फार वर्षांपुर्वी एका वृध्दाश्रमाला भेट देऊन आल्यावर तिथल्याच एका देवळाच्या पार कट्यावर एकटाच बसलो होतो आणि तेवढ्यात वा-यावर हेलकावे घेत एक पान गळलेल बघताना सुचल.
१.
त्या झाडाला देखिल आता,
माझ असण नकोस वाटल.
कसं वा-याच निमीत्त करुन,
मला एकट टाकल.
याचा श्वास मी होतो.
याचा ध्यास मी होतो.
उन,वारा पाउस झेलत,
याला मी जगवल
बघा तुम्हीच,
आता त्यानी कस वागवल.
त्या झाडाला देखिल आता,
माझ असण नकोस वाटल.
कसं वा-याच निमीत्त करुन,
मला एकट टाकल.
२.
घातले सुखाने,
हे अवघड उखाणे.
सोडवितो जन्मभर,
तुझ्या आठवाने.
तुटली माळ,
विखुरले मोती.
उरला धागा,
केवळ हाती.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2424
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरच
चांगले
विचार करायला लावणारी
हं
कविता खुपच
छान रूपक
स्वामी,
च्याआयला
संजाजी
In reply to च्याआयला by संजा
हम्म छान
अगदी
याचा श्वास
वास्तववाद