✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इवलेसे रोप लावियले द्वारी...

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 05/18/2010 - 13:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25557 वाचन

💬 प्रतिसाद (72)

प्रतिक्रिया

तात्यानु

Dhananjay Borgaonkar
Tue, 05/18/2010 - 13:47 नवीन
तात्यानु मिपा सारखं सुरेख संस्थळ तुमच्यामुळे उदयास आलं यासाठी आपले शतशः आभार. तुमच्या सर्व समस्या लवकरात लवकर सुटोत हीच मनापासुन ईच्छा. नीलकांतास अनेक अनेक शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

मुखपृष्ठ

विसोबा खेचर
Tue, 05/18/2010 - 13:48 नवीन
मुखपृष्ठ आणि खादाडी सदर हेदेखील अजून एखाद दोन दिवसच चालवीन.. त्यानंतर त्याचीही काळजी नीलकांतने आणि त्याच्या संपादक मंडळाने घ्यावी.. मराठी संस्थळाच्या बाबतीत 'मुखपृष्ठ', 'खादाडी सदर', 'संपादकीय' या सारख्या काही नव्या कल्पनांना जन्म देऊन त्या मी काही काळ राबवू शकलो याचा मला आनंद आहे.. तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

रौशनी ... तेव्हढे पूर्ण करा कि तात्या ...

sagarparadkar
Wed, 05/19/2010 - 15:48 नवीन
अहो तात्या, तेव्हढे ते रौशनी वरचे लेखन पूर्ण कराच ... ही नम्र विनन्ति. =; सर्व अडचणींचं लवकरात लवकर निवरण होवो ही सदिच्छा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

झाले ते

पर्नल नेने मराठे
Tue, 05/18/2010 - 13:51 नवीन
झाले ते झाले.. तात्या काय त्या अडचणी निस्तरुन परत लवकर या. आम्ही तुमची वाट पाहु. स्वामींचा जप करा. ते मार्ग दाखवतील. निलकांतचे अभिनंदन व शुभेच्छा !!! चुचु
  • Log in or register to post comments

नीलकांतचे अभिनंदन

श्रीयुत संतोष जोशी
Tue, 05/18/2010 - 13:57 नवीन
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments

नीलकांतचे अभिनंदन

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 05/18/2010 - 14:16 नवीन
पूर्वीचा कथित खोडसाळपणा आता वर्तमानात जाहीररित्या येत आहे हे पाहून आनंद झाला! जय हो नीलकांत! आणि जय हो, बिपिन भविष्यवाले!! अदिती
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

ऋषिकेश
Tue, 05/18/2010 - 14:28 नवीन
तात्यांना त्यांच्या वैयक्तीक त्रासातून सुटण्यासाठी तर नीलकांतला मिपाचे शिवधनुष्य सक्षमपणे (अधिकृतरित्या) पेलण्यासाठी अनेकोत्तम शुभेच्छा ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
  • Log in or register to post comments

+

शिल्पा ब
Tue, 05/18/2010 - 22:14 नवीन
+ १ *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

तात्या,

भोचक
Tue, 05/18/2010 - 14:44 नवीन
तात्या, तुमच्या समस्या लवकर सुटोत ही सदिच्छा. आणि नीलकांतला मिपाच्या 'सर्वतोपरी' जबाबदारीसाठी शुभेच्छा. शिवाय सहकार्य आहेच. (भोचक) जाणे अज मी अजर
  • Log in or register to post comments

ये धत्तड तत्तड

आनंदयात्री
Tue, 05/18/2010 - 15:40 नवीन
ये धत्तड तत्तड .. धत्तड तत्तड .. धत्तड तत्तड ..तत्तड धत्तड !! - (ढोलताश्यांचा आवाजात नाचणारा) आनंदयात्री >>'मिपा परस्पर हडप कर', 'आपण मिपा चालवू..', 'मिपा आमच्या हातात दे..!' अश्या प्रकारच्या अनेक मानसिक त्रासांना नीलकांत सामोरा गेला.. हॅ हॅ हॅ ... असो .. सूतशेखराचा खप वाढला असे कळते !! - (प्रतिसादक आणी हितचिंतक) आनंदयात्री
  • Log in or register to post comments

