संयत, विचारी प्रतिसाद देणारा आयडी अशी 'भोचक' यांची प्रतिमा होती. स्वतःलाच 'भोचक' म्हणवून घेणं, "आहेच मुळी मी भोचक", "आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो" अशी वाक्य स्वतःबद्दलच लिहीणार्या आयडीमागच्या माणसाबद्दल थोडी उत्सुकताही होती. जालीय वावर वाढल्यानंतर अभिनयशी व्यनी, खरडींमधून ओळखही झाली. इंदूर फार लांब आहे, तिथे मी कधी जाईन माहित नाही, पण कधी या बाजूला भोचकभाऊचं येणं झालं तर त्याला नक्कीच भेटू या असा विचारही मी अनेकदा केला...
ही टोचणी नेहेमीच राहिल.
अदिती
मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळासाठी मदतीचे आवाहन केल्यावर त्यांचा मला उपक्रमावर व्यक्तिगत निरोप आला होता. त्यात त्यांनी काही अतिशय चांगल्या सूचना केल्या होत्या. त्यातून त्यांची ह्याविषयीची अतिशय प्रामाणिक कळकळ व एकंदरच जी सहज मदत देऊ करण्याची वृत्ती दिसली होती ती अत्यंत लोभसवाणी वाटली होती.
अभिनय कुलकर्णी ह्यांचा जालांवरील अनेकांशी संपर्क असावा. एक सुचवावेसे वाटते. तुम्ही जसं जीमेलवरचं बोलणं संपादित करून इथे टाकलेले आहे तसे त्यांच्याशी संपर्कात असलेल्या इतर सुहृदांनीही केल्यास ती एक सार्थकशी श्रद्धांजली ठरावी.
त्यांना श्रद्धांजली.
वाचता वाचता लेख धुसर झाला! पुन्हा दिसु लागल्यवर प्रतिक्रीया द्यायला बसलो पण काय लिहु हेच कळत नाहिये
कुलकर्णी परिवाराला सहनशक्ती मिळो ही प्रार्थना
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
.......
त्यांच्या ब्लोग वर त्यांच्या लेकीचा फोटो बघीतला अन गलबलायला झालं
नकळत तिच्या फोटोवरुन मायेचा हात फिरवला
दैव ... नशिब ...
नेहमीच जिंकतो अन चटका देऊन जातो :-(
संध्याकाळ झाली पण ही बातमी काही मनाचा ताबा सोडत नाही ...
खुप सुन्न करुन गेली
~ वाहीदा
खरं तर 'कोण हे भोचक?' 'काय त्यांचा माझा संबंध?' असे प्रश्न पडतील...प्रॅक्टिकली विचार केला तर, पण.... तरीही सकाळी बातमी ऐकल्यापासुन काहीतरी भयानक विचित्र मनस्थिती झालीये.
"अरे धम्या, इंदुरात या की जोडीनं! इकडे पंचमढीला जाऊया, मांडवा फिरुया, सराफ्यात हादडुया.." असा नेहमी आग्रह करणारा हा सहृद कधी परका वाटलाच नाही. अगदी पहिला फोन झाला आमचा तेव्हाही कुणा त्रयस्थाशी बोलतोय असं वाटलंच नाही.. बक्कळ गप्पा व्हायच्या. ह्या मित्राची सामाजिक जाण, प्रगल्भता लख्ख जाणवायचं, पण म्हणुन समोरच्याला 'आपल्याला ह्यातलं काहीच कळत नाही बुवा' अशी भावना स्पर्शही करणार नाही ह्याची खबरदारी संभाषणातुन आपसुकच घेणारा असा हा मित्र!
कोण कुठला 'भोचक', नात्याचा ना गोत्याचा, पण सकाळपासुन विषण्ण वाटतंय, मधुनच गप्पा आठवतात आणि डोळे भरुन येताहेत...
मैत्रीमध्ये वितुष्टं येऊन काही मित्र आले आणि गेले, पण असा कधीच न परतण्यासाठी गेलेला हा माझा पहिलाच मित्र! काळजाला चटका लाऊन गेला.
भाग्यश्रीताईला हा दुर्दैवी प्रसंग पार पाडण्यासाठी देव बळ देवो!
खरं तर प्रश्न पडलाय आज..कोण देव? तो पुचाट? जो गणंग गाळ इथेच ठेवतो आणि सोन्याची काळिजं असलेले असे चांगले लोक घेऊन जातो?
खरच सुन्न करणारी बातमी
मागे एकदा राज ठाकरेंच्या धाग्यावर त्यांच्याशी चर्चा झाली होती
अत्यंत संयमी व्यक्तीमत्व वाटले मला ते
अभिनय कुलकर्णी उर्फ भोचक ह्यांना मिपा परिवारा तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
हि त्यांच्या अपघाताच्या बातमीची लिन्क
______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम
योगायोगानं मी वाचणारा पहिलाच होतो. रात्रीची झोप अस्वस्थ होतीच. सकाळी डोळा उघडला तेव्हाही ही बातमी पिच्छा सोडत नव्हती.
आंतरजालावरचे संबंध हे खरंच जालापुरते असतात का? ह्या प्रश्नाने पुन्हा एकदा मला भंडावून सोडले. भोचक ह्या आयडी मागच्या व्यक्तीला मी कधी भेटलो, बोललो किंवा जीटॉकही केलेले नव्हते. तरिही त्यांच्या मिपावरच्या मोजक्या वावरातून ही एक वेगळी व्यक्ती आहे इतका ठसा माझ्यामनावर उमटला होता.
त्यांचे इंदूरसंबंधीचे लेखन मला कायम भुरळ घालत आले मी ते आवडीने वाचत गेलो. प्रतिक्रिया देत गेलो. आयडीचे कवच अलगद गेले आणि एक व्यक्ती म्हणून मनात स्थान मिळाले.
आता पुन्हा अभिनय कुलकर्णींकडून काही लिहिले जाणार नाही आणि तेही अशा कारणाने ह्याचे मनस्वी दु:ख आहे.
ज्यांचा ह्याहूनही जास्त संपर्क त्यांच्याशी होता त्यांचे काय हाल झाले असतील हे समजू शकतो. इतकी असहायता फार कमी वेळेला अनुभवावी लागते.
त्यांच्या पत्नीला, मुलीला आणि इतर कुटुंबियांना जगण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना. त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.
(इथून पुढे कधी मी 'भोचक' हा शब्द नेहेमीच्या अर्थाने वापरु शकेन असे वाटत नाही..)
(साश्रु)चतुरंग
सकाळीच ही बातमी वाचून हतबल असल्याची जाणीव झाली.
त्यांच्या पत्नीला, मुलीला आणि इतर कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना. त्यांच्या दु:खात सहभागी आहे.
प्रतिक्रिया वा लेखावर ज्यांचे नाव बघितले की खाली लिहिलेला मजकूर उत्तमच असणार अशा काही व्यक्ती असतात. अशा यादीत मी हा "भोचक" हा "आयडी" टाकला होता. त्यांचा इंदूरवरचा लेख खूपच आवडल्याने स्वतःलाच तो रेफरन्ससाठी इमेल केला होता. असे त्यापूर्वीही कधी केले नव्हते आणि त्यानंतरही केले नाही.
काही माणसे समाजासाठी अॅसॅट असतात पण दुर्दैवाने धमुशेठने म्हटल्याप्रमाणे गणंग गाळ मागे राहतो आणि लखलखते सोने निघून जाते.
ईश्वरेच्छा बलियसि .. आता त्याच पांडुरंगाने हे डाँगराएवढे दु:ख सोसण्याची ताकद त्यांच्या आत्मियांना द्यावी एवढी प्रार्थना .. !
फेसबुकवर सम्राट फडणीसची पोस्ट पाहिली आणि थोड्या वेळातच ट्विटरवर नंदनचा ट्विट पाहिला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हे वापरून चोथा झालेलं वाक्य आहे पण अजून काही सुचत नाहीये.
रंगाने त्याच्या श्रद्धांजलीत शेवटी कंसात वापरलेल्या वाक्याशी पूर्णपणे सहमत.
सुन्न झालंय डोकं! काय लिहावं काही सुचत नाहिये...
भोचक नाशिकचेच असल्याने एक दोनदा त्यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यापेक्षा जास्त ओळख नव्हती. तरीही एक मित्र/जवळची व्यक्ती हरपल्यासारखं वाटतंय! :(
काही दिवसांपुर्वीच भोचक यांनी मराठी आंतरजालाबद्दल माहितीपूर्ण असा लेख 'लोकमत' मधे लिहिला होता-
http://onlinenews1.lokmat.com/php/detailedsuppliment.php?id=Manthan-52-1-03-07-2010-1eccb&ndate=2010-07-04&editionname=manthan
श्रद्धांजली !
आपण केवळ एक चांगला आणि सच्चा माणूस, (कधीही न भेटता देखील झालेला) सखाच गमावलेला नाही, तर एक प्रगल्भ विचार आणि कृती करणारा माणूसही गमावलेला आहे. फार नसतात अशी माणसं. हा विचार मनात येऊन अजूनच जास्त दु:ख होतं.
अभिनय कुलकर्णी नावाची व्यक्ती गेल्याचे सकाळी उपक्रमावर पाहीले आणि माहीत नसूनही अस्वस्थता आली. नंतर अभिनय म्हणजेच भोचक समजल्यावर तर अजूनही वाईट वाटले. कोणीतरी न पाहता देखील, जवळची व्यक्ती गेल्याची भावना आली.
भोचक यांच्यांशी कधी कधी व्य.नि.ने संवाद झाला होता. पण नंतर पुढे काही कारण नसताना संवाद करायचे राहून गेले होते... आता ती हूरहूर कायमच राहणार.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
प्रतिक्रिया
.
काय लिहू?
अभिनय न करता जगलेला अभिनय
.....
गलबलुन आले
खूप वाईट
हेच
...
अभिनयशी
संयत,
श्रध्दांजली.
.
मनस्वी लेखन
कधीही
अगदी मनातल
अगदी.
.
खरं बोललास
.....
अगदी हेच म्हणतो
अरेरे फार
---- -- Life is a questions
अरेरे!
सुन्न
..
श्रध्दांजली.
खरं तर 'कोण
फार वाईट
सुन्न
खरच सुन्न
...
काल रात्री श्रामोंनी निवेदन टाकलं
+१
अस्वस्थ
त्यांचे लेखन
अभिनय
श्रध्दांजली
श्रध्दांज
श्रद्धाजंली ..
.....
आजच सकाळी
आई ग!
इथे वाचा.
आपण केवळ
वाईट वाटले
त्यांच्या
हे इथे
:(
kaay bolav? kaay karav?
अत्यंत दुर्दैवी घटना...