छोटे छोटे प्रश्न...!
एका वृत्तपत्रातले कात्रण ई-मेल मधुन आले. त्यातील प्रश्न मलापण नेहमी पडतात.
उत्तरे मात्र मिळत नाहीत....
खालील काही मजेशीर प्रश्न तुमच्यासाठी:
१) मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्रजी पेपरपेक्षा कमी का? - (माझ्या पाहण्यात काही ठीकाणी सारखाच भाव आहे.)
२) उडप्याच्या हॉटेलात कांदाभजी का मिळत नाहित?
३) लहान बाळाशी बोलताना मोठी माणसं बोबडं का बोलतात?
४) 'मीचं म्हणून तुमच्याशी संसार केला' असं प्रत्येक बाई आपल्या नवर्याला का म्हणते? :?
५) आपण हॉटेलात बसल्याबरोबर तिथला पोरगा नेमका आपल्या बाकाखालची फरशी साफ करायला कसा काय येतो?
६) 'तुम्ही हा प्रश्न चांगला विचारलात' 8> असं मुलाखत देणारा प्रत्येक माणूस प्रश्नकर्त्याला का म्हणतो?
७) सिनेमा पहायला गेल्यावर, जर तिथे एखादा मित्र भेटला तर 'अरे सिनेमा पहायला आलास वाटतं?' असं का विचारतो?
८) हॉटेलात इडलीसांबराती शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची?
९) 'गॅसवर दूध ठेवलयं, जरा लक्ष द्या' म्हणून बायकोनं सांगितल्यावर आपली नजर चूकवून दूध उतू कसं जातं?
१०) दो शेजारणी 'खुप काम पडलीत बाई' असं म्हणत दारात उभं राहून अर्धा अर्धा तास का बोलतं असतात?
११) 'अज्ञानात सुख असतं' असं म्हणत असताना माणूस ज्ञान मिळवण्यासाठी कां धडपडतो?
या व्यतरिक्त तुम्हाला माहीती असलेले प्रश्न येउद्यात...............
प्रतिक्रिया
उत्तर!
हे आसन करणा-याला
(विषय दिलेला नाही)
जालिंदर
सविताजी
असे भारी
थोडा बदल..
काही प्रश्नांची उत्तरे
१) मराठी
थेअरी ऑफ
शिल्पा ब
किंवा