ओढ
लेखनविषय:
काव्यरस
क्षणात हसले क्षणात रुजले,
वसंता तूझे गीत कोवळे..
दंवे सुखाने तृणही रमले,
कळ्यात हळवे भ्रमर गुंतले !
प्राजक्त फुले गंध दरवळे,
फुलूनी आली बकुळफूले..
गुलाब गाली ओज झळकले,
समीरानेही अंग झटकले !
माळरानी रानफुल एकले,
त्यानेही तव गीत ऐकले..
तोर्यात उभी निशिगंधा बोले,
मला सख्याचे वेड लागले !
हळुवार तुझी चाहूल वसंता,
बघ वसुधेने बाहू पसरले ..
विरह व्याकुळ प्रिया जणू ,
भेटाया तुज मन आसावले !
विशाल
वाचने
2192
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
सुंदर निसर्ग कविता......!
डाक्तरदादा, धंकू बर्का :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
In reply to डाक्तरदाद by विशाल कुलकर्णी
>>>डाक्तरदादा, धंकू बर्का
असं काय ! येऊ द्या पुढच्या वेळेला कविता ? :)
-दिलीप बिरुटे
=P~
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आवडली.
गुलाब गाली ओज झळकले,
समीरानेही अंग झटकले !
ह्म्म!! आळस गेला सारा.
धन्यवाद उठवल्या बद्दल. आता वारा पण अन्ग झटकु लागला तर आम्हि पामर काय झोपणार?
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
आभार !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
जबरा!
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
चांगली कविता. वसंताच्या आगमनाने पृथ्वी हरखली हा तसा जुनाच विषय आहे. त्याचे आणखीन नवीन पैलू दिसले असते तर बहार आली असती.
खूप आवडली कविता.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
सुंदर