मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओढ

विशाल कुलकर्णी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
क्षणात हसले क्षणात रुजले, वसंता तूझे गीत कोवळे.. दंवे सुखाने तृणही रमले, कळ्यात हळवे भ्रमर गुंतले ! प्राजक्त फुले गंध दरवळे, फुलूनी आली बकुळफूले.. गुलाब गाली ओज झळकले, समीरानेही अंग झटकले ! माळरानी रानफुल एकले, त्यानेही तव गीत ऐकले.. तोर्‍यात उभी निशिगंधा बोले, मला सख्याचे वेड लागले ! हळुवार तुझी चाहूल वसंता, बघ वसुधेने बाहू पसरले .. विरह व्याकुळ प्रिया जणू , भेटाया तुज मन आसावले ! विशाल

वाचने 2192 वाचनखूण प्रतिक्रिया 10

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 04/05/2010 - 12:28
सुंदर निसर्ग कविता......!

In reply to by विशाल कुलकर्णी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 04/05/2010 - 12:50
>>>डाक्तरदादा, धंकू बर्का असं काय ! येऊ द्या पुढच्या वेळेला कविता ? :) -दिलीप बिरुटे

स्पंदना 04/05/2010 - 14:55
गुलाब गाली ओज झळकले, समीरानेही अंग झटकले ! ह्म्म!! आळस गेला सारा. धन्यवाद उठवल्या बद्दल. आता वारा पण अन्ग झटकु लागला तर आम्हि पामर काय झोपणार? शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

राजेश घासकडवी 04/05/2010 - 22:57
चांगली कविता. वसंताच्या आगमनाने पृथ्वी हरखली हा तसा जुनाच विषय आहे. त्याचे आणखीन नवीन पैलू दिसले असते तर बहार आली असती.