तात्यानु मिपा सारखं सुरेख संस्थळ तुमच्यामुळे उदयास आलं यासाठी आपले शतशः आभार. तुमच्या सर्व समस्या लवकरात लवकर सुटोत हीच मनापासुन ईच्छा.
नीलकांतास अनेक अनेक शुभेच्छा..
मुखपृष्ठ आणि खादाडी सदर हेदेखील अजून एखाद दोन दिवसच चालवीन.. त्यानंतर त्याचीही काळजी नीलकांतने आणि त्याच्या संपादक मंडळाने घ्यावी..
मराठी संस्थळाच्या बाबतीत 'मुखपृष्ठ', 'खादाडी सदर', 'संपादकीय' या सारख्या काही नव्या कल्पनांना जन्म देऊन त्या मी काही काळ राबवू शकलो याचा मला आनंद आहे..
तात्या.
झाले ते झाले.. तात्या काय त्या अडचणी निस्तरुन परत लवकर या.
आम्ही तुमची वाट पाहु. स्वामींचा जप करा. ते मार्ग दाखवतील.
निलकांतचे अभिनंदन व शुभेच्छा !!!
चुचु
:) आंद्याचा एक जुना धागा आठवला आणि तेच चित्र इथे पुन्हा टाकलं रे बाबा. :)
बाकी, इतर धाग्यांवर मालकीहक्काचा गदारोळ करणार्या मुखवट्यांच्या आयडींचे इथले मौन अंमळ 'untold tales' सांगुन जाताहेत असं का वाटतंय बरं मला?
असो!
हेल नीलकांत ;)
-एर्विन धोमेल. ;)
सुयोग्य निर्णय आहे! तात्यांचे आणि नीलकांतचे अभिनंदन.
नीलकांतला हे संकेतस्थळ असेच भरभराटीस ठेवता यावे म्हणून मनःपूर्वक शुभेच्छा!
तसेच तात्यांना देखील त्यांच्या जबाबदार्या पूर्ण करता याव्यात म्हणून शुभेच्छा!
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
हेच म्हणते.
फक्त एक सांगावेसे वाटते..
तात्या, मुखपृष्ठाची जबाबदारी तेवढी आपण घ्यावी... असे अगदी मनापासून वाटते.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
तात्या, मुखपृष्ठाची जबाबदारी तेवढी आपण घ्यावी... असे अगदी मनापासून वाटते.
धन्यवाद प्राजू.. मी वेळ मिळेल तसा ती जबाबदारी घेईनही.. फक्त नीलकांताची त्यास परवानगी हवी..
आणि हो, जबाबदरी देणारच असेल तो तर नुसत्या मुखपृष्ठाची नको. खादाडी सदराचीही हवी.. ;)
(विविध छायाचित्र प्रेमी) तात्या :)
तात्यांना त्यांचा ईतर जवाबदार्या पुर्ण करता याव्या यासाठी शुभेच्छा!!!
बाकी नीलकांतचे अभिनंदन, मिपाची घोडदौड अशीच उत्तरोत्तर चालू राहो.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
कवी असल्यामुळे तुमच्या मनाची भावुकता मला जरा अधिकच विवश करून गेली. :(
>>>हे निवेदन देतांना शब्दशः उर भरून येत आहे. मिसळपाव मोठे करत रहा त्याची काळजी घ्या, फार कष्टाने इथवर आले आहे हो !<<<
तात्यानुं काही काळजी करू नका. तुम्ही एक समर्थ स्थळ उभारले आहे. तुम्ही जमवलेली ही सगळी चमु म्हणजे "नवरत्न दरबार" आहे. मिपा उत्तरोत्तर यशाची मोठी पाउले चालेल ह्यात शंका नाही.
निलकांत सारखा अनमोल नीलमणी ह्या स्थळाचे वैभव वाढवणार आहे हे वाचून खूप आनंद झाला. निलकांत आणि संपादक मंडळींना एक विनंती-
मिपाची शक्ती त्याच्या वेगळेपणात आहे. ईथे मस्ती, दंगल, विचार मंथन, ललीत कला, पाक कला, फोटोग्राफी, आणि नुसताच टाईम पास असे सगळे पैलू आहेत. कधी लाथाळ्या ही होतात, पण चहाच्या पेल्यातील वादळासारखे ते असते. येणारे सवंगडी अतिशय विस्तृत क्षेत्रातून आले आहेत. सतत कडक ईस्त्री घालून वावरावे लागत नाही. हसी मजाक नुसती चालतच नाही तर दौडते.
