तुमचे विच्छेदन वाचायला नक्कीच गंमत वाटली. खरच किती लीलया सांगीतलेय.
>>तर थेटराच्या पिटाने
म्हणजे थिएटर मधील पिटात बसलेल्या लोकांनी म्हणायचेय काय? आमच्या मराठी शब्दकोशात सापडले नाही. का हे "हायर लेवल" संस्कृत आहे?
-----------------------------------------------
प्रतिभा आणि प्रतिमा वा वा! झाल आता काय कप्पाळ संस्कृत काव्य होणार माझ्याच्यान
> थिएटर मधील पिटात बसलेल्या लोकांनी म्हणायचेय काय?
१००% मार्क. याला इंग्रजीत सिनेक्डकी (synechdoche) का असे काहीसे गमतीदार नाव असलेला फिगर ऑफ स्पीच मानतात. म्हणजे "अमेरिकन लोकांना असे वाटते" ऐवजी "अमेरिकेला असे वाटते", वगैरे म्हणणे.
असेच म्हणतो...
हा लेख पुन्हा एकदा शांतपणे वाचून काढणार आहे.
गझलेवरच्या लेखाच्या दुव्यासाठीही धन्स. तोही वाचतो.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
हा एकदम भन्नाट प्रकार आहे...
आणि म्हणायला येतंय , अर्थ उत्तम आहे...
... आवडलं स्तोत्र...
.हे मुखपृष्ठावर आणल्याबद्दल धन्यवाद तात्या...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
धनंजयराव,
कमाल आहे. स्तोत्ररचना करायला शिकवायची म्हणजे जबरदस्तच. फारच उत्तम विवेचन केलेत. मजा आली. तुम्ही खरेच सिद्धहस्त आहात.
आमच्या दारी एकदा एक विक्रेता आला होता. त्याने बहुपयोगी किसणी आणली होती. त्या तळहाताता पेक्षा थोड्या मोठ्या किसणीवर अनेक प्रकारची भोके होती. त्याने भराभर वेगवेगळ्या ठिकाणावरुन गाजर, कोबी, टोमॅटोचे काप, कांद्याचे काप इत्यादी करुन पाह़णार्यांस चकित केले. मग ती किसणी काहिंनी विकत सुद्धा घेतली. पण नंतर मात्र त्या सहजतेने आणि लीलेने आम्हाला कोणालाच तश्या फोडी-काप-कीस जमला नाही. 'तेथे पाहिजे जातीचे !' हेच खरे. आपण ज्या सोप्या पद्धतीने रचना करणे शिकवले आहे ते वाचताना स्फूर्ती वगैरे आली.. पण ते तुमच्या सारख्या प्रतिभावंतालाच शक्य आहे हे मी मनातून जाणून आहे.
आपल्या कल्पकतेची आणि नवे प्रयोग करण्याच्या हौशीची कमाल वाटते.
-- लिखाळ.
बाजारात उत्तम पावा वाजवणार्या विक्रेत्याकडुन मी अनेकदा पावा विकत आणला. पण माझ्या हाती येताच त्याने शिट्टीपेक्षा वेगळा आवज कधीच काढला नाही.
कुठली चाल आवडते आपल्याला, बरे ही बघू :
ललालला ललालला ललालला ललालला ।
ललालला ललालला ललालला ललालला ॥
संस्कृत शिकताना अशा सोप्या चाली असतील मजेमजे संस्कृत शिकता येईल
गजानन वाटव्यांची मुलाखत एकदा टीव्हीवर पाहिली होती
"अण्णा, तुमच्या चाली किती सोप्या आहेत ना"
"त्याच अस आहे कि जेवढे शब्द तेवढ्या मात्रा, आता हे पहाना
फांद्यावर बांधिले ग मुलीनी झुले
पंचमीचा सण आला डोळे माझे ओले||"
आम्हाला एक प्रश्न पडला होता कि मुलीनी हे एकवचन कि अनेक वचन . पण नंतर लक्षात आले कि तृतीया विभक्ती नी हा जर मुलींनी/ मुलीन्नी असा उच्चार ला तर मात्रा बदलते. पण नी अगोदरचा मुली शब्द हा मात्र कवीला अनेकवचनी अभिप्रेत असावा
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
स्तोत्र अतिशय आवडले आणि त्यामाअचे विश्लेषणही. साधारणतः वृत्तबद्ध कविता लिहिताना कवीच्या मनातील कॅक्ल्युलेशन्स ची अतिशय अचूक ओळख. लेखाशी पूर्ण रिलेट करू शकलो, सबब मुद्दाम वर काढत आहे.
प्रतिक्रिया
:-)
हायर लेव्हल इंग्लिश!
धनंजया,
धन्य आहे रे बाबा तुझी.
हा एकदम
मस्तच
अरे वा, म्हणूनच 'स्तोत्र रचले' असे म्हणतात का?
कवितेची पाककृती
बहुपयोगी किसणी
मजमजेत संस्कृत
स्तोत्र अतिशय आवडले आणि