Skip to main content

सहज सुचल म्हणुन

लेखक jaypal यांनी मंगळवार, 29/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
फार वर्षांपुर्वी एका वृध्दाश्रमाला भेट देऊन आल्यावर तिथल्याच एका देवळाच्या पार कट्यावर एकटाच बसलो होतो आणि तेवढ्यात वा-यावर हेलकावे घेत एक पान गळलेल बघताना सुचल. १. त्या झाडाला देखिल आता, माझ असण नकोस वाटल. कसं वा-याच निमीत्त करुन, मला एकट टाकल. याचा श्वास मी होतो. याचा ध्यास मी होतो. उन,वारा पाउस झेलत, याला मी जगवल बघा तुम्हीच, आता त्यानी कस वागवल. त्या झाडाला देखिल आता, माझ असण नकोस वाटल. कसं वा-याच निमीत्त करुन, मला एकट टाकल. २. घातले सुखाने, हे अवघड उखाणे. सोडवितो जन्मभर, तुझ्या आठवाने. तुटली माळ, विखुरले मोती. उरला धागा, केवळ हाती.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2424
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

तुमची कविता विषण्ण करून गेली.....सुंदर! आंबोळी

छान. अर्थात ह्याही पेक्षा वाईट अनाथाश्रमाला भेट दिल्यावर वाटतं. वृद्धाश्रमात एखाद्याचा दोष असुही शकेल पण अनाथाश्रमात बिचार्‍यांचा काय दोष?

:( कविता खुपच छान पण मनाला चटका लावनारी..

कसं वा-याच निमीत्त करुन, मला एकट टाकल.
या ओळी परिणामकारक आहेत. अजून लिहा.

स्वामी, छान लिहिलं आहेस..

च्याआयला आता हे पण का? लै भारी रे >>>>फार वर्षांपुर्वी एका वृध्दाश्रमाला भेट देऊन..... आत्ता येवड्या उशिरा लिवलस काय ? संजा

In reply to by संजा

आज अचानक ते आठवल बस्स येवढच. अजुन खास कारण काही नाही *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

हम्म छान नाही म्हणावेस वाटले... निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

अगदी परिणाम कारक. जस एखाद छायाचीत्र!! वाचताना मन विषण्ण होत पण ते कवीच यश नव्हे का? निसर्गात आपल्या पाऊलखुणांशिवाय काहिही ठेऊ नका आणि त्यांच्या सुखद आठवणींशिवाय काहिही नेऊ नका>(योगेश २४ यांच्या परवानगीने)

याचा श्वास मी होतो. याचा ध्यास मी होतो. बघा तुम्हीच, आता त्यानी कस वागवल. --मस्तच पण कविता लवकर आवरती घेतलीस म्हणुन कवितेला वेगळ फील भेटल्,अर्थात अस फक्त मलाच वाटत असेल.पण ते २ नंतरच नाही आवडल(मोअर करेक्टली ' नाही समजल') ___________________________________________________ see what Google thinks about me! इथे http://www.flickr.com/photos/48008952@N05/4742173658/" title="OgA