भारतीय टपाल खात्यातर्फे आता नागरिकांसाठी पोस्टल ओळखपत्र
भारतीय टपाल ऑफिस गाईडच्या ६३ व्या कलमान्वये आता पोस्टल ओळखपत्र देण्यात येणार आहे.
अनेकदा लोक आपापले निवासस्थान बदलतात. त्यांना आपल्या नव्या पत्त्याचा सरकारी पुरावा सादर करणे बर्याचदा अवघड होऊन बसते. भारतीय टपाल खात्याने त्यावर एक उपाय शोधला आहे. टपाल खात्याकडून तुम्हाला आता तुमच्या निवासाचा पुरावा तुमच्या फोटोसहित मिळवता येतो. टपाल खाते हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारे ओळखपत्र हे ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र इत्यादींप्रमाणेच प्रमाणित ठरते. बँकेत खाते खोलण्यासाठी, टेलिफोन व गॅस कनेक्शनसाठी इत्यादी या ओळखपत्राचा उपयोग होतो.
ओळखपत्रात त्या त्या व्यक्तीचे इतर तपशील, त्याची स्वाक्षरी व त्याचा फोटो यांचा समावेश असेल. ते ओळखपत्र जारी केल्याच्या तारखेपासून पुढील तीन वर्षे कार्यान्वित राहील. त्यानंतर फ्रेश ओळखपत्रासाठी पुन्हा अर्ज करावा लागेल.
अर्जात भाडेकरु असल्यास घरमालकाविषयीची माहिती, नोकरदार असल्यास एम्प्लॉयरची माहिती - तपशील, नोकरदार असल्यास नोकरीच्या ठिकाणचे ओळखपत्राची कॉपी इ. हे द्यावे लागणार आहे. बाकी हे ओळखपत्र टूरिस्ट, वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रवासी प्रतिनिधी आणि अन्य भारतीय जनतेसाठी असेल.
हे ओळखपत्र मिळवण्यासाठी त्यासाठीचा टपाल खात्याचा अर्ज भरुन द्यायला लागतो. एकूण खर्च रुपये २५०/ फक्त येतो. ( १० रुपये अर्जाची किंमत व २४० रुपये प्रोसेसिंग फी). अधिक माहितीसाठी आपण आपल्या नजीकच्या टपाल कार्यालयात संपर्क साधू शकता. ही माहिती व ओळखपत्रासाठीचा अर्ज ऑनलाईन उपलब्ध आहेत!
खालील लिंकवर अन्य माहिती व डाऊनलोड होऊ शकणारा फॉर्म मिळेल.
http://www.taxguru.in/general-info/address-proof-card-issued-by-india-po...
भारताच्या पोस्ट सर्व्हिसेस गाईडमधील ६३ क्रमांकाचे कलम तुम्ही येथे वाचू शकता : http://www.indiapost.gov.in/PO_Guide_Part-1.pdf
-- अरुंधती
प्रतिक्रिया
ऐसे खायचे
उपयुक्त
हे सेवा
+१
इतर
इतर
ही सेवा फार जुनी आहे.
ह्या
धन्यू....!
तो असा असावा कदाचित
थँक्स....!