? तात्या तुमच्या एका वाक्यातुन दोन प्रश्न तयार झाले आहेत. :) केसु तुझ विडंबन आवडल रे.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव गुरुवार, 09/20/2007 - 12:25 नवीन

फर्मास!

केशवसुमारांचे इथले आगमन अगदी झोकात झालेले आहे. पहिल्याच चेंडूवर सणसणीत षटकार ठोकलाय त्यांनी. ह्यापुढेही त्यांची झंझावाती टोलंदाजी आम्हा सगळ्यांना पाहायला मिळेल अशी आशा करतो.
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव गुरुवार, 09/20/2007 - 14:19 नवीन

रेशमाच्या

रेशमाच्या भावांनी,रेशमाच्या काकांनी तब्येतीने ठोकीले हो बॉडीला हात नग लावू या येड्याला. अश्या वळी घूसाडायला होत्या, बाकी जोरदार लिव्हले बरं का.
  • Log in or register to post comments
ज
जगन्नाथ गुरुवार, 09/20/2007 - 22:32 नवीन

हहलोपो!

हहलोपो!
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 09/21/2007 - 02:06 नवीन

फर्मास

हा माणूस बिन-विडंबनाच्या कविता कुठल्या आयडीखाली लिहितो ते कोणी सांगा मला. कारण लिहीत असलाच पाहिजे!
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/21/2007 - 23:58 नवीन

माझ्या माहितीप्रमाणे नाही

माझ्या माहितीप्रमाणे केशवसुमारांच्या मेंदूत बिन-विडंबनाच्या कविता करण्याच्या राखाडी पेशीच नाहीत. आणि तेच बरे आहे :-) - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ब
बेसनलाडू Sat, 09/22/2007 - 00:01 नवीन

आडनावबंधू

तात्यांचे हे आडनावबंधू त्यांच्या मूळ नावानेही छान कविता लिहितात आणि यापूर्वीही लिहिल्या आहेत, ही खरी गोष्ट आहे. पण सध्या त्यांना स्वतःला त्यांच्या या प्रतिभेचे मोल कवडीमोल वाटते, असे खात्रीलायकरित्या समजते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
क
केशवसुमार Sat, 09/22/2007 - 12:01 नवीन

च्यामारी..

बेशनशेठ, हा अंतरजालाच्या आचारसंहितेचा भंग आहे.. लोकांची गुपिते अशी चावडीवर बोलू नये.. पण छान का काय ते म्हणालात ना म्हणून निषेध नाही करत..;) पण तुमचे बातमीदार तुम्हाला खरच खात्रीलायक बातम्या देतात का ते बघा बुवा.. (लाडूप्रेमी) केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Sun, 09/23/2007 - 01:06 नवीन

संशोधन

छे हो, कसले बातमीदार बितमीदार!!! हा आमच्या 'संशोधनाचा' निष्कर्ष आहे. नाहीतरी इकडे बरेच 'संशोधन' चालू असतेच; म्हटले आपणही करावे थोडे ;) काय? (संशोधक!)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
आ
आजानुकर्ण Sat, 09/22/2007 - 08:32 नवीन

पांढरा शर्ट

केशवसुमार जेव्हा पांढरा शर्ट घालतात तेव्हा बिनविडंबनाच्या कविता लिहितात. आणि काळा शर्ट घालतात तेव्हा विडंबनाच्या. (शिष्योत्तम) आजानुकर्ण ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्रमोद देव Sat, 09/22/2007 - 09:30 नवीन

आधुनिक एकनाथ?

आजानुकर्ण हा आधुनिक एकनाथ दिसतोय. संजोप राव,केशवसुमार वगैरे ह्याचे बरेच (२१)गुरु दिसताहेत.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 09/22/2007 - 09:38 नवीन

एकनाथ की एकलव्य?

आजानुकर्ण हा आधुनिक एकनाथ दिसतोय. संजोप राव,केशवसुमार वगैरे ह्याचे बरेच (२१)गुरु दिसताहेत. तुम्हाला एकनाथ ऐवजी एकलव्य असं म्हणायचंय का प्रमोदकाका? अहो बिचार्‍या आमच्या नाथांना कशाला उगाच मध्ये आणताय? :)) आपला, (भागवतधर्मी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रमोद देव Sat, 09/22/2007 - 11:28 नवीन

एकनाथच!

कारण एकनाथांनी २१ गुरु केले होते असे नुकतेच कुठे तरी वाचल्याचे स्मरते. आजपर्यंत तू रावसाहेबांना आपला गुरु मानत होतास(भले ते तुला त्यांचा शिष्य मानोत अथवा न मानोत.... अस्सल पुणेकर...इति.पुलं).पण आज केशवसुमारांचेही पट्टशिष्यत्व पत्करलेस तेव्हा शंका आली. म्हटले हा देखिल नाथांचा आधुनिक अवतार दिसतोय (गुरु बनवण्याच्या बाबतीत).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ध
धनंजय Sat, 09/22/2007 - 23:27 नवीन

एकनाथच बरा, एकलव्य नको

पावसाळ्यात सुळकेबिळके चढून "आम्ही मराठी माणसं मनात आणलं तर असं वाटेल ते करू शकतो" म्हणायला आम्हाला जागा ठेवतात. उद्या बिन-अंगठ्यांनी एकलव्यांनी हेच पराक्रम केलेत आमच्या आळशी स्वाभिमानाचा पुरताच चंदामेंदा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सहज Sat, 09/22/2007 - 09:38 नवीन