ये धत्तड

इनोबा म्हणे
Tue, 05/18/2010 - 15:50 नवीन
ये धत्तड तत्तड .. धत्तड तत्तड .. धत्तड तत्तड ..तत्तड धत्तड !!
च्यायला ह्ये लैच भारी :D
>>'मिपा परस्पर हडप कर', 'आपण मिपा चालवू..', 'मिपा आमच्या हातात दे..!' अश्या प्रकारच्या अनेक मानसिक त्रासांना नीलकांत सामोरा गेला.. हॅ हॅ हॅ ... असो .. सूतशेखराचा खप वाढला असे कळते !!
ह्म्म, काही दिवसांपुर्वीच स्टॉक संपला होता बहूधा. त्यांना भविष्य कळतं म्हणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

विश्वकर्मा नीलकांता...

धमाल मुलगा
Tue, 05/18/2010 - 16:46 नवीन
Image removed. :) आंद्याचा एक जुना धागा आठवला आणि तेच चित्र इथे पुन्हा टाकलं रे बाबा. :) बाकी, इतर धाग्यांवर मालकीहक्काचा गदारोळ करणार्‍या मुखवट्यांच्या आयडींचे इथले मौन अंमळ 'untold tales' सांगुन जाताहेत असं का वाटतंय बरं मला? असो! Image removed. हेल नीलकांत ;) -एर्विन धोमेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

धमुशी.

llपुण्याचे पेशवेll
Tue, 05/18/2010 - 16:48 नवीन
धमुशी. सहमत आहे. टिकलो तर आम्ही देखील मिपाच्या उत्कर्षास आधार होऊ. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

नीलकांत

सुमीत भातखंडे
Tue, 05/18/2010 - 16:10 नवीन
नीलकांतला मनापासून शुभेच्छा. मिपाची घोडदौड अशीच उत्तरोत्तर चालू राहो.
  • Log in or register to post comments

योग्य निर्णय

विकास
Tue, 05/18/2010 - 16:24 नवीन
सुयोग्य निर्णय आहे! तात्यांचे आणि नीलकांतचे अभिनंदन. नीलकांतला हे संकेतस्थळ असेच भरभराटीस ठेवता यावे म्हणून मनःपूर्वक शुभेच्छा! तसेच तात्यांना देखील त्यांच्या जबाबदार्‍या पूर्ण करता याव्यात म्हणून शुभेच्छा! -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Tue, 05/18/2010 - 17:14 नवीन
असेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+१

चित्रा
Tue, 05/18/2010 - 18:24 नवीन
असेच म्हणते. निर्णयाचे स्वागत आणि नीलकांत यांना अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

+१

प्राजु
Tue, 05/18/2010 - 19:11 नवीन
हेच म्हणते. फक्त एक सांगावेसे वाटते.. तात्या, मुखपृष्ठाची जबाबदारी तेवढी आपण घ्यावी... असे अगदी मनापासून वाटते. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.net/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

तात्या,

विसोबा खेचर
Wed, 05/19/2010 - 10:51 नवीन
तात्या, मुखपृष्ठाची जबाबदारी तेवढी आपण घ्यावी... असे अगदी मनापासून वाटते.
धन्यवाद प्राजू.. मी वेळ मिळेल तसा ती जबाबदारी घेईनही.. फक्त नीलकांताची त्यास परवानगी हवी.. आणि हो, जबाबदरी देणारच असेल तो तर नुसत्या मुखपृष्ठाची नको. खादाडी सदराचीही हवी.. ;) (विविध छायाचित्र प्रेमी) तात्या :) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

सुयोग्य निर्णय - अभिनंदन आणि धन्यवाद

धनंजय
Tue, 05/18/2010 - 20:05 नवीन
सुयोग्य निर्णय - अभिनंदन आणि धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