हा मिपाचा आत्मा कायम ठेवा.
तात्या, तुमच्या ज्या काही अडचणी असतील, त्या दूर होतील ह्याची खात्री बाळगा. तुमच्या ह्रदयात संगीताचा झरा वाहत आहे. ह्या कठीण काळातून पार पडण्यासाठी ते संगीतच तुमची शक्ती बनेल.
१०,०००+ हा आकडाच श्री.तात्या अभ्यंकर आणि नीलकांत यांच्या कल्पकतेचे उदाहरण आणि "मिसळपाव" यशस्वी होण्याचे द्योतक आहे. श्री. अभ्यंकर यांच्या व्यक्तिगत जीवनात आलेले मळभ लवकर दूर होवो तसेच श्री.नीलकांत यांना हा जगन्नाथाचा रथ चालविण्याचे बळ लाभो याच शुभेच्छा !!
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
अत्यंत महत्वाच्या क्षणी अचुक आणि स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल तात्या अभ्यंकर आणि नीलकांत ह्या दोघांचेही अभिनंदन !
खरे तर ह्याची वेळ आलीच होती, कारण गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांच्या निमित्ताने अनेक विघ्नसंतोषी व्यक्तींना आंतरजालावर धुडगुस घालण्यास फावले होते.
उत्तरे द्यायला कोणीच नसल्याने त्याचा मनोसोक्त दंगा चालु होता व त्यामुळे सामान्य वाचक अकारण वेठीस धरला जात होता.
तुर्तास तात्या अभ्यंकरांनी स्पष्टपणे सर्व जबाबदारी आणि संबंधित गोष्टी नीलकडे सोपवल्या असल्याने अनेक प्रश्नांची योग्य ती उत्तरे योग्य त्या चौकस लोकांना मिळाली असतील व आता त्यामुळे इथले वातावरण निवळण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
देवाच्या कॄपेने तात्या अभ्यंकर लवकरात लवकर त्यांच्या समस्यांतुन सुरक्षितपणे मोकळे होवो आणि पुन्हा पहिल्या जोमाने आपल्या विशिष्ठ शैलीतले लेख, माफक करमणुक करणारे धागे, व्यक्तिचित्रे आणि आंतरजालीय गजाल्या ह्यासाठी आम्हाला पुन्हा उपलब्ध होवोत हीच सदिच्छा !
नव्या कार्यभारासाठी नीलकांतचे अभिनंदन आणि सोबत त्याला खुप शुभेच्छांसकट 'संपुर्ण सहकार्य'.
इतर सर्व जणांनीही आता भुतकाळातील इतर बाबी विसरुन नीलकांतचय नेतॄत्वाखाली मिपाच्या भविष्यातल्या वाटचालीसाठी प्रामाणिक योगदान द्यावे ही सुज्ञ अपेक्षा.
नव्या जबाबदार्या व अधिकार व त्या सोबत येणार्या अपेक्षा ह्यांचे ओझे फार मोठ्ठे आहे, नील ते समर्थपणे पेलेल ही खात्री आहे आणि त्यासाठी आमची त्याला नेहमी साथ आहे ...
आजचे हे निवेदन पाहुन खुप आनंद झाला व 'मिसळपाव.कॉम' आता पुन्हा जोमाने वाटचाल करु लागेल असे वाटते आहे.
असो.
------
( शुभेच्छुक) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
सहमत
डॉनरावांच्या या प्रतिसादानिमित्त त्यांना अधिकाधिक सुपार्या मिळत राहोत ही शुभेच्छा! :)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
>>डॉनरावांच्या या प्रतिसादानिमित्त त्यांना अधिकाधिक सुपार्या मिळत राहोत ही शुभेच्छा!
आमेन !
विकासराव, कशाला खेचताय गरिबाची ?
अहो मोठ्ठ्या मुश्किलीने आधी झालेली तडिपारी रद्द करुन घेतली आहे आणि कसाबसा जगतो आहे ;)
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
अहो मोठ्ठ्या मुश्किलीने आधी झालेली तडिपारी रद्द करुन घेतली आहे
पोलीसात ओळख दिसतीयं ;)
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
नाही. विकासराव, नाही. त्यासाठी 'बारामती'करांशी ओळखी लागतात. मग ते पोलिसांना सांगतात. मग पोलीस ऐकतात.
काय योग आहे पहा. सगळे तीर नेमके कसे निशाण्यावर लागतात. पंढरीच्या विठोबाची कृपा ही...
काय डान्राव, बरोबर ना?
>>पंढरीच्या विठोबाची कृपा ही...
+१, सहमत ...
बोला "पुंढरिक वरदा हाऽऽऽरी विठ्ठलऽऽऽ !'
बाकी बरेच संदर्भ राहिले हो मोडक ?
असे कसे काय घडले ?
ते अनुशेष, दबावगट, पक्षाचा चेहरा , महामंडळे, अनुदान वागैरे बर्याच बाबी आहेत ;)
>>सगळे तीर नेमके कसे निशाण्यावर लागतात.
=))
इथे खुप अवांतर होत असल्यास वेगळा धागा काढावा ;)
त्या निमित्ताने आम्हालाही नव्या ४ बाबी शिकता येतील :)
------
( मोडकांचा मानस शिष्य ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
हा हा हा.. विषय निघाला आहे म्हणून विचारतो. काकांच्या प्रॉपर्टीचे काय झाले?
मानसपुतण्या कुठे गेल्या?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
तात्यांची प्रांजळ निवेदन वाचून बरे वाटले. मिपाशी जुळलेली आमची नाळ कधीच तुटणार नव्हती.
बाकी माझ्या ही भावना डान्याप्रमाणेच
तात्या अभ्यंकर लवकरात लवकर त्यांच्या समस्यांतुन सुरक्षितपणे मोकळे होवो आणि पुन्हा पहिल्या जोमाने आपल्या विशिष्ठ शैलीतले लेख, माफक करमणुक करणारे धागे, व्यक्तिचित्रे आणि आंतरजालीय गजाल्या ह्यासाठी आम्हाला पुन्हा उपलब्ध होवोत हीच सदिच्छा !
>> तात्या अभ्यंकर लवकरात लवकर त्यांच्या समस्यांतुन सुरक्षितपणे मोकळे होवो आणि पुन्हा पहिल्या जोमाने आपल्या विशिष्ठ शैलीतले लेख, माफक करमणुक करणारे धागे, व्यक्तिचित्रे आणि आंतरजालीय गजाल्या ह्यासाठी आम्हाला पुन्हा उपलब्ध होवोत हीच सदिच्छा !
मिसळपाव हे संकेतस्थळ मराठी संकेतस्थळांच्या महाजालात आपले वेगळेपण जपून ठेवेल यात शंका नाही
पुढील वाटचालीस शुभेच्छा !!
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
मिसळपाववर दोन एक वर्षांपुर्वी असाच फिरत फिरत आलो अन इथलाच झालो. खूप चांगले मित्र मिळाले मला इथं. अगदी व्यक्तीगत अडचणी आल्या तेव्हा रात्रभर दवाखान्यात माझ्याबरोबर रात्र काढणारे मित्र मिसळपाववर भेटले. मराठीत स्वतःला व्यक्त करण्याची संधी तर मिळालीच पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे सतत इतर सदस्यांकडुन, तात्यांकडुन, संपादकांकडुन प्रोत्साहन आणि सकारात्मक सूचना मिळाला. असं संकेतस्थळ उभारणं हे सोपं काम नव्हे. ते केल्याबद्दल तात्यांना धन्यवाद द्यावेत ते थोडेच.
नीलकांतची निवड सर्वोत्तम आहे याबाबत कुणालाच शंका असु नये. त्याला यशच मिळत राहील अशी मला खात्री आहे.
प्रतिक्रिया
तात्यानु
मुखपृष्ठ
रौशनी ... तेव्हढे पूर्ण करा कि तात्या ...
झाले ते
नीलकांतचे अभिनंदन
नीलकांतचे अभिनंदन
शुभेच्छा
+
तात्या,
ये धत्तड तत्तड
ये धत्तड
विश्वकर्मा नीलकांता...
धमुशी.
नीलकांत
योग्य निर्णय
+१
+१
+१
तात्या,
सुयोग्य निर्णय - अभिनंदन आणि धन्यवाद
तात्यांना
कवी
तुम्ही
चुचु
शुभेच्छा
तिन्ही लोक
स्तुत्य निर्णय ...
+१
+२
+३
तडिपारी ...
ह्म्म....
अच्छा
नाही
असो.
दबावगट
हा हा हा..
चिंता नको...
तात्यांची
+१ असेच म्हणतो
शतशः आभार
तात्या,
एकच गोष्ट कितीदा सांगणार?
जाऊ द्या हो!
सांडलो
मिसळपाव हे
तात्यांना धन्यवाद आणि नीलकांतचे अभिनंदन ....
+ १ जे झाले
असहमत
तुम्ही