गौप्यस्फोट

बघा देव साहेब केलात घाया. घ्या आता राहिलेल्या १९ सीट भरायला गुरूंची ही तारांबळ उडणार आहे की एखादा शिष्यच जाणे.. शिवाय ही बातमी सुटीच्या दिवशी जाहीर केलीत, लांब गावच्या भावी गुरूंना नाराज केलत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रकाश घाटपांडे Sat, 09/22/2007 - 10:33 नवीन

बोर्डातील विद्यार्थी

बोर्डात आलेल्या विद्यार्थ्याच्या नावावर इतके क्लास वाले आपला विद्यार्थी, असा शिक्का मोर्तब करतात कि हा आपले शाळा कॉलेज संभाळून किती क्लासला एकाच वेळी जात होता असा प्रश्न पडतो. प्रकाश घाटपांडे प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
क
केशवसुमार Sat, 09/22/2007 - 11:53 नवीन

घोळ..

प्रमोदशेठ, काय हे तुम्ही तुमच्या आवडत्या लेखकाचे आमच्याबद्दलचे हे वाक्य कस काय विसरलात? बर जाऊदे ते वाक्य इथे वाचा . बाकी अजानूकर्णशेठ तुम्ही खरोखरच शिष्योत्तम आहात.. गुरुची सगळी वाक्ये तुम्हाला तोडंपाठ दिसतात.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
अ
अनिला Sat, 09/29/2007 - 19:50 नवीन

वरील कविता

आहो, एवधे सुन्दर विड्म्बन अवघ्या त्रिख्डात वाचले नव्ह्ते.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 09/30/2007 - 08:33 नवीन

या वरून आठवले...

फारच मस्त विडंबन आणि पुढे अजून उस्फुर्त काव्य! अशा लोकांबद्दल आदर आणि अचंबा वाटतो! "रेशमाच्या बाबांनी" या ओळी वाचल्यावर एकदम "गंगा-यमुना डोळ्यात उभ्या का? " या गाण्याच्या या पहील्याच ओळींवरून मला वाटते वि.आ. बुवांनी विनोद केल्याचे आठवते की, "कवीला खरे तर आपल्या शेजारातील दोन मुलींच्या वागण्यावरून प्रश्न पडला आहे - गंगा यमुना बोळात उभ्या का?" याची आठवण झाली!
  • Log in or register to post comments
स
सुमीत Tue, 10/02/2007 - 09:03 नवीन

मस्तच

मस्तच आहे विडंबन काव्य, तात्यांचे प्रतइसाद आणी तुमचे उत्तरे वाचून तर ह ह पु वा
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 10/05/2007 - 15:16 नवीन

वाहवा

सुंदर विडंबन ! सर्व प्रतिसाद सुद्धा मजेदार. आगमन झोकात झाले आहे. अजून येवू द्या ! --लिखाळ. तिखट तर्री झेपत नसल्यानी जादा पाव आणि मिसळखाल्ल्यावर ताक आम्हाला पाहिजे असते. (अशीच माहितीची देवाणघेवाण हो!)
  • Log in or register to post comments
G
gavacha patil Sat, 03/29/2008 - 10:38 नवीन

reshmacha baap......laei danger.....!

aaplyala kavita laei aavadli.......baba....... reshmacha baap ani maza sasara ekcha kulatle.... tyacha mayala ... maza sashatang namskar. gavacha patil..
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Sat, 12/13/2008 - 19:25 नवीन

असेच एक

असेच एक विडंबन मी कुठेतरी ऐकले होते रेशमाच्या बाबांनी,काळ्या काळ्या हातांनी, रेशमाच्या कानाखाली वाजवली, रेशमा आमची घाबरली.... पुढचे काही माहीत नाही. (हे विडंबन माझे नाही! अधिच सान्गतो. )
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 06/19/2012 - 14:42 नवीन

ऐला काय खत्रा विडंबन!!

ऐला काय खत्रा विडंबन!! उत्खननसत्रात नजरेतून कसं काय सुटलं काय माहिती. गणपांचे अनेक धन्यवाद या धाग्याच्या पॉइंटरबद्दल :)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 06/19/2012 - 17:09 नवीन

असे असावे

असे असावे विडंबन . मिपावरील उत्खनन पटूस धन्यवाद !
  • Log in or register to post comments
ज
जाई. Tue, 06/19/2012 - 22:44 नवीन

मस्तच आहे हे

मस्तच आहे हे
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 12/28/2014 - 18:27 नवीन

@हात नगा लावू माझ्या बॉडीला !

@हात नगा लावू माझ्या बॉडीला ! =))))) अफाssssssssssट आहे हे! =))
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 12/28/2014 - 19:19 नवीन

सध्या हे "केशवसुमार" कुठे आहेत?

आज खूप दिवसांनी मनापासून हसलो.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 12/28/2014 - 19:33 नवीन

अप्रतिम...कोणीतरी यावर व्हिडो

अप्रतिम...कोणीतरी यावर व्हिडो रेकॉर्डिंग करायला हवे :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा