Skip to main content

छोटे छोटे प्रश्न...!

लेखक श्रीराजे यांनी शुक्रवार, 23/07/2010 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
एका वृत्तपत्रातले कात्रण ई-मेल मधुन आले. त्यातील प्रश्न मलापण नेहमी पडतात. उत्तरे मात्र मिळत नाहीत.... खालील काही मजेशीर प्रश्न तुमच्यासाठी: १) मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्रजी पेपरपेक्षा कमी का? - (माझ्या पाहण्यात काही ठीकाणी सारखाच भाव आहे.) २) उडप्याच्या हॉटेलात कांदाभजी का मिळत नाहित? ३) लहान बाळाशी बोलताना मोठी माणसं बोबडं का बोलतात? ४) 'मीचं म्हणून तुमच्याशी संसार केला' असं प्रत्येक बाई आपल्या नवर्‍याला का म्हणते? :? ५) आपण हॉटेलात बसल्याबरोबर तिथला पोरगा नेमका आपल्या बाकाखालची फरशी साफ करायला कसा काय येतो? ६) 'तुम्ही हा प्रश्न चांगला विचारलात' 8> असं मुलाखत देणारा प्रत्येक माणूस प्रश्नकर्त्याला का म्हणतो? ७) सिनेमा पहायला गेल्यावर, जर तिथे एखादा मित्र भेटला तर 'अरे सिनेमा पहायला आलास वाटतं?' असं का विचारतो? ८) हॉटेलात इडलीसांबराती शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची? ९) 'गॅसवर दूध ठेवलयं, जरा लक्ष द्या' म्हणून बायकोनं सांगितल्यावर आपली नजर चूकवून दूध उतू कसं जातं? १०) दो शेजारणी 'खुप काम पडलीत बाई' असं म्हणत दारात उभं राहून अर्धा अर्धा तास का बोलतं असतात? ११) 'अज्ञानात सुख असतं' असं म्हणत असताना माणूस ज्ञान मिळवण्यासाठी कां धडपडतो? या व्यतरिक्त तुम्हाला माहीती असलेले प्रश्न येउद्यात...............
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4405
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

मेरी मर्र्र्र्र्र्र्जी! (आमी काय बी करू. तुमाला काय करायचय?)

सर्व प्रश्नांची ऊत्तरे मिळतात आसे ऐकुन आहे. (मी काय म्हणतो एवढ्यात नाही म्हणु नका प्रयत्न करायला काय हरकत आहे ;) ) fsdfs *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by jaypal

जालिंदर बाबा की काय हे? =)) =)) =)) ------------ आयुष्याचे हे चक्र चालते....साद घालते आशा....स्वप्नामागून सत्य धावते...ही दैवाची रेषा...... जन्मापासून कोण खेळवी...तुलाच नाही ठावे......हवे...हवे.....ची हाव सरेना...किती हिंडशी गावे.....

In reply to by सविता

जालिंदर बाबांची आठवण करुन दिल्या बद्दल =)) =)) =)) =)) =)) :)) :)) :)) :)) :O) :O) :O) :O) *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

In reply to by शिल्पा ब

असे भारी भारी फोटो कुठून मिळतात हो जयचित्रपाल तुम्हाला?

१) मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्रजी पेपरपेक्षा कमी का? - (माझ्या पाहण्यात काही ठीकाणी सारखाच भाव आहे.) राज ठाकरेचे अजून या गोष्टीकडे लक्ष गेले नाही म्हणून.. २) उडप्याच्या हॉटेलात कांदाभजी का मिळत नाहित? याचे उत्तर मात्र एखादा उडपीच देऊ शकेल. (उडप्याची मर्जी). ३) लहान बाळाशी बोलताना मोठी माणसं बोबडं का बोलतात? कारण लहान बाळानेही बोबडं बोलून आपले मनोरंजन करावे हा हेतू.. ४) 'मीचं म्हणून तुमच्याशी संसार केला' असं प्रत्येक बाई आपल्या नवर्‍याला का म्हणते? "देखणा नवरा दुसर्‍याचा" ..म्हणून.. ५) आपण हॉटेलात बसल्याबरोबर तिथला पोरगा नेमका आपल्या बाकाखालची फरशी साफ करायला कसा काय येतो? कारण आपले पाय(वहाणा) तेथली फरशी खराब करतात.. ६) 'तुम्ही हा प्रश्न चांगला विचारलात' असं मुलाखत देणारा प्रत्येक माणूस प्रश्नकर्त्याला का म्हणतो? असे सांगणारा त्यावेळी त्या प्रश्नावर विचार करत असतो. (याला fllers असेही म्हणतात... basically, actually हा त्यातलाच प्रकार आहे. पहा . http://en.wikipedia.org/wiki/Filler_(linguistics))...प्रश्नकर्त्याला खुष करणे हा ही एक उद्देश असतो. ७) सिनेमा पहायला गेल्यावर, जर तिथे एखादा मित्र भेटला तर 'अरे सिनेमा पहायला आलास वाटतं?' असं का विचारतो? नाही.. मी इथे ब्लॅकने टिकीट विकतो असे उत्तर द्यावे का? खादाडमाऊ

१) मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्रजी पेपरपेक्षा कमी का? - (माझ्या पाहण्यात काही ठीकाणी सारखाच भाव आहे.) जे ईंग्रजी पेपर उपवासाला चालतो म्हणुन. २) उडप्याच्या हॉटेलात कांदाभजी का मिळत नाही ईटालीयन आणी लेबनीज हॉटेलातही मिळत नाही म्हणुन. ३) लहान बाळाशी बोलताना मोठी माणसं बोबडं का बोलतात? चुचु ताई मोठ्यांशी सुद्धा बोबडं बोलतात. त्याचं काय? ४) 'मीचं म्हणून तुमच्याशी संसार केला' असं प्रत्येक बाई आपल्या नवर्‍याला का म्हणते? संसार यशस्वी झाला याची खात्री तिला त्याशिवाय पटत नाही म्हणुन. ५) आपण हॉटेलात बसल्याबरोबर तिथला पोरगा नेमका आपल्या बाकाखालची फरशी साफ करायला कसा काय येतो? तुमच्यापेक्षा जास्त काम त्याच्याकडे आहे याची जाणीव करुन द्यायला. ६) 'तुम्ही हा प्रश्न चांगला विचारलात' असं मुलाखत देणारा प्रत्येक माणूस प्रश्नकर्त्याला का म्हणतो? आणखीन प्रश्न विचारु नकोस याची आठवण करुन द्यायला. ७) सिनेमा पहायला गेल्यावर, जर तिथे एखादा मित्र भेटला तर 'अरे सिनेमा पहायला आलास वाटतं?' असं का विचारतो? कॉमन सेंस इज नॉट सो कॉमन. ८) हॉटेलात इडलीसांबराती शेवग्याची शेंग चमच्याने कशी खायची? तोंड प्लेटमधे घालुन डायरेक्ट तोंडाने खाल्लीत तरी कुणाची हरकत नसावी. ९) 'गॅसवर दूध ठेवलयं, जरा लक्ष द्या' म्हणून बायकोनं सांगितल्यावर आपली नजर चूकवून दूध उतू कसं जातं? कारण दुध आणी गॅस हे तुमच्या बायकोच्या कंपुत असतात. १०) दो शेजारणी 'खुप काम पडलीत बाई' असं म्हणत दारात उभं राहून अर्धा अर्धा तास का बोलतं असतात? बोलणे हे त्याच कामांपैकी एक असतं म्हणुन. ११) 'अज्ञानात सुख असतं' असं म्हणत असताना माणूस ज्ञान मिळवण्यासाठी कां धडपडतो? थेअरी ऑफ रिलेटीविटी. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

In reply to by शिल्पा ब

शाळेत होत की हे सगळं. आइन्स्टाइनची थिअरी आहे ती. विकीवर पहा.