आणखी काही..
१) जेव्हा तुमचे किंवा घरातल्या कोणाचे लग्नाचे बघत असले तर..जेव्हा जेव्हा भेट होईल तेव्हा तेव्हा असे लोक सर्वांसमोर प्रश्न विचारतात.."काय मग ठरले का..?" किंवा.. " परवा तो मुलगा/मुलगी पहायला आले होते ना..काय झाले त्याचे..?"
२) परदेशात निघालो किंवा कधी फोन केला तर पहिला प्रश्न "कधी येणार?" ..किंवा.."अजून किती दिवस आहात तिकडे?"
३) एखाद नोकरी बघत असेल तर.."लागली का नोकरी"..किंवा "start किती आहे..? इतकाच..? आमच्या बाबूला मात्र एवढा start मिळाला".
खादाडमाऊ
(७) पायी चालणार्यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय.
हा हा हा .. बाकी परवा मी बाईक वर चाललो होतो , एक चोंग्या "फुटपाथ" सोडुन "रोडवरुन" चालला होता, त्याला कर्णकर्कष्य हॉर्ण देऊन देखील तो बाजुला हालला नाही, त्याला म्हंटलं , "काय गाव्वालं , आज इकडं कुटं मार्णींग वाकला ?"
:)
असो , लेख ओके ओके !!
कितीला घेतली ?
हि काय एवढी चांगली नाहीये, आमच्याकडे ह्या पेक्षा चांगली आहे. आम्ही जरा standard वापरतो
आमच्या गाडीला kick आणि button दोन्ही हाय आणि गरज पडली तर ढकलून सुद्धा start व्हतेया
हॅहॅहॅ ... कोणत्या "रंगा" बद्दल म्हणालात ? :)
असो ... च्यायला आम्ही आमच्या गाडीचा रंग लाल असुन काही बोलत नाही , वर कोण तो "आमचीच लाल" म्हणतोय ? फाडा त्याची ....... पावती हो .. हेल्मेट नाही .. डायरेक्ट कवटी आहे =))
-(यामा) दरोज धावते
खुलासा :
तुम्ही बाईक पुण्यात चालवत होतात असे (सोईस्कर) गृहीत धरतो.
>>.. बाकी परवा मी बाईक वर चाललो होतो , एक चोंग्या "फुटपाथ" सोडुन "रोडवरुन" चालला होता, त्याला कर्णकर्कष्य हॉर्ण देऊन देखील तो बाजुला हालला नाही,
त्याचे १००% बरोबर आहे, काय चुक आहे त्याची ?
एक तर त्तुम्ही फुटपाथ सोडुन रस्त्यावर बाईक चालवताच का ?
शिवाय त्याने तुमच्या गाडीचा हॉर्न ऐकुन बाजुला का व्हावे ? हॉर्न तुमच्या गाडीचा, वाजवणारे तुम्ही, मग त्याने का बाजुला व्हावे ?
हे न पटणारे आहे, असो.
------
(रामशात्री) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
हीहीही!
बरोबर म्हणताहेत डॉनसाहेब!;)
परवाच पुण्यात एक बाई आणि बाईकवाला भस्स्कन् जवळ येऊन थांबला. आता 'रामनाम' घेण्याची वेळ आली असे वाटल्याने मी पटकन् डोळे मिटले तर हा पठ्ठ्या हसायला लागला. आता वाटते, का म्हणून त्याने तरी बाईक हळू चालवावी?;)
रेवती
१, ४,५ फारसे आक्षेपार्ह नाहीत.
(७) पायी चालणार्यांवर सतत कर्णकर्कश भोंगा (हॉर्न) वाजवने ही अशा प्रकारच्या काही बाईकस्वार लोकांची चीड आणणारी सवय
पादचारीही काही कमी नसतात. बागेत फिरल्याप्रमाणे रस्त्यावर फिरणे, मनात येइल तेव्हा रस्ता क्रॉस करणे (डावी-उजवीकडे न पहाता), हिरवा सिग्नल मिळाल्यावर पुढे टपकणे वगैरे वगैरे.
(९) सिनेमाला जातांना "बघू नका, भंगार सिनेमा आहे" असे सांगतात आणि जाणार्याच्या आनंदावर विरजण पाडून त्या व्यक्तीच्या मुड ओफ करू त्याचे दही करतात.
तुमचे पैसे वाचले ना ! पुढच्यास ठेच, मागचा शहाणा !!
तसेही हल्लीचे हिंदी सिनेमे फार बकवास असतात्...
काही मुद्दे पटतील असे वाटले.
बाय द वे, बर्याच वेळा ह्या गोष्टी सापेक्ष असतात. असो.
>>वरातीत मुदाम रस्ता अडवून नाचणे, रस्ता मोकळा न करने.
-१,
१००% असहमत ...
आम्हाला असे वरातीत रस्त्यावर नाचायला लै आवडते. त्यात एक वेगळीच मज्जा आहे हो,एकदा अनुभव तर घेऊन पहा ;)
बाकी आम्हाला नेहमीच खटकणारा प्रश्न "काय साहेब, आज आमच्या गरिबाच्या मिपा/मीम वर कसे ? " ;)
बाकी सविस्तर नंतर :)
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
आपल्या प्रतिक्रियांवरून मला लक्षात आले की...
काही ठीकाणी अनवधानाने काही मुद्दे लिहायचे राहीले किंवा चुकीच्या पद्धतीने लिहिले गेले, ते मी आता बरोबर केले आहेत. कृपया पुन्हा लेख वाचावा.
तसदी बद्दल क्षमस्व!
(उदा :
सार्वजनिक ठिकाणी तोंडाला रुमाल/हात न लावता शिंकणे; रस्त्यावर गुटखा खाऊन थुंकणे; .. असा बदल केला आहे)
धन्यवाद!
माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या-
http://nimishthinkcity.blogspot.com
>> झेरॉक्स काढायला येणार्या व्यक्तीचे खासगी कागदपत्रके, याकडे हे लोक ढुंकून बघण्याचा प्रयत्न करतात. <<
याबाबतीत मी एकदा व्होडाफोनच्या दुकानातल्या माणसाला फैलावर घेतला होता. पोस्टपेड कनेक्शनसाठी बँकेच्या पासबुकाची कॉपी हवी होती. त्याने पहिलं पान बघायला मागितलं, पत्ता नीट लिहीला आहे ना बघायला आणि पुढची पानं उलटायला लागला. मी टोकलं. तर म्हणे, "तुम्हाला याची कॉपी द्यावी लागेलच कंपनीला, नाहीतर पोस्टपेड कनेक्शन कसं देणार ते!"
मी पासबुक आधी हिसकावून घेतलं, "तुम्ही कनेक्शन अॅप्रूव्ह करणार का कंपनीवाले? तुम्ही करणार नसाल तर माझ्या एकाही डॉक्यूमेंटमधे डोकावून पाहिलंत तर खबरदार! तुमचं काम डॉक्यूमेंट इथून तिथे पाठवायचं आहे तर उगाच भोचकपणा बंद करा."
माझं कनेक्शनचं कामही चटकन झालं! ;-)
अदिती
१.
"कुठे आहेस?" - पृथ्वीवर!
"आजूबाजूला आवाज कसला येतोय?" - शांततेचा!
"कुठे पिक्चर मधे आहात वाटतं?" - नाही. सिनेमात आहे अशा कल्पनेत आहे!
"लग्नाची वरात चाललीय वाटतं तुमच्या जवळून!" - अय्या! कित्ती तो मनकवडेपणा!
"आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे..
३. "एखादी आनंदाची बातमी आहे का?" - आहे की. तुम्ही एक्स्पेक्टींग आहात ५६व्यांदा असे ऐकलेय!
४. "कुठे? बाहेर चाल्लेत का?" - नाही. घरात चाललेय.. १८० अंशातून!
५. "केवढ्याला घेतली?" - विचारून सांगते.. गिफ्टमध्ये मिळालेय ना!
६. "पगार किती मिळतो?" - मिळतो कसला हो? उलट नोकरीवर ठेवल्याबद्दल आम्हालाच पैसे द्यावे लागतात कंपनीला..!
९. "बघू नका, भंगार सिनेमा आहे" - तुम्ही भंगार विकत घेण्याचा कार्यक्रम कधीपासून सुरू केलात?
एकदम क्लास उत्तरे आहेत ...
>> आजूबाजूला पाण्याचा आवाज कसला येतोय?"- तुमची बायको रडतेय इथे...
ऑ ???
अहो हे ऐकल्यावर तो मित्र आमच्या पेकाटात लाथ घालायला धावुन येणार नाही का ?
उगाच त्यावरुन 'महाभारत' व्हायचे ...
------
(पितामह)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
त्यापेक्षा सगळ्यात सोपं म्हणजे "कुठे आहेस?" विचारण्या ऐवजी- "नमस्कार! कसा आहेस? बिझी आहेस/आहात काय? ही वेळ बोलायला योग्य आहे का, की नंतर फोन करू?" असे आपण विचारू शकतो!
