Skip to main content

(खूळ)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 24/06/2010 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियांचे रूळ आणि गुरू चतुरंग यांचा गूळ पाहून मलाही अंमळ लहानपणची खूळं आठवली. पायात पाय घालून आम्ही पाडायचो तो एका सायकलीवर असायचा अन मी दुसरीवर टांग मारायचे तोल सांभाळत पाडत असताना खोड्या काढताना असंच तासभर खेळायचे सगळेजण मिळून मिसळून पाडायचो आयटीच्या रूळावरून कधीतरी तो मोटर-मन झाला मी मात्र आहे त्याच सायकलीवर पाय मारत... तास न तास
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 7226
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

वाह! वा! क्या बात है! बिडंबन आहे असं वाटतच नाहिये! रेवती

In reply to by रेवती

कसं वाटणार रेवतीताई, एका गरीब पोस्टडॉकची करूण कहाणी आहे गं ती! ;-) (सायकलवाली) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असं असेल तर मग मलाही चानस आहे 'मूळ' नावाचे विडंबन करायचा! आज नेमका घाईगर्दीचा दिवस! बघते दुपारी जमलं तर. रेवती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एका गरीब पोस्टडॉकची करूण कहाणी आहे गं ती!
वेळीच विचार करा! माझा एक वर्ग मित्राने दूर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर Maine मधून astrophysics मध्ये पीएच्डी केलं आणि आता unix programing करून सुखाचे जीवन जगत आहे. दूसरा वर्गबंधू डिपार्टमेंट टॉपर. ईश्वराचा लाडका पुत्र. पार्टिकल फिजिक्स मध्ये पीएच्डी केली. पण त्याला एक दिवस साक्षात्कार झाला की जीवनाचं अंतिम सत्य पार्टिकल फिजिक्सच्या इक्वेशन्स मध्ये नसून moving averages सारख्या सोप्या इक्वेशन्समध्ये दडलेलं आहे. त्याच्या गुज्जु रक्ताने त्याला स्टॉक मार्केट्च्या वाटेवर अलगद आणून सोडलं. तो पण आता सुखात आहे. अशा किती गोष्टी सांगू... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

(चूळ) एकाच कट्ट्यावर बसून आम्ही पिंकायचो तो गुठखा खात असायचा अन मी मशेरीवर चूळ भरायचो मुखरस सांभाळत पिंकत असताना खोड्या काढताना मुखरस तोंडात असंच तासभर घोळवायचे दोघेजण मिळून जमीन "रंगवायचो" सायटींवर भरलेल्या चुळांमुळे कधीतरी तो संपादक झाला मी मात्र आहे त्याच गुठख्यावर चुळा भरत ... तास न तास

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शिवाय हेही शिल्लक आहेत : शूळ (पहा : पोटशूळ , इनो वगैरे) धूळ कूळ (ऋषि(केशा)चे कूळ , नदीचे मूळ वगैरे)

In reply to by मुक्तसुनीत

कोणीतरी सूळ टाका रे !!!!!! बिपिन कार्यकर्ते

In reply to by मुक्तसुनीत

=D> =D> =D> मशाल्ला!! क्या बात क्या बात!! सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by मुक्तसुनीत

भन्नाट! हे मूळ कवितेचं विडंबन की विडंबनाचं विडंबन? युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

आदिती छान जमलय विडंबन. :) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

जबरा वार्षिक विडंबन दिन जोरात चालु आहे.

लै भारी......सायकलची धडकाधडकी आठवली... आठवड्याला ४ स्पोक्स तरी बदलावे लागायचे. :)

लै भारी, चालू द्या.. :)

कविता, विडंबन, विडंबन^२ .... सगळंच दणक्यात!!! बिपिन कार्यकर्ते

:)

अप्रतिम चाल्लंय .. मस्त

पायात पाय घालून आम्ही पाडायचो. कधी एकेरी पट काढायचो , कधी लांगेत बोटे घालायचो. लंगोट घालताना, माती मळताना, थंडाई गिळताना असंच आयुष्यभर लोळायचं , एकमेकांना हलकेच बजावून सांगायचो. गादी वरच्या नुरा खेळून कधी त्याच्या दारात बी गाडी आली, मी मात्र मारत आहे त्याच पेठांत चकरा , ही तालीम ते ती तालीम

In reply to by अडगळ

एकदम भारी!! :) =D> (स्वतंत्र धाग्यात टाका ना राव!) (रुस्तम ए मिपा)चतुरंग

छान कविता केलीस!

जोरदार हो दुर्बिणवाल्या बै --अवलिया