अनुभवांनी तुझं विश्व संपन्न आहे गं अरु. छान लिखाण.
खूप म्हणजे फार वाईट वाटलं त्या पाद्रीबाबांना फूट्बॉल मधे गती असूनही खेळता आलं नाही त्याचं. दारीद्र्यासारखा शाप नाही : (
बिचारे !!
मनाला चटका लावून गेलं तुझं लिखाण.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
असे अनुभव जगण्यात राम निर्माण करणारे असतात.
हा अत्यंत वेगळा अनुभव शेअर केल्याबद्दल धन्स, अरूंधती.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
मस्त अनुभव गं.
मी काही वर्षांपूर्वी सीबीडी मध्ये राहत होते. तेथेही एक आजोबा रोज रात्री मार्केटातल्या आईसक्रीम पार्लरमध्ये येऊन तिथल्या काकांशी गप्पा मारत बसत. ते काका आमच्याही ओळखीचे होते.. त्यामुळे ते आजोबाही ओळखीचे झाले. रोज त्यांना गप्पा मारायला कुणीतरी हवे असे. ते तसे होते दाक्षिणात्य ख्रिश्चन. म्हणून त्यांना मराठी शिकायची होती. मी आणि रूममेट आठवड्यातून २-३ वेळा जात असू, नाहीतर मग ते फोन करून बोलवायचे.. नको नको म्हटले तरी बर्याचदा आईसक्रीम द्यायचे नाहीतर मग काहीतरी दाक्षिणात्य मिठाया घेऊन यायचे...
नंतर त्या पार्लरवाल्या काकांनी सांगितले की त्यांची सर्व मुले-नातवंडे परदेशात असतात..नि त्यांना एकटेपणा छळतो.. महत्वाची गोष्ट म्हणाजे त्या अजोबांना चांगलेच मराठी येत होतं..
असेच एकदा ते बोलता बोलता त्यांचा वाढदिवस कधी असतो ते सांगून गेले. मग त्या दिवशी आम्ही दोघी त्यांच्यासाठी केक नि बुके घेऊन गेलो.. त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं होतं.. गेल्या दहा वर्षांत कुणी त्यांना आठवणीने विश पण केलं नव्हतं..
आता बरीच वर्षे झाली सीबीडी सोडून.. त्यांच्याशी संपर्कही नाही.. माहित नाही कुठे असतील ते!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
आवडला.
काही वेळा अशीच भेट झालेल्या एका अश्याच बिशपचा पगार एक दिवशी वर्तमानपत्रातुन कळला वर्षाला एक मिलियन डॉलर्स + ऑल एक्स्पेन्सेस पेड. चर्च म्हणले तर छोटे म्हणले तर मोठे. छोटे या करता की एका विशिष्ट समुदायाकरता असलेले चर्च. मेंबर काही प्रचंड संख्येत नाहीत व मोठे या करता की उलाढाल.... बर हे का लिहले तर ...
>ह्या दाक्षिणात्य पाद्रीबुवांना तरुण अशासाठी म्हणावेसे वाटते कारण वयाच्या ६८व्या वर्षीही त्यांचा काही नवे शिकण्याचा, नवी भाषा - नवी संस्कृती जाणून घेण्याचा उत्साह केवळ अप्रतिम होता!
अहो कॉर्पोरेटमधे फतवे निघाले की सगळ्यांना सांगू ते कोर्सेस करावे लागतात...
असो.
लेख आवडला.
प्रतिक्रिया
अनुभवांनी
(नेहेमीप्र
वेगळाच अनुभव
अत्यंत वेगळा अनुभव
छान
मस्त अनुभव
अतिशय हृद्य अनुभव!
वेगळा लेख
+अहो
वेगळाच अनुभव
हा लेख
सुंदर
उत्तम लिखाण आणि छान अनुभव..
सर्वांचे
सुरेख