ही तर क्रेडीट कार्ड/पर्सनल लोन गळ्यात मारणार्यांची ट्रेन्ड भाषा झाली हो.!
हे असे प्रास्तविक ऐकले की तोंडातुन आपोआप "नॉट इंटरेस्टेड" हे ट्रेन्ड उत्तर आपोआप बाहेर पडते.
त्यापेक्षा "कुठे आहेस?" लाखपटीने परवडले.
उगाच बिनबुडाची औपचारिकता नको.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
(३) हे लोक लग्न झालेल्या पण अजूनपर्यंत मूल नसलेल्या जोडप्याला प्रत्येकच भेटीत, फोनवर, समारंभात सर्वांसमोर "एखादी आनंदाची बातमी आहे का?" हेच विचारत
सुटतात. (यांच्या अशा "सुटलेल्या" प्रशनामागचा हेतू हाच की "सुटलेले "पोट यांना लवकर दिसावे )
लग्न झालेल्या व मूल न झालेल्या जोडप्याला अजुन काय प्रश्न विचारु शकतो ते सांगा बरे.?
(विशेषतः त्या जोडप्याची तुमची जुजबीच ओळख असेल आणि दोघांनाही (तुम्हालाही आणि समोरच्या जोडप्यालाही) एकमेकांशी काय बोलावे हा प्रश्न पडत असेल तर.फक्त हसुन पुढे जाणे म्हणजे शिष्ठपणा दाखविल्यासारखे होते.)
(५) आपण काही वस्तू खरेदी केली की, आपल्याला ते विचारतात "केवढ्याला घेतली?" अगदी विचारतातच!
एखादी नवी वस्तु तुम्ही खरेदी केली आणि दुसर्याला दाखविली तर त्या दुसर्या व्यक्तिकडुन तुम्हाला काय अपेक्षित आहे बुवा.
त्यांनी काय फक्त वा वा छान छान असे म्हणणे..!
दुसर्या व्यक्तिच्या बाजुने विचार केला तर ती असेही म्हणेल की काही लोकांना उगाच नव्या वस्तु खरेदी करुन लोकांना दाखवायची फार हौस असते बुवा.
इनफॅक्ट आजकाल सर्वत्र होणारी फसवाफसवी पाहता हा प्रश्न तर अगदीच औचित्यपूर्ण ठरतो.कुठुन काय किती किमतीत मिळेल ह्याचा अंदाज येतो.विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या बाबतीत तर फारच फसवाफसवी होण्याची शक्यता असते.
(४) बाहेर जात असलो की हे विचारतात -"कुठे? बाहेर चाल्लेत का?
कामात काम झाले तर बिघडले कुठे हो?
तुम्ही जिकडे जाणार असाल तिकडेच त्या विचारणार्यांचे काही काम असेल तर?
हा प्रश्न गैरवाजवी कसा?
बाहेर जाताना स्वतःहुन सांगुन जाणे उत्तम.
विशेषतः काही महाभाग घरात न सांगता बाहेर जातात आणि मोबाईल ही विसरतात.मग त्यांच्या मोबाईलवर आलेले कॉल अटेन्ड करा आणि कुठे गेला?कधी येणार असा प्रश्न आला तर काय उत्तर द्यावे हा प्रश्नच!
बाकी .. लोकांचे कशामुळे काय बिनसेल काही सांगता येत नाही बुवा..
सर्व उत्तरे ह.घ्या.
(भोचक वाचक) योगेश
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
(मी विवाहीत असून मला सहा वर्षाचा मुलगा आहे)
हे सगळे अनुभव मलाच आले असून कंटाळून मी हे लिहिले आहे असे नाही. मित्रमंडळी, इतर नातेवाईक यांच्या अनुभवावर सुद्धा हे आधारित आहे.
आणि हो, सर्व उत्तरे ह. च घेतली आहेत मी...
:-)
डोंट वरी!
तुमचे मुद्दे बरोबर आहेत, माझा आक्षेप फक्त खालील प्रकारांना आहे-
(३) माझ्या ओळखीच्या जोडप्यांना असे अनुभव आलेत की, बरेचदा आमचा अजून विचार नाही असे सांगून टाकलेल्यांना सुद्धा पुन्हा पुन्हा असे प्रश्न विचारले जातात. तसेच, खुप चेकप होवून ही कुणात दोष नसूनही एखाद्या जोडप्याला मूल होत नाही असे माहिती असूनही, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारले जातात. हे चूक आहे.
(४) कुठे चालले असे उगाचच टोकू नये असे मला वाटते. नाट, नजर लागते. असो ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे!
