✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गारांचा पाऊस

अ
अरुंधती यांनी
गुरुवार, 06/03/2010 - 19:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14173 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

चांगला

अवलिया
गुरुवार, 06/03/2010 - 19:25 नवीन
चांगला लेख. कोपऱ्यावरच्या वडेवाल्याने समयोचित ताज्या, गरमागरम बटाटेवड्यांचा घाणा तळायला घेतला होता Smile छ्या ! गरमागरम कांदा भज्यात जी मज्जा ती बटाटेवड्यात नाही. आणि नंतर मस्त आल्याचा चहा. आपली आपली आवड. --अवलिया
  • Log in or register to post comments

बटाटेवड्य

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 20:38 नवीन
बटाटेवड्यांची राऊंड झाली की असतेच खेकडाभजीची राऊंड.... त्यावर चहाची फोडणी! (आमच्या घराजवळचा वडेवाला कांदा महागल्यापासून फक्त बटाटाभजी, मिर्चीभजी व मूगभजी तळतो! :( ) अवलियासाहेब, भजीची खमंग आठवण करून दिल्याबद्दल धन्स! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

आवलियाजीं

टारझन
Fri, 06/04/2010 - 21:25 नवीन
आवलियाजींनी अरुंधती जींना भजीची खमंग आठवण करुन दिल्याने डोळे पाणावले , आणि लेख वाचुन तोंड पाणावले ... :) - खमंगती(भजी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

गारेगार

मदनबाण
गुरुवार, 06/03/2010 - 19:34 नवीन
गारेगार लेख... :) कित्येक वर्ष झाली मला परत गारांचा पाऊस पहायला मिळालाच नाही !!! :( नवी कोवळी, पोपटी रंगाची पालवी तर काय लुसलुशीत दिसत होती! अहाहा!! नशीब मी बकरी नाही.... नाहीतर खादडलीच असती तिला... फक्त ती पालवी झाडाच्या माथ्यावरच होती ही गोष्ट अलाहिदा! >>> खी खी खी... ख्या ख्या ख्या. काय हो ताई ठीक आहात ना !!! ;) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments

हा हा हा, मी

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 20:39 नवीन
हा हा हा, मी आहे अजून तरी ठीक.... पण खर्रच ती आंब्याची पानं इतकी मस्त मस्त दिसत होती.... मला प्रेमाने त्यांना गट्ट्म स्वाहा करावेसे न वाटले तरच नवल! :D अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

हा.हा.हा...

मदनबाण
Fri, 06/04/2010 - 20:46 नवीन
हा.हा.हा... हो कोवळी पालवी खावी वाटते हे मात्र खरं... खाली चित्रा ताईने सांगितलेला पाल मी मन मुराद चरला आहे !!! ;) बाकी तुमच्या वरच्या प्रतिसाद हे वाक्य वाचलं :--- खेकडाभजीची राऊंड>>> हे काय? वाचाव ते नवलचं... ;) (पाला-पाचोळा खाणारा वळू) ;) मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

सुंदर ललीत

शुचि
गुरुवार, 06/03/2010 - 19:42 नवीन
सुंदर ललीत लेख : ) >>आजदेखील त्या पावसात गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करायला मन आसुसले होते >> : ) लहानपणीचं एक गाणं आठवलं - टपटपटप काय बाहेर वाजतय ते पाहू चल ना आई चल ना आई त्या पावसात जाऊ सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

शुचि, मला

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 20:43 नवीन
शुचि, मला नव्हतं गं माहीत हे गाणं.... आम्ही आपले ''ये रे ये रे पावसा'' करत बसायचो! पावसाकडे बघता बघता पावसाची गाणी ऐकत-म्हणत खरंच इतकी धम्माल येते गं! फुल सेलिब्रेशन! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

झकास

भानस
गुरुवार, 06/03/2010 - 19:59 नवीन
आमच्याकडे खूप वेळा गारा पडतात पण आयती भजी आणि बटाटेवडा... :( नवी कोवळी, पोपटी रंगाची पालवी तर काय लुसलुशीत दिसत होती! अहाहा!! नशीब मी बकरी नाही.... नाहीतर खादडलीच असती तिला... हा हा.... अगदी अगदी. सेम पिंच. तशी पालवी खादडता येत नाही म्हणून पावसाळ्यात येणारी कुठलीही पालेभाजी म्या चरते. :)
  • Log in or register to post comments

अगदी अगदी

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 20:47 नवीन
अगदी अगदी गं भाग्यश्री.... भारतात नाक्यानाक्यावर मिळणार्‍या ब.वडा व भजीचं सुख न्यारंच! बाकी पावसाळ्यात इथली पालेभाजी चिखल-मातीशी जरा जास्तच सलगी केलेली असल्याने टाळली जाते! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भानस

सुंदर

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/03/2010 - 21:03 नवीन
एकदम अरुंधती, आपलं, मस्त लेख! आमच्याकडे का नाही गारा पडल्या? :-( अदिती
  • Log in or register to post comments

वितळल्या

मेघवेडा
गुरुवार, 06/03/2010 - 21:06 नवीन
वितळल्या असतील.. तापमान भयंकर ना तुझ्या डोक्याचं!! ;) बादवे, लेखन नेहमीप्रमाणे उत्तम आहेच!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणूनतर गारा

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/03/2010 - 21:19 नवीन
माझं डोकं गरम हे मात्रं खरं!! पण म्हणूनतर गारा पडल्या पाहिजेत ना ... तापमानात फरक असतो तेव्हाच गारा पडतात, जमिनीवर तापमान कमी असेल तर इंग्लंडातल्यासारखा बर्फ पडेल ना रे, लॉर्ड मेवे! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

तेच

मेघवेडा
गुरुवार, 06/03/2010 - 21:34 नवीन
तेच म्हणतोय.. 'तापमानातील फरकाच्या' नियमाप्रमाणे पडल्या खर्‍या पण .. वितळल्या! असो. बादवे लॉर्ड काय..? ड्युक, मार्किस, अर्ल निदान व्हिस्काऊंट तरी म्हणायचं.. लॉर्ड नको.. ते उगाच राजकारणी झाल्यासारखं वाटतं! ;) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हेहेहेहे

श्रावण मोडक
गुरुवार, 06/03/2010 - 21:52 नवीन
लॉर्ड नको.. ते उगाच राजकारणी झाल्यासारखं वाटतं! Wink हेहेहेहे... त्यासाठीच तर ती तसं म्हणाली. तू काही राजकारणी नाहीस. तरीही ती तसं म्हणते. म्हणजे... जाऊ दे... इतकं स्पष्टीकरण नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

थॅन्क्स गं

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 20:49 नवीन
थॅन्क्स गं अदिती! तू ये पुण्याला, मग गारांचा पाऊस मिळेल अनुभवायला! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मी

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 06/05/2010 - 00:51 नवीन
मी पुण्यातच आहे गं अरूंधतीताई, इथे विद्यापीठात गारा दिसल्या नाहीत म्हणून जास्तच रडून दाखवलं! आणि तो रेडीओ मिर्चीवाला गारांचं गारेगार लाईव्ह वर्णन सांगत होता. आमच्याइथे आम्ही फक्त साठलेल्या पाण्यात फतकन उड्या मारून, आणि रस्त्यातून चालताना खाली झुकलेल्या झाडांच्या फांद्या ओढून अचानक सोडून द्यायचा खेळ खेळलो! अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

नेहमीप्रमाणे सुंदर लेख

jaypal
गुरुवार, 06/03/2010 - 21:42 नवीन
असा मस्त गारांचा पाउस पडतोय. मी गॅलरीत बसुन तो बघतोय . सोबत ओल्ड मंकची चपटी = समाधी अवस्था ................. (चखण्याची लिस्ट खुप मोठी होउ शकते पण कमीत कमी पापड / बॉइल्ड एग/ मांदेली) Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

छान

बेसनलाडू
गुरुवार, 06/03/2010 - 21:50 नवीन
चित्रदर्शी लेखन. जुन्या दिवसांत घेऊन जाणारे. फार आवडले. (चिंब)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

भारी

चित्रा
गुरुवार, 06/03/2010 - 21:52 नवीन
छान लिहीले आहे. लेख आवडला. नवी कोवळी, पोपटी रंगाची पालवी तर काय लुसलुशीत दिसत होती! अहाहा!! नशीब मी बकरी नाही.... नाहीतर खादडलीच असती तिला... चिंचेचा पाला खाऊन बघा जमल्यास, कोवळा. मस्त लागतो.
  • Log in or register to post comments

हा हा हा....

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 20:50 नवीन
हा हा हा.... चित्रा, अगं चिंचेचा पाला हा तर माझा आवडता खाऊ आहे! (पण मी बकरी नाही हे आधीच सांगितलं आहे! ;-)) धन्स प्रतिसादाबद्दल! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

वर्षागान...!!

