Skip to main content

..पाऊस मोठा अस्सा यावा..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 09/06/2010 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस मोठा अस्सा यावा! ---------------------------------- खोटा पैसा खरा व्हावा.. पाऊस मोठा अस्सा यावा. चिंबलेल्या पाण्यातुन मग.. लटका तुझा गुस्सा न्यावा. सोसाट्याचे वारे वहावे.. धूळ पाने उडवित जावे.. तुला पदरात लपेटून मग. वार्यालाही अडवित जावे.. स्वप्न सुंदर असे पडावे.. रागावलेली तू..खुशीत यावस.. रात्र बेचैन होताना मग.. मला अलगद कुशीत घ्यावस. थंडी अशी कडक पडावी.. घट्ट तुझी मिठ्ठी व्हावी.. खट्याळ तुझ्या डोळ्यात पाहुन.. मग कामावरही सुट्टी घ्यावी.. -- योगेश जोशी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3272
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

वा... कविता आवडली... :) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

In reply to by परिकथेतील राजकुमार

ख्या ख्या ख्या...खी खी खी... :D कविते मधील भाव आवडले !!! ;) कविता तर आवडलीच पण मिठी न-आवडणारा अरसिकच !!! ;) अजुन... (टारू मोड ऑन) त्या मिठीचा अणुभव णाही !!! ;) बाकी परा...तुझ्या कॅफेत कोण तरी फटाकडी येत असावी सध्या... ;) (रसिकलाल)... ;) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

In reply to by मदनबाण

=)) =)) 'सध्या' ह्या शब्दाचा तिव्र निषेध रे !! आपल्याकडे 'राबता' असतो ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

मस्त कविता. (ही कविता वाचत असतानाच इकडे गडगडाटासह पाउस चालु झालाय.) P = NP

In reply to by चिरोटा

इकडे म्हणजे बेंगलोर मध्येच ना..! सॉरी भेंडीभाऊ तुमच्या एकाही खरडीला उत्तर देऊ शकलो नाही. अजुनही मला खरडवहीत लिहिण्याची सुविधा दिली गेली नाही आहे. --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

हो.बेंगळूरमध्येच. :) P = NP

पावसाची मस्त कविता अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

छान कविता. -जय महाराष्ट्र , जय मराठी !

तुमच्या सगळ्याच कविता फार मस्त असतात. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

च्यामारी सरळ सरळ सांगाना तिचा राग घालवायचा आहे, तिला मिठी मारायची आहे, तिच्या पदरात लपायचे आहे आणि हे सगळं करायला ऑफिसला दांडी मारायची आहे. त्यासाठी कवितेचा खटाटोप करुन त्या पावसाला इथे खेचुन आणला, तिथे शेतकरी खोळंबले आहेत. जे मनात आलं ते करुन टाकायचं, अरे हाय काय अन् नाय काय? - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

कविता आवडली. उलट पैश्याला खोटे ठरवा (म्हणजेच ऑफिसला दांडी मारा,) मग पावसाची मजा मनमुराद लुटता येईल. होय कि नाही ?

मस्तच चिंबलेल्या पाण्यातुन मग.. लटका तुझा गुस्सा न्यावा. binarybandya™

छान , आवडली. शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

मस्तच :) *~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~* - अस्मिता

आवडली कविता..! -दिलीप बिरुटे