(५) नवीन घेतलेली वस्तू उगाच याला त्याला प्रत्येकाला दाखवत बसणं, हा निदान माझा तरी स्वभाव नाही.
पण, मला असे अनुभव आलेत की, मी वस्तू न दाखवताही मला विचारेल जाते. एकदा मी बुट घेतले. घालून जात असतांना एकाने विचारले- "नवीन घेतलेत वाटते. केवढ्याला? कोठून घेतले...." वगैरे.. :-)
जाहिरात-
माझ्या ब्लॉगला जरुर भेट द्या-
http://nimishthinkcity.blogspot.com
मला वारंवार छळणारे आणि वैताग आणणारे काही प्रश्न :
१. आयला, आज इतका लवकर कसा हापिसात ?
( आता मला सांगा एवढ्या उन्हाचे ११.३० / १२ ला हापिसात आल्यावर हा प्रश्न विचारणे माणुसकीला सोडुन नाही का ? )
२. अरे त्या टास्कचे काय झाले ? झाला का डिलिव्हर ?
३. दर शुक्रवारी हमखास विचारला जाणारा प्रश्न : काय मग, आज हाफ-डे का ?
( बर्याचदा हे विचारणारे आंतरजालीय मित्र असतात हा भाग अलहिदा )
बाकी अजुन आठवल तसे ....
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
मी भवानी टँक येथे नेहमीप्रमाणे सकाळी स्विमिंग करीत होतो. त्याचवेळी तेथे आपल्या नातवाला घेऊन आलेले आमचे एक ज्येष्ठ पाहुणे मला पोहताना पाहुन म्हणाले, "अरे व्वा... इन्द्रा, काय पोहायला आलायं वाटतं?"
काय उत्तर देणार.... "नाही, फिरायला आलोयं बागेत" ???
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
एक से एक उत्तरं!
खरंय, फालतु प्रश्न विचारुन कधीकधी डोकं पार भंजाळुन टाकतात लोक.
मला वैताग आणणारा प्रश्नः
(सोमवार ते शुक्रवार सर्वसाधारणपणे रात्री ९-९:३० पर्यंत माणुस हापिसात काम(!) करत असतो हे तसं सगळ्यांना ठाऊक असतं, पण्ण....)
एखाद्या दुपारी/संध्याकाळी आपण कामाच्या गडबडीत असताना फोन खणाणतो..
मी: हॅलो?
फोन करणारा/री: कुठेयस?
मी (मोठा नि:श्वास सोडत) :ऑफिस! आणखी कुठे असणार?
फोन करणारा/री : काय करतोयस?
(ह्या वाक्यावर, फोनमध्ये शिरुन समोरच्याचं कानठाळ रंगवण्याची तीव्र इच्छा दाबावी लागते.)
मी: ब्रेबॉन स्टेडियमवर वॉटरपोलो खेळतोय..येतोयस?
बाकी, मी लहान असताना, "कुठे चाललात?" हा माझा तिर्थरुपांना विचारण्याचा नेहमीचा प्रश्न! आणि त्यांचं राग आवरुन द्यायचं नेहमीचं उत्तरः "खड्ड्यातल्या गणपतीला चाललोय." =))
>>मी: ब्रेबॉन स्टेडियमवर वॉटरपोलो खेळतोय..येतोयस?
???
अरे पण तु वॉटरपोलो खेळायल पुण्यातुन खास बेबॉर्न स्टेडियम ( मुक्काम मुंबई ) इथे कशाला जातोस ?
पुण्यात सोय आहे की नेहरु स्टेडियम आणि सणस मैदानावर ...
तु एवढ्या लांब का जातोस रे ?
------
( चौकस )छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
पण हे असे प्रश्न वारंवार 'तुम्हालाच' का विचारले जातात हा मुद्दा खरोखर विचार करण्यासारखा आहे.
असो, लोक तुम्हालाच का विचारतात हो असे प्रश्न ?
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
वस्तुतः हा मुद्दा अगदी विचार करण्याजोगा आहे. एका गहन विषयालाच आपण हात घातला असे म्हणल्यास वावगे ठरु नये.
आता माझ्या अल्पमतीनुसार मी जे काही आडाखे बांधले त्याप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. (वि.सु.: ह्या उत्तरासाठी आम्ही विकिपिडिया खंगाळला नाही, ऑनलाईन लायब्र्यांची पानं उचकली नाहीत, की कुणाला फोनाफोनी करुन आकडेमोड वगैरेची मदत घेतलेली नाही, त्यामुळे हे उत्तर विश्वासार्ह असेलच ह्याची आम्ही खात्री देऊ शकत नाही. उत्तर आवडलं, ठीक! नाही आवडलं, तरीपण ऐकायचं :D )
तर, असे प्रश्न आमच्यासारख्यांनाच का विचारले जात असावेत ह्यावर आम्ही सखोल चिंतन केलं. त्यावरुन साधारणतः असं लक्षात आलं, की आम्ही अशा प्रश्नांना समोरच्याला "अरेरे, अॅग्गद्दी कॅसॅही असला आपल्यातलाच आहे. आपणच नाही लक्ष दिलं तर कोण आहे बिचार्याला? ह्यांना आपलं म्हणूया" अशा उदात्त दृष्टीकोनातुन उत्तरं देत रहातो, कधी विचारणार्याच्या वयामुळे, कधी भिडस्तपणामुळे इ.इ. अशामुळं होतं काय की, ह्या प्रश्नप्रसवविद्वानांना वाटते की, चला, कुणापुढेतरी जुदाईमधला परेशरावल होता येतंय...चान्स सोडता कामा नये."
तेच जर एखाद्यानं 'तुमचं चालु द्या. माझ्यापुरता विषय संपला" असं म्हणलं तर पुन्हा कशाला कोण हिंग लाऊन विचारायला जाईल अशा व्यक्तीला?
अहो, शेवटी आपण माणसं जोडतो, त्यांचं आपल्यावर प्रेम असतं, त्यातुन ते बिचारे असं काहीबाही विचारत बसतात. आम्ही जमेल तेव्हढी उत्तरं देतो प्रेमानं. न जमेल तेव्हा, "आज तुला फारच पातळ प्रश्न लागले आहेत रे.." असं म्हणुन कटवतो. :D
असो,
माझ्या ह्या संक्षिप्त आणि चिमुकल्या प्रतिसादातुन माझे मनोगत समजले असेल अशी आशा करतो आणि हा प्रतिसाद इथेच आवरता घेतो.
प्रतिसाद देण्याची संधी दिल्याबद्दल मी श्री.निमिष सोनार, प्रश्न विचारल्याबद्दल श्री. छोटा डॉन, मिसळपाव.कॉम तयार केल्याबद्दल श्री.नीलकांत, मराठीत टंकनसुविधा देणारे गमभनकार श्री.ॐकार, इंटरनेट कनेक्शन वापरु दिल्याबद्दल आमची कुंपणी, त्या नेटवर्कवर मिपा उघडु देत असलेल्या सिस्टिम्स डिपार्टमेंट, मला शाळेत मराठी शिकवणारे श्री.भावे गुरुजी ह्या सर्वांचे मनापासुन आभार मानुन माझे चार शब्द संपवतो.
_/\_
जय हिंद, जय महाराष्ट्र!
बरं बरं यादी पावली; पण संगणक बनवणार्या अॅलन ट्यूरीनला नाही का धन्यवाद?
असो. धम्या, तू वॉटरपोलो का रे खेळतोस, त्यापेक्षा कबड्डी खेळत जा! पैलवानांनी असे खेळ खेळावेत.
निमिषभौ, लेखन आवडले.
आपण म्हणता त्याप्रकारचे प्रश्न विचारून लोक आपल्याला अडचणीत आणतात खरे! आपल्याकडे तर फुल्ल ष्टॉक आहे अश्या प्रश्नांचा (मला विचारलेल्या)! :)
रेवती
प्रतिक्रिया
आणखी काही..
(७) पायी
काय
:)
कितीला
अर्रर्र!
यापेक्षा
टेक्निकली तुम्ही चुकलात ...
आगायायाया
शास्त्रीब
हीहीही!बरो
(७) पायी
मजेशीर धागा ...
खटकणारा प्रश्न
खरे तर हे
आम्हाला
काय गहन विषय आहे
आपल्या प्रतिक्रियांवरून मला लक्षात आले की...
>> झेरॉक्स
पासबुक
मस्त लिहले
उलटप्रश्न!
मस्त उत्तरे ...
>>
बहुतांश
त्यापेक्ष
(३) हे लोक
(मी
प्रश्न आणि हेतू...
अजुन काही ...
पोहणे...!!!
खी खी
हॅ हॅ हॅ!!!
सहमत आहे
अरे पण ...
झालं?
खरे आहे ...
ह्म्म...
बरं बरं
निमिषभौ,
अहो, मग तो ष्टॉक शेअर करा की आमच्यासोबत...
अजून एक- रांगेत पेन मागणे व शक्यतो पेन परत न करणे! :-)