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 06/03/2010 - 21:56 नवीन
".....पावसाने गारव्याची अशी काही बरसात केली की सारी सृष्टीच नव्हे तर मनही त्या सरींमध्ये न्हाऊन निघाले! ...." पावसाने आणि गारांच्या वर्षावाने निर्माण झालेला अरुंधतीताईंच्या प्रतिभेचा हा आविष्कार एका सुखद तुषारांचा अनुभव देवून गेला आहे. या वर्णनाशी साम्य राखणारी पु.शि.रेग्यांची एक कविता त्याच क्षणी मला आठवली... कविता खूपच मोठी असल्याने त्यातील बरीच कडवी मला नीट आठवत नव्हती म्हणून तो संग्रह मुद्दाम शोधून काढला....त्यातील हे "गारा नृत्य..." "तडकते वर जलकणांची संतत धारा : स्वेदकण हे फुटून येती आतून वर.... क्वचित एकादा फेनधवल हंसा़कृति मेघ घालतो भासे झेप खालती - ज्युपिटर जसा - उष्ण-मृदुल पिसांच्या गर्दीत विकल लेडा.... दूर कुठे तरी साद उठती तार उत्कट, 'होईन पांखरू; घेईन चोचीनें कमल-तंतू, देठ कोवळे; तुडुंब तडागी डुंबत नाचेन - पंख माझेच जीवनोत्सवी आहेत ध्वज....!' जडत्व आता इतुके भिनले तू सहसंवादी चराचराचा. उरल्या नाहीत काहीच सीमा... वहाळ, नाले.... पाणीच पाणी ... अचल परी मनूसाठी तू मत्स्य सत्यसंघ कारण आहे जीवनी तुला उत्कट आशा. असे कधी तरी तुंबळ वायूच्या अट्टाहासात परिचित श्री चिरपरिचित रूप दाविते...." १०४ ओळींची असलेली "वर्षागान" ही पूर्ण कविता जरूर वाचा... फार आवडेल तुम्हाला ! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

फार छान

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 20:34 नवीन
फार छान कविता दिलीत भाऊ! अवश्य वाचेन वर्षागान! :-) धन्यवाद! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

एकदम

अनिल हटेला
गुरुवार, 06/03/2010 - 22:28 नवीन
एकदम गारेगार लेख !! :) (गारोबा) ;) चायनीजकर !!!उर्फ.. АНИЛ ХАТЕЛА :D
  • Log in or register to post comments

गर्मा गरम

मीनल
Fri, 06/04/2010 - 03:44 नवीन
आत्ताच्या आत्ता हवाय तो बटाटा वडा. गर्मा गरम. मीनल. http://myurmee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

ये इथं, मग

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 20:52 नवीन
ये इथं, मग खिलवते तुला गर्मागरम बटाटेवडा व भजी! आमच्या गल्लीच्या कोपर्‍यावर मस्त मिळतात दोन्ही.... सकाळ संध्याकाळ घमघमाट सुटलेला असतो नुसता! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनल

वयाने

Manoj Katwe
Fri, 06/04/2010 - 05:32 नवीन
वयाने कितीही मोठे झालो तरी मनाचे वय वाढत नाही हेच खरं हेच खरं
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Fri, 06/04/2010 - 06:16 नवीन
चला आता भानसताईंनी एक लेख लिहावा मग परत अरुंधतीताईंनी..
  • Log in or register to post comments

मस्तच.

चतुरंग
Fri, 06/04/2010 - 07:40 नवीन
गारा वेचून खाल्ल्याला कित्येक वर्ष झालीत! किती साध्या साध्या आनंदाला मुकतोय असं वाटतं. गच्च पाऊस पडून गेल्यावर आभाळ उघडतं तेव्हा मला फार आवडतं. सगळीकडे गार हवा, पाऊस पडून गेल्याने खाली बसलेला धूर - धूळ आणि स्वच्छ प्रकाश, एकदम आल्हाददायक असतं वातावरण. गरमागरम चहा घ्यावा आणि सज्जात, खिडकीत उभं राहून रस्त्यावरची गंमत बघत राहावं.. (नांगराची होडी न जमणारा)चतुरंग
  • Log in or register to post comments

पाऊस पडून

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 20:56 नवीन
पाऊस पडून गेल्यावर काही मिनिटं तरी एक अनाम शांतता जाणवते वातावरणात.... सारं कसं तृप्त, स्वच्छ, लख्ख वाटतं त्या काही मिनिटांत.... मग पुन्हा वाहनांचे हॉर्न्स सुरु होतात... गर्दी वाढते.... आणि ते क्षण नाहीसे होतात!! चतुरंग, मी पण विसरून गेलेय नांगराची होडी कशी करतात ते! आता फक्त साधी होडी व बंबी बोट करता येते! बादवे, तिला बंबी बोट का म्हणत असतील?? :D :? अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सरिवर सर !

मीली
Fri, 06/04/2010 - 07:56 नवीन
किती छान आणि ओघवते लिहितेस ग तू .मान गये यार! कालच सकाळ मध्ये गारांचा फोटो पहिला.गारा वेचून खायची मजा वेगळीच! मीली
  • Log in or register to post comments

अगं मिली,

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 21:02 नवीन
अगं मिली, गारा फक्त वेचूनच नाही तर भांड्यांमध्ये पण जमा करून खाल्ल्या आहेत मी! टणाट्टण आवाज येतो गारांचा.... तडतडाट नुस्ता.... खूप धम्माल येते!:-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीली

जीव थंड

स्पंदना
Fri, 06/04/2010 - 14:49 नवीन
जीव थंड झाला तिकडे पाउस पडला हे वाचुन. नुसत वाचुन तोन्डाला पाणी सुटल्..गारा काय्..बटाते वडे काय्..जाउ दे अस जीव घेण्(की तोंड घेण) लिहीत जाउ नको ग्..आता वडे वा भजी करावी लागणार. सुर सुर करत सुरीने कांदे कापणारी अपर्णा
  • Log in or register to post comments

कर, कर

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 21:00 नवीन
कर, कर बटाटेवडे, भजी कर आणि इथल्या गारांची, पावसाची आठवण करत कसेबस्से संपव! :D अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

चांगला लेख

विकास
Fri, 06/04/2010 - 20:48 नवीन
चांगला लेख! लहानपणी गारांच्या पावसांचे खूप आकर्षण असायचे. कारण मुंबईच्या भागात तो कधी अनुभवायला मिळायचा नाही. मग आजोळी गेल्यावर उन्हाळ्यात कधीतरी मिळायचा. बॉस्टनमध्ये कधीतरी पडतो पण तशी मजा वाटत नाही. :( दोन वर्षांपुर्वी आम्ही (पती, पत्नी, लहान कन्या) आणि आमच्या घरातील ३ ज्येष्ठ नागरीक असे व्हॅनमधून रमत गमत नायगारा धबधबा बघायला चाललो होतो. बॉस्टन ते नायगारा जवळपास ८-९ तासाचा ऑलमोस्ट सरळ रस्ता आहे. एकदा शहरी भाग सोडला आणि न्यूयॉर्क राज्यात आलो की मोकळे दिसते. आम्ही छान रमत गमत चाललो होतो. अचानक दूरवर एक जमिनीपासून आकाशात गेलेला मोठा काळा ढग दिसला. आधी वाटले टोर्नॅडो आहे का काय. पण तसे काहीच नव्हते, सुदैवाने! जसजसे पुढे गेलो आणि तो ढग पण उलट बाजूने पुढे येत गेला तस तसा पाऊस येऊ लागला आणि नंतर लिंबाएवढ्या गारा आदळायला लागल्या! आजूबाजूला काहीच नाही, जर गाडीच्या काचा फुटल्या असत्या तर. त्यामुळे टेन्शन! शेवटी हळू हळू बाजूला गाडी उभी केली. एकमेकांचे ऐकायला येत नव्हते इतक्या मोठ्यांनी गारा आदळत होत्या. सर्वच टेन्शनमधे असल्याने कोणीच शंका काढत नव्हते की आता काय होणार... रस्त्यावर दोन तीन इंचांचा गारांचा थर झाला होता. काही मिनिटात तो ढग पुढे सरकला (गाडीच्या मागे गेला) आणि after clouds comes clear weather हे अनुभवले. पुढचा रस्ता जणू काही झालेच नाही इतका छान आणि निरभ्र आकाशाचा होता. -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

बाप रे! इथे

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 20:59 नवीन
बाप रे! इथे इतक्या कमी प्रमाणात पडतात तरी त्यांचा कसला जबरी वेग, मारा असतो.... आणि लिंबाएवढ्या गारा म्हटल्यावर काय झालं असेल कल्पनाही करू शकत नाही! नशीब, कोणाला व गाडीला काही झालं नाही!! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

थोडा वेगळा अनुभव....