तात्यांना

निखिल देशपांडे
Tue, 05/18/2010 - 16:36 नवीन
तात्यांना त्यांचा ईतर जवाबदार्‍या पुर्ण करता याव्या यासाठी शुभेच्छा!!! बाकी नीलकांतचे अभिनंदन, मिपाची घोडदौड अशीच उत्तरोत्तर चालू राहो. निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments

कवी

अरुण मनोहर
Tue, 05/18/2010 - 16:40 नवीन
कवी असल्यामुळे तुमच्या मनाची भावुकता मला जरा अधिकच विवश करून गेली. :( >>>हे निवेदन देतांना शब्दशः उर भरून येत आहे. मिसळपाव मोठे करत रहा त्याची काळजी घ्या, फार कष्टाने इथवर आले आहे हो !<<< तात्यानुं काही काळजी करू नका. तुम्ही एक समर्थ स्थळ उभारले आहे. तुम्ही जमवलेली ही सगळी चमु म्हणजे "नवरत्न दरबार" आहे. मिपा उत्तरोत्तर यशाची मोठी पाउले चालेल ह्यात शंका नाही. निलकांत सारखा अनमोल नीलमणी ह्या स्थळाचे वैभव वाढवणार आहे हे वाचून खूप आनंद झाला. निलकांत आणि संपादक मंडळींना एक विनंती- मिपाची शक्ती त्याच्या वेगळेपणात आहे. ईथे मस्ती, दंगल, विचार मंथन, ललीत कला, पाक कला, फोटोग्राफी, आणि नुसताच टाईम पास असे सगळे पैलू आहेत. कधी लाथाळ्या ही होतात, पण चहाच्या पेल्यातील वादळासारखे ते असते. येणारे सवंगडी अतिशय विस्तृत क्षेत्रातून आले आहेत. सतत कडक ईस्त्री घालून वावरावे लागत नाही. हसी मजाक नुसती चालतच नाही तर दौडते. हा मिपाचा आत्मा कायम ठेवा. तात्या, तुमच्या ज्या काही अडचणी असतील, त्या दूर होतील ह्याची खात्री बाळगा. तुमच्या ह्रदयात संगीताचा झरा वाहत आहे. ह्या कठीण काळातून पार पडण्यासाठी ते संगीतच तुमची शक्ती बनेल.
  • Log in or register to post comments

तुम्ही

पर्नल नेने मराठे
Tue, 05/18/2010 - 16:49 नवीन
तुम्ही जमवलेली ही सगळी चमु म्हणजे "नवरत्न दरबार" आहे. =)) =)) =)) चुचु रत्नपारखी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर

चुचु

अरुण मनोहर
Tue, 05/18/2010 - 18:49 नवीन
:? चुचु :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

शुभेच्छा

इन्द्र्राज पवार
Tue, 05/18/2010 - 16:41 नवीन
१०,०००+ हा आकडाच श्री.तात्या अभ्यंकर आणि नीलकांत यांच्या कल्पकतेचे उदाहरण आणि "मिसळपाव" यशस्वी होण्याचे द्योतक आहे. श्री. अभ्यंकर यांच्या व्यक्तिगत जीवनात आलेले मळभ लवकर दूर होवो तसेच श्री.नीलकांत यांना हा जगन्नाथाचा रथ चालविण्याचे बळ लाभो याच शुभेच्छा !! ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

तिन्ही लोक

टारझन
Tue, 05/18/2010 - 16:43 नवीन
तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :) मिपा भरभराटी साठी आमचा स्ट्राँग अ‍ॅक्स्टीव्ह सहभाग असेल (बुरुंज) टारझन
  • Log in or register to post comments

स्तुत्य निर्णय ...

छोटा डॉन
Tue, 05/18/2010 - 16:56 नवीन
अत्यंत महत्वाच्या क्षणी अचुक आणि स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल तात्या अभ्यंकर आणि नीलकांत ह्या दोघांचेही अभिनंदन ! खरे तर ह्याची वेळ आलीच होती, कारण गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांच्या निमित्ताने अनेक विघ्नसंतोषी व्यक्तींना आंतरजालावर धुडगुस घालण्यास फावले होते. उत्तरे द्यायला कोणीच नसल्याने त्याचा मनोसोक्त दंगा चालु होता व त्यामुळे सामान्य वाचक अकारण वेठीस धरला जात होता. तुर्तास तात्या अभ्यंकरांनी स्पष्टपणे सर्व जबाबदारी आणि संबंधित गोष्टी नीलकडे सोपवल्या असल्याने अनेक प्रश्नांची योग्य ती उत्तरे योग्य त्या चौकस लोकांना मिळाली असतील व आता त्यामुळे इथले वातावरण निवळण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे. देवाच्या कॄपेने तात्या अभ्यंकर लवकरात लवकर त्यांच्या समस्यांतुन सुरक्षितपणे मोकळे होवो आणि पुन्हा पहिल्या जोमाने आपल्या विशिष्ठ शैलीतले लेख, माफक करमणुक करणारे धागे, व्यक्तिचित्रे आणि आंतरजालीय गजाल्या ह्यासाठी आम्हाला पुन्हा उपलब्ध होवोत हीच सदिच्छा ! नव्या कार्यभारासाठी नीलकांतचे अभिनंदन आणि सोबत त्याला खुप शुभेच्छांसकट 'संपुर्ण सहकार्य'. इतर सर्व जणांनीही आता भुतकाळातील इतर बाबी विसरुन नीलकांतचय नेतॄत्वाखाली मिपाच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी प्रामाणिक योगदान द्यावे ही सुज्ञ अपेक्षा. नव्या जबाबदार्‍या व अधिकार व त्या सोबत येणार्‍या अपेक्षा ह्यांचे ओझे फार मोठ्ठे आहे, नील ते समर्थपणे पेलेल ही खात्री आहे आणि त्यासाठी आमची त्याला नेहमी साथ आहे ... आजचे हे निवेदन पाहुन खुप आनंद झाला व 'मिसळपाव.कॉम' आता पुन्हा जोमाने वाटचाल करु लागेल असे वाटते आहे. असो. ------ ( शुभेच्छुक) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments

+१

लवंगी
Tue, 05/18/2010 - 17:42 नवीन
अतिशय समर्पक प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+२

गणपा
Tue, 05/18/2010 - 18:54 नवीन
डॉण्रावांशी बाडिस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

+३

विकास
Tue, 05/18/2010 - 19:29 नवीन
सहमत डॉनरावांच्या या प्रतिसादानिमित्त त्यांना अधिकाधिक सुपार्‍या मिळत राहोत ही शुभेच्छा! :) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

तडिपारी ...

छोटा डॉन
Tue, 05/18/2010 - 20:09 नवीन
>>डॉनरावांच्या या प्रतिसादानिमित्त त्यांना अधिकाधिक सुपार्‍या मिळत राहोत ही शुभेच्छा! आमेन ! विकासराव, कशाला खेचताय गरिबाची ? अहो मोठ्ठ्या मुश्किलीने आधी झालेली तडिपारी रद्द करुन घेतली आहे आणि कसाबसा जगतो आहे ;) ------ छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ह्म्म....

धमाल मुलगा
Tue, 05/18/2010 - 20:15 नवीन
'त्या पन्नास' जणांच्या यादीतले आपण एक वाटतं. असो! विषयांतराबद्दल क्षमस्व. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अच्छा

विकास
Tue, 05/18/2010 - 20:16 नवीन
अहो मोठ्ठ्या मुश्किलीने आधी झालेली तडिपारी रद्द करुन घेतली आहे पोलीसात ओळख दिसतीयं ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

नाही

श्रावण मोडक
Tue, 05/18/2010 - 20:32 नवीन
नाही. विकासराव, नाही. त्यासाठी 'बारामती'करांशी ओळखी लागतात. मग ते पोलिसांना सांगतात. मग पोलीस ऐकतात. काय योग आहे पहा. सगळे तीर नेमके कसे निशाण्यावर लागतात. पंढरीच्या विठोबाची कृपा ही... काय डान्राव, बरोबर ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

असो.

छोटा डॉन
Tue, 05/18/2010 - 20:43 नवीन
>>पंढरीच्या विठोबाची कृपा ही... +१, सहमत ... बोला "पुंढरिक वरदा हाऽऽऽरी विठ्ठलऽऽऽ !' बाकी बरेच संदर्भ राहिले हो मोडक ? असे कसे काय घडले ? ते अनुशेष, दबावगट, पक्षाचा चेहरा , महामंडळे, अनुदान वागैरे बर्‍याच बाबी आहेत ;) >>सगळे तीर नेमके कसे निशाण्यावर लागतात. =)) इथे खुप अवांतर होत असल्यास वेगळा धागा काढावा ;) त्या निमित्ताने आम्हालाही नव्या ४ बाबी शिकता येतील :) ------ ( मोडकांचा मानस शिष्य ) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

दबावगट

आनंदयात्री
Tue, 05/18/2010 - 20:45 नवीन
>>ते अनुशेष, दबावगट, पक्षाचा चेहरा , महामंडळे, अनुदान वागैरे बर्‍याच बाबी आहेत ख्या ख्या ख्या ... एकच नंबर रे डॉन्या !! =)) =)) आणी मानसपुत्र का स्वयंघोषित मानसपुत्र ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

हा हा हा..

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 05/20/2010 - 11:32 नवीन
हा हा हा.. विषय निघाला आहे म्हणून विचारतो. काकांच्या प्रॉपर्टीचे काय झाले? मानसपुतण्या कुठे गेल्या? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Phoenix
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

चिंता नको...

श्रावण मोडक
गुरुवार, 05/20/2010 - 21:07 नवीन
हाहाहाहा... मालमत्तेची चिंता नको. मानसपुतण्या आहेत, पुतण्याही आहेच. ते सोडवतील राव हा प्रश्न. आपण कुठं डोकं गुंतवा त्यात? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

तात्यांची

विजुभाऊ
Wed, 05/19/2010 - 12:10 नवीन
तात्यांची प्रांजळ निवेदन वाचून बरे वाटले. मिपाशी जुळलेली आमची नाळ कधीच तुटणार नव्हती. बाकी माझ्या ही भावना डान्याप्रमाणेच तात्या अभ्यंकर लवकरात लवकर त्यांच्या समस्यांतुन सुरक्षितपणे मोकळे होवो आणि पुन्हा पहिल्या जोमाने आपल्या विशिष्ठ शैलीतले लेख, माफक करमणुक करणारे धागे, व्यक्तिचित्रे आणि आंतरजालीय गजाल्या ह्यासाठी आम्हाला पुन्हा उपलब्ध होवोत हीच सदिच्छा ! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+१ असेच म्हणतो

संदीप चित्रे
Wed, 05/19/2010 - 23:36 नवीन
>> तात्या अभ्यंकर लवकरात लवकर त्यांच्या समस्यांतुन सुरक्षितपणे मोकळे होवो आणि पुन्हा पहिल्या जोमाने आपल्या विशिष्ठ शैलीतले लेख, माफक करमणुक करणारे धागे, व्यक्तिचित्रे आणि आंतरजालीय गजाल्या ह्यासाठी आम्हाला पुन्हा उपलब्ध होवोत हीच सदिच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

शतशः आभार

उदय सप्रे
Tue, 05/18/2010 - 17:04 नवीन
तात्या साहेब, मिपा मुळे खूप चांगले वाचता आले, शिकता आले.आपला अत्यंत आभारी आहे.आपल्या समस्या देव लव्करच सोडवेल ही सदिच्छा ! आपला विनम्र, उदय सप्रेम
  • Log in or register to post comments

तात्या,

टुकुल
Tue, 05/18/2010 - 17:11 नवीन
तात्या, निलकांत आणी मिसळपावचे अभिनंदन १०,००० आकडा गाठल्याबद्दल. --टुकुल
  • Log in or register to post comments

एकच गोष्ट कितीदा सांगणार?

प्रमोद देव
Tue, 05/18/2010 - 17:48 नवीन
(|:
  • Log in or register to post comments

जाऊ द्या हो!

इनोबा म्हणे
Tue, 05/18/2010 - 18:05 नवीन
जाऊ द्या हो! सिद्धहस्त लेखक आहेत ते. घ्यायचं आपलं सांभाळून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

सांडलो

टारझन
Tue, 05/18/2010 - 18:36 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) सांडलो -(सिद्धहस्त वाचक) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

मिसळपाव हे

अमोल केळकर
Tue, 05/18/2010 - 19:04 नवीन
मिसळपाव हे संकेतस्थळ मराठी संकेतस्थळांच्या महाजालात आपले वेगळेपण जपून ठेवेल यात शंका नाही पुढील वाटचालीस शुभेच्छा !! अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

तात्यांना धन्यवाद आणि नीलकांतचे अभिनंदन ....

प्रसन्न केसकर
Tue, 05/18/2010 - 20:25 नवीन
मिसळपाववर दोन एक वर्षांपुर्वी असाच फिरत फिरत आलो अन इथलाच झालो. खूप चांगले मित्र मिळाले मला इथं. अगदी व्यक्तीगत अडचणी आल्या तेव्हा रात्रभर दवाखान्यात माझ्याबरोबर रात्र काढणारे मित्र मिसळपाववर भेटले. मराठीत स्वतःला व्यक्त करण्याची संधी तर मिळालीच पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे सतत इतर सदस्यांकडुन, तात्यांकडुन, संपादकांकडुन प्रोत्साहन आणि सकारात्मक सूचना मिळाला. असं संकेतस्थळ उभारणं हे सोपं काम नव्हे. ते केल्याबद्दल तात्यांना धन्यवाद द्यावेत ते थोडेच. नीलकांतची निवड सर्वोत्तम आहे याबाबत कुणालाच शंका असु नये. त्याला यशच मिळत राहील अशी मला खात्री आहे.
  • Log in or register to post comments

+ १ जे झाले

दशानन
Tue, 05/18/2010 - 20:52 नवीन
+ १ जे झाले ते वाईटच झाले तसे पाहता पण परिवर्तन हा नियम आहे व ते होत राहतोच. असो. जे बदलत आहेत त्यांचे बदल योग्य आहेत. ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर

असहमत

आनंदयात्री
Tue, 05/18/2010 - 21:07 नवीन
असहमत. -१ चुकिचे अशी पाचर सॉ सॉरी टाचण मारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

तुम्ही

दशानन
Tue, 05/18/2010 - 21:18 नवीन
तुम्ही चुकीच्या संकेतस्थळावर आहात मग ;) टाचणासाठी असो. ** प्रतिसादावर येतो... असहमतीचे कारण नाही सांगितले पण जे मला वाटले ते त्यानुसार लिहतो.. व्यक्तीगत जीवनामध्ये व्यक्ती कसा वागतो व का वागतो त्याची काही कारणे वेगळी असू शकतात म्हणून मी ते वाक्य लिहले होते... उगाच धत्तड धत्तड करुन नाचलो नाही कारण अवस्था / व्यवस्था व परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असते वर एखाद्याच्या दुख:वर नाचावे एवढी वाईट अवस्था माझ्या मनस्थितीची नक्कीच झालेली नाही. काही चुकले असू शकते.. म्हणून नाचणे अयोग्यच. ÿÿÿ ©º°¨¨°º©©º°¨¨°º© राजे ©º°¨¨°º©©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा