आषाढी एकादशी:-
म्रुदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करुन त्याला प्रसन्न करुन घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवीला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फ़क्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या म्रुदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, उभयतांच्या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपुन राहिले. तिथे काही दिवसानी ब्रम्हा - विष्णू - महेश या तीघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. तिने नंतर देवांना अभय देऊन म्रुदुमान्याला ठार मारले. देवांनी तीची स्तुती केली आणि तीनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील.
तर अशी ही एक एकादशीची कथा.
आषाढ शुक्ल ११ व कार्तिक शुक्ल ११ या दोन एकादशांना महाएकादशी असे म्हणतात. त्यातील आषाढी एकादशीला शयनी एकादशी तर कार्तिकी एकादशीला प्रबोधीनी एकादशी असेही म्हट्ले जाते.
आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्रीविष्णु शयन करतात (झोपतात) ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजुत आहे. म्हणुनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला संपतो. हे चार महिने व्रतस्थ रहायचे असुन सणासुदीनी भरलेले आहेत.
फ़ार पुर्वि आर्य लोक ऊत्तर ध्रुव प्रदेशी किंवा त्याच्या जरा खाली वसति करुन रहात होते. तेव्हा याच दिवसात चार महिने त्यांना सूर्यदर्शन होत नसे. त्यामुळे सूर्यरुपी विष्णू झोपलेला आहे अशी कल्पना त्यांनी केली असावी व नंतर पुराणकारांनी त्या घटनेवर कथा रचल्या असाव्यात असे काही जणांचे मत आहे.
महाराष्ट्रातील विशेषत: भागवतधर्मीय किंवा पंथीय म्हणवणारे लोक या दिवशी उपवास तर करतातच पण शक्य तर पंढरीची वारी करुन श्रीविठ्ठ्ल दर्शन घेतात नच जमले तर गावातल्या एखाद्या देवळात जाऊन अभंग गाऊन ती रात्र नामसंकीर्तन, भजन, पूजनात घालवितात.
उपवास या शब्दाचा अर्थ केवळ उपास करणे किंवा दिवसभर उपासाचे खाणे असा नसुन थोडा वेगळा आहे. उपवास याचा मुळ अर्थ जवळ जाणे (उप + वास) असा आहे. म्हणजेच परमेश्वराच्या जवळ जाणे, त्याची आराधना करणे. परमात्म्याचे स्मरण करणे, त्याचा निकटवास अनुभवणे म्हणजे उपवास. उपासकाला आहार कमी करण्यावाचुन गत्यंतर नाही असे पाहुन धार्मिक साधनेप्रीत्यर्थ केलेल्या अन्नत्यागाला पुढे उपवास म्हणण्याची प्रथा पडली असावी. उपवासाने मन अंतर्मुख होते, द्रुष्टि निर्मळ होते, शरीर हलके रहाते, वासना शुध्द होते, संकल्प शक्ति वाढते.
आषाढी एकादशीच्या या व्रताला विष्णूशयनोस्तव असेही म्हणतात. चातुर्मास व्रतारंभ याच दिवशी करतात. यापुढील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना या दिवशी करतात.
आपल्याकडील नव्या पिढीतील लोकांना तसेच परदेशी स्थायीक झालेल्या लोकांना धार्मिक सण, व्रते, आपल्या परंपरा याची थोडीशी माहिती असावी या उद्देशाने हे लिखाण केले आहे. आणखी काही माहिती उपलब्ध असल्यास ती इथे अवश्य द्यावी. पुढील चातुर्मास काळात येणा-या व्रत आणि सणांची थोड्क्यात माहिती देण्याचा देखील विचार आहे.
बज्जु गुरुजी
वाचने
22196
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
बोला
संपादकांन
In reply to बोला by अवलिया
तृटी
In reply to संपादकांन by Nile
तूटी..
In reply to तृटी by ३_१४ विक्षिप्त अदिती
सुंदर
मान्य पण......
In reply to सुंदर by परिकथेतील राजकुमार
उपवास या
अजून भर
छान माहिती.
तेव्हा याच
बहुतेक
In reply to तेव्हा याच by ३_१४ विक्षिप्त अदिती
टिंग्या त
In reply to तेव्हा याच by ३_१४ विक्षिप्त अदिती
त्यासाठी
In reply to टिंग्या त by अवलिया
पूर्वी
In reply to तेव्हा याच by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to पूर्वी by पक्या
श्री
In reply to पूर्वी by पक्या
छे
In reply to श्री by Nile
खरे आहे,
In reply to छे by निस्का
नक्कीच आहे
In reply to श्री by Nile
कृपया
In reply to नक्कीच आहे by आमोद शिंदे
नविनच
मिपावरील
श्रद्धावान व धार्मिक
In reply to मिपावरील by परिकथेतील राजकुमार
काहीच
माहितीपुर
उत्तर ध्रुवावरचे आर्य ...?
"
दुवा मिळेल काय? ...
In reply to " by बद्दु
http://timesofindia.indiatime
In reply to " by बद्दु
छान माहिती
धन्यवाद
चातुर्मास
१. गटारी
In reply to चातुर्मास by पुष्करिणी
पण वर
In reply to १. गटारी by प्रभो
ही कथा पहिल्यांदाच ऐकली आहे.
In reply to पण वर by पुष्करिणी
फार छान
उपयुक्त
वा वा वा!
नायल्या,
In reply to वा वा वा! by Nile
आणि
In reply to नायल्या, by यशोधरा