मयुरा गुप्ते
Fri, 06/04/2010 - 21:17 नवीन
अरुंधती ताई, लेख खुप छान. पण गारांचा अनुभव थोडा वेगळा आहे. मुंबईत असताना कधीच गारा अनुभवल्या नव्हत्या पण इथे टेक्सास मध्ये आल्यावर वर उल्लेखिलेल्या रोमँटीक गारा मात्र बघायला मिळाल्या नाहीत. जे काही बघितलं ते अगदी भिषण होतं. कधीहि कुठेही गारा पडतायत असं कळलं कि पोटात धडकी भरते. वर रेवती ताईंनी सांगितल्या प्रमाणे एक एक गारा गोल्फ बॉल किंवा टेबल टेनीस च्या चेंडु एवढ्या असतील तर नुसता विचार करा...गाडी,घरं,माणसं कश्याचाही मुलाहीजा न बाळगता आकाशातुन शब्दशः दगडांचा वर्षाव. विचार करायलाही वेळ नाही. घरात असु तर बाहेर गेलेल्यांची काळजी, आणि बाहेर असु तर स्वःताची आणि घराची काळजी. मागच्या वर्षीचे काही फोटोज आहेत. नक्की टाकीन एक दोन दिवसांत. -- मयुरा.
  • Log in or register to post comments

हम्म्म्म....

अरुंधती
Fri, 06/04/2010 - 21:29 नवीन
हम्म्म्म.... खरंय तुझं मयुरा... निसर्गाचे मवाळ रूप जसे असते तसेच रौद्र रूपही असते.....कल्पना करवत नाहीए की गोल्फ-टेनिस बॉलएवढ्या गारांचा मारा किती खतरनाक असेल ते!!! :SS :S आता पावसाचेच बघ ना... जिथे अतिवृष्टी होते, पूर येतात तिथेही लोकांना पावसाला ''रोमँटिक'' वगैरे म्हणावेसे वाटेल तरी का? तुम्हाला तिथं गारांचा असा भीषण अनुभव येतो हे फार वाईट आहे.... पण शेवटी निसर्ग आहे ना तो! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरा गुप्ते

छान

स्वाती२
Sat, 06/05/2010 - 00:46 नवीन
छान लिहिलयस अरुंधती. इथे आल्या पासून माझा ही गारांच्या बाबतीतला अनुभव भयानकच आहे.
  • Log in or register to post comments

गारांचा पाऊस आणि वाईट अनुभव

प्रियाली
Sat, 06/05/2010 - 00:59 नवीन
मस्त लिहिले आहेस. भजी आणि वडे वाचून भूक चाळवली. :( मुंबईला गारांचा पाऊस कधी पाहायला मिळाला नव्हता. इथे अमेरिकेत मात्र मिळतो. एकदा टेनिस बॉलच्या आकाराच्या गारांचा मारा खाल्ला आहे आणि मरता मरता वाचलो आहोत. तो अनुभव येथे वाचता येईल.
  • Log in or register to post comments

hail storm

चतुरंग
Sat, 06/05/2010 - 01:10 नवीन
च्या ऐवजी hell storm का? ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

हेल स्टॉर्म

प्रियाली
Sat, 06/05/2010 - 01:26 नवीन
हो हो hell storm च आणि मग वाचल्यावर आम्ही त्याला "हेल हिटलर" च्या धर्तीवर "हेल स्टॉर्म" असे ही म्हटले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

गुड वन!

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 06/05/2010 - 01:27 नवीन
गुड वन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

कोल्हापुर

इन्द्र्राज पवार
Sat, 06/05/2010 - 11:23 नवीन
कोल्हापुर भागात गेली कित्येक वर्षे "गारांचा पाऊस" पडलेला नाही, त्यामुळे आता चौथी, पाचवीच्या वर्गात शिकत असणार्‍या मुलांनी आपआपल्या घरी "गारा म्हणजे काय?" असा प्रश्न विचारला तर आईबापाने त्यांना "बर्फाचे शेंगदाण्याएवढे तुकडे" असे सांगण्याची वेळ आली आहे. पण "गारा" या अगदी बेसबॉल्/टेनिस बॉलच्या आकाराच्यादेखील असू शकतात हे पाहण्यासाठी ही व्हीडीओ क्लिप पहा ~~ Image removed." alt="" /> ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

बाप रे! काय

अरुंधती
गुरुवार, 06/10/2010 - 19:00 नवीन
बाप रे! काय गारा आहेत की चेंडू? परवाच बहीण त्यांच्या येथे झालेल्या हेलस्टॉर्म विषयी सांगत होती! अराराररा..... फार वाईट प्रकार! :( अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आहाहा! मस्त

रेवती
गुरुवार, 06/10/2010 - 19:22 नवीन
आहाहा! मस्त लेखन! आत्ता लग्गेच गारांचा पाउस पडावा असं वाट्टय! रेवती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा