कातरवेळ
पडवीत सांजअंधारी
कवडसा मनाचा श्वास
तुळशीच्या पणतीभवती
मिणमिणतो मंद प्रकाश
तु काय अवेळी येशी
भासांत पैंजणी घुमती
विटलेल्या उबेसाठी
भरजरी शाल एकांती ?
डोळ्यांच्या काठावरती
तरळते तुझे बघ नांव
पण हाय, नदीच्या काठी
डोंबांचा अवघा गांव
लसलसत्या काळोखात
क्षीण जीव एकटा बसला
विझणार्या टेंभ्यावरती
वाघुळ करीतसे हल्ला
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
1946
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
थोडे
सुंदर
सुंदर
कवितेतला भाव असा ...
आरं तिच्या..
In reply to कवितेतला भाव असा ... by दत्ता काळे
अरे, बापरे ...
वेगळ्याच