Skip to main content

गीत: कसं जगावं या असल्या दिवसात

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 03/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गीत: कसं जगावं या असल्या दिवसात
देवा एकदातरी चांगला आशिर्वाद मला दे ना कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||धृ|| जिथं बघावं तिथं चालते लाच अन लुटमार नव्याणवाचा आकडा येई शेवटी वस्तूच्या किंमतीवर फसवणूक करूनी धंदा करता, गिर्‍हाइकांचं कोन ऐकेना कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||१|| झाली भाजी महाग, गेली कुठं किफायत? प्रवास नाही स्वस्त, रिक्षावाले लुटतात मस्त अन्नधान्यात भेसळ होवोनी, वरणासाठी डाळं मिळेना कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||२|| कामावर राबराबूनी, येई घरी परतूनी टिव्ही ची कटकट असते सुरू प्राईमटायमातूनी विरंगुळा म्हणूनी काहीतरी चांगले लावाना कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||३|| बाहेर असते तारांबळ, माझ्या घरी झाली आबाळ बायको सारखी म्हणे, "तुम्हांघरी सारखा दुष्काळ" बायको तर सोडा पन शेजारीन ढुंकूनही बघेना कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||४|| गरीब झाले गरीब अधिक, श्रीमंतांची नावे फोर्ब मासिकात खायची असतांना ददात, ऑस्कर बक्षीस मिळतात कोठे दाद मागायची कळेना या तुझ्या पाषाणा ||५|| कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना देवा एकदातरी चांगला आशिर्वाद मला दे ना कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||धृ|| - गरीब पाषाणभेद (दगडफोड्या) ०३/०६/२०१०
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1367
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

दादा ...कविता एकदम झकास

दफोराव, कविता आवडली... मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget