सागरी तेलविहीर दुर्घटना - २
पहील्या भागात आपण तेल, तेल विहीर आणि आत्ता झालेला अपघात इथपर्यंत वाचले असेल. आता परीणामांच्यासंदर्भात आधी थोडे समजून घेण्याचा प्रयत्न करूया...
प्रदुषणाचे परीणाम दृश्य-अदृश्य अशा दोन्ही स्वरूपात असतात. त्यांची व्याप्ती ही अनेक गोष्टींवर ठरते. त्यात नुसते प्रदुषणाचे रासायनीक मिश्रणच जबाबदार नसते तर भौगोलीक परीस्थिती, वातावरणातील तापमान, पाउस/कोरडेपणा, पाणी असेल तर त्याचा वेग, घनता, जमिनीत असेल तर त्या मातीचे गूण, चढ उतार, आजूबाजूस असलेले भूगर्भातील जल त्याचे वाहणे वगैरे वगैरे अनेक गोष्टी हे ठरवत असतात.
थोडे अवांतर होईल, पण कल्पना येण्यासाठी, एक उदाहरण म्हणून सांगतो, कॅनडातील क्युबेक (त्यातील जंगलांचा) भाग हा आमच्या घरापासून साधारण ४००-४५० मैलावर रस्त्याने असेल. गेल्या रविवारी म्हणजे मे ३०, २०१० ला तेथे जंगलात बरेच वणवे पेटले. तर बॉस्टनमधे हवा काळवंडली आणि जळका वास हा दिवसभर येत होता. राज्याच्या पर्यावरण विभागाला काही भागात हवेने धोक्याची पातळी गाठली असल्याने लोकांना घरात बसायला सांगावे लागले. दुसर्या दिवशी पाऊस पडला तर चार्ल्स नदीवर काजळी पसरल्याचे जाणवत होते. असेच एक अजुनही मोठे उदाहरण म्हणजे चीन सध्या मोठ्या धडाक्यात औष्णीक वीज केंद्रे बांधत आहे. तर त्याचे परीणाम पॅसिफिकच्या दुसर्या टोकाला असलेल्या कॅलीफोर्नियात जाणवत आहेत. थोडक्यात पर्यावरण आणि प्रदुषण हे कुठल्या राजकीय अथवा आर्थिक/सामाजीक सीमा पाळत नाही.
खनीज तेल हे प्रामुख्याने हायड्रोजन आणि कार्बन यांच्या विविध संयोगांचे मिश्रण असते. तरी देखील त्यातून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, व्होलाटाईल ऑर्गॅनिक कॉम्पाउंड्स, शिसे (लेड) वगैरे वगैरे बरेच काही, ज्याला प्रदुषण म्हणता येईल अशी घन-द्रव-वायू रुपातील रसायने असतात. एक छान वाक्य आहे, मला वाटते मी युएस फिशरीच्या संकेतस्थळावर वाचलेले होते: तेल जेंव्हा आपण गाड्या, उर्जा उत्पादन, घरं गरम करायला वापरतो, तेंव्हा ती एक मोठी गरज असते. मात्र तेच तेल जेंव्हा समुद्रात सांडते तेंव्हा तो एक मोठा प्रश्न ठरतो. प्रदुषणाच्या नेहमी वापरलेल्या (येथील) कायदेशीर (रेग्युलेटरी) ठोकताळ्यात बोलायचे तर, एका गॅलन तेलाने एक बिलीयन गॅलन्स पाणी प्रदुषित होऊ शकते!
मात्र एक गंमतशीर आलेख मला नासाच्या संस्थळावर मिळाला. अर्थात यातील विदा हा अमेरिकेचा आहे, पण इतरत्र याहून चांगली अवस्था असण्याची शक्यता कमी वाटते! याचा अर्थ असा की तेलाने होणारे प्रदुषण हे जास्त करून मोठ्या कंपनीकडून एकदाच होण्या ऐवजी व्यक्तिगत कृत्यातून दरोज, हळू हळू घडत असते! अर्थात हे स्लो पॉयझनिंग सारखे ठरत असते आणि त्यातून एकतर नद्या अथवा काही जवळचे किनारे हे खराब होतात.
Source: seawifs.gsfc.nasa.gov
याचा अर्थ बिपीकडून जे काही घडले ते विशेष नाही असा होतो का? अर्थातच नाही. एक भांडवलदार म्हणून बिपीकडून पैसे वाचवण्यासाठी आधी आणि अपघातानंतरही अनेक चुका (का गुन्हे?) झाल्या आहेत. त्यात सुरक्षायंत्रणा नीट नसणे हे प्रामुख्याने आधीचे कारण होते. तर नंतर ज्या पद्धतीने वाचलेल्या कामगारांकडून फसवून सह्या करून घेतल्या (आम्हाला काही झाले नाही वगैरे, हे एनपीआर वर ऐकले होते) त्यातून त्यांची लबाडी समजली. अर्थात आता ते सगळे बदलत आहे कारण अक्षरशः अभाळ फाटले असताना ठिगळाने स्वतःचा बचाव करणे येथे शक्य होऊ शकत नाही. सुरवातीस दिवसास १००० बॅरल्स इतकी तेलगळती सांगितली. इपिए आणि एनओएए या संस्थांनी अधिक संशोधन केल्यावर ती पाचपट अधिक म्हणजे दिवसाला ५००० बॅरल्स इतकी आढळली. न्यूजवीकच्या आजच्या बातमीत म्हणल्याप्रमाणे ४२ दिवसात साधारण दिवसाला १९००० बॅरल्स इतकी तेलगळती होत आहे. अर्थात खरा आकडा कुणालाच ठाम पणे सांगता येत नसला तरी सुरवातीस सांगितलेला आकडा फारच कमी होता.
तेल प्रदुषणाने, सागरीसृष्टी खराब होते - नुसते तेलात बुडल्यानेच नाही! तर संपूर्ण जैविकशृंखलाच खिळखिळी झाल्याने. खालील चित्र केवळ एक प्रातिनिधिक चित्र आहे. त्यामुळे मासेमारी थांबते. अर्थात मच्छिमार उद्योग असलेल्या भागांचा प्रत्यक्ष व्यवसाय जातो आणि ते विकत घेऊन विकणार्यांचा धंदा. त्यातूनही जर नकळत प्रदुषित पाणि, हवा अथवा मासे खाल्ले गेले तर त्याचे आरोग्यावर परीणाम होतात आणि डॉक्टरांकडे जावे लागले की आरोग्याच्या विम्यावर. सरकारी विमा असला तर त्या दुखण्यांचा काही खर्च सरकारला उचलावा लागतो तर खाजगी असला तर खाजगी क्षेत्राला. विम्यासंदर्भातील विधान हे विशेष करून अमेरिकेलाच लागू आहे. पण इतरत्रही कुठल्यानकुठल्या रुपाने आरोग्यावर पैसे जातातच. असे तेल जर किनार्यावर आले तर त्यातून ते किनारे हे पर्यटनासाठी खराब होतात. म्हणजे पर्यटन व्यवसाय बुडाला. व्यवसाय बुडाला याचा अर्थ माणसांचे काम/पैसे कमी झाले. सरकारी महसूल कमी झाला, वगैरे वगैरे. थोडक्यात एका कंपनीच्या पैसे वाचवण्याच्या चुकीच्या पद्धतीने आज त्या कंपनीचे देखील आर्थिक नुकसान झाले आणि राष्ट्राचे आर्थिक नुकसानही होत आहे.
Source: www.newsweek.com and Charlie Riedel , AP
भाग ३ - तेलगळती थांबावायचे प्रयत्न - तांत्रिक, सामाजीक, राजकीय पाउले, इतरत्र वापरलेली अणूबाँबसहीत वेगवेगळी तंत्रज्ञाने.
-------------

प्रतिक्रिया
>>थोडक्यात
छान
माहितीपूर्ण लेखमाला.
उत्तम
अजून एक
तेलाचे पृत्थकरण
माहितीपूर
+१
साध्या आणी
लेखमाला
बापरे !!!
अमेरिकेवर बहुधा शनी वक्री झाला असावा.